Saturday, 27 July 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️ ऑलिम्पिक स्पर्धेत महाराष्ट्रातील 5 खेळाडूंचा समावेश
1) प्रवीण जाधव (तिरंदाजी)
2) अविनाश साबळे (स्टीपलचेज)
3) सर्वेश कुशारे (उंच उडी)
4) चिराग शेट्टी (बॅडमिंटन)
5) स्वप्निल कुसळे (रायफल शूटिंग)

❇️ 2034 ची ऑलिंपिक आणि पॅरालिम्पिक हिवाळी खेळांचे आयोजन : सॉल्ट लेक सिटी-उटा राज्य ( अमेरिका ) येथे होणार आहे
◾️आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या सदस्यांनी   पॅरिसच्या 142 व्या IOC सत्रादरम्यान निर्णय घेतला .
◾️IOC चे अध्यक्ष थॉमस बाख
◾️2002 मध्ये सॉल्ट लेक सिटी मध्ये Winter onlympic चे आयोजन करण्यात आले होते

❇️कॅथोलिक धर्मगुरू लेखक आणि पर्यावरणवादी, फादर फ्रान्सिस डी'ब्रिट्टो यांचे निधन झाले.
◾️25 जुलै 2024 रोजी निधन
◾️2020 :  93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष ( धाराशिव)
◾️2013 : महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा साहित्य पुरस्कार
◾️2014 : साहित्य अकादमीचा पुरस्कार
 
❇️ विधानपरिषद निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांचा 28 जुलै रोजी शपथविधी होणार आहे.
◾️विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनिर्वाचित सदस्यांना शपथ देणार आहेत.
◾️विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी  दि. 12 जुलै 2024  रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. 
◾️28 जुलै, 2024 रोजी विधानभवनातील सेंट्रल हॉल  येथे सकाळी 11 वाजता  शपथविधी होणार आहे.
◾️यामध्ये योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, भावना गवळी, कृपाल तुमाने, शिवाजीराव गर्जे, राजेश विटेकर, मिलिंद नार्वेकर, प्रज्ञा सातव या निवडून आलेल्या  नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश

❇️ NITI आयोगाच्या 9 वी गव्हर्निंग कौन्सिलची बैठक
◾️अध्यक्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी
◾️थीम : विकसित भारत @2047
◾️राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री आणि नायब राज्यपाल, पदसिद्ध सदस्य आणि विशेष निमंत्रित म्हणून केंद्रीय मंत्री आणि NITI आयोगाचे उपाध्यक्ष, सुमन बेरी उपस्थित
◾️महाराष्ट्राकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल:

🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

bird sanctuaryआल्फ्रेड विणकर यांनी मांडलेल्या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार उत्तरेला असणाऱ्या लाॅरेशिया व दक्षिणेला असणारा गोंडवाना या दोन भूमीच्या दरम्यान टेथिसा नावाचा समुद्र पसरलेला होता भूगर्भातील हालचाली उत्तरेकडील लाॅरेशिया व दक्षिणेकडील गोंडवाना या भूमि जवळ येऊ लागल्या व टेथिसा समुद्रांचा तळ घड्यांसारखा वर उचलला जाऊन यापासून हिमालय या घडीच्या पर्वतांची निर्मिती झाली. या हिमालयीन पर्वतावर होणाऱ्या भरपूर पर्जन्य वर्षावामुळे येथे अनेक नद्यांचे उगम झाले.

या हिमालयात उगम पावणार्‍या नद्यांनी खाली मैदानात येतांना आपल्यासोबत बराच गाळ वाहून आणला या गाळापासून भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेपासून (यमुना नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या राजमहाल टेकड्या) भारतीय द्वीपकल्प पठारी प्रदेशाला सुरुवात होते. उत्तर भारतीय पठारी प्रदेश व दक्षिण भारतीय पठारी प्रदेश या दोन प्रादेशिक विभागाचा समावेश होतो. दक्षिण भारतीय पठारी प्रदेशातील एक पठार म्हणजे महाराष्ट्र पठार होय. या पठाराची भूमी ही प्राचीन गोंडवानाची भूमी आहे.

तसेच भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी पश्चिम किनारपट्टी चे प्रदेश व द्विकल्पीय पठारी प्रदेश या दोन प्राकृतिक विभागांचा समावेश हा महाराष्ट्रात होतो.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

🌹🌹महाराष्ट्र हा प्राकृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. पश्चिमेला असणारे कोकण किनारपट्टी, भारतातील सात पर्वत प्रणालीपैकी प्रमुख सह्याद्री पर्वत व सातपुडा पर्वत या दोन पर्वत प्रणाली व ज्वालामुखीपासून तयार झालेले महाराष्ट्र पठार अशी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे.

प्राकृतिक रचना अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण प्राकृतिक प्रभाव हा त्या भागावरील हवामानावर होतो.

महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये सम हवामान आहे तर पूर्व पठारावर विषम हवामान आहे. हवामान व प्राकृतिक रचना या दोघांच्या प्रभावाने याच भागातील मृदा तयार होते. (जास्त पाऊस पडणाऱ्या भागात कमी सुपीक, तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात अधिक सुपीक जमीन) ज्या भागात जसे हवामान व मृदा त्या पद्धतीची पिके तेथे घेतली जातात. कोकणात फळ व भात पिके तर  पठारावर कापूस

म्हणजेच एकूणच एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना ही त्या देशाची वा राज्याची विकासाची दिशा ठरवू शकते.

🌸🌸🌺🌺🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

1) प्रस्तरभंग (Geological Fault) :- भूगर्भातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठिण खडकांनी बनविलेल्या भूपृष्ठावर आडव्या परंतु एकमेकांविरुद्ध किंवा क्षितिज समांतर दिशेने कार्य करत असेल तर भूपृष्ठावर ताण निर्माण होऊन भूपृष्ठाला घड्या न पडता तडे पडतात. त्यास प्रस्तरभंग असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

2) गट पर्वत ( Block Mountain) :- कठीण भूपृष्ठावर जर एकाच वेळी दुहेरी प्रस्तरभंग झाला असेल तर काहीवेळा प्रस्तरभंग बाहेरील भाग स्थिर राहतो व मधला भाग वर उचलला जातो, तर काही वेळा व दुहेरी प्रस्तरभंगाच्या मधला भाग स्थिर राहतो व दोन्ही बाजूंकडील भाग खाली खचतो तेव्हा मधला भाग उंच दिसतो. त्यास गट पर्वत अथवा ठोकळ्याचा पर्वत असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत.

🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

3) अवशिष्ट पर्वत :- भूपृष्ठावरील एखादा उंचवटा मृदू व कठीण खडकापासून तयार झालेला असेल, अशा उंचवट्यावर होणाऱ्या बाह्य घटकांच्या उत्खनन कार्यामुळे मृदू खडकांची झीज होते व कठीण खडक अस्तित्वात राहतात, ते सभोवतालच्या खडकांपेक्षा उंच दिसतात. त्याला अवशिष्ट पर्वत असे म्हणतात.

उदा :-सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, अरवली पर्वत.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

4) घळई (V Shape Vally) :- नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना तीव्र उतारावरून वाहते. त्यावेळी तिचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे नदीचे  तळभागाचे म्हणजे अधोगामी क्षरण (शीर्ष क्षरण) हें काठांच्या क्षरणापेक्षा (पार्श्व क्षरण) जास्त असते. म्हणजेच तळ भागाची झीज जास्त होते व काठावरील बाजू तीव्र उताराची होते याला  घळई म्हणतात.

उदा:- प्रवरा नदीवर रंधा धबधब्याखाली घळई निर्माण झाली आहे.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?


📌 _ देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात.


✍️ _ संविधानाच्या कलम 356 नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.


✍️ _ संविधानाच्या कलम 365 नुसार, एखादे राज्य सरकार केंद्राच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करत असल्यासही त्या संबंधित राज्यात राष्ट्रपती राजवट घोषित करणे शक्य असते.


👉 _ राष्ट्रपती राजवट लागू झाल्यापासून दोन महिन्यांच्या आत संसदेची मान्यता मिळवणे आवश्यक असते.


