Saturday, 29 June 2024

IAS, IPS होण्याचं स्वप्न होणार पूर्ण, सरकार देणार मोफत प्रशिक्षण, जाणून घ्या संपूर्ण माहिती

आपल्या राज्यात शेकडो विद्यार्थी आहेत, जे आयएएस आणि आयपीएस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अभ्यास करतात. पण काही विद्यार्थ्यांना यात यश येते तर बहुसंख विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागते.



सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीने स्पर्धा परीक्षेसची तयारी करणाऱ्यांसाठी एक उत्तम संधी निर्माण करून दिली आहे. बार्टीतर्फे महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी एमपीएससी, यूपीएससी, पोलीस भरती यासाठी मोफत प्रशिक्षण घेण्यात येणार आहे. त्यासाठी बार्टीतर्फे अर्ज मागवण्यात आले आहेत. 3 जुलै 2024 पर्यंत यासाठी अर्ज करता येणार आहे.



कोणकोणत्या स्पर्धा परीक्षांसाठी मिळणार प्रशिक्षण


बार्टीतर्फे संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्रा लोकसेवा आयोग (राज्यसेवा, न्यायिक सेवा, अभियांत्रिकी सेवा), पोलीस व मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, बँक, (आयबीपीएस) रेल्वे, एलआयसी व इतर तत्सम स्पर्धा परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज मागवण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येतील.   



स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या अंमलबजावणीकरिता महाराष्ट्र शासनामार्फत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक 30 ऑक्टोबर 2023 च्या शासन निर्णयानुसार सर्वंकष धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने पुण्यातील बार्टीमार्फत सन 2024-25 करिता वरील परीक्षांच्या पूर्व प्रशिक्षणासाठी हे अर्ज मागवण्यात आले आहेत.



अर्ज करण्यासाठी काय पात्रता हवी? 

 

अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे खालील पात्रता असणे गरजेचे आहे. 


>>> उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा

 

>>> उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीचा दाखला व अधिवास असणे गरजेचे आहे. 



>>> उमेदवाराचे वय वरील परीक्षांच्या अटी व शर्तीनुसार असावे. 



>>> आर्थिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असणाऱ्या उमेदवारालाच त्यासाठी अर्ज करता येणार आहे. 



>>> अनाथ आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी उणेदवाराकडे महाराष्ट्र शासानाच्या महिला व बालविकास विभागाकडून निर्गमित केलेले प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 



>>> उमेदवार दिव्यांग असल्यास 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्व असल्याच्या प्रमाणापत्राची साक्षांकित प्रत सदार करावी. 



या पूर्व प्रशिक्षणासाठी आरक्षण खालीलप्रमाणे असेल


>>> महिलांसाठी 30 टक्के आरक्षण असेल. 



>>> दिव्यांगांसाठी 5 टक्के आरक्षण असेल. 



>>> वंचित 5 टक्के आरक्षण असेल. (वाल्मिकी व तत्सम जाती-लोहार, बेरड, मातंग, मांग, मागदी इत्यादीसाठी) 



निवडीचा निकष काय असेल? 


या प्रशिक्षणासाठी पात्र ठरायचे असेल तर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात येईल. 



इच्छुक उमेदवारांनी http://trtipune.in/bartregmay24/ लिंकवरुन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 3 जुलै 2024 आहे.





Today 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि यांची पुढील लष्कर उपप्रमुख म्हणून नियुक्ती

◾️लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतील

❇️ पंतप्रधान मोदी उद्या मन की बात मध्ये आपले विचार मांडणार आहेत
◾️तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाल्यानंतर ही पहिलीच मन की बात आहे
◾️ मन की बात चा हा 111 वा भाग असणार आहे
◾️3 ऑक्टोबर 2014 ला याची सुरवात झाली होती
❇️ भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांमध्ये हिंदीचा वापर वाढवण्यासाठी 'Hindi @ UN' प्रकल्पासाठी 1.16 दशलक्ष डॉलर चे मोठे योगदान दिले आहे.
◾️भारताच्या स्थायी मिशनचे प्रभारी आर. रवींद्र यांनी हा धनादेश यूएनच्या ग्लोबल कम्युनिकेशन्स विभागाच्या (DGC) न्यूज आणि मीडिया विभागाचे संचालक इयान फिलिप्स यांना दिला.
◾️2018 मध्ये संयुक्त राष्ट्रांचा हिंदी भाषेत लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आणि जागतिक स्तरावर अधिक जागरूकता पसरवण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आला .
❇️ भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे

◾️अमेरिका आणि चीननंतर भारत तिसरा क्रमांक
◾️एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म ऑफिशियल एअरलाइन गाईड (ओएजी) यांच्या आकडेवारी नुसा

❇️ विक्रम मिस्री यांची पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आह
े.
◾️1989 बॅचचे IFS अधिकारी
◾️विनय मोहन क्वात्रा यांची जागा घेतील
◾️मिस्री सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.
◾️त्यांनी चीन, म्यानमार आणि स्पेनमध्ये भारतीय दूत म्हणून काम केले आ
हे.
❇️ नुकतेच दिले गेलेले महत्वाचे पुरस्कार लक्षात ठ
ेवा

◾️सैन्य जेंडर एडवोकेट ऑफ़ द ईयर अवार्ड 2023 - राधिका सेन
◾️साहित्य अकादमी फेलोशिप अवार्ड : रस्किन बांड
◾️आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024: जेनी एर्पेनबेक (Kairos)
◾️व्हिटली गोल्ड अवार्ड (Green Oscar) 2024- पूर्णिमा देवी बर्मन (असम)
◾️गोल्डमन पर्यारण पुरस्कार 2024 (Green Nobel prize) - आलोक शुक्ल
◾️आर्यभट्ट पुरस्कार - पावुलिरी सुब्बाराव
◾️लता दीनानाथ मंगेश्कर पुरुस्कार 2024 - अमिताभ बच्चन
◾️एबेल पुरस्कार (गणित चे नोबेल ) : Michel Talagrand
◾️इरासमस पुरस्कार - अमिताभ घोष
◾️2024 pritzkar पुरस्कार - रिकेन यामामोटो
◾️हिंदी साहित्य भारती पुरस्कार 2023 : IPS कृष्ण प
्रकाश

❇️ पॅराग्वे आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 100 वा सदस्य बन
ला आहे
◾️INTERNATIONAL SOLAR ALLIANCE (ISA)
◾️ उद्देश : जागतिक स्तरावर सौर ऊर्जेच्या उपयोजनाला गती देणे
◾️2021 मध्ये स्थापना
◾️भारत आणि फ्रान्स यांनी मिळून याची स्थपणा केली
◾️अध्यक्ष : अजय माथुर
◾️मुख्यालय: नवी दिल्ली
◾️सदस्
य : 100

❇️ लडाख पूर्ण कार्यक्षम साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हण
ून घोषित
◾️भारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत संपूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त केली आहे .
◾️ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लडाखने 97 टक्क्यांहून अधिक साक्षरता गाठली आहे.
◾️ 25 जून 2024 रोजी लडाखचे लेफ्टनंट गव्हर्नर डॉ बीडी मिश्रा यांनी सिंधू सांस्कृतिक केंद्र (SSK), लेह येथे एका कार्यक्रमात ही मा
हिती दिली

❇️ अरुंधती रॉय यांना 2024 पेन पिंटर साहित्य पुरस्कार
 दिला गेला
◾️पुरस्कार सुरवात : 2009
◾️हेरोल्ड पिंटर यांच्या स्मरणार्थ सुरू केला
◾️हेरोल्ड पिंटर यांना 2005 मध्ये साहित्यासाठी
◾️पेन पिंटर पुरस्कार प्रतिवर्ष यूनाइटेड किंगडम, आयरलैंड गणराज्य, राष्ट्रकुल सदस्य देशातील लेखकांना दिला जातो
◾️अरुंधती रॉय यांना ' द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स ' साठी 1997 मध्ये बुकर पुरस्कार मिळाला
◾️बुकर पुरस्कार जिंकणाऱ्या त्या पहिल्या
भारतीय आहेत

महिलांच्या साठी विविध राज्यात असलेल्या महत्वाच्या योजना

❇️ कर्नाटक राज्य
गृहलक्ष्मी योजना  : कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयांची निधी

❇️ तमिळनाडू राज्य
कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम योजना  : कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये

❇️ आंध्र प्रदेश राज्य :
अम्मा वोडी योजना : शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15000 रुपये , 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18500 रुपये

❇️ उत्तर प्रदेश राज्य
कन्या सुमंगला योजना : प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25000 रुपये

❇️ मध्य प्रदेश राज्य
लाडली बहना योजना  : 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1,250 रुपये

