Friday 21 June 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि हे लष्कराचे उपप्रमुख असतील
◾️सध्या ते लष्कराच्या सेंट्रल कमांडची धुरा सांभाळत आहेत
◾️नॅशनल डिफेन्स अकादमी आणि इंडियन मिलिटरी अकादमीचे माजी विद्यार्थी
◾️1985 मध्ये गढवाल रायफल्समध्ये नियुक्त करण्यात आले होते
◾️37 वर्षे पेक्षा जास्त काळ ते सेवा करत आहेत
◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत)
◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत)
◾️30 जून ला एनएस राजा सुब्रमणि लष्कर उपप्रमुख बनतील
◾️30 जून ला उपेंद्र द्विवेदी लष्कर प्रमुख बनतील

❇️ नागालँडमध्ये 20 वर्षांनंतर नागरी निवडणुका होणार,
◾️महिलांना 33% जगा स्थानिक स्वराज संस्था निवडणूक मध्ये राखीव असतील
◾️2004 मध्ये स्थानिक स्वराज संस्था निवडणूक झाली होती
◾️आता त्यांनतर आता 20 वर्षांनी होणार आहे (26 जूनला होणार)

❇️ सर्वोच्च पवन ऊर्जा स्थापित क्षमतेसाठी गुजरातला पुरस्कार
◾️पाहिले पवनऊर्जा क्षमता जास्त असलेली राज्ये
◾️गुजरात: 11,823 मेगावॅट 
◾️तामिळनाडू : 10743 मेगावॅट
◾️कर्नाटक :6312 मेगावॅट

❇️ जगातील पहिले आशियाई गिधाड संवर्धन केंद्र, उत्तरप्रदेश मध्ये
◾️उत्तर प्रदेशने महाराजगंज जिल्ह्यात आशियाई  गिधाडांसाठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र स्थापन केले आहे .
◾️2007 पासून इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झव्हेंशन ऑफ नेचरच्या लाल यादीमध्ये गंभीरपणे धोक्यात आले आहे.

❇️ काही महत्वाचे लक्षात ठेवा
◾️देशातील पाहिले डिजिटल सायन्स पार्क : केरळ, कोच्चि
◾️देशातील पहिले जियोलॉजिकल पार्क : मध्य प्रदेश, जबलपुर
◾️देशातील पहिला सेटेलाइट फोन असलेला पहिला नॅशनल पार्क : काजीरंगा नॅशनल पार्क
◾️भारत का पहला रक्षा औद्योगिक पार्क : केरळ
◾️देशातील पहिला वैदिक थीम पार्क : उत्तर प्रदेश, नाव - वेद वन पार्क
◾️देशातील पहिला AI और रोबोटिक टेक्नोलॉजी पार्क : बेंगलुरु
◾️देशातील पहिला पूर्ण महिलांच्या साठी FLO औद्योगिक पार्क - हैदराबाद
◾️देशातील पहिले e-waste eco पार्क : नवी दिल्ली
◾️देशातील पहिले जेंडर पार्क : केरल, कोझीकोड
◾️देशातील पहिले नाइट सफारी पार्क: लखनऊ (UP)

------------------------------------------

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ?

⚪️ दराक्ष 

⚪️ मोसंबी 

⚪️ डाळिंब

⚫️ चिकू ☑️


महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने .....जिल्ह्यात आढळतात..?

⚪️ सोलापूर 

⚫️ अहमदनगर ☑️

⚪️ जालना 

⚪️ अमरावती 



पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदुषित शहर कोणते. ?

⚪️ मबई 

⚪️ ठाणे

⚫️ चंद्रपूर ☑️

⚪️ नागपूर 



मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर ....हे आहे. ?

⚪️ कांडला

⚪️ मार्मागोवा 

⚪️ हल्दीया 

⚫️ न्हावा-शेवा ☑️



 लोह व अँल्युमिनीयमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते. ?

⚪️ काळी मृदा 

⚪️ गाळाची मृदा 

⚫️ जांभी मृदा ☑️

⚪️ पिवळसर मृदा 



 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही. ?

⚪️ सांगली 

⚪️ सातारा 

⚫️ *रायगड ☑️*

⚪️ रत्नागिरी 



 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते. ?

⚪️ लोणावळा 

⚫️ चिखलदरा ☑️

⚪️ महाबळेश्वर 

⚪️ माथेरान 



पर्जन्यछायेचा प्रदेशामध्ये ...स्थान आहे. ?

⚪️ महाड 

⚫️ वाई ☑️

⚪️ महाबळेश्वर 

⚪️ नाशिक 



महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे. ?

⚫️ 6 ☑️

⚪️ 4

⚪️ 7

⚪️ 9 



 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरुळ लेणी आहेत. ?

⚪️ पणे 

⚪️ अहमदनगर 

⚫️ औरंगाबाद ☑️

⚪️ लातूर


1) योग्य जोड्या जुळवा.