👉 _ संसदेच्या मंजूरीनंतर सहा महिन्यांसाठी राष्ट्रपती राजवट लागू करता येते.


📌 _ संसदेने पुढील सहा महिन्यांसाठी मान्यता दिल्यास राष्ट्रपती राजवटीचा कालावधी वाढवता येऊ शकतो.


📌 _ संसदेची मान्यता मिळत असली, तरीही कोणत्याही राज्यात जास्तीत जास्त तीन वर्षापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य असते.


राष्ट्रपती राजवटीत न्यायालयीन वगळता राज्याची सर्व सत्ता राष्ट्रपतींच्या हाती असते.


राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून बहुतांश वेळा राज्यपालच राज्याचे शासन चालवतात.


राज्यपाल राज्याच्या मुख्य सचिवांच्या सहाय्याने शासन चालवतात.


राष्ट्रपती राजवटीत संबंधित राज्याच्या विधिमंडळाची कार्ये, अधिकार संसदेकडे सोपवले जातात.


राष्ट्रपती स्वतः आदेश देऊन राज्य सरकारच्या सेवेतील कोणत्याही अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगू शकतात.


लोकसभेची बैठक नसल्यास राज्याच्या संचित निधीतून पैसा खर्च करण्याचा आदेश राष्ट्रपती त्या कालावधीमध्ये देऊ शकतात.


राष्ट्रपती राजवटीतही उच्च न्यायालयाचे अधिकार अबाधित असतात.


संबंधित राज्याच्या विधानसभेचे विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना असतो.


राष्ट्रपती राजवट आणि महाराष्ट्र (What is President’s rule)


महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट दोनवेळा लावण्यात आली होती.


महाराष्ट्रात पहिल्यांदा 1980 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.


त्यावेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुलोद सरकार बरखास्त करण्यात आले होते. बरखास्तीनंतर विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या.


त्यावेळी महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती शासन लागू करण्यात आले होते.


महाराष्ट्रात दुसऱ्यांदा 2014 मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.


2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती.


त्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार सत्तेवर येईपर्यंत राष्ट्रपती राजवट लागू होती.


⚡️ _2014 मध्ये राष्ट्रपती राजवट का होती?


2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी राजीनामे दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने पृथ्वीराज चव्हाण सरकारचा पाठिंबा काढून घेतल्यानं ते सरकार अल्पमतात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर राज्यापालांच्या शिफारशीवरून राज्यात राष्ट्रपती राजवट (What is President’s rule) लागू करण्यात आली. 

प्रश्न सराव


1. वस्तूच्या कंपनामुळे ____ ची निर्मिती होते. 

अ. ध्वनी 

ब. प्रतिध्वनी 

क. अवतरंग 

ड. प्रकाश 


उत्तर अ. ध्वनी 


2. खालील पैकी कशामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असेल.

अ. पाणी

ब. वायू

क. लाकडी ठोकळा 

ड. निर्वात वातावरण 


उत्तर क. लाकडी ठोकळा 


3. कार्य करण्यासाठी साठवलेली क्षमता म्हणजे 

अ. बल

ब. ऊर्जा 

क. शक्ती 

ड. गती


उत्तर ब. ऊर्जा 


4. न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला ?

अ. डाल्टन 

ब. चॅडविक 

क. रूदरफोर्ड 

ड. थॉमसन 


उत्तर ब. चॅडविक 


5. आधुनिक आवर्तसारणीमध्ये किती आवर्त आहेत ?

अ. आठ

ब. सात

क. नऊ

ड. सहा


उत्तर ब. सात


6. हा वैश्विक द्रावक आहे.

अ. हवा

ब. अल्कोहोल 

क. पाणी

ड. रॉकेल


उत्तर क. पाणी


7. ज्वलनासाठी कोणत्या वायूची गरज असते. 

अ. ऑक्सीजन 

ब. नायट्रोजन 

क. सल्फर डाय ऑक्साईड 

ड. कार्बन डाय ऑक्साईड 


उत्तर अ. ऑक्सीजन 


8. वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असणारे प्राणी कोणते ?

अ. शाकाहारी 

ब. मिश्राहारी 

क. कीटकहारी 

ड. मांसाहारी 


उत्तर ड. मांसाहारी 


9. अन्न तयार करण्यासाठी वनस्पतींना कशाची गरज असते?

अ. ऑक्सीजन 

ब. सुर्यप्रकाश 

क. माती

ड. अंधार 


उत्तर ब. सुर्यप्रकाश 


10. प्लेगच्या साथीसाठी कोणता प्राणी कारणीभूत असतो ?

अ. डास

ब. मासे

क. उंदीर 

ड. मासे


उत्तर क. उंदीर

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न विषय :-सामान्य ज्ञान


1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

👉साडी 


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

👉 अरबी समुद्र 


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

👉ठोसेघर धबधबा 


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

👉औरंगाबाद 


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

👉पुणे 


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

👉 भूकंप 


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

👉 नाशिक 


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

👉गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉नांदेड 


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

👉 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

👉अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

👉1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

👉 थंड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

👉 गडचिरोली 


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

👉 रत्नागिरी 

====================

सराव प्रश्नसंच - राज्यशास्त्र


● पंचायत समितीचा सचिव कोण असतो?

अ. सभापती

ब. तहसीलदार

क. गटविकास अधिकारी

ड. विस्तार अधिकारी.


उत्तर - क. गटविकास अधिकारी 


● पंचायत समितीचा उपसभापती आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतात?

अ. सभापती

ब. जिल्हाधिकारी

क. तहसीलदार

ड. गटविकास अधिकारी


उत्तर - अ. सभापती 


● जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची समिती कोणती आहे?

अ. विषय समिती

ब. स्थायी समिती

क. अर्थ समिती

ड. शिक्षण समिती


उत्तर - ब. स्थायी समिती 


● स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हटले जाते?

अ. महात्मा गांधी

ब. जवाहरलाल नेहरू

क. वसंतराव नाईक

ड. लॉर्ड रिपन


उत्तर - ड. लॉर्ड रिपन 


● स्थानिक स्वराज्य संस्थांना पंचायत राज हे नाव कोणी दिले ?

अ. जवाहरलाल नेहरू

ब. महात्मा गांधी

क. बलवंतराय मेहता

ब. वसंतराव नाईक


उत्तर - अ. जवाहरलाल नेहरू 


● पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते?

अ. महाराष्ट्र

ब. गुजरात

क. कर्नाटक

ड. राजस्थान


उत्तर - ड. राजस्थान 


● ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भुषवतो?

अ. ग्रामसेवक

ब. सरपंच

क. तलाठी

ड. तहसीलदार


उत्तर - ब. सरपंच 


● ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असते?

अ. 18

ब. 21

क. 23

ड. 25


उत्तर - अ. 18


● पंचायत व्यवस्थेविषयी घटनात्मक तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे?

अ. 73

ब. 14

क. 40

ड. 44


उत्तर - क. 40


● ग्रामसभेचे कामकाज सुरू करण्यासाठी किती गणपूर्ती आवश्यक असते?

अ. 10%

ब. 15%

क. 20%

ड. 25%

उत्तर - ब. 15%

Super Questions


1.   धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो? 

✅  - अमरावती


2.   कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते?

✅.  - कोरकू 


3.   अमरावती जिल्ह्यातून जाणार्‍या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?

✅.   - गाविलगड रांग 


4.  पैनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते?

✅.   - अजिंठा, बुलढाणा 


5.   पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?

✅.   - पैनगंगा 


6.  तापी नदीच्या खोर्‍यात येणारा जिल्हा कोणता? 

✅  - बुलढाणा 


 7.  अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे? 

✅  - विषम 


8.   बाळापूर हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? 

✅  - अकोला 


9.  कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - अकोला 


10.    जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?

✅.  - अकोला 


11.   विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता? 

✅   - अकोला 


12.    शिरपूर हे जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - अकोला 


13.   काटेपूर्णा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.  - अकोला 


14.   पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? 

✅.  - अकोला


15.   नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते?

