Thursday 5 September 2024

काकोरी कट घटना


( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती. 


- दिनांक: ९ ऑगस्ट १९२५

- स्थान: काकोरी जवळ, लखनऊजवळील एक लहान गाव, (उत्तर प्रदेश) 


प्रमुख सहभाग:


- हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA): काकोरी घटना हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या सदस्यांनी घडवून आणली होती, ही १९२४ मध्ये स्थापन झालेली ब्रिटिश शासनाविरुद्ध लढण्यासाठीची क्रांतिकारी संघटना होती

.

- प्रमुख क्रांतिकारी: 

  - रामप्रसाद बिस्मिल (या ऑपरेशनचे नेते)

  - अशफाकुल्ला खान

  - चंद्रशेखर आझाद

  - राजेंद्र लाहिरी

  - रोशन सिंग

  - मुकुंदी लाल

  - सचिंद्र बक्षी

  - बनवारी लाल

  - केशब चक्रवर्ती

  - ठाकूर रोशन सिंग

  - विष्णु शरण दुब्लिश


उद्दिष्टे:


- क्रांतिकारी क्रियाकलापांसाठी निधी जमा करणे: काकोरी घटनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे सरकारी निधी घेऊन जाणाऱ्या ट्रेनची लूट करणे होते. क्रांतिकारकांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी त्यांचे क्रियाकलाप चालवण्यासाठी आणि शस्त्रास्त्रे खरेदी करण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून पैसा जप्त करण्याचा प्रयत्न केला.


घटना:


- ९ ऑगस्ट १९२५ रोजी, क्रांतिकारकांनी काकोरी येथे ८-डाउन सहारनपूर-लखनऊ ट्रेनची चेन खेचून ट्रेन थांबवली. त्यांनी ट्रेनमध्ये ठेवलेली सरकारी पैसे असलेली तिजोरी लुटली. लुटलेली रक्कम सुमारे ₹८,००० होती, जी त्या वेळी एक मोठी रक्कम होती.


परिणाम:


- अटक आणि खटले: लुटीनंतर, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी HRA वर मोठा आघात केला. अनेक सदस्यांना अटक करण्यात आली आणि "काकोरी कट प्रकरण" नावाचा खटला चालवला गेला.


- शिक्षा:

  - रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान, राजेंद्र लाहिरी आणि रोशन सिंग यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली आणि १९२७ मध्ये त्यांची फाशी झाली.

  - इतर क्रांतिकारकांना वेगवेगळ्या शिक्षा सुनावण्यात आल्या, ज्यामध्ये जन्मठेपेची शिक्षा देखील होती.


महत्व:


- स्वातंत्र्य चळवळीची प्रेरणा: काकोरी घटना ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या प्रतिकाराचे प्रतीक बनली. या घटनेमुळे अनेक तरुण भारतीयांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली.

- शहादत: बिस्मिल, अशफाकुल्ला खान, लाहिरी, आणि रोशन सिंग यांची फाशी भारतीय इतिहासात शहादत म्हणून ओळखली जाते, जी त्यांच्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाचे प्रतीक आहे.


वारसा:

- काकोरी घटना ही ब्रिटिश राजवटीविरुद्धच्या धैर्याच्या कृती म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची तीव्रता वाढल्याचे दिसते. या घटनेत सहभागी झालेल्या क्रांतिकारकांचे स्मरण भारताच्या स्वातंत्र्य संघर्षातील नायक म्हणून केले जाते. उत्तर प्रदेशात विशेषतः दरवर्षी या घटनेचे स्मरण केले जाते.


ह घटना भारतातील क्रांतिकारक क्रियाकलापांमध्ये एक महत्त्वपूर्ण वळण म्हणून ओळखली जाते, ज्यामुळे ब्रिटिश अधिकाऱ्यांविरुद्ध अधिक थेट आणि लढाऊ कृतींना चालना मिळाली. 


मुघल साम्राज्याचा उदय


♦️1. बाबर (सन 1526 ते 1530) :

✔️Founder 


✔️Battle of Khanwa

:Babur defeated Rana Sunga of Mewar and his allies.


✔️Battle of Ghaghra

Babur defeated the joint forces of the Afghans and Sultan of Bengal


✔️Babur defeated Ibrahim Lodi in the first battle of Panipat.



