२० जुलै २०२४

इतिहासाच्या दृष्टीने महत्वाचे

◾️राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :-◾️


▶️ 1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन


▶️ 1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी


▶️ 1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष


▶️ 1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष


▶️ 1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष


▶️ 1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायले गेले.


▶️ 1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.


▶️ 1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.


▶️ 1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.


▶️ 1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.


▶️ 1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.


▶️ 1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.


▶️ 1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.


▶️ 1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


▶️ 1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.


▶️-1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.


▶️ 1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.


▶️ 1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.


▶️ 1929 – लाहोर– पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.


▶️ 1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.


▶️ 1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.


▶️ 1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –


▶️1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –


▶️1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.


▶️1940 – मुंबई – मौ. अबूल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.


▶️1946 – मिरत – जे. बी. कृपलानी –


▶️1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन


स्वराज्य पक्ष


🔹सवराज्य पक्ष उदयाची कारणे

* म. गांधीचा चळवळ तहकुबीचा आदेश

* सरकारची ताठर भूमिका

* राष्ट्रसभा व मुस्लिम लीग यांच्यातील सहकार्याची समाप्ती

* गांधीजींची अनुपस्थिती

* चौकशी समितीचा निष्कर्ष


🔹सवराज्य पक्षाची स्थापना

* मोन्टेग्यू चेम्सफर्ड सुधारणा अंतर्गत होऊ घातलेल्या निवडनुकीवर बहिष्कार घालावा असे राष्ट्रसभेचे धोरण होते.

* परंतु हा बहिष्कार घालण्याऐवजी कायदे मंडळात प्रवेश करून सरकारला सनदशीर मार्गाने विरोध करावा असे काही नेत्यांना वाटत होते.

* त्यामुळे राष्ट्रसभेची फेरवादी नावाचा गट सी. आर. दास. व मोतीलाल नेहरू यांच्या नियंत्रणाखाली स्थापन झाला.

* नाफेरवादी एक गट डॉ राजेंद्रप्रसाद वाल्लभबाई पटेल यांच्या नियंत्रणाखाली तयार झाला. काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहून तिच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना डिसेंबर १९२२ मध्ये फेरवादी विचारवंतानी केली.


🔸सवराज्य पक्षाची उदिष्टे

* आपल्या मताचा प्रसार करून असहकार चळवळीमुळे लोकांच्या मनात निर्माण झालेला गैरसमज दूर करून व निवडणुका लढवणे व कायदे मंडळाचे सभासदत्व प्राप्त करणे.

* सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये स्वराज्याची तळमळ कायम ठेवून राष्ट्रीय चळवळीत प्रगती करणे आवश्यक होते.

* ब्रिटीश शासनाच्या दडपशाही विरुद्ध आवाज उठवून हिंदुस्तानच्या घटनेत आवश्यक ते अनुकूल परिवर्तन घडवून आणणे.

* देशातील सर्व हिंदू मुसलमानामध्ये ऐक्याची भावना निर्माण करणे.

* ब्रिटीश शासनाची हिंदुस्तानच्या बाबतीत असलेली ताठर भूमिका बदलून कल्याणकारी राज्य स्थापन करणे.


🔹सवराज्य पक्षाची कार्ये

* सरकारच्या धोरणावर प्रहार

* चळवळीची जागृती

* चळवळीचे कार्यक्रम

* गोलमेज परिषदेची उभारणी

पोलीस भरती प्रश्नसंच


1. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?

शिवराम महादेव परांजपे.  √

विष्णुशास्त्री चिपळूणकर

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

छत्रपती शाहू महाराज

=========================

2. विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते

संत तुकाराम

संत सावतामाळी

संत नरहरी सोनार

संत नामदेव.   √

=========================

3. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?

डॉ. भाऊ दाजी लाड

दादोबा पांडुरंग

बाळशास्त्री जांभेकर

नाना जगन्नाथ शंकरशेठ.   √

=========================

4. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.

ऊस

कापूस

भात

नीळ.   √

=========================

5. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........

गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग.   √

अनेक संस्थाने खालसा करणे

ख्रिश्चन धर्म प्रसार करणे

पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने

=========================

6. गांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?

पंडित जवाहरलाल नेहरू 

विनोबा भावे.    √

सरदार वल्लभभाई पटेल 

मौलाना आझाद

=========================

7. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?


विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली

साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत

साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत.   √

विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत 

=========================

8. सन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?

इंग्रजांना दुसऱ्या महायुध्दात सहकार्य करणे

ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे

वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरु करणे.  √

निवडणुकांवर बहिष्कार टाकणे

=========================

9. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

रविंद्रनाथ टागोर .    √

लाला लजपतराय

लाला हरदयाळ

महात्मा गांधी

=========================

10. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?

डॉ. रार्जेद्र प्रसाद.    √

डॉ. राधाकॄष्णन

डॉ. आंबेडकर

डॉ. झाकीर हुसेन

=========================

11.  ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

खैर.   √

कुसूम

कंडोल

शलार्इ

=========================

12. इस्त्रायलची राजधानी कोणती?

जेरुसलेम.  √

दमास्कस

तेल अवीव 

तेहरान 

=========================

13. ............... वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

निग्रॉइड

मंगोलाइड .  √

बुश मॅनाइड 

ऑस्ट्रेलोंइड

=========================

14. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?

हरिहरेश्र्वर

वज्रेश्र्वरी.  √

गणपतीपुळे

संगमेश्र्वर

=========================

15. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

गाळाची जमीन 

काळी जमीन.   √

तांबडी जमान

रेताड जमीन

=========================

16. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र …………… येथे उभारण्यात आले.

पाडेगाव

कोर्इमतूर

कानपूर

मांजरी.   √

=========================

17.  ……… हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

दिल्ली

चेन्नर्इ

मुंबर्इ.   √

हैद्राबाद

=========================

18. देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे.

महाराष्ट्र

केरळ .  √

प. बंगाल

तमिळनाडू

=========================

19. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?

मुंबई

दिल्ली.   √

मद्रास 

बंगलोर

=========================

20. लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत?

अरबी समुद्र .   √

बंगालचा उपसागर  

हिंदी महासागर   

पॅसिफिक महासागर

स्वातंत्र्याच्या आधी झालेल्या गोलमेज परिषदा

कायदेभांगाची चळवळ चालू असताना परिस्थिति सांभाळण्यासाठी ब्रिटीशांनी पहिली गोलमेज परिषद बोलावली

      

पहिली गोलमेज परिषद (1930-31)

      

इंग्लंड मध्ये पंतप्रधान मकडोनाल्ड च्या अध्यक्षतेखाली पहिली गोलमेज परिषद नोव्हेंबर 1930 मध्ये भरवण्यात आली आली. पहिल्या गोलमेज परिषदेला एकंदर 89 प्रतींनिधी जमले होते. 89 सदस्या पैकी 16 सदस्य हिंदुस्थानातील राजकीय संघटनांचे होते. राष्ट्रसभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर पूर्ण बहिष्कार टाकला होता.                         