( अ ) आर्य समाज                               ( i ) स्वामी दयानंद सरस्वती 

( ब ) प्रार्थना समाज                             ( ii ) दादोबा पांडुरंग तर्खडकर 

( क ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन              ( iii ) म. गो. रानडे 

( ड ) सामाजिक परिषद                       ( iv ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 

                                                         \  ( v ) विष्णुशास्त्री पंडित


              अ    ब   क   ड

( 1 )        i     iv   ii    v 

( 2 )        iii   ii     i    iv 

( 3 )         v   ii    iv   iii 

( 4 )        i     ii    iv   iii ✔️


2) खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल योग्य नाही ? 

( 1 ) त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती म्हणत.

( 2 ) ते जावरा संस्थानच्या नबाबाचे इंग्रजी शिक्षक होते.✔️

( 3 ) शुन्यलब्धी हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

( 4 ) ते कुलाबा वेधशाळेचे संचालक होते.


3) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'विद्यार्थी निधी' सुरू करून त्यात जमा झालेला पैसा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला दिला ? 

( 1 ) महर्षी धोंडो केशव कर्वे ✔️

( 2 ) कर्मवीर भाऊराव पाटील 

( 3 ) पंजाबराव देशमुख 

( 4 ) गोपाळ गणेश आगरकर 


4) मानवधर्मसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ? 

( 1 ) मानवधर्मसभेची स्थापना 1844 मध्ये मुंबई येथे झाली. ✔️

( 2 ) मानवधर्मसभेच्या स्थापनेत दादोबा तर्खडकर , दुर्गादास मंछारा 

( 3 ) सभेचा प्रार्थना दिवस रविवार होता.

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर 


5) ------- ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती.

( 1 ) थ्रोस्टल मिल 

( 2 ) द ओरिएंटल स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी 

( 3 ) बॉम्बे युनायटेड स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी 

( 4 ) बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी ✔️


6) राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगदगुरु मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली ? 

( 1 ) सदाशिव लक्ष्मण पाटील ✔️

( 2 ) गणेश सुदामा पाटील 

( 3 ) वासुदेव जोशी 

( 4 ) माणिकचंद पाटील 


7) नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांतिकारी चळवळीत योगदान दिले ?

( 1 ) तुफानी सेना✔️ 

( 2 ) वानरसेना 

( 3 ) बहुजन सेना 

( 4 ) वरीलपैकी एकही नाही.


8) 'सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लीजन ' ही संस्था कोणी स्थापन केली ? 

( 1 ) सावरकर आणि अनंत कान्होरे

( 2 ) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर 

( 3 ) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर 

( 4 ) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर ✔️


9) योग्य जोड्या लावा.


( अ ) शिवाजी क्लब        i) नाशिक 

( ब ) आर्य बांधव समाज ii) पुणे 

( क ) चाफेकर क्लब      iii) वर्धा, नागपूर 

( ड ) मित्र मेळा             iv) कोल्हापूर 


           अ     ब   क    ड

( 1 )     i      ii    iii    iv

( 2 )     iv    iii   iii     i ✔️

( 3 )     ii     iv   iii     i

( 4 )     iii    iv    ii     i 


10) खालील वर्णन कोणाचे आहे ? 

त्यांनी आर्य महिला समाज, शारदा मुक्ती सदन, कृपा सदन इ . संस्था उभारल्या. त्यांना 'कैसर - ए - हिंद' ही पदवी देऊन गौरवले गेले. त्यांनी वैद्यकीय पुरवण्यासाठी लेडी डफरीन फंड उभारला.

 1 ) तर्खडकर भगिनी 

( 2 ) रमाबाई रानडे 

( 3 ) ताराबाई शिंदे 

( 4 ) पंडिता रमाबाई ✔️



1) हरिश्चंद्र - बालाघाट ' ही डोंगररांग कोणत्या दोन नद्यांची जल विभाजक आहे ?

( 1 ) तापी व नर्मदा 

( 2 ) गोदावरी व भीमा✔️

( 3 ) भीमा व कृष्णा 

( 4 ) तापी व गोदावरी


2) खालील विधाने पाहा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) विदर्भात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते.

( ब ) उत्तर कोकणात दक्षिण कोकणापेक्षा जास्त पाऊस पडतो.

( क ) गगनबावड्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस आहेत.


( 1 ) अ , ब बरोबर 

( 2 ) ब , क बरोबर

( 3 ) अ , क बरोबर ✔️

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर 


 3) जोड्या जुळवा.

      जिल्हा                निर्मिती

( अ ) लातूर       ( i ) 1 जुलै 1998 

( ब ) नंदुरबार    ( ii) 1 मे 1981 

( क ) हिंगोली    ( iii ) 16 ऑगस्ट 1982 

( ड ) सिंधुदुर्ग    ( iv ) 1 मे 1999


            ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )        iii      ii       i      iv

( 2 )        iii       i     iv       ii ✔️

( 3 )        iv       i      ii      iii

( 4 )        iii     iv       i       ii



4) योग्य जोड्या जुळवा.