2. हुमायून (सन 1530 ते 1555) :


• बिहारमधील अफगाणचा प्रमुख शेरशहा सुरीने चौसाच्या लढाईत हुमायूमचा पराभव केला.

• यामुळे हुमायूमला पळून जावे लागले चौसाच्या दुसर्‍या लढाईत (सन 1540) हुमायूचा दुसर्‍यांदा पराभव करून मुघलांची सत्ता संपूष्ठात आणली.


3. शेरशहा सूरी (सन 1540 ते 1554) :-

:सूरी वंशाची स्थापना केली. शेरशहाने जनतेच्या हितार्थ अनेक योजना सुरू केल्या.

✔️जमीन महसूल सुधारणा: –

• शेतीची प्रत निश्चित करून उत्पादनानुसार शेतसारा निश्चित केला.

✔️रस्ते बांधणी :-

✔️चलन व्यवस्था :-

• त्याने रुपया हे नाणे सुरू केले.

✔️टपाल व्यवस्था :-


४.हुमायून (सन 1555 ते 1556) :


🔥His biography Humayunnama was written by Gulbadan Begum in Persian language.


5. अकबर (1556 ते 1606) :


   ✔️second battle of Panipat in 1556

  ✔️In the Battle of Haldighati, Rana Pratap Singh was severely defeated by the Mughal army

   ✔️ Chand Bibi defended Ahmednagar against the Mughal forces.


✔️Ibadat Khana (House of worship) at his new capital Fatepur Sikri.

• अकबर हा सहष्णू राजा होता.

• त्याने युद्धकैद्यांना गुलाम बनविण्याची प्रथा बंद केली.

• सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.

• हिंदूवर लादण्यात आलेला झिझिया कर रद्द केला.

• बालहत्या प्रथा बंद केली.

• सर्व धर्माची तत्वे एकत्र करून दिन-ए-रलाही धर्माची स्थापना केली.

✔️, he promulgated a new religion called Din Ilahi or Divine Faith.

कला व विद्याप्रेमी :-

• अकबराच्या काळात आगर्‍याचा किशाल किल्याचे व फत्तेपूर शिक्रीचा किल्ला बांधला.

• अकबराच्या काळातच तानसेन व बैजू बाबरा सारखे गायक प्रसिद्धीला आले.

• अकबराच्या काळात अथर्ववेद, पंचतंत्र, रामायण व महाभारताचे फारसी भाषेत रूपांतर करण्यात आले.

• तुलसीदासचे रामचरितमानस याच काळात रचले गेले.

• अकबराच्या नवरत्न दरबार प्रसिद्ध होता.


6. जहांगीर (1606 ते 1627) :


• त्याने पूर्व बंगाल व पंजाबमधील कांगडा प्रांत राज्यास जोडले. हा राजा कलाप्रेमी होता.

• मुघल चित्रकलाशैली याच राज्याच्या काळात प्रसिद्धीला आली.

• काश्मिरमधील प्रसिद्ध निशांत बाग व शालिमार बाग जहांगीर राजनेच बांधली.

• जाहांगीरच्या कारभारावर नूरजहांचे नियंत्रण होते.


7. शहाजहान (सन 1627 ते 1658) :

• त्याने दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतूबशाहींना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्या मदतीने निझामशाही संपुष्टात आणली.

• 

• शहाजहान हा कलाप्रेमी राजा होता. त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तु बांधली. दिल्ली जामा मशीद आणी लाल किल्ला हे याच राज्याच्या काळात बांधले गेले.


8. औरंगजेब (सन 1658 ते 1707) :

👉🏾Alamgir, World Conqueror.


✔️ninth Guru of Sikhs Guru Tegbahadur was executed by Aurangazeb.


• औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघल साम्राज्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली होती. 


याच काळात पंजाब प्रांतात शिखांविरुद्ध संघर्ष सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.


• औरंगजेबास आपली 21 वर्षे मराठ्यांसोबत संघर्ष करण्यात खर्च करावी लागली. परंतु, त्यास यश आले नाही.

• शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. 



औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले.


• सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले.

महत्त्वाच्या आयोगांची माहिती

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- स्थापना: 1926

- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 


 📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315

- संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317, 


 🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324

- स्थापना: 26 जानेवारी 1950

- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK

- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.


 💰 CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148

- स्थापना: 1858

- संरचना: 1 महालेखा परीक्षक

- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.