      पहिल्या गोलमेज परिषदेत घेण्यात आलेले काही महत्वाचे निर्णय.------

     हिंदुस्थानात भावी काळात ब्रिटिश आणि हिंदुस्तान संस्थानिकांचे संघराज्य स्थापन करावे.                                                                        संघराज्याचे कार्यकारी मंडळ हे कायदे मंडळाला काही प्रमाणात जबाबदार राहील. घटक राज्यात स्वतःचा राज्यकारभार पाहण्याचा स्वतंत्र आधिकार असावा. इत्यादि राजकीय सुधारणामुळे काही महत्वाचे बदल हिंदुस्तानात होणार होते.


गांधी आयर्विण करार-------


      राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर बहिष्कार टाकला होता. सरकारच्या विरोधात सविनय कायदेभांगाची चळवळ चालू ठेवली होती. यामुळे व्हाईसरॉय ने महात्मा गांधीस व इतर नेत्यास तरुंगातून मुक्त केले.

      5 मार्च 1931 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व इंग्लंड वरुण आलेल्या आयर्विण यांच्यात अनेक करार झाले त्या करारास गांधी आयर्विण करार म्हणून संबोधले जाते. या करारातील काही मुद्दे पुढील प्रमाणे सांगता येतील.



·         इंग्रज शासनाने राजकीय कैद्यांची ताबडतोब सुटका करावी.

·         जीवनावश्यक असलेल्या मिठावरील कर रद्द करून मीठ तयार करण्याचा आधिकार हिन्दी नागरिकांना द्यावा.

·         विदेशी दारू विकणार्‍या दुकाना पुढे निदर्शने करण्याचा आधिकार असावा.

·         कायदेभंग चळवळीत सरकारने ज्या ज्या व्यक्तींना खाजगी मालमत्ता जप्त केली असेल त्या त्या व्यक्तींची मालमत्ता परत करावी

·         कायदेभंग चळवळ स्थगित व्हावी

·         राष्ट्रसभेने गोलमेज परिषदात भाग घ्यावा

·         बहिष्कार चळवळ मागे घ्यावी.

·         सरक्षण, परराष्ट्र, अल्पसंख्यांक व काही खाती येत्या राज्यकारभार पद्धतीत राखीव म्हणून रहावीत.   

      गांधी आयर्विण करारा बरोबरच सविनय कायदेभंग चळवळीचा शेवट झाला. त्याच बरोबर हिंदुस्थानातील नेत्यांनी दुसर्‍या गोलमेज परिषदेस हजर राहण्यास संमती दर्शवली.


दुसरी गोलमेज परिषद (1931)---

     
      गांधी करारानंतर लॉर्ड आयर्विण यांनी आपले व्हाईसरॉय चे पद सोडून मायदेशी परतले त्यांच्या जागी लॉर्ड विलिंगडन व्हाईसरॉय झाले. ते प्रतिगामी व नोकरशाही वृत्ती असलेले व्हाईसरॉय होते.
      पुढे राष्ट्रसभेने सरदार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अधिवेशन घेतले. या अधिवेशनात काही करार मंजूर करून महात्मा गांधी परिषदेला उपस्थित राहण्यासाठी इंग्लंड ला गेले. या परिषदे मध्ये हिंदुस्तानला लगेच वसाहतीचे राज्य द्यावे अशी मागणी महात्मा गांधी यांनी केली. परंतु महात्मा गांधी हे केवळ राष्ट्रसभेचे नेते आहेत ते संपूर्ण हिंदुस्तानाच्या वतीने बोलू शकत नाहीत अशी आठवण इतरांनी करून दिली. भारतातील अनेक धर्म व जाती आहेत व त्यांचे प्रतींनिधी गोलमेज परिषदेला उपस्थित होते. गांधीजींनी केवळ राष्ट्रसभेचे नेतृत्व करावे असे इतरांचे म्हणणे होते. या गोलमेज परिषदेत गांधीजींचे समाधान झाले नाही त्यामुळे निराश आवस्थेत ये आपल्या मायदेशी परतले व भारतात येताच परत सविनय कायदेभांगाची चळवळ सुरू केली परंतु ब्रिटीशांनी या वेळेस गांधीजींना अटक करून तुरुंगात टाकले.




राम्से मॅकडॉनल्ड यांचा जातीय निवाडा (16 ऑगस्ट 1932)


      काही अनेक कारणास्तव दुसरी गोलमेज परिषद अयशस्वी ठरली. दुसर्‍या गोलमेज परिषदेत विविध जाती धर्माचे प्रतींनिधी उपस्थित होते त्या मध्ये हिंदुस्तानाच्या राज व्यवस्थेच्या बाबतीत एकमत होऊ शकले नाही. जाती धर्माच्या आधारावर कायदेमंडळात व्यक्तींना सभासदत्व प्राप्त करून देणारा ठराव पंतप्रधान राम्से मॅकडॉनल्ड यांनी 16 ऑगस्ट 1932 रोजी जाहीर केला पंतप्रधानाच्या या निर्णयास इतिहासात रॅम्से मॅकडोनाल्ड यांचा जातीय निवाडा म्हणून ओळखले जाते.
      या निवाड्यानुसार ज्या प्रांतात मुसलमान अल्पसंख्यांक होते तेथे त्यांना प्रमाणाबाहेर प्रतिनिधित्व मिळाले. तथापि जेथे हिंदू अल्पसंख्यांक होते तेथे हिंदूंना मात्र प्रमाणापेक्षा अधिक प्रतिनिधित्व मिळाले नाही. ख्रिशन, अँग्लो इंडियन आणि यूरोपियन यांना देखील त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणाबाहेर जागा मिळाल्या होत्या. मॅकडोनाल्ड यांनी अस्पृश्य समाजालाही स्वतंत्र मतदार संघ जाहिर केला तसेच ते सर्वसाधारण मतदारसंघात देखील मतदान करू शकत होते पण अस्पृश्यांना हिंदू पासून अलग करण्याचा हा निर्णय महात्मा गांधी यांना पसंद नाही पडला त्यामुळे त्यांनी या निर्णयाविरुद्ध उपोषण सुरू केले. अस्पृश्यांचे शुभचिंतक व नेते बाबासाहेब आंबेडकर यांना स्वतंत्र मतदार संघाची कल्पना आवडली होती परंतु महात्मा गांधी यांनी आमरण उपोषण सुरू केल्याने त्यांना महात्मा गांधी यांची भेट घ्यावी लागली तेथे तडजोड घडून आली.