                धरण                नदी 

( अ ) विल्सन बंधारा      ( i ) गोदावरी 

( ब ) विष्णुपुरी धरण।    ( ii ) येळवंडी 

( क ) भाटघर              ( iii ) मुठा 

( ड ) टेमघर                ( iv ) प्रवरा 


           ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )       ii      iii       i      iv

( 2 )       iv     iii       i      ii

( 3 )       iv      i       ii      iii✔️

( 4 )        i      iv      ii      iii 



5) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) आम्लीय मातीमध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियमचे प्रमाण कमी व हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते.

( ब ) आम्लीय मातीमध्ये सुधारणा करण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो.


( 1 ) फक्त अ बरोबर ✔️

( 2 ) फक्त ब बरोबर 

( 3 ) दोन्ही बरोबर 

( 4 ) दोन्ही चूक 


6) खालील शिखरांचा उंचीनुसार चढ़ता क्रम लावा.

( अ ) त्र्यंबकेश्वर 

( ब ) हरिश्चंद्रगड 

( क ) महाबळेश्वर 

( ड ) सप्तशृंगी 

( इ ) राजगड


( 1 ) अ , इ , ड , ब , क ✔️

( 2 ) इ . अ , ड , क , ब 

( 3 ) अ , ड , इ , ब , क 

( 4 ) ड , अ , इ . ब , क  


7) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) लोकसंख्येच्या घनतेबाबत महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

( ब ) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.


( 1 ) दोन्ही विधाने बरोबर

( 2 ) दोन्ही चूक

( 3 ) फक्त अ बरोबर 

( 4 ) फक्त ब बरोबर ✔️


8) खालील वैशिष्ट्यांवरून वनांचा प्रकार ओळखा.

( अ ) या वनांना 'अल्लापल्ली' असेही म्हणतात.

( ब ) प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर भागात आढळतात.

( क ) आईन , किंडल , आवळा ही वृक्षे आढळतात.


( 1 ) उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने ✔️

( 2 ) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने 

( 3 ) उष्ण कटिबंधीय काटेरी वने 

( 4 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने


 9) खालीलपैकी कोणत्या नद्या महाबळेश्वर येथून उगम पावतात ? 

( अ ) कृष्णा 

( ब ) सावित्री 

( क ) वेण्णा 

( ड ) गायत्री 

( इ ) कोयना 


( 1 ) अ , इ 

( 2 ) अ , क , इ

( 3 ) अ , ब , ड , इ 

( 4 ) वरीलपैकी सर्व✔️


10) जोड्या जुळवा.

      अभयारण्ये                   जिल्हा

( अ ) तुंगारेश्वर           ( i ) यवतमाळ 

( ब ) टिपेश्वर             ( ii ) रायगड 

( क ) नरनाळा          ( iii ) पालघर

( ड ) कर्नाळा           ( iv ) अकोला 


             ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )         i       iii      ii      iv

( 2 )        iii       i       ii      iv

( 3 )        iii       i      iv       ii✔️

( 4 )        iv      iii      i        ii


1) आसियानसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.

( 1 ) आसियानचे 10 सदस्य देश आहेत .✔️ 

( 2 ) तिचे बोधवाक्य वन व्हिजन वन आयडेंटीटी वन कम्युनिटी ' आहे.

( 3 ) तिची स्थापना 1967 ला बैंकॉक जाहीरनाम्याने झाली,

( 4 ) सर्व विधाने बरोबर 


2) प्रवास आणि पर्यटन निर्देशांक ----- मार्फत जाहीर केला जातो.

( 1 ) डब्ल्यू इ.एफ.✔️

( 2 ) आयएमएफ 

( 3 ) वर्ल्ड बँक 

( 4 ) संयुक्त राष्ट्र 


3) वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक ------- प्रसिद्ध करते.

( 1 ) आयएमएफ✔️

( 2 ) यूएन

( 3 ) वर्ल्ड बैंक 

( 4 ) डब्ल्यूईएफ 


4) माराकेश करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

( अ ) त्याचा संबंध दृष्टीहीन व्यक्तीशी व त्यांच्याशी संबंधित स्वामित्व हक्काच्या गोष्टी जसे की पुस्तक यासारख्या गोष्टींशी संबंधित आहे.

( ब ) भारत हा करार स्वीकारणारा प्रथम देश आहे. योग्य विधान / ने निवडा.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब

( 3 ) अ , ब दोन्ही✔️

( 4 ) यापैकी नाही.


5) गॅट्स् करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

( अ ) क्रॉस - बॉर्डर पुरवठा : एका सदस्यांच्या प्रदेशातून दुसऱ्या सदस्यांच्या प्रांतात असलेला सेवा प्रवाह 

( ब ) परदेशात होणारी सेवा : एखादा ग्राहक सेवा घेण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या प्रदेशात जातो.

