२५ जुलै २०२४

महाराष्ट्राचा इतिहास.

🧩 मौर्य ते यादव...


🅾️(इ.स.पू. २२० ते इ.स. १३१०)


🧩 मौर्य साम्राज्याचा काळ...


🅾️महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


🧩 सातवाहन साम्राज्याचा काळ...


🅾️सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. 


🅾️महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


🧩 वाकाटकांचा काळ...


🅾️वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.



🧩कलाचुरींचा काळ...


🅾️वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


🧩 बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ...


🅾️वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. 


🅾️त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


🧩 वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ..


🅾️वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


🧩 यादवांचा काळ..


🅾️महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. 


🅾️यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना.


🅾️धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.

 

🅾️विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.

 

🅾️ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते.

 आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती.

 

🅾️त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते.

 

🅾️त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला.अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता.

 स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत 

जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता.


🅾️ संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.


🧩ब्राम्हो समाजाची स्थापना :


🅾️त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते.हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते.

 

🅾️हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

 

🅾️केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.

 म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.


भारत स्वातंत्र्याचा इतिहास.


🧩स्वातंत्र्याची घोषणा :


🅾️नवी दिल्ली येथील संसद भवनाच्या भव्य सभागृहात 14 ऑगस्टच्या रात्री भारताच्या संविधान समितीची बैठक सुरू होती.मध्यरात्री बाराचे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवण्यात आला.


🅾️ त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकवण्यात आला. वर्षानुवर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला गळून पडल्या.

 ब्रिटिश सत्तेने भारतात पाय रोवल्यापासून ज्या लक्षावधी भारतीयांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी असीम त्याग केला होता, अनेकांनी आपले प्राण वेचले होते त्यांच्या महान त्यागाची ही फलश्रुती होती.

 

🅾️या ऐतिहासिक क्षणाचे महत्व स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रभावी भाषणात उलगडून दाखवले.ते म्हणाले, 'अनेक वर्षांपूर्वी आपण नियतीशी एक करार केला होता. आज त्याची पूर्तता, पूर्णपणे नसली तरी बर्‍याच मोठया प्रमाणात आपण करत आहोत.


🅾️ मध्यरात्रीचा ठोका पडेल तेव्हा सारे जग झोपलेले असताना स्वतंत्र व चैतन्यमय भारत जन्माला येईल.या मंगल क्षणी केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवजातीच्या सेवेला वाहून घेण्याची शपथ घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले लक्षावधी भारतीयांनी स्वातंत्र्याचा सोहळा अभूतपूर्व उत्साहाने साजरा केला.

 स्वातंत्र्यप्रातीचा हा उत्कट आनंद निर्भळ मात्र नव्हता.

 

🅾️देशाची फाळणी आणि त्या वेळी उफाळलेला भयानक हिंसाचार यामुळे भारतीय जनता दु:खी होती. स्वातंत्र्य सोहळयात सहभागी व्हायला गांधीजी दिल्लीत थांबले नव्हते.शांतता व जातीय सलोखा टिकवण्यासाठी ते बंगालमध्ये जिवाचे रान करत होते.

 

🅾️भारत स्वतंत्र करण्यासाठी अहर्निश झटलेल्या या महात्म्याची स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांतच निर्घृण हत्या करण्यात आली.

ही हत्या नथुराम गोडसे याने 30 जानेवारी, 1948 रोजी केली.हिंदु-मुस्लिम ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती व त्यासाठीच त्यांनी आपल्या प्राणाचेही मोल दिले.

सिंधु नदीच्या खोर्‍यातील संस्कृती :

सिंधु संस्कृतीचा शोध –


सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या.
सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय.
ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते.
आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे.
आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


सिंधु संस्कृतीचे वैशिष्टे

जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे.
रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था याची सुनियोजित रचना.
पुरापसून संरक्षण करण्याकरिता उंच जोत्यावर घरे बांधण्यात आली होती.
आरोग्य व स्वच्छता यांच्या दृष्टीने बंद गटारे निर्माण करण्यात आली होती.
मोहेंजदडो येथे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीचे स्नानगृह मिळाले आहे.
मोहेंजदडो हे शहर नदीच्या पुरामुळे सात वेळा नष्ट होवून पुन्हा वसविल्या गेल्याचे येथील पुराव्यावरून सिद्ध होते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