पुणे करार----1932

     
      त्या काळी अस्पृश्यांची परिस्थिति फार दयनीय होती. हिंदू समाजातील चार वर्ण पद्धतीतील सर्वात खालचा स्थर म्हणजेच अस्पृश्य होत. या परिस्थितीचा विचार करूनच मॅकडोनाल्ड यांनी जातीच्या आधारावर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ दिला होता. पण अस्पृश्यांना हिंदू पासून वेगळे केले तर ते कधी एक होऊ शकणार नाही असे महात्मा गांधीजींना वाटले त्यामुळे त्यांनी या निर्णयाविरोधात उपोषण सुरू केले शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी तडजोड करून त्यांच्याशी बोलणी करण्याचे ठरवले. शेवटी अस्पृश्यांना 148 जागा राखीव देण्यात आल्या या करारास पुणे करार म्हणून संबोधले जाते.

तिसरी गोलमेज परिषद—1932

      महात्मा गांधीजींनी सुरू केलेली सविनय कायदेभंग चळवळीचा प्रभाव कमी होत होता. परंतु असे असतानाही इंग्रजांनी दडपशाही चे धोरण चालूच ठेवले होते. इंग्लंड मधील हुजूर पक्षाने देखील भारतास नवीन राज्यघटना देण्यास नकार दिला होता.
      असे असताना देखील तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली (डिसेंबर 1932). या गोलमेज परिषदेत भारतातील राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त सलेक्षण कमिटी ची स्थापना केली. या गोलमेज परिषदेच्या आधारावरच 1935 चा कायदा उदयास आला.

असहकार चळवळ

◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.


➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.


◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.


◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.


◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.


🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

जालियनवाला बाग हत्याकांड



जनरल डायरद्वारा केले गेलेले सामुहिक हत्याकांड


एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० 


जालियनवाला बाग सभा


अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्त्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बॅंकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बॅंक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरीकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरीक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.


योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.


जालियनवाला बाग हत्याकांड महत्त्वाचे मुद्धे


20 जुलै 1905 रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली.


सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते.


16 ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले.


कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला 50,000 लोक हजर होते.


बंगालच्या खेडयापाडयांतून न शहराशहरांतून सभा, मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते.


परकीय बनावटीच्या सर्व वस्तुवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर हे या चळवळीचे सूत्र होते.


अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळया पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणार्‍या दुकानांपुढे निदर्शने करण्यात आली.


शाळा, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालये व सरकारी नोकर्‍यांचा त्याग असे या असहकार आंदोलनाचे स्वरुप होते, मात्र कार्यक्रमांतील हा भाग परिणामकारकरीत्या अमलात येऊ शकला नाही, परकीय जोखडातून स्वातंत्र्य, अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली.


त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर 1906 मधील कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना दादाभाई नौरोजींनी स्पष्ट केले की ‘स्वराज्य’ हेच कॉंग्रेसचे उद्दिष्ट आहेत.


खेडयातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले.


विशेषत: विद्यार्थी, महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते, मोठया उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले, स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतांतही प्रसृत झाल्या.


परदेशी कापडावरील बहिष्काराचे आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले.


समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांनी सारा देश आता एक होऊ लागला.


सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले. सभांवर बंदी घालण्यात आली.


वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला. राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना मारझोड करण्यात आली.


सरकारने जहालांपासून मवाळांना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले.


जनता आता जागृत झाली होती, पण तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढयाला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही.


अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्षे काळया पाण्याची शिक्षा झाली.


बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपत राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले.


मोठया जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय अधिकार्‍यांची हत्या करणे हीच त्यांच्या राजकीय कार्याची पध्दत बनली. अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते.


या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही. पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे.


इसवी सन 1909 पासून 1916 पर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती, पण पहिल्या महायुध्दाच्या काळात भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या इंग्रज विदुषी अ‍ॅनी बेझंट यांनी आणि करावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी ‘इंडियन होमरुल लीग’ च्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरु केले.


युध्दकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते. त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उलेख केला पाहिजे.


त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.


हत्याकांडाच्या प्रतिक्रिया


भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले.


शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला

लखनऊ ऐक्य व लखनऊ करार



🖍गोखलेंच्या भारत सेवक समाजास होमरुल लीगचे सदस्य होण्याची संमती नव्हती, परंतु त्यांनी देखील भाषण दौरे आयोजित करुन होमरुलला पाठबळ दिले.

🖍होमरूल कार्यपध्दती ही गांधीजींना मान्य नव्हती व होमरूलसाठीची ही योग्य वेळ नाही असे त्यांचे मत होते. 

🖍या अधिवेशनासाठी टिळकांच्या होमरूल लीगने ‘काँग्रेस स्पेशल’ व ‘होमरूल स्पेशल’ म्हणून लखनौसाठी या दोन स्पेशल आगगाडयांची व्यवस्था केली.

🖍या अधिवेशनात ॲनी बेझंट यांच्या प्रयत्नाने जहालांना पुन्हा काँग्रेसमध्ये औपचारिकरित्या सामील करून घेण्यात आले. यास ‘लखनौ ऐक्य’ असे म्हणतात.

🖍आता काँग्रेसची दारही जहाल गटाला खुली झाल्यानंतर ती पुन्हा प्रभावीत तसेच गतीशील बनली व राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करण्याची ताकद तिच्यात पुन्हा निर्माण झाली.

🖍याअधिवेशनात एक मुखाने स्वराज्याची मागणी करण्यात आली.

🖍काँग्रेस व मुस्लिम लीग दोघांच्या राजकीय मागण्या सारख्याच असाव्यात म्हणून काँग्रेस व मुस्लिम लीग यांमध्ये एक करार करण्यात आला. त्यास लखनौ करार असे म्हणतात.

🖍या कराराव्दारे काँग्रेसने मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केली, तर मुस्लिम लीगने काँग्रेसच्या साम्राज्यांतर्गत स्वराज्याच्या मागणीचे समर्थन केले.

🖍तसेच मुस्लिमांच्या अल्पसंख्य प्रांतातून मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधी 
पाठविण्यासंबंधीची मागणी मुस्लिम लीगने काहीशी सौम्य केली.

🖍आता काँग्रेस व लीग यांच्यात राजकीय मागण्याबाबत मतैक्य होवून भारताच्या राजकीय क्षेत्रात समान उद्दिष्ट पूर्तीसाठी या संघटना सहकार्यास सिध्द झाल्या. (वस्तुत: काँग्रेसने व्यवहारीक दृष्टीकोनातून राष्ट्रीय सामंजस्यासाठी मुस्लिमांचे स्वतंत्र मतदार संघ आनंदाने स्विकारुन नाईलाजाने केलेली एक तात्विक तडजोड होती.)