( क ) व्यावसायिक उपस्थिती : एखाद्या सदस्याचा सेवा पुरवठादार क्षेत्रीय उपस्थिती स्थापित करतो.

( ड ) नैसर्गिक व्यक्तीची उपस्थिती : सेवेच्या पुरवठ्यासाठी एका सदस्याची व्यक्ती दुसऱ्या सदस्याच्या क्षेत्रात प्रवेश करते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा. 


( 1 ) अ , ब 

( 2 ) ब , क 

( 3 ) अ , ब , क 

( 4 ) वरीलपैकी सर्व✔️


6) खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान / ने निवडा.

( अ ) फेरा कायदा 1973 मध्ये पहिल्यांदा संमत केला.

( ब ) भारत सरकारने फेरा कायदा फेमा कायद्याने बदलला.


( 1 ) फक्त अ

( 2 ) फक्त ब ✔️

( 3 ) अ , ब दोन्ही 

( 4 ) यापैकी नाही.


7) कृषी अनुदानासंबंधी खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान / ने ओळखा.

( अ ) ब्ल्यू बॉक्स : - प्रत्यक्षात व्यापारावर काहीही परिणाम होत नाही,

( ब ) अॅम्बर बॉक्स : - व्यापारावर सर्वात जास्त परिणाम करतात.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब

( 3 ) अ , ब दोन्ही

( 4 ) यापैकी नाही✔️


8) भौगोलिक निर्देशांकासंबंधी खालील विधाने पहा व योग्य विधान / ने निवडा.

( अ ) एखाद्या वस्तूची विशिष्ट ठिकाणामुळे असणारी खासियत भौगोलिक निर्देशांक दर्शवितो.

( ब ) ओदिशाला अलिकडेच रसगुल्ल्यांसाठी भौगोलिक निर्देशांक मिळाला.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब 

( 3 ) अ , ब दोन्ही ✔️

( 4 ) यापैकी नाही.


9) भारतातील उदारीकरणाच्या परिणामांसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा.

( अ ) कर कमी झाले.

( ब ) बाजार नियंत्रणमुक्त झाला.

( क ) गुंतवणुकदारास राजकीय गोष्टींचा धोका कमी झाला.


( 1 ) अ , ब 

( 2 ) ब , क

( 3 ) अ , क 

( 4 ) अ , ब , क ✔️


10) डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली ?

( 1 ) 15 एप्रिल 1993 

( 2 ) 15 जुलै 1993

( 3 ) 15 एप्रिल 1994✔️

( 4 ) 15 जुलै 1994


🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.


१) मोद्रिक धोरण.

२)राजकोषीय धोरण ✔️✔️

३)द्रव्य निर्मिती 

४) चलनविषयक धोरण

_____________________________


🟠 सटेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे. 

१) लोखंड व कार्बन

२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️

३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट

४) लोखंड टीन व कार्बन

_____________________________


🟡 गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

 

१)छोटा नागपूर

२)अरवली ✔️✔️

३) मालवा

४) विध्य

_____________________________


🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

१) कांगारू 

२) पेग्विन

३) व्हेल

४) प्लॅटिपस ✔️✔️

_____________________________


🔵 पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे 

१)दुसरे

२)पाचवे

३)सातवे

४)नववे ✔️✔️

_____________________________

🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

 

१) लॅडस्टयनर ✔️✔️

२)फुन्क

३)स्टेड

४)विल्यम हार्वे

_____________________________


⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते

१)पारा 

२) चांदी

३) पाणी ✔️✔️

४) लोखंड

_____________________________

🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.


१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️

२) लोकमान्य टिळक

३) न्यायमूर्ती रानडे

४)म.गांधी

_____________________________


🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो

१)ग्लुकोज

२) लक्टोज

३)रेनिन

४)केसिन ✔️✔️

_____________________________


🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.

१)सी -१४  ✔️✔️

२) सी -१३

३) सी -१२

४) यापैकी एकही नाही


 1) खालीलपैकी कोणत्या घटकाकडून प्रथिनांचे अमिनो आम्लात पचन होते ? 

( 1 ) अमायलेज 

( 2 ) ट्रिप्सिन ✔️

( 3 ) लायपेज पेप्सीन 

( 4 ) पेप्सीन


2) पियूषिका ग्रंथीसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.

( 1 ) पियूषिका ग्रंथी ‘ मास्टर ग्रंथी ' म्हणून ओळखली जाते.

( 2 ) ही सर्वांत लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे.

( 3 ) ही ग्रंथी मेंदूमध्ये वसलेली असते.

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर ✔️


3) खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाला वार्धक्यविरोधी जीवनसत्त्व म्हणतात ? 

( 1 ) लॅक्टिक अॅसिड 

( 2 ) अॅस्कॉर्बिक ✔️

( 3 ) फॉर्मिक अॅसिड 

( 4 ) इथेनॉल 


4) खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसँकेराईड आहे ? 