❇️ पश्चिम बंगाल
लक्ष्मीर भंडार : अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1000 रुपये
कन्याश्री प्रकल्प : 13 ते 18 या वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये
रूपश्री प्रकल्प: लग्नासाठी मुलीला एकदाच 25000 रुपयांचे अनुदान

❇️ महाराष्ट्र

◾️ लेक लाडकी योजना
🔥मुलीचा जन्म झाल्यावर : 5 हजार रुपये
🔥मुलगी इयत्ता पहिलीत गेल्यावर : 6 हजार रुपये
🔥मुलगी सहावीत गेल्यावर: 7 हजार रुपये
🔥मुलगी 11 वीत गेल्यावर: 8 हजार रुपये
🔥मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यावर: 75 हजार रुपये

◾️मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
◾️दरमहा 1500 रुपये मिळणार

👱‍♀️ कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते.
👱‍♀️ महाराष्ट्रात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते

-------------------------------------------

राष्ट्रीय सांख्यिकी दिन

🔷भारतात राष्ट्रीय सांख्यिकी दिन दरवर्षी 29 जून रोजी भारतातील आधुनिक सांख्यिकीचे जनक प्रशांत चंद्र महालनोबिस यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो .

🔷2024 मध्ये" निर्णय घेण्यासाठी डेटाचा वापर करा " या थीम अंतर्गत साजरा केला जाणार आहे.

🔷2007 मध्ये, भारत सरकारने महालनोबिस यांच्या जयंतीनिमित्त आणि सांख्यिकी आणि आर्थिक नियोजनातील त्यांच्या व्यापक कार्याची दखल घेण्यासाठी 29 जून हा राष्ट्रीय सांख्यिकी दिवस म्हणून नियुक्त केला. पहिला राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा 2007 मध्ये झाला आणि तेव्हापासून हा वार्षिक कार्यक्रम बनला आहे जो राष्ट्रीय विकासात आकडेवारीची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करतो

🔷तथापि, हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, राष्ट्रीय सांख्यिकी दिवस हा जागतिक सांख्यिकी दिनासोबत गोंधळून जाऊ नये, जो संयुक्त राष्ट्रांनी 20 ऑक्टोबर रोजी दर पाच वर्षांनी साजरा केला जातो

🔰पार्श्वभूमी👇👇👇

🔷फेब्रुवारी 2010 मध्ये झालेल्या 41 व्या सत्रात, संयुक्त राष्ट्रसंघ सांख्यिकी आयोगाने 20 ऑक्टोबर 2010 हा जागतिक सांख्यिकी दिवस  म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला.

🔷माहितीपूर्ण धोरणात्मक निर्णय आणि सहस्राब्दी विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी विश्वासार्ह, वेळेवर आकडेवारी आणि देशांच्या प्रगतीचे सूचक तयार करणे अपरिहार्य आहे हे मान्य करून, 3 जून 2010 रोजी सर्वसाधारण सभेने ठराव स्वीकारला, ज्याने 20 ऑक्टोबर 2010 रोजी अधिकृतपणे नियुक्त केले. पहिला जागतिक सांख्यिकी दिन "अधिकृत आकडेवारीच्या अनेक उपलब्धी साजरे करणे" या सामान्य थीम अंतर्गत.

🔷2015 मध्ये जनरल असेंब्लीने 20 ऑक्टोबर 2015 हा सर्वसाधारण थीम अंतर्गत दुसरा जागतिक सांख्यिकी दिवस म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला, "चांगले डेटा, चांगले जीवन" तसेच दर पाच वर्षांनी 20 ऑक्टोबर रोजी जागतिक सांख्यिकी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला.

🔷20 ऑक्टोबर 2020 रोजी जगभरात तिसरा जागतिक सांख्यिकी दिन साजरा केला गेला" जगाशी कनेक्ट करणे ज्यावर आम्ही विश्वास ठेवू शकतो अशा डेटासह " या थीमसह साजरा केला गेला ही थीम राष्ट्रीय सांख्यिकीय प्रणालींमध्ये विश्वास, अधिकृत डेटा, नावीन्य आणि सार्वजनिक हिताचे महत्त्व प्रतिबिंबित करते

🔷युनायटेड नेशन्स डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सचा सांख्यिकी विभाग हा या मोहिमेचा जागतिक समन्वयक आहे, जागतिक प्रमुख संदेश परिभाषित करतो आणि या वेबसाइटद्वारे देश आणि इतर भागीदारांना पोहोच संसाधने उपलब्ध करून देतो.