होमरूल चळवळ

* होमरूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा आपणास अधिकार प्राप्त करून घेणे. 

* इंग्लंडच्या जोडखातून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी होमरुलची चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरु झाली. 

* डॉ. अनी बेझंट या विदुषीने तिचा प्रथम विचार मांडला. 

* बेझंट ह्या जन्माने आयरिश होत्या, २५ सप्टेंबर १९१५ साली होमरूल लीग [ स्वराज्य संघ ] याची स्थापना करण्यात आली. 

* त्यांच्या धार्मिक थिओसोफ़िकल सोसायटी हा संप्रदाय स्थापन केला. 

* २ जानेवारी १९१४ रोजी मद्रास प्रांतात 'कॉमन विल' हे वृत्तपत्र स्थापन केले. 

* इंग्लंडचा दौरा करून डॉ अनी बेझंट हिंदुस्तानात परतल्यानंतर त्यांनी मद्रासेत 'न्यू इंडिया' नावाचे एक आणखी वृत्तपत्र काढून आपले विचार सुरु केले.


🔹लो. टिळकांची होमरूल चळवळ

* हिंदुस्तानासाठी स्वराज्य मागणे व त्यासाठी चळवळ उभारणे, हि त्यावेळी जहाल विचारसरणीच होती. 

* बेझंट बाईच्या होमरूल चळवळीच्या अगोदरच त्यांनी १८ एप्रिल १९१६ रोजी त्यांना महाराष्ट्रात होमरूल चळवळ स्थापन केली होती. व जोसेफ बॉप्टिस्टा हे या लीग चे अध्यक्ष होते. 

* न ची केळकर हे तिचे सचिव होते.


🔺होमरूल चळवळीचे परदेशातील कार्य

* हिंदुस्त्नातील चळवळीचे कार्य हे परदेशातही उमटले. 

* मद्रास हाय कोर्टाचे न्यायाधीश सर सुब्र्म्ह्न्यम अय्यर हे मद्रास प्रांतातील होमरूल लीगचे अध्यक्ष होते. 

* ईंग्लंड व अमेरिकेतही होमरूल या संघटनेचे वृत्त या देशातील वृत्तपत्रानीही घेण्यास सुरवात केली.


🔸होमरूल चळवळीचे कार्याचे परीक्षण

* राष्ट्रसभेच्या धोरणात बदल 

* पाश्चात्य देशात हिंदी स्वराज्याबद्दल सहानुभूती 

* मॉन्टेग्यू साहेबाची  इतिहास प्रसिद्ध घोषणा


🔺होमरूल चळवळीचे उदिष्टे

* ब्रिटीश साम्राज्याचा अंतर्गत स्वराज्य ताबडतोब प्राप्त करणे

* देशातील लोकमत जागृत करून ते संघटीत करणे

* इंग्रजांच्या जुलुमी धोरणाचा परिचय सामान्य जनतेला करून देणे

* स्वराज्य मिळून देण्यासाठी देशातील सर्व साधनसामुग्रीचा वापर करणे

* इंग्रज प्रशासनाकडून भरीव राजकीय सुधारणा प्राप्त करणे


दृष्टिक्षेपात भारतीय राज्यघटनेचे स्त्रोत



◾️भारत सरकार कायदा, १९३५


संघराज्यीय शासनपद्धती, राज्यपालाचे पद, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग,

आणीबाणीसंबंधी तरतुदी व प्रशासनिक तपशील.


2)ब्रिटिश राज्यघटना


संसदीय शासन पद्धती, कायद्याचे राज्य, कायदेमंडळ प्रणाली, एकेरी नागरिकत्व,

आदेश (writs) पारित करण्याचे विशेषाधिकार, संसदीय विशेषाधिकार व द्विगृही

कायदेमंडळ


3) अमेरिका 

मूलभूत अधिकार, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीविरुद्ध महाभियोग, सर्वोच्च न्यायालयाच्या व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची पदच्युती, उपराष्ट्रपतिपद


4) आयर्लंड

राज्यधोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, राज्यसभेत सदस्य नामनिर्देशित करणे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत.


5) कॅनडा 

प्रबळ केंद्रसत्ता असलेले संघराज्य, केंद्राकडे शेषाधिकार, केंद्रातर्फे राज्यपालांची नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागारी अधिकार क्षेत्र,


6) ऑस्ट्रेलिया 

समवर्ती सूची, व्यापार व वाणिज्य व्यवहारांचे स्वातंत्र्य, संसदेच्या दोन्ही गृहांचेसंयुक्त अधिवेशन.


7) जर्मनी 

आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकारांचे निलंबन.


8) सोव्हिएत युनियन (आताचे रशिया) मूलभूत कर्तव्ये आणि सरनाम्यातील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श.


9) फ्रान्सची राज्यघटना

प्रजासत्ताक पद्धती आणि सरनाम्यातील स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे आदर्श.


10) दक्षिण आफ्रिकेची राज्यघटना

घटनादुरुस्तीची पद्धत आणि राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक.


11) जपान 

कायद्याने स्थापित प्रक्रिया


अॅनी बेझंट यांची होमरुल लीग

(स्थापना सप्टेंबर १९१६)

> कार्यक्षेत्र - मुंबईसहित मद्रास व उर्वरीत महाराष्ट्र,

उत्तर व दक्षिण भारत.

> ही संघटना टिळकांच्या संघटनेपेक्षा ढीली होती.

कोणतेही तीन सभासद लीगची शाखा सुरू करू शकत.

> सदस्यांना व्यक्तिगत सूचना दिल्या जायच्या किवा न्यू इंडियातील 'अरुंडेल' यांच्या होमरुल सदरातून

द्यायचे.

> मार्च १९१७ मध्ये या लीगचे ७००० सभासद होते.

> होमरुल लीगमध्ये प्रवेश केलेले नेते -


 मोतीलाल नेहरु, जवाहरलाल नेहरु, भुलाभाई देसाई, चित्तरंजन दास, मदनमोहन मालवीय, महंमद अली जीना, तेजबहादूर सप्रू आणि लाला लजपतराय.

> सरकारने चळवळ दडपून टाकण्यासाठी एका

भाषणाबद्दल टिळकांवर खटला भरला. तेव्हा उच्च न्यायालयातील अपिलवर टिळक निर्दोष सुटले.

बेझंटबाईवर ऑगस्ट १९१७ ला खटला भरला.

> १९१५ ला मुंबईत होमरुल लीगची स्थापना झाली.

महाधिवक्ता


राज्य सरकार आणि राज्यपाल यांना कायदेशीर सल्ला देण्यासाठी भारतीय कलम 165 नुसारच एक महाधिवक्त्याचे पद निर्माण केलेले आहे.

हा महाधिवक्ता राज्य सरकारचा वकील म्हणूनदेखील काम करतो.