 ⚖️ Lokpal (लोकपाल)


- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013

- स्थापना: 2019

- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.


⚖️ Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980

- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल 


 👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: 1993

- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.


👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993

- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001

- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल

- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.


🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003

- स्थापना: 1964

- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त

- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.


👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1985

- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985

- स्थापना: 1991

- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)

- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार: 


📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978

- स्थापना: 1966

- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य

- कार्यकाल: 3 वर्षे

- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती

- काढून टाकण्याचा अधिकार:


महत्वाचे खटले

❇️केशवानंद भारती खटला 1973:-

✍️भारतीय संसद पूर्णपणे सार्वभौम नाही तर सर्वोच्च न्यायालय पूर्णपणे सार्वभौम नाही तर दोघांच्या अधिकारामध्ये पर्याप्त संतुलन निर्माण करण्यात आले आहे

✍️प्रास्ताविक घटनेचा भाग असल्याचं स्पष्ट केले

✍️मूलभूत हक्काचं उल्लंघन करणाऱ्या कायदयला आव्हान देता येऊ शकेल


❇️मिनर्व्हा मिल खटला 1980:- 

✍️भारताची घटना मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यामधील संतुलन च्या आधारशिलेवर आधारलेली आहे

✍️घटनेने संसद ला घटनादुरुस्ती चा मर्यादित अधिकार दिलेला आहे त्याचा वापर करून संसद अमर्यादित अधिकारात बदलू शकत नाही

✍️राष्ट्रीय आणीबाणीच्या उद्घोषणेला दूषप्रवृत्ती च्या आधारावर आव्हान देत येऊ शकेल


❇️बेरुबारी युनियन खटला 1960:-

✍️प्रास्ताविक घटनेचा भाग नसल्याचे स्पष्ट केले


❇️ए के गोपालन खटला 1950:- (

✍️कलम 21 अंतर्गत संरक्षण केवळ असंगत कार्यकारी कृती च्या विरुद्ध उपलब्ध आहे ,असंगत कायदेशीर कृती विरुद्ध नाही


❇️मेनका गांधी खटला1978:- (https://t.me/joinchat/Rju74jGW683AtnSf)

✍️कलम 21 ला कायद्याची उचित प्रक्रिया हे तत्व लागू केले


❇️आय आर कोहेल्लो खटला 2007:- (https://t.me/joinchat/Rju74jGW683AtnSf)

✍️नवव्या अनुसुचितील कायद्यांना न्यायिक पुनर्विलोकन पासून संरक्षण प्राप्त नाही.


❇️एस आर बोंमई खटला 1994:- (https://t.me/joinchat/Rju74jGW683AtnSf)

✍️घटना संघत्मक असल्याचे स्पष्ट केले तसेच संघराज्यवाद घटनेचे मूलभूत वैशिष्ट्य असल्याचे स्पष्ट केले.

भाऊराव पायगौंडा पाटील


(२२ सप्टेंबर १८८७–९ मे १९५९). 


महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून गाडगे महाराज (Gadge Maharaj) यांनी त्यांना कर्मवीर पदवी दिली.  ते अण्णा या नावानेही परिचित आहेत.

 जन्म:


कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ घराणे मूडब्रिदी (जि. दक्षिण कन्नड – कर्नाटक) गावचे. देसाई हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु पुढे त्यांच्या घराण्याला पाटीलकी मिळाल्याने ते देसाईचे पाटील झालेत. 


शिक्षण:

एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. राजर्षी शाहूमहाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.


भाऊराव हे ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत फिरल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. 


कार्य:

१९०९ मध्ये दादा जिनप्पा मद्वण्णा यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दूधगाव (जि. सांगली) येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. या शिक्षण संस्थेपासून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी १९१९ मध्ये कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता. पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. त्या वेळी गांधीजींनी ‘भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तीस्तंभ है’ अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले. गोरगरीब पण हुशार मुले जेथेजेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, या मंत्राबरोबरच भाऊरावांनी ‘तुम्हास एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा’ हा संदेश दिला.

सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य पतकरून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले.वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले (Mahatma Jyotirao Govindrao Phule) व राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Mharaj) यांची शिक्षणाप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ते सत्यशोधक समाज (Satyashodhak Samaj) याचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. 


निधन:

भाऊराव यांचे हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले.

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...