( 1 ) ग्लुकोज 

( 2 ) फ्रुक्टोज 

( 3 ) सुक्रोज ✔️

( 4 ) सेल्युलोज 


5) मानवी शरीरात जवळजवळ किती की.मी लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ?

( 1 ) 10000 

( 2 ) 97000✔️

( 3 ) 98500

( 4 ) 98000


6) पेशींमधील ------ पेशीचे ऊर्जाकेंद्र म्हणतात. 

( 1 ) हरितलवक 

( 2 ) तंतूकणिका✔️

( 3 ) रायबोझोम्स  

( 4 ) लयकारिका


7) खालीलपैकी कोणती ग्रंथी सर्वांत मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे ? 

( 1 ) कंठग्रंथी ✔️

( 2 ) पियूषिका ग्रंथी 

( 3 ) लाळग्रंथी  

( 4 ) यकृत 


8) प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतींमधील कोणत्या भागात होते ? 

( 1 ) पाने

( 2 ) हिरवी खोडे 

( 3 ) थोड्या प्रमाणांत फुलांमध्ये 

( 4 ) वरीलपैकी सर्व ✔️


9) भारतीय आहारात व्हिटॅमिन - ए मुख्यत्वे ----- पासून मिळते.

( 1 ) फायटिन 

( 2 ) टँनिन

( 3 ) ऑक्सिटोसिन 

( 4 ) कँरोटीन ✔️


10) उत्क्रांतवादी दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणता प्राणी माणसाशी साधर्म्य साधतो ? 

( 1 ) डॉल्फीन ✔️

( 2 ) उडणारा मासा 

( 3 ) शार्क 

( 4 ) कासव




एमपीएससी-महाराष्ट्राचा इतिहास



बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य अध्ययन या विषयामध्ये आपल्या शालेय विषयातले इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्रसारखे बऱ्याच विद्यार्थ्यांना कंटाळवाणे वाटणारे विषय असतात, पण हेच विषय आपल्या पुढच्या अभ्यासाचा आणि आयुष्याचा पाया आहे. त्यात प्रामुख्याने १८८५ ते १९४७ पर्यंत महाराष्ट्रात घडलेल्या घडामोडींचा समावेश होतो. यात खालील घटकांचा समावेश होतो. मुख्यत्वे 'महाराष्ट्राच्या इतिहासा'चा प्रभाव जाणवतो.

० महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा
० महाराष्ट्रातील आर्थिक सुधारणा
० राजकीय पुढाऱ्यांचे कार्य/ समाजसुधारकांचे कार्य
० वर्तमानपत्रे व शैक्षणिक संस्थांचे कार्य
० महाराष्ट्रातील चळवळी

या सर्व घटकांचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.

१९ व्या शतकात सामाजिक जागृतीची सुरुवात महाराष्ट्र व बंगालमध्ये मोठय़ा प्रमाणावर झाली. त्यात प्रामुख्याने प्रार्थनासमाज (न्या. रानडे), आर्य समाज (स्वामी दयानंद सरस्वती) व सत्यशोधक समाजाची (महात्मा फुले) स्थापना महाराष्ट्रात झाली. नंतरच्या काळात थिऑसॉफिकल सोसायटी (डॉ. अॅनी बेझंट), रामकृष्ण मिशन (स्वामी विवेकानंद)च्या माध्यमातून महाराष्ट्रातील उपेक्षित, कष्टकरी व दलित समाजासाठी विशेष कार्य केले. स्वातंत्र्य चळवळीसोबतच बहुजन समाजाचा विकास व्हावा म्हणून विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली.

ब्रिटिश काळात मुंबई हे कापूस व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. १८८० साली नारायणराव लोखंडे यांनी कामगारांसाठी मिल हॅण्ड असोसिएशन सोसायटीची स्थापना केली. १९०५ साली लॉर्ड कर्झनने उद्योगधंदे, व्यापार व तांत्रिक शिक्षणाच्या सोयी केल्या. १९२० मध्ये टाटांचा जलविद्युत प्रकल्प खोपोली येथे सुरू झाला.
महाराष्ट्रातील पहिली कागद गिरणी 'डेक्कन पेपर मिल' १८८७ मध्ये सुरू झाली. २३ डिसेंबर १९४० रोजी वालचंद हिराचंद या महाराष्ट्रीय उद्योजकाने 'हिंदुस्थान एअरक्राफ्ट' ही विमान कंपनी स्थापन केली. थोडक्यात, स्वातंत्र्यपूर्व काळात महाराष्ट्र सामाजिक व आर्थिक सुधारणेत देशात आघाडीवर होता. या घटकांवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये या सुधारणांना कारणीभूत असणाऱ्या संघटना, त्यांची स्थापना, संघटनेशी संबंधित नेते याबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात.