या महाधिवक्त्याला अनेक वैधानिक स्वरूपाचे कार्य पार पाडावी लागतात. त्यामुळे महाधिवक्याला घटक राज्याचा प्रथम कायदा अधिकारी म्हणून ओळखले जाते. अशा महाधिवक्त्याची नेमणूक पुढीलप्रमाणे केली जाते.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️


1. नेमणूक


महाधिवक्त्याची नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात.

महाधिवक्त्याला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राज्यपालासमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.

राज्यपालाच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महाधिवक्ता पदासाठी केली जाते.


🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


2. पात्रता


भारतीय घटना कलम 165 नुसार महाधिवक्ता पदावर नियुक्त होणार्‍या पुढील पात्रता असणे आवश्यक आहे.

ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.

त्याचे वय 62 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

त्यांनी भारतातील कोणत्याही न्यायालयामध्ये 10 वर्षे न्यायाधीश म्हणून किंवा उच्च न्यायालयात 5 वर्षे वकील म्हणून कार्य केले असावे.

संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्याने पूर्ण केलेल्या असाव्यात.

राज्यपालाच्या मते ती व्यक्ती निष्णात कायदेपंडित असावी.

उच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या पात्रता त्या व्यक्तीच्या अंगी असाव्यात.


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷


3. कार्यकाल


भारतीय राज्यघटनेत महाधिवक्त्याच्या तसा कार्यकाल ठरवून दिलेला नाही परंतु त्याचे निवृत्ती वय 62 वर्षे ठरवून दिलेले आहे. याचाच अर्थ असा की, महाधिवक्ता वयाच्या 62 वर्षापर्यंत आपल्या अधिकारपदावर कार्य करू शकतो असे असले तरी महाधिवक्ता मुदतपूर्व आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो.

याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटना विरोधी कृत्य केले असेल तर राज्यपाल त्याला पदच्युत करतात.


सामान्यत: राज्यातील मंत्रीमंडळ बदलते की. महाधिवक्ता बदलला जातो.


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀


4. वेतन व भत्ते


महाधिवक्त्याला दरमहा रुपये 80,000/- वेतन प्राप्त होते. त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त त्याला निवासस्थान मोफत दिले जाते. शासकीय कामासाठी देशी विदेशी प्रवास त्याला मोफत असतो.

एकदा निश्चित झालेले त्याचे वेतन कोणीही कपात करू शकत नाही. परंतु राष्ट्रपतीने आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्याच्या वेतनात कपात केली जाते.

महाधिवक्त्याचे वेतन हे राज्याच्या संचित निधीतून दिल्या जाते.

निवृत्त झाल्यानंतरही त्याला निवृत्तीवेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹


5. अधिकार व कार्ये


राज्यपालाने मागितलेल्या कायदेशीर बाबीसंबंधी सल्ला देणे.

राज्य सरकारच्या बाजूने न्यायालयात उपस्थित राहून कायदेविषयक मत मांडणे.

राज्यविधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात उपस्थित राहून तेथील चर्चेमध्ये भाग घेणे.

महाधिवक्त्याला खाजगी वकिलीदेखील करता येते. परंतु एखदया खटल्यामध्ये एक पक्ष राज्यसरकारचा असेल तर राज्यसरकारच्या बाजूने युक्तिवाद करावा लागतो.

योग्य न्यायासाठी उच्च न्यायालयातील खटला सर्वोच्च न्यायालयाकडे अपील करणे.

महा पोलीस भरती


ब्रिटीशांचा भारतातील पहिला व्हॉईसरॉय कोण होता?

     🔴 लाॅर्ड कॅनिंग ✅✅

     ⚫️ लॉर्ड वेलस्ली

     🔵 वॉरन हेस्टिंग्ज

     ⚪️ यापैकी नाही


१ जानेवारी १९२३ रोजी मोतीलाल नेहरु व देशबंधू यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली?

     🔴यग इंडिया

     ⚫️सवराज्य पक्ष ✅✅

     🔵नाझीवादी पक्ष

     ⚪️इडिया कॉग्रेस



देशी व्यापारोत्तेजक मंडळ   या संस्थेची स्थापना कोणी केली?

     🔴छत्रपती शाहू महाराज

     ⚫️विठ्ठल रामजी शिंदे

     🔵बाबा पद्मजी

     ⚪️सार्वजनिक काका ✅✅



इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार   हे...... या वृत्तपत्राचे ध्येय होते.

     🔴मराठा

     ⚫️बहिष्कार भारत

     🔵परभाकर

     ⚪️सधारक ✅✅



स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री कोण?

     🔴डॉ. पंजाबराव देशमुख ✅✅

     ⚫️सी.सुब्रह्यण्यम

     🔵सरदार बलदेवसिंग

     ⚪️गलझारीलाल नंदा



जोतीराव गोविंदराव फुले यांना महात्मा ही पदवी...... यांच्याकडून देण्यात आली.

     🔴बरिटिश सरकार

     ⚫️पण्यातील जनता

     🔵सत्यशोधक समाज

    ⚪️ मबईतील जनता ✅✅




१९ व्या शतकात पंजाबात  नामधारी शिख चळवळ  र्उफ  कुका चळवळ  कोणी सुरु केली?

      🔴गरु रामसिंग ✅✅

      ⚫️गरु तेगबहादूर

      🔵लाला हरदयाळ

      ⚪️गरुजीत सिंग




१८५७ चा उठाव म्हणजे ख्रिश्चन धर्माविरुध्द हिंदूचे बंड  असे कोण म्हणाले?

     🔴डॉ. शेन ✅✅

     ⚫️न. र. फाटक

     🔵थॉमस मन्रो

    ⚪️ यापैकी नाही


कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात लोकमान्य टिळक व आगरकर यांना किती दिवस कारावासाची शिक्षा झाली?

   🔴  १०२

   ⚫️ १०१ ✅✅

   🔵  १००

   ⚪️    ११०


१९७१ साली कोणता देश स्वतंत्र झाला

     🔴नामिबिया

     ⚫️बांगला देश ✅✅

     🔵फिजी

     ⚪️झिंबाब्वे



इ.स.१४९८ मध्ये भारताकडे येणारा सागरी महामार्ग कोणी शोधून काढला?

     🔴कोलंबस

     ⚫️रॉर्बट क्लाईव्ह

     🔵वास्को द गामा ✅✅

     ⚪️वॉरन हेस्टिंग


१८५७ साली मंगल पांडे यांनी कोठे उठाव केला?