✅.   - बुलढाणा   


16.   कापसाचे कोठार कोणत्या शहरास संबोधतात?

✅.   - अमरावती 


17   यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमाट आढळते?

✅.   - गोंड 


18.  लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - बुलढाणा 


19.    किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - नांदेड व यवतमाळ 


20.   यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो?

✅.   - गोंडवन 


21.    लाकडाचे आधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता ? 

✅.  - अमरावती 


22.   महाराष्ट्रातील बॉक्साइट कोणत्या जिल्ह्यात सापडते?

✅.  - अकोला, अमरावती 


23.  अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय?

✅.  - विदर्भ 


24.    चिखलदरा हे पर्वत शिकर कोणत्या पर्वतात आहे? 

✅.  - सातपुडा 


25.  टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे? 

✅.  - नांदेड व यवतमाळ 


26.  लोणार क्रेटर वनोद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे?

✅.   - बुलढाणा 


27.    जलगंगा धरण कोठे आहे? 

✅.  - बुलढाणा


28.  गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे?

✅.   - विदर्भ 


29.  हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात? 

✅.  - यवतमाळ 


30.  श्री दत्त अवधुताचे जागृत स्थान कोठे आहे? - कारंजा 


राज्यघटना टेस्ट क्र १♦️


1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?

१. ४४✅

२. ४८

३. ४६

४. ५०


2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.

१. घटनेचा मसुदा

२. मूलभूत अधिकार 

३. घटनेचा सरनामा ✅

४. मार्गदर्शक तत्त्वे


3. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?

१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅

२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण

३. लोकपाल 

४. लोकायुक्त


4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?

१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅

२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो 

३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते

४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो


5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?

१. गृहमंत्री

२. पंतप्रधान✅

३. राष्ट्रपती

४. उपराष्ट्रपती


5. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?

१. महाराष्ट्र विधानसभा - 278

२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88

३. लोकसभा - 543

४.राज्यसभा - 250✅


6. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.

१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅

२. हुंडा पद्धती बंद करणे

३. निरक्षरता दूर करणे 

४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे


7. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?

१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब

२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार 

३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅

४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार


8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?

१. कलम 21 

२. कलम 23 

३. कलम 24 ✅

४. कलम 28


9. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?

१. कलम 350

२. कलम 368✅

३. कलम 370 

४. कलम 360


10. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?

१. महाराष्ट्र 

२. राजस्थान 

३. जम्मू कश्मीर 

४. आंध्र प्रदेश✅


1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?

१. महात्मा गांधी

२. मानवेंद्र नाथ रॉय✅

३. डॉ बाबासाहेब आंबेडकर

४. जवाहरलाल नेहरू


2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?

१. डॉ राजेंद्र प्रसाद

२. एच सी मुखर्जी

३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅

४. पं मोतीलाल नेहरू


3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?

१. एच सी मुखर्जी

२. के एम मुन्शी 

३. वल्लभभाई पटेल

४. जे बी कृपलानी✅


4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.

१. कलम न 1✅

२. कलम न 2

३. कलम न 3

४. कलम न 4


5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?

१. यु एस ए 

२. जपान

३.जर्मनी

४. ब्रिटिश✅


6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?

१. बी एन राव

२. जवाहरलाल नेहरू

३. के एम मुन्शी

४. एच सी मुखर्जी✅


7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.

१. २२ जुलै १९४७✅

२. १७ नोव्हेंबर १९४७

३. २४ जानेवारी १९५०

४. ४ नोव्हेंबर१९४८


8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?

१. डॉ बाबासाहेब आंबेडकर

२. पं मोतीलाल नेहरू

३. डॉ राजेंद्र प्रसाद

४. जवाहरलाल नेहरू✅


9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.

१. २६/०१/१९५०✅

२. २६/११/१९४९

३. २६/०८/१९४७

४. ०४/११/१९४८


10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?

१. डॉ के एम मुन्शी

२. एन गोपालस्वामी अय्यंगार

३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर

४. बी एन राव✅


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?


१.19 ते 22✅

२.31 ते 35

३.22 ते 24

४.31 ते 51


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.


१.राष्ट्रपती✅

२.उपराष्ट्रपती

३.पंतप्रधान

४.राज्यपाल


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?


१.राष्ट्रपती

२ राज्यपाल

३.पंतप्रधान

४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅



4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?


१.11 डिसेंबर 1946✅

२.29 ऑगस्ट 1947

३.10 जानेवारी 1947

४.9 डिसेंबर 1946



5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.


१.परिशिष्ट-1

२.परिशिष्ट-2

३.परिशिष्ट-3✅

४.परिशिष्ट-4


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.


१.47✅

२.48

३.52

४.यापैकी नाही



7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?


१.डॉ. आंबेडकर

२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅

३.पंडित नेहरू

४.लॉर्ड माऊंटबॅटन



8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


१.डॉ. राजेंद्रप्रसाद

२.डॉ. आंबेडकर✅

३.महात्मा गांधी

४.पंडित नेहरू



9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?


१.लोकसभा

२.विधानसभा

३.राज्यसभा✅

४.विधानपरिषद


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?


१. लोकसभा सदस्य✅

२.मंत्रीमंडळ

३. राज्यसभा सदस्य

४. राष्ट्रपती


1.संविधानाच्या कुठल्या कलमांतर्गत लोकसभा आणि राज्य विधान सभा निवडणुका प्रौढ मताधिकाराने होणे नमूद केले गेले आहे?


१.322

२.324

३.326✅

४.329



2. SC-ST करिता विशेष तरतुदी संदर्भात असणाऱ्या यादीत कोणत्या जातीला समाविष्ट करायचे हा अंतिम अधिकार कोणाचा आहे?

१. संसद✅

२.राज्याचे राज्यपाल

३.राष्ट्रपती

४. सर्वोच्च न्यायालय



3.खालील विधानांचा विचार करा.

अ. लोकशाही समाजवादी प्रणालीमध्ये सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांचे सहअस्तित्व असते.

ब. भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ आहे.

क. भारतीय समाजवाद मार्क्सवादी समाजवादाकडे अधिक झुकलेला दिसतो.

ड. 1991 च्या 'उखाजा' धोरणामुळे भारताची समाजवादी ओळख कमी झाली आहे.


वरील विधानांतून योग्य विधाने ओळखा.

१.अ,ब,क,ड

२.अ,ब,ड✅

३.अ,क,ड

४.ब,क,ड


4.भारतीय राज्यघटना सरनाम्यातील सामाजिक , आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श नमूद केले आहेत. 


या तिन्ही प्रकारांचे मूळ स्रोत कोणते?

१.फ्रेंच राज्यक्रांती 1789

२.रशियन राज्यक्रांती 1917✅

३.जर्मनी (वायमर संविधान)

४.जपान संविधान


5. आंतरराष्ट्रीय न्यायालयात नियुक्त झालेले प्रथम भारतीय न्यायाधीश कोण होते?


१.डॉ नागेन्द्र सिंह✅

२.जी. वी. माळवणकर

३.जगदीश चंद्र बसु

४.आर. के. नारायण


6. नागरिकत्व मिळवणे व गमावणे याबाबत आणि नागरिकत्वासंबंधी इतर कोणत्याही विषयाबाबत तरतुदी करण्याचा संसदेचा अधिकार राज्यघटनेच्या कितव्या कलमात नमूद केलेला आहे?

१.कलम 11✅

२.कलम 10

३.कलम 9

४.कलम 8


7. परदेशस्थित भारतीय नागरिक कार्डधारक(OCI) व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्राप्तीसाठी अर्ज नोंदणीपूर्वी किती दिवस भारतीय वास्तव्य आवश्यक आहे?

१.12 महिने

२.3 वर्ष

३.5 वर्ष✅

४.7 वर्ष


8. भारतात प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार कोणाला दिला आहे?

१.राष्ट्रपती

२.पंतप्रधान

३.सर्वोच्च न्यायालय

४.संसद✅


9. मूलभूत हक्क अंमलबजावणीसाठी कायदे करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाला आहेत?