स्वातंत्र्यलढय़ात सहभागी असलेले महाराष्ट्रातील राजकीय पुढारी व समाजसुधारक यांच्या नेतृत्वावर आधारित प्रश्न विचारले जातात. जसे- 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' या आशयाचा 'केसरी'तून लेख लिहिणारे लोकमान्य टिळक, महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळकृष्ण गोखले, न्या. महादेव गोविंद रानडे, 'मुंबईचा सिंह' म्हणून ओळखले जाणारे फिरोजशहा मेहता, भारताचे पितामह म्हणून ओळखले जाणारे दादाभाई नौरोजी, 'भूदान चळवळी'चे नेते विनोबा भावे, मातृभूमीसाठी जन्मठेपेची शिक्षा भोगणारे स्वा. सावरकर यांसारख्या नेत्यांनी स्थापन केलेल्या संघटना, त्यांनी लिहिलेली पुस्तके, त्यांनी सुरू केलेल्या चळवळी, त्यांचे जन्मवर्ष, जन्मठिकाण याबाबत प्रश्न विचारले जातात.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रवादाची भावना निर्माण करणाऱ्या घटकांपैकी महत्त्वाचे घटक म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या भागांत सुरू झालेली वर्तमानपत्रे, साप्ताहिके, मासिके व समाजसुधारकांनी सुरू केलेल्या विविध शैक्षणिक चळवळी. बाळशास्त्री जांभेकरांनी मराठीतून पहिले वृत्तपत्र 'दर्पण' सुरू केले.

लोकहितवादींनी 'शतपत्रे', 'प्रभाकर' मासिकातून प्रसिद्ध करून राष्ट्रवादाला चालना दिली. टिळक-आगरकरांनी 'केसरी', 'मराठा' व 'सुधारका'तून राजकीय स्वातंत्र्याचा व समतेचा पुरस्कार केला. गांधीजींनी 'यंग इंडिया' साप्ताहिकातून इंग्रजांविरुद्ध लढा सुरू केला.
या राष्ट्रवादी चळवळीसोबत १८४८ साली महात्मा फुलेंनी पुण्यात पहिली मुलींची शाळा काढली. १८८० व १८८१ साली आगरकरांनी अनुक्रमे न्यू इंग्लिश स्कूल व फग्र्युसन कॉलेजची स्थापना केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, शाहू महाराज, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी शैक्षणिक संस्था काढून मोठय़ा प्रमाणावर वैचारिक क्रांती घडवून आणली. या सर्वावर अनेक प्रश्न विचारले जातात.

यात प्रामुख्याने महात्मा फुलेंनी सुरू केलेली सत्यशोधक समाजाची स्थापना, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना एकत्र आणून त्यांच्या हक्काबाबत जागृतीचे केलेले कार्य, त्यांनी स्थापन केलेली 'इंडिपेंडंट लेबर पार्टी', महाड येथे केलेला 'चवदार तळ्याचा सत्याग्रह', आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी केलेल्या क्रांतिकारी चळवळी, १८५७ च्या उठावातील तात्या टोपे, नानासाहेब पेशवेंसारखे क्रांतिकारी नेते, १९१३ साली लाला हरदयाल यांनी केलेली 'गदर पार्टी'ची स्थापना, स्वा. सावरकरांनी स्थापन केलेली 'अभिनव भारत संघटना', चापेकर बंधूंचे कार्य, राष्ट्रीय क्रांतिकारक चळवळीतील विविध संघटना, क्रांतिकारकांनी लिहिलेली पुस्तके, आत्मचरित्रे त्यांनी

आखलेले काकोरी कट, चितगाव कटासारख्या घटना, फासावर गेलेले क्रांतिवीर यांसारख्या अनेक घटनांवर प्रश्न विचारले जातात.

भारतातील विविध कामगार संघटना, त्यांचे नेते, 'मिरज खटला', आयटक व इंटकसारख्या संघटनांची स्थापना, शेतकरी चळवळी, दुष्काळी काळात सारा वसुलीबाबत इंग्रजांनी अवलंबलेले सक्तीचे धोरण, त्यातून १८७५ मध्ये डेक्कनचे दंगे झाले.

सेनापती बापट यांनी 'मुळशी सत्याग्रह' सुरू केला. आदिवासींच्या उठावाचे नेतृत्व उमाजी नाईक यांनी केले, भिल्ल, कोळी, सावंत यांनी इंग्रजांविरुद्ध महाराष्ट्रात उठाव केला. त्याचे क्षेत्र व कार्य याबाबत प्रश्न विचारले जातात.

यासाठी आपणास जयसिंगराव पवारलिखित 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास' हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे, याशिवाय पाचवी ते बारावीची इतिहासाची क्रमिक पुस्तके, महात्मा गांधी 'माझे सत्याचे प्रयोग', स्टडी सर्कलची विविध पुस्तके यांचा आपणास सदरच्या स्पर्धा परीक्षांसाठी मोठय़ा प्रमाणावर उपयोग होऊ शकतो.