     🔴दिल्ली

     ⚫️बराकपूर ✅✅

     🔵मीरत

     ⚪️बरेली


 भारतातील सर्वात जास्त श्रमशक्ती कोणत्या क्षेत्रात आहे?
      🔴पराथमिक ✅✅✅

     ⚫️ दवितीय

      🔵तत्तीय

     ⚪️ वरील सर्व

 

 डब्लू.टी. ओ. चे मुख्य कार्यालय............येथे आहे.
      🔴नयूर्यॉक

      ⚫️वॉशिग्टन

      🔵लडन

      ⚪️जिनिव्हा✅✅✅



 कोणत्या बॅंकेचे राष्ट्रीयीकरण करुन स्टेट बॅंक ऑफ इंडिया अस्तित्वात आली ?
      🔴बक ऑफ हिंदोस्तान

      ⚫️इपिरियल बॅंक✅✅✅

      🔵परेसिडेन्सी बॅंक

      ⚪️सट्रल बॅंक



 भारताची मध्यवर्ती बॅंक कोणती ?
     🔴 बक ऑफ बॉम्बे

      ⚫️रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया✅✅

      🔵सटेट बॅंक ऑफ इंडिया

      ⚪️अशी बॅंक नाही



 भारतात सर्वात मोठी प्राण्यांची जत्रा कोठे भरते?
      🔴सोनपूर✅✅✅

      ⚫️पष्कर

      🔵जयपूर

      ⚪️रायबरेली



भारतातील सर्वात उंच व मोठा असलेला गोमटेश्वरचा पुतळा कोणत्या राज्यात आहे?
    🔴  आध्र

     ⚫️ तामिळनाडू

    🔵  कर्नाटक✅✅✅

     ⚪️ करळ


बालिका दिन  हा दिवस कोणाचा जन्मदिवस आहे ?
      🔴पडिता रमाबाई

      ⚫️इरावती कर्वे

      🔵सावित्रीबाई फुले✅✅✅

      ⚪️डॉ. आनंदी गोपाळ



 भारताचा पहिला राष्ट्रपुरुष  ह्या पुस्तकात डॉ. माधव पोतदार यांनी कोणाचे चरित्र लिहिले आहे?

      🔴बाळशास्त्री जांभेकर

      ⚫️लोकमान्य टिळक

      🔵महात्मा गांधी

      ⚪️ना. जगन्नाथ शंकरशेट✅✅

  

फिल्म फेअर पुरस्कार  कोणाद्वारे देण्यात येतो?
      🔴टाईम्स ऑफ इंडिया✅✅

      ⚫️इडियन एक्सप्रेस

      🔵द हिंद

      ⚪️लोकशक्ती टाईम्स



 रेमन मॅगसेसे  पुरस्कार केव्हापासून देण्यात येतो?
      🔴१९५०

      ⚫️१९५५

      🔵१९६५

      ⚪️१९५७✅✅✅


 गेट वे ऑफ इंडिया  निर्माण झाल्याचे साल कोणते?
      🔴१९०१

      ⚫️१९०२

      🔵१९०४

      ⚪️१९११✅✅✅



 रेडक्रॉस संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
      🔴लपान्स

     ⚫️ वहिएन्ना

      🔵जिनिव्हा✅✅✅

      ⚪️परीस



 ओझोन दिन  कोणता दिवस आहे?
      🔴१५ जून

      ⚫️१५ मे

      🔵१८ मार्च

      ⚪️१६ सप्टेंबर✅✅✅


 हैद्राबाद जवळील बोलाराम या ठिकाणच्या राष्ट्रपती निवासस्थानाला काय नाव आहे ?
      🔴राष्ट्रपतीभवन

      ⚫️राजभवन

      🔵निलायम✅✅✅

      ⚪️मगलधाम


 नदी जोड योजनेस कोणते नाव देण्यात आले आहे.?
      🔴सरीता क्रांती

      ⚫️अमृत क्रांती✅✅✅

      🔵जलक्रांती

      ⚪️जलस्वराज्य


 जिल्हा परिषदेच्या   महिला व बालकल्याण समितीचा सचिव   म्हणून कोण काम करतो?
      🔴तहसीलदार

      ⚫️गट विकास अधिकारी

      🔵समाजकल्याण अधिकारी

      ⚪️उपमुख्य कार्यकारी अधिकारी✅✅

       

विधानपरिषदेची जननी   कोणास म्हणतात?
      🔴विधानसभा✅✅

      ⚫️लोकसभा

      🔵राज्यसभा

      ⚪️पचायत राज परिषद



अंतर्गत सशस्त्र उठाव आणि बाह्य आक्रमणावरुन राष्ट्रीय आणीबाणीची प्रक्रिया भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमात स्पष्ट केली आहे?
      🔴३५२✅✅

      ⚫️३६८

      🔵३५६

      ⚪️३६०


 देशातील जिल्हा नियोजनानुसारची पहिली पंचवार्षिक  योजना कोणत्या वर्षी सुरु झाली?
      🔴१९६९ ते १९७०

      ⚫️१९५१ ते १९५२

      🔵१९७७ ते १९७८

      ⚪️१९७४ ते १९७५✅✅



जन्म मृत्यूचा दाखला कोणत्या कर्मचार्‍याशी संबंधित आहे?
     🔴 गटविकास अधिकारी

      ⚫️पचायत विस्तार अधिकारी

      🔵गरामसेवक✅✅

      ⚪️तलाठी

      

 जमिनीच्या हस्तांतरणाबाबतची कागदपत्रे कोण तयार करतो?
      🔴जिल्हाधिकारी

      ⚫️तलाठी✅✅

      🔵तहसिलदार

      ⚪️यापैकी कोणीही एक

        

भारतात प्रशासकीय (सिव्हील) सेवा कोणी सुरु केल्या?
      🔴लॉर्ड कर्झन

      ⚫️लॉर्ड कॉर्नवॉलिस✅✅

      🔵लॉर्ड डलहौसी

      ⚪️लाॅर्ड मेयो



 महाराष्ट्रातील   रोजगार हमी योजना   कशावर आधारीत आहे?
      🔴मलभूत कर्तव्य

      ⚫️नसर्गिक अधिकार

      🔵मार्गदर्शक तत्त्वे✅✅

      ⚪️रोजगाराचा मूलभूत हक्क



 कोणास   भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे पितामह   म्हणून ओळखले जाते?
      🔴लॉर्ड माऊंटबॅटन

      ⚫️लॉर्ड लिटन

      🔵लॉर्ड रिपन✅✅

      ⚪️लॉर्ड कॅनिंग


 महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे ?
      🔴७८✅✅

      ⚫️१४८

      🔵१७८

      ⚪️२८८



महाराष्ट्रातुन लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात ?
      🔴४०

      ⚫️४२

      🔵४८✅✅

      ⚪️यापैकी नाही


 मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचे सदस्य हे कोणाला जबाबदार असतात ?
      🔴राष्ट्रपती

      ⚫️ससद

      🔵विधानपरीषद

      ⚪️विधानसभा✅✅



राज्यशासनाचे कायदेशीर सल्लागार कोण असतात ?
      🔴उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश

      ⚫️राज्याचे मुख्यमंत्री

      🔵महाधिवक्ता✅✅

      ⚪️राज्यपाल



 राज्य विधीमंडळाच्या दोन बैठकात किती महिन्यापेक्षा जास्त अतंर असु नये ?
      🔴दोन

      ⚫️चार

      🔵पाच

      ⚪️सहा✅✅


पंचायत राज्याची सुरूवात सर्वप्रथम कोणत्या राज्याने केली ?
      🔴महाराष्ट्र

      ⚫️मध्य प्रदेश

      🔵आध्र प्रदेश

      ⚪️राजस्थान✅✅


मेदापासुन किती उर्जा (उष्मांक)  मिळते?  (ASST 2014)

🔴४कॅलरी 

⚫️९कॅलरी ✅✅✅

🔵७कॅलरी 

⚪️१२कॅलरी


 लहान मुलांमध्ये रातांधळेपणा हा आजार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो? (STI 2012)
🔴A✅✅✅

⚫️B

🔵C

⚪️D



 आहारातील उर्जेचे प्रमुख स्त्रोत कोणते??  (PSI 2012)
🔴परथिने 

⚫️कर्बोदके✅✅✅

🔵मद

⚪️जीवनसत्वे 



कोणत्या प्राण्याचे ह्रृदय सर्वात मोठे आहे? (ASST 2014)
🔴मगर

⚫️हत्ती 

🔵सिंह 

⚪️जिराफ✅✅✅


 नैसर्गिक प्रसूतीसाठी लागणारे संप्रेरक कोणते? (ASST 2015)
🔴आक्सीटोसीन✅✅✅

⚫️वहासोप्रिसीन

🔵अड्रेनॅलीन

⚪️थायरोक्झिन



खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो? (PSI 2014)
🔴कगारू

⚫️पलाटिपस✅✅

🔵पग्विन 

⚪️वहेल



मद्यपानामुळे_________चा अभाव निर्माण होतो? (PSI 2012)

🔴थायमिन

⚫️रटीनाॅल

🔵नायसीन✅✅✅

⚪️अस्काॅर्बीक आम्ल



 हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? (STI 2016)
🔴सटफिलोकोकस

⚫️बासिलस

🔵सट्रेप्टोकोकस

⚪️कलोस्ट्रिडियम✅✅✅



 बटाटे, कांदे यांसारख्या भाज्यांना कोंब येऊ नये यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? (STI 2016)
🔴अल्फा

⚫️गमा ✅✅✅

🔵मायक्रोवेव्हस्

⚪️अल्ट्राव्हायलेट



 मलेरिया रोग______ मुळे होतो. (PSI 2011)
🔴पलाझमोडियम✅✅✅

⚫️पलॅनेरिया

🔵फायलेरिया

⚪️आरेलिया

विविध समित्याविषयी थोडक्यात माहिती

1) रंजन गोगोई समिती 

मध्यप्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणासाठी नेमलेली समिती.


2) परमराजसिंग उमरानंगल समिती 

भारतीय हॉकी कर्णधार सरदारसिंगवर ब्रिटिश युवतीने लैंगिक शोषणाचा आरोप केल्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.


3) एच.एस. बेदी समिती 

शिखावरील सोशल मीडिया व सार्वजनिकरित्या केले जाणारे विनोदी किस्से बंद करण्याबाबत उपाययोजना सुचविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती.


4) गोपाळ सुब्रमण्यम समिती 

दिल्ली अँड डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशन मधील कथित गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी नेमलेली समिती.


5) दीपक मोहांती समिती 

वित्तीय समायोजनाचे धोरण या नजीकच्या भविष्यातील दिशा निश्चित करण्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेने स्थापन केलेली समिती.


6) श्याम बेनेगल समिती 

सेन्सॉर बोर्डाची पुनर्रचना करण्यासाठी आणि सिनेमॅटोग्राफ कायद्यात बदल सुचविण्यासाठी नेमण्यात आलेली समिती.


7) अरविंद पनगारिया समिती 

जपान बरोबर मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन समस्या सोडविण्यासाठी


8) एम. वेंकच्या नायडू समिती 

जाट समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती


9) बी.के. प्रसाद समिती 

इशरत जहां प्रकरणातील गहाळ फायलींचा शोध घेण्यासाठी नेमलेली समिती.


10) डॉ. हर्षदीप कांबळे समिती 

ऑनलाइन औषध खरेदी गैरव्यवहार करणार्‍या कंपन्यांवर निर्बंध लावण्यासाठी कायदा करण्यासंदर्भात केंद्र सरकारने नेमलेली समिती.


11) मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस समिती 

राज्यातील डान्सबार बंदीसाठी नवा कायदा करण्यासाठी नेमलेली


12) प्रो. राकेश भटनागर समिती 

जेएनयू विद्यापीठ (दिल्ली) मधील चिथावणीजनक दिलेल्या घोषाणांच्या अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती


13) विलास बर्डेकर समिती 

राज्याच्या शाश्वत विकासाबरोबरच जैववैविध्याचे सर्वेक्षण करण्यासाठी भविष्याचा वेध घेऊन कृती आराखडा करण्याच्या सुचना सुचविण्यासाठी नेमलेली समिती.


14) भगवान सहाय्य समिती 

राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभागाचा औषधी खरेदी घोटाळा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती.

44वी घटनादुरुस्ती 1978



1)  लोकसभा आणि विधानसभांचा मूळ कार्यकाल (५ वर्षे) पुनर्स्थापित केला.


2) लोकसभा आणि राज्यविधिमंडळाच्या गंपूर्तीची तरतूद पुनर्स्थापित केली.


3) संसदीय विशेषाधिकाराबाबद ब्रिटिशांच्या सामान्य ग्रहाचा संदर्भ वगळण्यात आला.


4) संसद आणि राज्यविधिमंडळामध्ये चालणाऱ्या कार्यपध्द्तीचे खरे वार्तांकन वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यास घटनात्मक संरक्षण दिले.


5) मंत्रिमंडळाचा सल्ला पुनर्विचारार्थ केवळ एकदा परत पाठविण्याचा अधिकार राष्ट्रपतीला दिला. परंतु पुनर्विचार करून दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आला.


6) अध्यादेश काढण्यासाठी राष्ट्रपती, राज्यपाल आणि प्रशासक यांच्या समाधानाची तरतूद रद्द केली.


7) सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे काही अधिकार पुनर्स्थापित केले.


8) राष्ट्रीय आणीबाणीच्या संदर्भात ‘अंतर्गत अशांतता’ या शब्दा ऐवजी ‘सशस्त्र बंडाळी’ हा शब्द योजण्यात आला.