१.केंद्रीय मंत्रिमंडळ

२.संसद✅

३.राज्य विधिमंडळ

४.संसद आणि राज्य विधिमंडळ


10. खालील विधानांचा विचार करा.


अ. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क राज्यांच्या कारवाईपासून संरक्षित आहेत.


ब. कलम 19 अन्वये प्रदान करण्यात आलेले हक्क खासगी व्यक्तीपासून संरक्षित नाहीत.


क. कलम 19 मधील हक्क भारतीय नागरिक व कम्पनी भागधारकांना लागू आहेत.


ड. कलम 19 मधील हक्क परकीय नागरिक किंवा निगम/कम्पनी यांना लागू नाहीत.

पर्याय

१.अ,ब,क,ड✅

२.अ,ब,क

३.ब,क,ड

४.अ,ब,ड


१) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती ✅

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 



२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे✅

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे


३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅



४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग✅



५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य✅

क) दोन्ही

ड) यापैकी नाही


6) भारतात वृत्तपत्र स्वतंत्र चा हक्क कोणी दिला आहे?

१.प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया

२.भारतीय राज्यघटना✅

३.माहिती व प्रसारण मंत्रालय

४.प्रेस कोन्सिल ऑफ इंडिया


7) विधानपरिषदेची सदस्य संख्या विधानपरिषडेच्या सदरस्य संख्येच्या किती पट असते?

१.२/३

२.१/४

३.१/३✅

४.३/४


8.खालीलपैकी नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो?

१. नियोजन मंत्री

२.वित्तमंत्री

३.पंतप्रधान✅

४.राष्ट्रपती


9. केंद्र राज्य आर्थिक संसाधनांची विभागणी करणेबाबत शिफारस कोण करते?

१.राष्ट्रीय विकास परिषद

२.आंतरराज्य परिषद

३.नियोजन आयोग

४.वित्त आयोग✅


10. संस्थानांच्या विलीनीकरणाबाबत सर्वात महत्वाची भूमिका कोणी बजावली?

१.जवाहरलाल नेहरू

२.सरदार पटेल✅

३.महात्मा गांधी

४.मोतीलाल नेहरू


१) राज्यघटनेने मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी निदेश जारी करण्याचे अधिकार ____ दिलेले आहेत.

१) सर्वोच्च न्यायालयास कलम ३२ अन्वये     २) उच्च न्यायालयास कलम २२६ अन्वये

३) सर्वोच्च न्यायालय कलम ३२ अन्वये आणि उच्च न्यायालय कलम २२६ अन्वये असे दोघांनाही✅

४) कोणतेही न्यायालयास किंवा अधिकरणास


२) राजकुमारी अमृत कौर या कोणत्या मतदारसंघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या?

१) बिहार    २) किंद्रीय प्रांत ✅   ३) बॉम्बे    ४) पंजाब


३) राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्त्वांचा स्वीकार केला आहे.

अ) एकेरी न्यायव्यवस्था    ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता

क) समान अखिल भारतीय सेवा

१) अ, क      २) अ, ब     ३) ब, क      ४) वरील सर्व✅


४) योग्य क्रम निवडा

अ) भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करणे     ब) सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण करणे

क) नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करणे     ड) संविधानाचा सन्मान करणे


५) भारतीय संविधानातील कोणता भाग हा महिलांच्या सन्मानाला न शोभणाऱ्या प्रथांचा त्याग करण्याबाबत सुचवितो?

१) मूलभूत अधिकार   २) मूलभूत कर्तव्ये ✅   ३) प्रस्तावना     ४) राज्याच्या उद्दिष्टांची मार्गदर्शक तत्त्वे


६) घटनेच्या मूलभूत अधिकारांतर्गत खालीलपैकी कोणते कलम योग्य पर्यावरणात प्रतिष्ठीतपणे जगण्याचा अधिकार देते?

१) २१  ✅   २) २२     ३) २३     ४) २४


७) संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती समिती बरोबर जुळत नाही?

समिती     -     अध्यक्ष

१) सुकाणू समिती - डॉ. राजेंद्र प्रसाद      

२) कामकाज समिती - के. एम. मुन्शी

३) मुलभूत हक्क उपसमिती - जे. बी. कृपलानी

४) अल्पसंख्याक उपसमिती - मौलाना अबुल कलाम आझाद✅


८) राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे भारताच्या संविधानातील कोणत्या भागात वर्णन केली आहेत?

१) भाग १     २) भाग २     ३) भाग ३     ४) भाग ४✅


९) ९ डिसेंबर १९४६ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली. या समितीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले?

१) डॉ.बी.आर. आंबेडकर २) डॉ. राजेंद्र प्रसाद  ३) डॉ. सचिदानंद सिन्हा  ✅४) पंडित जवाहरशलाल नेहरू


१०) १९३५ च्या कायद्यात कशाची तरतूद होती?

१)प्रौढ मताधिकार

२)साम्राज्य अंतर्गत शासन✅

३)सापेक्ष स्वायत्तता


1.विधानसभेचा सदस्य होण्यासाठी वयाची किती वर्षे पूर्ण लागतात?

1. 30 वर्षे

2. 21 वर्षे

3. 25 वर्षे✅

4. 18 वर्षे


2.कोणाच्या शिफारशिशिवाय धनविधेयक विधानसभेत मांडता येत नाही?

1. मुख्यमंत्री

2. राज्यपाल✅

3. राष्ट्रपती

4. यापैकी नाही


3. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतात?

1. पंतप्रधान व मुख्यमंत्री

2. राज्यपाल✅

3. राष्ट्रपती

4. मुख्य न्यायमूर्ती


4.जिल्ह्यातील महसूल प्रशाशनाचे प्रमुख कोण असतात?

1. तहसीलदार

2. जिल्हाधिकारी✅

3. आयुक्त

4. उपजिल्हाधिकारी

  


5. महाराष्ट्रात पंचायतराज व्यवस्था कधी पासून अमलात आणली?

1. १ मे १९६०

2. १ मे १९६१

3.  १ मे १९६२✅

4.  १ मे १९६४


6. 4G Wi= Fi   (वाय - फाय) सेवा देणारी देशातील पहिली नगरपरिषद कोणती? 

1. अकलूज

2. इस्लामपूर✅

3. मिरज

4. सांगली


7. भारतात महिलांसाठी .......... जागा राखीव आहेत 

1. लोकसभा

2. पंचायतराज संस्था

3. राज्य विधिमंडले

4. यापैकी nahi✅


8. ग्रामपंचायतीमध्ये कमीत कमी सदस्यांची संख्या किती? 

1.पाच

2. सात✅

3. नऊ

4. अकरा


9. तलाठ्याच्या कार्यालयास काय म्हणतात?

1. चावडी

2. पार

3.दफ्तर

4. सजा✅


10. कोतवालाची नेमणूक खालीलपैकी कोण करतो?

1. तहसीलदार✅

2. उपविभागीय अधिकारी

3. जिल्हाधिकारी

4. विभागीय अधिकारी

भारतीय इतिहास


प्रश्‍न 1- वैदिक गणित का महत्‍वपूर्ण अंग क्‍या है।

उत्‍तर - शुल्‍व सूत्र ।

प्रश्‍न 2- वेदों की संख्‍या कितनी है।

उत्‍तर - 4 ।


प्रश्‍न 3- सबसे प्राचीन वेद कौन सा है।

उत्‍तर - ऋग्‍वेद ।


प्रश्‍न 4- किस वेद द्वारा वैदिक संस्‍कृति के बारे में ज्ञान होता है।

उत्‍तर - ऋग्‍वेद द्वारा ।


प्रश्‍न 5- भारत के राजचिन्‍ह में लिखा 'सत्‍य मेव जयते' किस उपनिषद से लिया गया है।