स्थानिक प्रसाशन –

मोहेंजदडो येथे करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून येथील लोक आरोग्य आणि स्वच्छता विषयक सोईच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसून येते.
नगररचना योजनाबद्ध होती.
यावरून या ठिकाणी आजच्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असाव्यात आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपीवण्यात आल्याचे दिसून येते.
हडप्पाकालीन लोकजीवन –

सिंधु आणि रावी नद्यांच्या परीसरात करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे येथील लोकजीवनाबाबत खालील माहिती मिळते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


दैनंदिन जीवनप्रणाली –

अन्न : येथील लोक आपल्या आहारामध्ये तांदूळ, गहू, सातू, खजूर, मांस, मासे भाज्या व फळे यांचा वापर करीत असल्याचे दिसून येते.
वस्त्र व प्रावरणे : येथील उत्खनात मिळालेल्या पुराव्यावरून या लोकांना कापड विणण्याची कला अवगत असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुषांच्या पोशाखात कंबरेपर्यंतचे वस्त्र व उपरण्याचा वापर करीत असे.
अलंकार : हे लोक सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले कवडया, बिया इत्यादींचा वापर दागिने तयार करण्याकरिता करीत असे. यामध्ये बाजूबंद, अंगठ्या, दंडापर्यंत बांगड्या कमरपट्टा इत्यादी अंलकाराचा समावेश होता.
करमणुकीची साधने : हे लोक करमणुकीकरिता, नृत्य, संगीत व सोंगट्या व फासे यांचा खेळ खेळत.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

धार्मिक संकल्पना –

पुजा अर्चना : हडप्पाकालीन उत्खननात मिळालेल्या मातृदेवतेची मूर्ति आणि अग्नीचे अवशेष यावरून लोक निसर्गपूजक व मातृपूजक होते स्पष्ट होते.
अंत्यविधी : हडप्पा कालीनलोक मृतदेहांना जाळित असे किंवा शवपेटीत घालून पुरले जात आसवेत असे या स्पष्ट होते. त्याचबरोबर मृतदेह पुरतांना सोबत अन्न, अंलकार व आयुधे सुद्धा पुरवण्यात येत असे.
उद्योग व व्यवसाय : हडप्पाकालीन लोकांचा शेती आणि व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते.
शेती : शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. ते शेतीमध्ये गहू, तांदूळ, कापूस, सातू, कडधान्ये इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असे.
भांडी : भांडी तयार करणे आणि त्यावरच चित्रकला काढणे हा येथील लोकांचा दूसरा व्यवसाय असल्याचे दिसून येते.
कापड : कापूस व लोकरीपासून धागा तयार करणे आणि कापड तयार करणे हा येथील लोकांचा एक व्यवसाय होता.


व्यापर : हडप्पा येथे तयार होणार्‍या मालाचे अवशेष सुमेरियन संस्कृतीमध्ये मिळाल्यामुळे आणि गुजरात मधील लोथल येथे मिळालेल्या बंदरच्या अवशेषावरून हे लोक व्यापारामध्ये प्रविण असल्याचे दिसून येते.हडप्पा येथील लोकांचा व्यापार जलमार्गाने इतर देशांशी चालत असल्याचे स्पष्ट होते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

ब. जीनांचे चौदा मुद्दे


१. भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी. शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.

२. सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.

३. सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.

४. केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.

५. स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.

६. पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.

७. सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.

८. कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.  

९. मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.

१०. वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.

११. राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत.

१२. मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

१३. केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.

१४. केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.

सिंधू/हडप्पा संस्कृती



💁‍♂ महत्त्वाची स्थळे व नद्या 


⦿ हडप्पा ➾ रावी


⦿ मोहेंजोदाडो ➾ सिंधू


⦿ चन्हंदडो ➾ सिंधू


⦿ कोटदिजी ➾ सिंधू


⦿ कालीबंगन ➾ घग्गर


⦿ बनवाली ➾ घग्गर


⦿ रंगपुर ➾ मादर


⦿ रोपड ➾ सतलज


⦿ लोथल ➾ भोगवा


⦿ धोलावीरा ➾ रंगाई


⦿ राखीगढ ➾ चौटांग


⦿ आलमगीर ➾ हिंडन


(इंग्रजी: Harappan civilization) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. 


इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. 


या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात.


 नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. 

जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले.


 हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते.


 हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.


💠💠प्राचीन भारताचा इतिहास 💠💠

.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.

०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.

०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.

१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.

११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.

१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.

१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.

१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.

१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.

१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.

१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.

१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

🟢 सिंधु संस्कृतीचा शोध 🟢

◾️  सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या. 

◾️  सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय. 

◾️  ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते. 

◾️ आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे. 

◾️ आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.

वाचा :- राज्यघटना बाबत मते

🍀एन श्रीनिवासन:-

✍️भाषा आणि आशय या बाबतीत घटना जवळजवळ 1935 च्या कायद्यासारखीच आहे


🍀आयव्हर जेंनीग्स:-

✍️1935 च्या कायद्यातून काही तरतुदी जशास तश्या घेतल्या आहेत


🍀के हनुमंतय्या:-

✍️आम्हला विना किंवा सतार याचे संगीत हवे होते पण येथे इंग्लिश घोष विभागाचे संगीत आहे

✍️ज्या प्रकारची घटना गांधीजींना नको होती व त्यांना अपेक्षित न्हवती नेमक्या त्याच प्रकारची ही घटना आहे


🍀लोकनाथ मिश्र:-

✍️पश्चिमचे गुलामी अनुकरण,त्याहून पश्चिमेला गुलामी शरणागती


🍀लक्ष्मीनारायण साहू:-

✍️मसुदा ज्या विचारधारावर आधारलेला आहे त्याचे मूळ भारतीय विचारधाराशी कोणतेही नाते दिसत नाही


🍀एच बी कामत:-

✍️आपल्या समितीसाठी हत्ती हे चिन्ह स्वीकारले आहे ते राज्यघटनाशी सुसंगत आहे


वाचा :- महाराष्ट्र इतिहास


● महाराष्ट्रात नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद आदी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


● महाराष्ट्रात महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.


● मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.


● जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. ‘सिमुक’ राजा या घराण्याचा संस्थापक मानला जातो.


● सातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची राणी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.


● राष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले.


● शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.


● शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.


● चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली. तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.


● यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.


● महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली. तो या राज्याचा संस्थापक मानला जातो. 


बहामणी राज्याचे खालील 5 तुकडे झाले. 

1. वर्हाडी : इमादशाही

2. अहमदनगर : निजामशाही

3. बिदर : बरीदशाही

4. गोवलकोंडा : कुतुबशाही

5. विजापूर : आदिलशाही

प्रागैतिहासिक कालखंड‼️


👉👉प्रागैतिहासिक मानवाला लेखन शैली अवगत नव्हती


अश्म युग👇👇👇


✔️पुराणाश्म युग (Palaeolithic age) :इ.स.पूर्व 9000


 मानवाचा मुख्य व्यवसाय शिकार करणे.


शिकार व इतर कामांसाठी दगडी हत्यारांचा वापर केला जात असल्याने पाषाण युग म्हटले गेले. 

हत्यारे तीक्ष्ण नव्हती.

शेतीचे ज्ञान नव्हते.

डोंगरपायथ्यालगत किंवा नदी काठावर वस्ती करत असे.


नैसर्गिक गुफांमध्ये राहत असे. उदा. भीमबेटका (मध्यप्रदेश).

भीमबेटका येथील गुहांमध्ये भिंतीवर चित्रे कोरली आहेत. त्यात मानवी जीवन तसेच शिकारीचे दृष्य दाखवली आहेत. पक्षी आणि प्राणी चित्रे यांचा समावेश,


✔️मध्याश्मयुग (Mesolithic age): इ.स.पूर्व 9000 इ.स.पूर्व 4000


 पाषाण युग आणि नवाश्म युग यांच्यामधील कालखंड, मुख्य व्यवसाय – शिकार, कंदमुळे गोळा करणे आणि मासेमारी, नंतर प्राणी पाळण्यास सुरुवात.


दगडी हत्यारांचाच वापर मात्र हत्यारे अधिक तीक्ष्ण बनली. दगडी हत्यारे चकत्यांसारखी झाली.


✔️नवाश्म युग (Neolithic age): इ. स. पूर्व 4000 इ. स. पूर्व 1500


 मेहरगड,बलुचिस्तान (एकमेव ) 


 या काळातील दगडी हत्यारे मध्याश्म युगापेक्षा अधिक तीक्ष्ण बनली.