लॉर्ड & वहाइसरॉय


👉 लॉर्ड एल्गीन – (१८६२-१८६३) :

सिंधू नदीच्या पलीकडील हिंदुकुश पर्वतातील वहाबीविरुद्ध लढाई केली. भारतात आल्यावर धर्मशाला येथे अवघ्या २० महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला.

👉 लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६३-१८६९) :

सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अ‍ॅक्ट फॉर पंजाब अ‍ॅण्ड अवध संमत केला. १८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली. दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले. सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.


👉 लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :

सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली. डिसेंबर १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या. १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो. बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या. संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले. सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२ मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात. जानेवारी, १८७२ मध्ये अंदमान येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.


👉 वहाइसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक (१८७२-१८७६) :

१८५३ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा चार्ल्स वुडचा सचिव होता. १८७२ मध्ये नॉर्थब्रुक व्हाइसरॉय झाला. लॉर्ड नॉर्थब्रुक हा अनियोजित खाजगी आर्थिक व्यवहार आणि मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कर्ता होता. बिहार, बंगाल प्रांतात दुष्काळ निवारणार्थ (१८७३-७४) ब्रम्हदेशातून तांदूळ आयात केला. बंगाल-बिहार दुष्काळ निवारणार्थ नॉर्थब्रुकने ६६ लक्ष पौंड खर्च केले. त्याच्या काळात पंजाबातील कुका चळवळीचा सामना करावा लागला. त्याच्याच कारकिर्दीत मुंबईत १८७५ साली आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. नॉर्थब्रुकची कारकीर्द अफगाण संदर्भात विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध आहे. इंग्लंड सत्ताधीशांच्या मतभेदामुळे एक वर्ष आधी मुदतपूर्व राजीनामा दिला.


👉लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) 

लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला. या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली. व्हाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने स्ट्रची दुष्काळ निवारण समिती नेमली. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली. लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले. १८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले. त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली. अमृतबझार पत्रिका हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे. १८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी. लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला. आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले. त्याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची (आयसीएस पास प्रथम भारतीय व्यक्ती) इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम.


👉 वहाइसरॉय लॉर्ड रिपन (१८८०-१८८४) 

भारतीयांसाठी उदारमतवादी व्हाइसरॉय म्हणून ओळखला जातो. इ.स. १८३२ च्या इंग्लंडमधील फॅक्टरी अ‍ॅक्टप्रमाणे रिपनने १८८१ मध्ये कामगारांसंबंधी फॅक्टरी अ‍ॅक्ट पास केला. इ.स. १८३५ मध्ये चार्ल्स मेटाकाफ व लॉर्ड मेकॉलेने भारतातील वृत्तपत्रांना स्वातंत्र्याची मागणी केली होती. १९ जानेवारी, १८८२ रोजी रिपनने (Vernacular) रद्द केला. रिपनने शिक्षणपद्धतीच्या पाहणीकरिता १८८२ मध्ये हंटर समिती १८५४ च्या वुड्स खलित्याप्रमाणे नेमली. हंटर समितीच्या शिफारशी स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली. १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला. रिपनने स्थानिक भारतीयांना नियुक्त केले. त्यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधतात. भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना १८८१ मध्ये रिपनच्या कारकिर्दीत झाली. १८८४ मध्ये इलबर्ट बिल मंजूर केले. या कायद्यान्वये भारतीय सत्र न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटले चालविण्याची मुभा देण्यात आली. १८८४ मध्ये रिपनने राजीनामा दिला.


👉 लॉर्ड डफरिन (१८८४-१८८८) 

रिपनच्या मुदतपूर्व राजीनाम्यामुळे लॉर्ड डफरिनची व्हाइसरॉयपदी नियुक्ती झाली. डफरिनच्या काळात उत्तर ब्रम्हदेश जिंकून संपूर्ण ब्रम्हदेश (१८८६) इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला. मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट केले जावे म्हणून व्हाइसरॉयने चार्ल्स अ‍ॅचिसन समिती नेमली. चार्ल्स अ‍ॅचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग (पब्लिक सर्व्हिस कमिशन)ची स्थापना झाली. १८८७ मध्ये अ‍ॅचिसनने लोकसेवा आयोगाच्या शिफारशी (अहवाल) सादर केल्या. डफरिनच्या काळात अ‍ॅलन ‘ाुम (निवृत्त आय.ए.एस. अधिकारी) ने इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापण्यास पुढाकार घेतला. डिसेंबर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईत तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली. लॉर्ड डफरिनने इंपेरियल सर्व्हिस क्रॉप्सची स्थापना केली. बंगाल, पंजाब, औंधमध्ये नवीन कुळकायदे व कुळासाठी अधिक उदार धोरण स्वीकारले.