उत्‍तर - मुंडक उपनिषद से ।


प्रश्‍न 6- भारतीय संगीत का आदि ग्रंथ किस वेद को कहा जाता है।

उत्‍तर - सामवेद ।


प्रश्‍न 7- कृष्‍ण भक्ति का प्रथम एवं प्रधान ग्रंथ कौन सा है।

उत्‍तर - श्रीमद्भागवत गीता ।


प्रश्‍न 8- पुराणों की संख्‍या कितनी है।

उत्‍तर - 18 ।


प्रश्‍न 9- वैदिक धर्म का मुख्‍य लक्षण किसकी उपासना था ।

उत्‍तर - प्रकृति ।


प्रश्‍न 10- किस देवता के लिए ऋग्‍वेद में पुरंदर शब्‍द का प्रयोग हुआ है।

उत्‍तर - इंद्र के लिए ।


प्रश्‍न 11- जैन धर्म व बौद्ध धर्म , दोनों के उपदेश किसके शासन काल में दिए गये ।

उत्‍तर - बिंबिसार ।


प्रश्‍न 12- बौद्ध धर्म ग्रहण करने वाली प्रथम महिला कौन थी ।

उत्‍तर - महाप्रजापति गौतमी ।


प्रश्‍न 13- गौतम बुद्ध का प्रथम धर्मोपदेश क्‍या कहलाता है।

उत्‍तर - धर्मचक्र प्रवर्तन ।


प्रश्‍न 14- बौद्ध के ग्रह त्‍याग का प्रतीक क्‍या है।

उत्‍तर - अश्‍व ।


प्रश्‍न 15- गौतम बुद्ध द्वारा भिक्षुणी संघ की स्‍थापना कहा की गई ।

उत्‍तर - कपिलवस्‍तु में ।


प्रश्‍न 16- शून्‍यता का सिद्धान्‍त किस बौद्ध दार्शनिक ने प्रतिपादित किया ।

उत्‍तर - नागार्जुन ।


प्रश्‍न 17- महावीर स्‍वामी को प्रथम शिष्‍य कौन था ।

उत्‍तर - जमालि ।


प्रश्‍न 18- प्रथम जैन महासभा का आयोजन कहा हुआ ।

उत्‍तर - पाटलिपुत्र ।


प्रश्‍न 19- जैन धर्म के श्‍वेताम्‍बर व दिगंम्‍बर सम्‍प्रदायों का विभाजन कब हुआ ।

उत्‍तर - चंद्रगुप्‍त मौर्य के समय में ।


प्रश्‍न 20- महावीर ने जैन संघ की स्‍थापना कहॉ की ।

उत्‍तर - पावा में ।


प्रश्‍न 21- भारत पर पहला तुर्की आक्रमण किसने किया।

उत्‍तर - 986 ई. में गजनी के सुबुक्‍तीगीन ने।

प्रश्‍न 22- महमूद गजनवी किसका पुत्र था।

उत्‍तर - सुबुक्‍तीगीन।


प्रश्‍न 23- महमूद गजनवी गजनी का शासक किस वर्ष बना।

उत्‍तर - 998 ई.।


प्रश्‍न 24- महमूद गजनवी ने भारत पर कितनी बार आक्रमण किया।

उत्‍तर - 17 बार (1001-1027 ई. तक)।


प्रश्‍न 25- 1001 ई. में गजनवी के आक्रमण का सामना किस हिन्‍दूशाही वंश के शासक ने किया।

उत्‍तर - जयपाल।


प्रश्‍न 26- गजनवी ने मुल्‍तान पर हमला कब किया।

उत्‍तर - 1006 ई.।


प्रश्‍न 27- जब गजनवी ने मुल्‍तान पर आक्रमण किया तब मुल्‍तान का शासक कौन था।

उत्‍तर - अब्‍दुल फतह दाऊद।


प्रश्‍न 28- सोमनाथ पर किसने आक्रमण किया था।

उत्‍तर - महमूद गजनवी (1025 ई. में)


प्रश्‍न 29- भारत में तुर्की राज्‍य का संस्‍थापक किसे माना जाता है।

उत्‍तर - मुल्‍तान।


प्रश्‍न 30- तराइन का प्रथम युद्ध (1191 ई.) में मुहम्‍मद गोरी को किसने हराया।

उत्‍तर - पृथ्‍वीराज चौहान।


प्रश्‍न 31- तराइन के दूसरे युद्ध (1192 ई.) में किसकी जीत हुई।

उत्‍तर - मुहम्‍मद गोरी।

प्रश्‍न 32- पृथ्‍वीराज चौहान को बंदी बनाकर मुहम्‍मद गोरी कहां ले गया।

उत्‍तर - अफगानिस्‍तान।


प्रश्‍न 33- चन्‍दावर के युद्ध (1194 ई.) में मुहम्‍मद गोरी ने किसे हराया।

उत्‍तर - कुतुबुद्दीन ऐबक।


प्रश्‍न 34- मुहम्‍मद गोरी ने किसे दिल्‍ली और उसके आस-पास के इलाकों को सौंपा।

उत्‍तर - कुतुबुद्दीन ऐबक।


प्रश्‍न 35- किसने नालन्‍दा तथा विक्रमशिला को नष्‍ट कर दिया।

उत्‍तर - बख्तियार खिलजी (यह मुहम्‍मद गोरी का सेनापति था)


प्रश्‍न 36- बख्तियार खिलजी कैसे मारा गया।

उत्‍तर - 1206 ई. में खोखरों के साथ युद्ध में खिलजी मारा गया।


प्रश्‍न 37- महमूद गजनवी किस वंश से संबन्धित था।

उत्‍तर - यमीनी।


प्रश्‍न 38- चन्‍द्रावर के युद्ध (1194 ई.) में मुहम्‍मद गोरी ने किसे हराया।

उत्‍तर - कन्‍नौज के गहड़वाल शासक जयचंद।


प्रश्‍न 39- भारत पर आक्रमण करने वाला पहला विदेशी कौन था।

उत्‍तर - साइरस।


प्रश्‍न 40- मोहम्‍मद गौरी की हत्‍या की थी।

उत्‍तर - खोखर।

चंद्रगुप्त पहिला


 हा गुप्त साम्राज्याचा संस्थापक मानला जातो. महाराज श्रीगुप्त यांनी स्थापलेल्या गुप्त राज्याचे साम्राज्य करण्यात चंद्रगुप्त यांचे मोठे योगदान आहे. 


● चंद्रगुप्त हा महाराज घटत्कोच यांचा पुत्र होता. श्रीगुप्त व घटत्कोच यांना महाराज किताब होता तर चंद्रगुप्त ने स्वता:ला महाराजाधिराज म्हणवले.


● चंद्रगुप्तने आपल्या कार्यकालात अनेक स्वता:च्या नावाने अनेक मोहरा काढल्या ज्या त्याच्या कार्यकालातील त्याचा प्रभाव दर्शावतात. चंद्रगुप्त पहिल्याचा कार्यकाल साधारणपणे इस ३२० ते ३३५ होता व हा काल भारतीय संस्कृतीचा सुवर्ण काळ मानला जातो  .


● चंद्रगुप्त ने अनेक जनपदांना आपल्या अधिपत्याखाली आणले. प्रयाग, साकेत मगध ही भारतातील महत्त्वाची राज्ये गुप्त साम्राज्याच्या अधिपत्याखाली आली .


●  वैशालीच्या लिच्छवी राज्याशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करणे ही चंद्रगुप्ताच्या जीवनातील मह्त्त्वाची घटना आहे. तत्कालीन राजकीय जीवनात वैशालीचे लिच्छवी घराणे अत्यंत सामर्थ्यसंपन्न समजले जाई. 


●लिच्छवीची राजकन्या कुमारदेवीशी त्यांचा विवाह झाला  . या वैवाहिक संबंधामुळे चंद्रगुप्त यांचे महत्त्व वाढले. राजकीय सामर्थ्य व प्रतिष्ठेत वाढ झाली. चंद्रगुप्ताने लिच्छवीच्या मदतीने मगध प्रदेश जिंकून घेतला. नंतर प्रयाग,अयोध्या,बिहार हे प्रदेश त्याने जिंकले. त्याने स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला. 


● चंद्रगुप्त पहिला व कुमारदेवी यांची प्रतिमा असलेली नाणी तसेच दुसऱ्या बाजुवर सिंहावर बसलेली दुर्गा व त्या खाली 'लिच्छवी’ असे अंकित केले आहे. चंद्रगुप्त प्रथम व कुमारदेवीचा पुत्र म्हणजे समुद्रगुप्त होय  .