हत्यारे बनवण्यासाठी चकाकी असलेल्या दगडांचा वापर करण्यात येत.

चकत्यासारखी दगडी हत्यारे वापरत नसे.



शेतीची सुरवात – रागी, कुलीथ, काही ठिकाणी गहू व तांदुळ यांचे शेतीत उत्पादन.

राहण्यासाठी दगड व मातीची चौकोनी आकाराचे घरे बनवत असे.

स्थायिक जीवन पद्धतीची सुरुवात.

मातीच्या भांड्यांच्या वापरास सुरुवात.

पाळीव प्राण्यांच्या संख्येत वाढ.


✔️ताम्र पाषाण युग (Chalcolithic age)


Maharashtra, Madhya Pradesh, Rajasthan, Southern-eastern India.

जोर्वे दायमाबाद नेवासा(अहमदनगर) चांदोली सोनगाव इनामगाव (पुणे) प्रकाशे,नाशिक 👈 जोर्वे संस्कृती



नवाश्मयुगाच्या शेवटी धातुच्या वापरास सुरुवात.


सुरुवातीचे धातु तांबे हे होते.

या काळात तांबे व दगड या दोन्हींचा वापर होत असल्याने यास ताम्रपाषाण युग म्हटले गेले.

काही ठिकाणी ब्राँझचाही वापर.


ताम्रपाषाण संस्कृतीच्या महत्त्वाची ठिकाणी- अहर, कायथा, सावळदा, प्रभास, नागपूर शिकार ही करत आणि गाय, म्हैस, शेळी सारख्या प्राण्यांनाही पाळत असे. मात्र घोडा हा प्राणी त्यांना माहित नसावा.


गहु, तांदुळ, बाजरा, मसुर, कापुस इ. ची शेती करत.

कापड बनवण्याची कला अवगत होती.

मृत व्यक्तींना पुरण्याची पद्धत होती.

स्त्री देवतांची पुजा करत.

चालू घडामोडी :- 24 JULY 2024

1) राष्ट्रीय औष्णिक अभियंता दिन दरवर्षी 24 जुलै रोजी साजरा केला जातो.

2) अॅडव्हान्स्ड थर्मल सोल्यूशन्स, इंक (एटीएस) ने जुलै 2014 मध्ये राष्ट्रीय औष्णिक अभियंता दिनाची स्थापना केली.

3) अरुणाचल प्रदेश विधानसभेने 'अरुणाचल प्रदेश सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024' एकमताने मंजूर केले आहे.

4) 'ग्रामोदय संकल्प' मासिकाच्या आगामी अंकासाठी पंचायती राज मंत्रालयाकडून लेख आणि यशोगाथा मागवण्यात आल्या आहेत.

5) भारतात दरवर्षी 24 जुलै रोजी 'इन्कम टॅक्स डे' साजरा केला जातो.

6) केव्ही सुब्रमण्यन यांची फेडरल बँकेने सीईओ आणि एमडी म्हणून नियुक्ती केली आहे.

7) 'Institute of Cost Accountants of India' (ICMAI) च्या अध्यक्षपदी 'विभूती भूषण' यांची निवड झाली आहे.

8) हरियाणामध्ये NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेडद्वारे ग्रीन चारकोल प्लांट उभारला जाईल.

9) 23 जुलै 2024 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग सातव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला आहे.

10) केंद्रीय अर्थसंकल्पात आदिवासींच्या विकासासाठी पंतप्रधान जनजाती उन्नत ग्राम अभियान सुरू करण्याची घोषणा  करण्यात आली असून ते 63,000 आदिवासीबहुल गावात राबविण्यात येणार आहे.

11) केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25 मध्ये नैसर्गिक शेतीसाठी 10 हजार जैव-निविष्ट संसाधन केंद्राची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

12) केंद्रीय अर्थसंकल्पात एंजल टॅक्स रद्द करण्याची घोषणा करण्यात आली असून तो 2012 लागू करण्यात आला होता.

13) सुभाष प्रसाद गुप्ता यांची भारताचे सुरीनाम या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे.

14 ) भावी मेहता यांना Oxford Bookstor बुक कवर पुरस्कार 2024 जाहीर झाला आहे.