9) कॅबिनेटने केवळ लेखी स्वरूपात शिफारस केल्यानंतरच राष्ट्रपती ‘राष्ट्रीय आणीबाणी’ घोषित करू शकतात. अशी तरतूद केली.


10) राष्ट्रीय आणीबाणी आणि राष्ट्रपती राजवटीबाबत काही ठराविक प्रक्रियात्मक संरक्षण तरतुदी केल्या.


11) मालमत्तेचा हक्क मूलभूत हक्कांच्या यादीतून रद्द केला आणि तो केवळ कायदेशीर हक्क केला.


12) कलम २० आणि कलम २१ अन्वये हमी दिलेले मूलभूत हक्क राष्ट्रीय आणीबाणीमध्ये तहकूब करता येणार नाहीत.


13) राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि लोकसभेचा सभापती यांच्या निवडणूकवादाबाबत न्यायालये निर्णय देऊ शकत नाहीत ही तरतूद वगळण्यात आली.

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

🏆  छत्रपती शिवाजी महाराजांच्या वीरता, शूरतेचे प्रतीक असलेली वाघनखे साताऱ्यात दाखल
◾️उद्घाटन :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
◾️ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, सातारा
◾️व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालय, लंडन येथून आणले गेले
◾️चार टपाल तिकीटांचे अनावरणही केलं गेलं
⭐️ 350 व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त किल्ले रायगड
⭐️किल्ले सिंधुदुर्ग,
⭐️छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा,
⭐️संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग

🏆 राज्यात पोलिसांना मदत करण्यासाठी ‘मार्वल’ ह्या 'AI' कंपनी स्थापन केली असे करणारे देशातील पहिले राज्य बनले
◾️MARVEL :  Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement
◾️मुख्यालय : नागपूर
◾️कृत्रिम बुद्ध‍िमत्तेचा वापर करून गुन्ह्यांची उकल करण्यात महाराष्ट्र पोलीस दलाला याची जोड मिळणार आहे
◾️कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य
◾️मार्वल’ स्थापन करण्याबाबत 22 मार्च 2024 रोजी त्रिपक्षीय करार
⭐️राज्य शासन
⭐️भारतीय व्यवस्थापन संस्था, नागपूर
⭐️ मे. पिनाका टेक्नॉलॉजीज खाजगी मर्या. यांच्यात

🏆 AI च्या वापराबाबर खूप महत्वाच्या गोष्टी वाचा 
⭐️भारतातील पहिली AI शाळा - शंतिगिरी विद्याभवन (तिरुअनंतपुरम - केरळ )
⭐️भारताची पहली AI टीचर - Iris
⭐️भारताची पहली AI city : लखनौ
⭐️महाराष्ट्रातील पेंच व्याघ्र प्रकल्पाने जंगलातील आग शोधण्यासाठी  AI प्रणालीचा वापर
⭐️महाराष्ट्र पोलीस दलात पण AI चा वापर होणार
⭐️देशातील पहिला AI और रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क : बेंगलुरु
⭐️ग्लोबल इंडिया AI समिट : 2024 नवी दिल्ली येथे झाली
⭐️ICICI लोम्बार्डने AI-शक्तीवर चालणारी आरोग्य विमा योजना 'एलिव्हेट' लाँच केली
⭐️केरळमध्ये शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट आहे.
⭐️DD किसान AI अँकर : कृष आणि भूमी

🏆 IMF ने 2025 साठी भारताचा GDP
Growth Rate 7% ⬆️ एवढा सांगितला आहे
◾️IMF ने 16 जुलै ला World Economic Outlook रिपोर्ट जाहिर केला
◾️IMF ने 6.8% चा Growth Rate 7 % पर्यंत वाढवला आहे
◾️2025 ला 7% सांगितलं आहे
◾️2026 ला 6.5% सांगितले आहे

🏆 IMF : International Monetary Fund (IMF)
◾️UN ची एक संस्था आहे
◾️आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था
◾️स्थपणा : 27 डिसेंबर 1945
◾️सदस्य : 190 सदस्य
◾️संचालक : क्रिस्टालिना जॉर्जिव्हा

🏆 महाराष्ट्रातील 1000 महाविद्यालयात "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची" स्थापना केली जाणार आहे
युवक-युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे
◾️प्रत्येक केंद्रात 150 विद्यार्थी
◾️दरवर्षी एकूण 1,50,000 विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण
◾️वय : 15 ते 45 सर्व पात्र
◾️कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री : मंगल प्रभात लोढा आहेत

🏆  ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हा उपक्रम आरोग्य विभागाकडून आषाढी वारी दरम्यान राबविला गेला
◾️या वारीमध्ये 17 जुलैपर्यंत 13 लाख 96 हजार 72 वारकऱ्यांवर मोफत उपचार करण्यात आले आहेत.
◾️प्रत्येक 5 किलोमीटरवर एक ‘आपला दवाखाना’ तयार करण्यात आला होता.
◾️6 हजार 268 आरोग्य अधिकारी, कर्मचारी होते
◾️आरोग्य मंत्री : प्रा. डॉ. तानाजी सावंत
◾️दिंडी प्रमुखांसाठी औषधी कीट
◾️पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 136 हिरकणी कक्षाची स्थापना
◾️पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 5 खाटांची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष
◾️आरोग्य शिक्षण संवाद आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.

🏆 या योजना आणि त्यांची राज्ये लक्षात ठेवा
◾️प्रधानमंत्री श्री पर्यटन हवाई सेवा : मध्य प्रदेश .
◾️जनता भवन सौर प्रकल्प - असम न्याय प्रदान करने के लिए
◾️पहली गवाह संरक्षण योजना - असम मुख्यमंत्री
◾️माझी लडकी बहिन योजना - महाराष्ट्र
◾️एनटीआर भरोसा पेंशन योजना - आन्ध्र प्रदेश
◾️महतरी वंदन योजना : छत्तीसगड
◾️कन्या सुमंगल योजना : उत्तरप्रदेश
◾️मुख्यमंत्री विश्वकर्मा पेन्शन योजना : राज्यस्थान
◾️मुख्यमंत्री वयोश्री योजना : महाराष्ट्र
◾️मुख्यमंत्री संपूर्ण पुष्टी योजना : ओडीसा
◾️गृह लक्ष्मी योजना : कर्नाटक
◾️बहन बेटी स्वावलंबन योजना : झारखंड
◾️इंद्रा गाँधी प्यारी बहना सुख सम्मान निधि योजना - हिमाचल प्रदेश
◾️लक्ष्मी भांडार योजना : पश्चिम बंगाल
◾️लाडली बहीण योजना : मध्य प्रदेश
◾️महिला सन्मान योजना : दिल्ली
◾️गोधन न्याय योजना : छत्तीसगड
◾️SAUNI (सौराष्ट्र नर्मदा अवतार सिंचन) गुजरात
-------------------------------------------