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे


❇️ शिखराचे नाव उंची (मीटर) जिल्हे ❇️


◆ कळसूबाई 1646 अहमदनगर


◆ साल्हेर 1567 नाशिक


◆ महाबळेश्वर 1438 सातारा


◆ हरिश्चंद्रगड 1424 अहमदनगर


◆ सप्तशृंगी 1416 नाशिक


◆ तोरणा 1404 पुणे


◆ राजगड 1376 पुणे


◆ रायेश्वर 1337 पुणे


◆ शिंगी 1293 रायगड


◆ नाणेघाट 1264 पुणे


◆ त्र्यंबकेश्वर 1304 नाशिक


◆ बैराट 1177 अमरावती


◆ चिखलदरा 1115 अमरावती.

महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्यावरील धरणे


★ धरण : नदी : जिल्हा ★


💧 भंडारदरा : प्रवरा : अहमदनगर 

💧 जायकवाडी : गोदावरी : औरंगाबाद 

💧 गंगापूर : गोदावरी : औरंगाबाद

💧 सिध्देश्वर : दक्षिणपूर्णा : हिंगोली 

💧 येलदरी : दक्षिणपूर्णा : हिंगोली

💧 मोडकसागर : वैतरणा : ठाणे 

💧 मुळशी : मुळा : पुणे 

💧 दारणा : दारणा : नाशिक 

💧 माजलगाव : सिंदफणा : बीड 

💧 बिंदुसरा : बिंदुसरा : बीड

💧 खडकवासला : मुठा : पुणे 

💧 कोयना : कोयना : सातारा 

💧 राधानगरी : भोगावती : कोल्हापूर .

नद्यांच्या काठावरील प्रमुख ठिकाणे


Imp इन्फॉर्मशन देत आहे. सर्वांनी नक्की वेळ काढून वाचा.


👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇


1) गोदावरी = नाशिक , पैठण , आपेगाव , गंगाखेड ,  नांदेड  , कोपरगाव , राक्षसभुवन 



2) मुळा - मुठा  =  पुणे



3) भीमा  = पंढरपूर



4) इंद्रायणी = देहू ,  आळंदी



5) सीना  =  अहमदनगर



6) प्रवरा  =  संगमनेर ,  नेवासे



7) पंचगंगा  =  कोल्हापूर



8) कऱ्हा  =  सासवड ,  जेजुरी ,  मोरगाव ,  बारामती



9)  वेण्णा  =  हिंगणघाट



10)  भोगावती  =  उस्मानाबाद



11)  मोर्णा  =  अकोला



12) कृष्णा  =  वाई ,  कराड ,  सांगली ,  मिरज ,  औदुंबर , नरसोबाचीवाडी



13)  तापी = भुसावळ



14) गिरणा  =  भडगाव , जळगाव



15) सिंदफणा  = माजलगाव ( जी. बीड )



16) बिंदूसरा = बीड


17)  कायधू  = हिंगोली



18) धाम  =  पावनार



19) नाग = नागपूर



20) ईरई  = चंद्रपूर



21) पांझरा  =  धुळे



22) कुंडलिक  =  जालना ( मराठवाड्यातील नदी )



23) कुंडलिक  = रोहा ( कोकणातील नदी )



24) वशीष्टी = चिपळूण


➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

सम्राट अशोक


📌चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. 


➡️बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इ.स.पू. २७३ मध्ये सत्तेवर आला. 


📌राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. 


➡️तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरीत्या मोडून काढले होते. 


📌मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. 


🗺कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला.


🗺वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते.


✔️कलिंगचे युद्ध :- 


🔻कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. 


🔻सत्य, अहिंसा, इतरांप्रति दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. 


🔻त्याचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. 


🔻हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. 


🔻या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख 'देवानं पियो पियदसी' (देवाचा प्रिय प्रियदर्शी) असा केलेला आहे. 


➡️राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदयपरिवर्तन झाले, याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे.


➡️सम्राट अशोकाच्या दिल्ली-टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते.

वाचा :- इतिहास महत्वाचे प्रश्न उत्तरे

(1) नंद वंशाचा शेवटचा सम्राट कोण होता.

(अ) महापद्यानंद

(आ) घनानंद

(क) कालाशोक

(D) यापैकी नाही

>> घनानंद.


(२) वैशाली येथे जगातील पहिले प्रजासत्ताक कोणी स्थापन केले?

(रहस्य

(आ) लिच्छवी

(क) मौर्य

(ड) नंद

>> लिच्छवी.


(३) भारताचा काही भाग ताब्यात घेणारा पहिला इराणी शासक.

(अ) सायरस

(ब) डेरियम

(क) कॉम्बिसिस

(D) Xerces

>> डेरियम.


(४) त्रिपिटक हा एक धार्मिक ग्रंथ आहे.

(अ) बौद्ध

(ब) हिंदू

(क) शीख

(ड) जैन

>> बौद्ध.


(५) बौद्धांसाठी प्रसिद्ध विक्रमशिला विद्यापीठाची स्थापना कोणत्या शासकाने केली?

(अ) महिपाल

(आ) धर्मपाल

(क) गोपाळ

(डी) देवपाल

>> धर्मपाल.


(६) महावीरांचा जन्म कोणत्या क्षत्रिय गोत्रात झाला?

(अ) शाक्य

(आ) लिच्छवी

(क) जंत्रिक

(ड) सॅलस

>> जंत्रीक.


(७) महावीरांची आई कोण होती?

(अ) देवानंदी

(आ) त्रिशाला

(क) यशोदा

(D) यापैकी नाही

>> त्रिशाला.


(8) सर्वात जुने विद्यापीठ कोणते होते?

(अ) नालंदा

(आ) वैशाली

(क) गांधार

(D) यापैकी नाही

>> नालंदा.


(9) भगवान महावीरांचे पहिले शिष्य कोण होते?

(अ) जमाली

(आ) योसूद

(क) प्रभास

(D) यापैकी नाही

>> जमाली.


(10) अजीवक पंथाचे संस्थापक कोण होते?

(अ) उपली

(आ) मखली गोसल

(क) आनंद

(D) यापैकी नाही

>> मखली गोसल.

    

(11) तैमूर लांगने भारतावर कोणत्या वर्षी आक्रमण केले?

(A) 1350 इ.स

(ब) 1600 इ.स

(C) 1398 इ.स

(D) यापैकी नाही

>> 1398 इ.स.


(12) लोदी वंशाचा संस्थापक कोण होता?

(अ) बहलोल लोदी

(आ) सिकदर लोदी

(क) इब्राहिम लोदी

(D) यापैकी नाही

>> बहलोल लोदी.


(13) गझनीचा महमूद कोणत्या वंशाचा होता?

(अ) यामिनी

(आ) तुघलक

(क) गुलाम

(D) यापैकी नाही

>> यामिनी.


(१४) शून्याचा शोध कोणी लावला?

(अ) भास्कर

(आ) आर्यभट्ट

(क) वराहमिहिर

(D) यापैकी नाही

>> आर्यभट्ट.


(15) प्राचीन भारतामध्ये खालीलपैकी कोणते शिक्षण केंद्र नव्हते?

(अ) कोशांबी

(ब) तक्षशिला

(क) विक्रमशीला

(डी) हे सर्व

>> कोशांबी


महत्वाचे प्रश्न इतिहास


1 तहकीक-ए-हिंद हे पुस्तक कोणी लिहिले आहे?

A अलबेरुनी

B खफिखानं

C चाणक्य

D कोटिल्य

उत्तर A


2 वैदिक काळात किती वेदांगे सांगितले आहे?

A 12

B 8

C 10

D 6

उत्तर D


3 संगम साहित्यातून चोल चेर व कोणत्या राज्याचा इतिहास आपणास समजतो?

A होयसळ

B कुशाण

C वाकाटक

D पांड्य

उत्तर D


4 पुढीलपैकी कोणत्या राज सत्तेने रोमनांची नक्कल करून 124 ग्रेनचे सवर्ण नाणे सुरू केले?