15) पंजाब राज्यात भारतीय सेना आणि वायू सेना यांच्या व्दारे गगन स्ट्राईक-2 या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

16) नागालँड या राज्यात कोहीमा शांती स्मारकाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

17) केंद्रीय अर्थसंकल्पात ईशान्य प्रदेशात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या 100 शाखा स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

18) मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे.

19) ब्रिटन या देशाचा टेनिसपटू आणि अँडी मरे याने निवृत्तीची घोषणा केली आहे.

20) हंगेरी येथे झालेल्या हंगेरियन ग्रांप्री (GP) 2024 स्पर्धेचे विजेतेपद पटकावून मॅकलारेनच्या ऑस्कर पियास्त्री या ऑस्ट्रेलियन रेसिंग ड्रायव्हरने आपले पहिले F1 विजेतेपद पटकावले.

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫



⚙️ भारतीय खगोल भौतिकशास्त्रज्ञ प्रल्हाद चंद्र अग्रवाल यांना COSPAR हॅरी मॅसी पुरस्कार 2024 ने सन्मानित
◾️हा पुरस्कार मिळवणारे पाहिले भारतीय
◾️हा पुरस्कार अवकाश संशोधनाच्या विकासात उल्लेखनीय योगदानाला दिला जातो
◾️पुरस्कारप्राप्त व्यक्तीला मायनर प्लॅनेट (20064 प्रल्हादग्रवाल) या नावाने सन्मानित केले जाते.
◾️15 जुलै रोजी दक्षिण कोरियाच्या बुसान येथे 45 व्या COSPAR सायंटिफिक असेंब्लीच्या उद्घाटन समारंभात सन्मानित करण्यात आले
◾️AstroSat प्रकल्पाचे मार्गदर्शक आणि प्रमुख अन्वेषक होते
◾️भारताच्या पहिल्या चंद्र मोहिमेचा (चांद्रयान 1) प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी इस्रोने स्थापन केलेल्या चंद्र टास्क फोर्सचे ते सदस्य होते

⚙️ गेवरा आणि कुसमुंडा खाणींचा समावेश जगातील पहिल्या 10 सर्वात मोठ्या खाणींच्या मध्ये झाला
1】🌆 साउथ ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड (SECL) च्या गेवरा ( जगात दुसरी मोठी)
2】🌆 कुसमुंडा कोळसा ( जगात चौथी मोठी )
◾️दोन्ही खाणी छत्तीसगड कोरबा जिल्ह्यात आहेत
◾️या दोन खाणीतून भारताच्या एकूण उत्पादनाच्या 10% उत्पादन होते
◾️WorldAtlas.com यांनी हा रिपोर्ट प्रकाशित केला

⚙️ BCCI ने इंडियन ऑलिंपिक असोसिएशनला 8.5 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली आहे
◾️BCCI अध्यक्ष :  रॉजर बिन्नी
◾️BCCI सचिन : जय शहा ( यांची घोषणा)
◾️BCCI मुख्यालय :मुंबई
◾️BCCI स्थापना : डिसेंबर 1928

⚙️एलोन मस्क यांनी की एक्स 📱 आणि स्पेसएक्स मुख्यालय कॅलिफोर्निया मधून ते टेक्सासमध्ये हलवणार असल्याची घोषणा केली

⚙️ स्मृती मानधना महिला 🏏 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय मध्ये सर्वाधिक धावा बनवणारी भारतीय खेळाडू बनली आहे
◾️ हरमनप्रीत कौर हिला मागे टाकले
◾️एकूण 3365 धावा बनवले आहेत

⚙️ भारताला एशियन डेव्हलपमेंट बँकेने (ADB) $240.5 दशलक्ष कर्ज मंजूर केले आहे
◾️भारतातील छतावरील सौर यंत्रणांना🌫 वित्तपुरवठा करण्यासाठी
◾️स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आणि नॅशनल बँक फॉर ग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) मार्फत हे कर्ज वितरित केले जाईल.

⚙️आशियाई विकास बँक /Asian Development Bank
⭐️मुख्यालयः मांडलुयोंग, फिलीपिन्स
⭐️स्थापनाः 19 डिसेंबर 1966
⭐️68 सदस्य देश
⭐️अध्यक्षः मासात्सुगु असाकावा
------------------------------------------

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...