A कुशाण

B गुप्त

C होयसळ

D यापैकी नाही

उत्तर A


5 सातवाहन घराण्यातील कोणत्या राजाच्या काळात नाण्यावर जहाजाचे चित्र असल्याचे पुरावे मिळतात?

A गौतमी सातकर्णी

B नरेश सातकर्णी

C विक्रमादित्य

D A आणि B

उत्तर B


6 हडप्पा काळात कोठे मण्यांचे कारखाने आढळून आले आहेत?

A धोलविरा,चनदूदडो

B लोथल,बनवाली

C कालीबंगन, म्होहेजदडो

D लोथल,चनदूदडो

उत्तर D


7 सँडलर आयोगात किती भारतीय व्यक्ती होत्या?

A 2

B 1

C 3

D एकही नाही

उत्तर A


8 तायुनी चळवळ 1839 कोठे सुरू झाली होती?

A लाहोर

B ढाका

C दिल्ली

D कराची

उत्तर B


9 फिरयादी चळवळ कोणत्या प्रदेशात घडून आली?

A बंगाल

B लाहोर

C उत्तरप्रदेश

D कराची

उत्तर A


10 विष्णुस्मृती ही रचना कोणाच्या काळातील मानली जाते?

A मौर्य

B कुशाण

C गुप्त

D सातवाहन

उत्तर C


11 मासा हे राजचिन्ह कोणत्या राजसत्तेचे मानले जाते?

A कनिष्क

B चेर

C पांड्य

D चोल

उत्तर C


12 ऋग्वेदकाळात विणकाम करणाऱ्या स्त्रीस काय संबोधले जाते?

A सिसाई

B व्रात

C सिराई

D सिरी

उत्तर D


13 ऋग्वेदात इंद्रावर किती ऋच्या आहेत?

A 250

B 150

C 110

D 210

उत्तर A


Poverty Measurements


✅वी. एम. दांडेकर आणि एन. रथ (1971 पद्धत)✅

- कॅलरी आवश्यकता: 

  - ग्रामीण आणि शहरी भाग: 2,250 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन


- संपूर्ण गरीबीचे पद्धत: 

  - कॅलरी आधारित गरीबी मोजण्याची सुरुवात




✅  वाय के अलघ समिती (1979 पद्धत)✅

- समायोजित किंमत स्तर: 

  - महागाईसाठी किंमत स्तर समायोजित करणे.

- राज्य-विशिष्ट गरीबीरेषा:

  - प्रत्येक राज्यासाठी वेगळ्या गरीबीरेषा

  - 

- कॅलरी आवश्यकता:

  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन




✅लकडावाला समिती (1993 पद्धत) [URP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005): 

  - ग्रामीण भाग: ₹356.30 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹538.60 प्रति व्यक्ती


- कॅलरी आवश्यकता:

  - ग्रामीण भाग: 2,400 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन

  - शहरी भाग: 2,100 कॅलरी प्रति व्यक्ती प्रतिदिन


 2004-2005

- संपूर्ण गरीबी: 27.5%




✅तेंडुलकर समिती (2009 पद्धत) [MRP]✅

- मासिक किमान खर्च (2004-2005):

  - ग्रामीण भाग: ₹446.68 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹578.80 प्रति व्यक्ती


- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹816 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,000 प्रति व्यक्ती

  - 

- कॅलरी आवश्यकता: 

  - कॅलरी आधारित पद्धतीपासून दूर जाऊन एक विस्तृत उपभोग आधारित पद्धत


2004-2005

- संपूर्ण गरीबी: 37.2%

2011-2012

- संपूर्ण गरीबी: 21.9%





✅रंगराजन समिती (2014 पद्धत) [MMRP]✅

- मासिक किमान खर्च (2009-2010):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती

  

- मासिक किमान खर्च (2011-2012):

  - ग्रामीण भाग: ₹972 प्रति व्यक्ती

  - शहरी भाग: ₹1,407 प्रति व्यक्ती


- कॅलरी आवश्यकता:

  - कॅलरीसह एक विस्तृत वस्तू आणि सेवांच्या पद्धतीचा वापर


2009-2010 (सुधारित अंदाज)

- संपूर्ण गरीबी: 38.2%


2011-2012

- संपूर्ण गरीबी: 29.5%

आणीबाणी


1. आणीबाणीचे प्रकार

   - कलम 352: राष्ट्रीय आणीबाणी (युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र बंड).

   - कलम 356: राष्ट्रपती राजवट (राज्य शासन).

   - कलम 360: आर्थिक आणीबाणी (आजपर्यंत लागू नाही).


2. घोषणेसाठी आधार

   - भारताची सुरक्षा: 

   - 42 वी घटनादुरुस्ती: विशिष्ट भागात आणीबाणी.

   - 44 वी घटनादुरुस्ती: "आंतरर्गत गोंधळ" चे "सशस्त्र बंड" मध्ये बदल; मंत्रिमंडळाच्या लेखी शिफारशीची आवश्यकता.


3. न्यायालयीन पुनरावलोकन

   - 38 वी घटनादुरुस्ती: राष्ट्रीय आणीबाणी पुनरावलोकनापासून मुक्त.

   - 44 वी घटनादुरुस्ती: तरतूद हटविली.

   - मिनर्वा मिल्स प्रकरण (1980): आणीबाणीची घोषणा न्यायालयात आव्हान दिली जाऊ शकते.


4. मंजुरी प्रक्रिया

   - संसद मंजुरी: एका महिन्याच्या आत (पूर्वी दोन महिने होते).

   - लोकसभा विसर्जन असल्यास: नवीन लोकसभेच्या पहिल्या बैठक पासून 30 दिवस टिकेल, राज्यसभेची मंजुरी आवश्यक.

   - वाढ: दर सहा महिन्यांनी संसदेच्या मंजुरीने अनिश्चित काळासाठी वाढवता येते.


5. मंजुरीसाठी बहुमत

   - एकूण सदस्य: बहुमत आवश्यक.

   - उपस्थित आणि मतदान करणारे: दोन-तृतीयांश बहुमत.


6. राष्ट्रीय आणीबाणीचे रद्दीकरण

   - राष्ट्रपतींचे रद्दीकरण: कधीही शक्य.

   - लोकसभा ठराव: राष्ट्रीय आणीबाणीचा नामंजुरीचा ठराव फक्त लोकसभा करू शकते .

   - लेखी सूचना: एक-दशांश सदस्यांनी सूचना द्यावी; 14 दिवसांत विशेष बैठक बोलवावी.

   - साधे बहुमत: नामंजुरीसाठी.


7. राष्ट्रीय आणीबाणीचे परिणाम

   - केंद्र-राज्य संबंध: कार्यकारी, विधायी, आर्थिक बदल.

   - आयुष्य वाढ: लोकसभा आणि राज्य विधानमंडळांचे कार्यकाळ वाढविला जाऊ शकतो.

   - मूलभूत अधिकार:

     - कलम 19: स्वयंचलित निलंबन (कलम 358).

     - कलम 32: राष्ट्रपतींच्या परवानगीने निलंबन (कलम 359).


8. ऐतिहासिक उदाहरणे

   - 1962, 1971, 1975: राष्ट्रीय आणीबाणी घोषित.


भारतीय संविधानाची निर्मिती 🇮🇳


📜 कॅबिनेट मिशन योजना:

- एकूण जागा: ३८९

  - ब्रिटिश भारत: २९६ जागा (२९२ जागा ११ राज्यपाल प्रांतांमधून, ४ मुख्य आयुक्त प्रांतांमधून)

  - संस्थाने: ९३ जागा (मुस्लिम लीग सदस्यांच्या माघारीमुळे ७० जागा)


🏛️ संविधान सभेची रचना:

- मूळ जागा: २९९

- ब्रिटिश भारत प्रांत: २२९ जागा

- संस्थाने: ७० जागा


⚖️ सार्वभौम संस्था:

- पूर्णपणे सार्वभौम आणि विधायी अधिकार असलेली संस्था.

- अध्यक्षता करणारे:

  - विधायी सत्र: जी.व्ही. मावळंकर

  - संविधान सत्र: डॉ. राजेंद्र प्रसाद


🗓️ महत्वाच्या तारखा:

- पहिलं सत्र: ९ डिसेंबर १९४६

- अंतिम सत्र: २४ जानेवारी १९५०

- स्वीकारणे: २६ नोव्हेंबर १९४९

- अंमलबजावणी: २६ जानेवारी १९५०


📝 मसुदा समिती:

- अध्यक्ष: डॉ. बी.आर. आंबेडकर

- सदस्य:

  - एन. गोपालस्वामी आयंगार

  - अलादी कृष्णस्वामी अय्यर

  - डॉ. के.एम. मुंशी

  - सैयद मोहम्मद सादुल्लाह

  - एन. माधव राव

  - टी.टी. कृष्णमाचारी


📘 संविधानाची माहिती:

- प्रारंभिक सामग्री: उद्देशिका, ३९५ कलमे, ८ अनुसूचियां

- सभेचे अध्यक्ष: डॉ. राजेंद्र प्रसाद

- उपाध्यक्ष: एच.सी. मुखर्जी, वी.टी. कृष्णमाचारी

- तात्पुरते अध्यक्ष: डॉ. सच्चिदानंद सिन्हा

- प्रतीक: 🐘

- संवैधानिक सल्लागार: बी.एन. राव

- सचिव: एच.व्ही.आर. आयंगार

- मुख्य मसुदाकार: एस.एन. मुखर्जी

- कॅलिग्राफर: प्रेम बिहारी नारायण रायझादा

- सजावट: नंदलाल बोस, ब्योहर राममनोहर सिन्हा


🗳️ मतदान आणि प्रतिनिधित्व:

- मुसलमान, शीख, आणि सामान्य श्रेणींना जागा वाटप.

- प्रातिनिधिक मतदान प्रणालीद्वारे मतदान.

- संस्थानामधून नामांकित सदस्य होते.


महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1927-1935)



🟢 1927

📌 सायमन कमिशन (1927)  

✦ भारतातील घटनात्मक सुधारणा तपासण्यासाठी नेमण्यात आला.


🟢 1928

📌 नेहरू अहवाल (1928)  

✦ मोतीलाल नेहरू आणि इतरांनी तयार केलेला अहवाल, स्वराज्याची मागणी.


🟢 1929

📌 आयर्विनची दीपावलीची घोषणा (मे 1929)  

✦ भारताला डॉमिनियन स्टेटस देण्याची घोषणा.


📌 लाहोर अधिवेशन (डिसेंबर 1929)  

✦ लाहोर येथे काँग्रेसचे अधिवेशन, पूर्ण स्वराज्याची घोषणा.


🟢 1930

📌 दांडी यात्रा (12 मार्च ते 6 एप्रिल 1930)  

✦ 

📌 गांधींना अटक (मे 1930)  

✦ पुण्यात येरवडा तुरुंगात गांधींना अटक.


🟢 1931

📌 पहिली गोलमेज परिषद (नोव्हेंबर 1930 ते जानेवारी 1931)  

✦ काँग्रेसने बहिष्कार.


📌 गांधी-आयर्विन करार (5 मार्च 1931)  

✦ करारावर स्वाक्षरी, सविनय कायदेभंग आंदोलन स्थगित.


📌 भगतसिंग शहीद (23 मार्च 1931)  

✦ भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी.


📌 कराची अधिवेशन (मार्च 1931)  

✦ काँग्रेसचे अधिवेशन, मूलभूत अधिकार आणि आर्थिक नियोजनावर जोर.


📌 दुसरी गोलमेज परिषद (सप्टेंबर ते डिसेंबर 1931)  

✦ काँग्रेसने भाग घेतला, गांधी उपस्थित.


📌 सविनय कायदेभंग पुन्हा सुरू (डिसेंबर 1931)  

✦ आंदोलन पुनरारंभ.


🟢 1932

📌 गांधींना अटक (जानेवारी 1932)  

✦ गांधींना पुन्हा अटक.


📌 रॅमसे मॅकडोनाल्ड जातीय निवड (ऑगस्ट 1932)  

✦ अस्पृश्यांसाठी स्वतंत्र निवडणूक पद्धती.


📌 पुणे करार (सप्टेंबर 1932)  

✦ गांधी आणि आंबेडकर यांच्यात करार, संयुक्त मतदारसंघ.


🟢 1933

📌 तिसरी गोलमेज परिषद (नोव्हेंबर ते डिसेंबर 1933)  

✦ काँग्रेस अनुपस्थित.


🟢 1935

📌 1935 चा कायदा (1935)  

✦ भारत शासन कायदा 1935: प्रांतिक स्वायत्तता आणि केंद्रातील फेडरल संरचना.


महाजनपद आणि त्यांची माहिती:






1. अंग 🟢

   - स्थान: गंगेच्या दक्षिणेला, बिहार

   - राजधानी: चंपा 🏰

   - राजा: दशरथ 👑

   - पाडाव: मगधच्या बिंबिसारने याचा पाडाव केला ⚔️


2. वज्जी (वृज्जि) 🟢

   - स्थान: उत्तर बिहार

   - राजधानी: वैशाली 🏰

   - शासन: विविध (गणराज्य)


3. मगध 🟢

   - स्थान: दक्षिण बिहार

   - राजधानी: राजगृह (नंतर पाटलीपुत्र) 🏰

   - राजे: बिंबिसार आणि अजातशत्रू 👑

   - विशेषता: भारतीय उपखंडातील सर्वात सामर्थ्यशाली महाजनपद


4. काशी 🟢

   - स्थान: बिहारच्या पश्चिमेला

   - राजधानी: वाराणसी 🏰

   - राजा: ब्रह्मदत्त 👑

   - पाडाव: अजातशत्रूने काशी जिंकले ⚔️


5. कोशल 🟢

   - स्थान: पूर्व उत्तर प्रदेश

   - राजधानी: श्रावस्ती (उत्तर), कुशावती (दक्षिण) 🏰

   - राजा: प्रसेनजीत (बुद्धाचा समकालीन) 👑

   - विशेषता: अयोध्या, कपिलवस्तु (बुद्धाचा जन्मस्थान)


6. वत्स 🟢

   - स्थान: यमुना नदीच्या काठावर, आधुनिक अलाहाबाद (प्रयागराज)

   - राजधानी: कौशांबी 🏰

   - राजा: उदयन 👑


7. चेदी 🟢

   - स्थान: आधुनिक बुंदेलखंड, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश

   - राजधानी: सुकतीमती 🏰

   - राजा: शिशुपाल 👑


8. पांचाल 🟢

   - स्थान: पश्चिम उत्तर प्रदेश

   - राजधानी: अहिच्छत्र (उत्तर), कांपिल्य (दक्षिण) 🏰


9. कुरू 🟢

   - स्थान: आधुनिक दिल्ली आणि दोआब प्रदेश

   - राजधानी: इंद्रप्रस्थ 🏰


10. मल्ल 🟢

    - स्थान: पूर्वी उत्तर प्रदेश

    - राजधानी: कुशीनगर, पावा 🏰


11. मत्स्य 🟢

    - स्थान: पूर्व राजस्थान (जयपूर, अलवर, भरतपूर)

    - राजधानी: विराटनगरा 🏰


12. अवंती 🟢

    - स्थान: मध्य माळवा

    - राजधानी: उज्जैन (उत्तर), महिष्मती (दक्षिण) 🏰

    - राजा: प्रद्योत 👑


13. अश्मक 🟢

    - स्थान: गोदावरी नदीच्या काठावर, आधुनिक महाराष्ट्र

    - राजधानी: पोटली/पोतन 🏰

    - विशेषता: विंध्यच्या दक्षिणेला एकमेव महाजनपद


14. गांधार 🟢

    - स्थान: आधुनिक उत्तर-पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व अफगाणिस्तान

    - राजधानी: तक्षशिला 🏰

    - राजा: पुकारसाथ 👑


15. कंबोज 🟢

    - स्थान: उत्तर पाकिस्तान

    - राजधानी: राजपूर (द्वारका) 🏰


16. सुरसेन 🟢

    - स्थान: पश्चिम उत्तर प्रदेश

    - राजधानी: मथुरा 🏰

    - राजा: अवंतीपुरा 👑

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...