👉 लॉर्ड लॅन्सडाऊन (१८८८-१८९४) 

भारतीयांना शासनात सहभाग मिळावा म्हणून भारतीय विधिमंडळ कायदा, १८९२ संमत झाला.     सर डय़ुरांड यांनी पूर्व व दक्षिण अफगाणिस्तानची सीमा निश्चित केली. हिला डय़ुरांड रेषा म्हणतात. १८९१ साली कामकरी महिला व बालके यांच्या संरक्षणासाठी दुसरा फॅक्टरी अ‍ॅक्ट मंजूर केला गेला. समाजसुधारक बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नामुळे व्हाइसरॉय लॅन्सडाऊनने एज ऑफ कन्सेंट अ‍ॅक्ट (संमतिवयाचा कायदा) १८९१ मध्ये संमत केला.


👉 लॉर्ड एल्गीन – २ (१८९४-१८९९) 

यांच्या कारकिर्दीत १८९६ चा भीषण दुष्काळ पडला. १८९६-९७ दुष्काळग्रस्तांसाठी व्हाइसरॉय एल्गीनने अन्नधान्य हाँगकाँगकडून मुंबई बंदरात आणले. या अन्नधान्यासोबत ब्युबॉनिक नावाचा भयंकर प्लेग भारतात आला.

👉 लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) 

👉 लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता. १८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली. १९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता. १८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले. पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला. १९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली. १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. १९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला. कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय. तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता. सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले. कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात. लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.

👉 कर्झनच्या शेती सुधारणा :

👉 १९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली. १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला. कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली.



👉 लॉर्ड मिंटो-२ (१९०५-१९१०) 

👉 १९०८-१० या काळात बंगाल फाळणी आंदोलनास तोंड दिले व फाळणीविरोधी आंदोलनाबाबत कायदे मिंटोने तयार केले. १९०७ मध्ये लॉर्ड मिंटोने चीनशी अफूचा व्यापार बंद केला. मुसलमानांना मिंटोने चिथावणी दिली. स्वतंत्र मतदारसंघाचे सिमला येथे १९०६ मध्ये वचन दिले. १९०९ मध्ये इंडिया कौन्सिल अ‍ॅक्ट, ज्याला मोल्रे मिंटो सुधारणा म्हणतात हा कायदा पास झाला.


👉 वहाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज (१९१०-१९१६) 

👉 भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाइसरॉय म्हणून लॉर्ड हार्डिंग्जला ओळखतात. व्हाइसरॉय हार्डिंग्जने जॉर्ज पंचमच्या स्वागतार्थ दिल्लीत १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली दरबार भरवला. त्या वेळी पंचम जॉर्जने बंगाल फाळणी रद्द केली. २३ डिसेंबर, १९१२ रोजी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलविली. त्या शाही मिरवणुकीत हार्डिंग्ज बॉम्बहल्ल्यात जखमी झाला. रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरला. तो खटला दिल्ली खटला म्हणून ओळखतात.
डिसेंबर, १९१४ मध्ये प्रथम महायुद्धास सुरुवात झाली. भारतीयांनी त्यास बिनशर्त पाठिंबा दर्शविला.



👉 लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१) 

👉 लॉर्ड चेम्सफोर्डने भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात गव्हर्नर जनरलपदी कार्य केले होते. १९१९ चा माँटेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा भारत अधिनियम कायदा संमत झाला. १९१९ मध्ये पंजाब प्रांतात रौलेट कायदा (काळा कायदा) लागू केला. १३ एप्रिल, १९१९ रोजी जालियानवाला बाग हत्याकांड झाले. (जनरल डायर). १९२०-२१ मध्ये खिलाफत चळवळ व असहकार चळवळ .



👉 लॉर्ड रिडिंग (१९२१-१९२६) 

👉 लॉर्ड रिडिंग यहुदी होता. परंतु स्वगुणाने इंग्लंडचे मुख्य न्यायाधीश व भारताचा व्हाइसरॉय म्हणून नेमणूक झाली. काँग्रेसमध्ये फेरवादी व नाफेरवादी गट पडले. स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. रिडिंगच्या काळात दुहेरी प्रशासन व्यवस्था व मुडिमन समितीचा अहवाल सादर झाला.



👉 लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१) 

👉 आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले. डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला गेला. आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली. ५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला. गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.



👉 लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६) 

👉 वहाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली. १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात. गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला. विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.



👉 वहाइसरॉय लिनलिथगो (१९३६-१९४३) 

👉 सटॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता. १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली. सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले. १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.




👉 लॉर्ड वेव्हेल (१९४३-१९४७) 

👉 ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग  सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बठक सिमला येथे बोलवली. इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली. आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.




👉 वहाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन (मार्च १९४७ ते ऑगस्ट १९४७- जून १९४८) 

👉 मार्च १९४७ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आले. मे १९४७ मध्ये ब्रिटन संसदेशी चर्चा करण्यास लंडनला गेले. २ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ३ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची तारीख जाहीर केली. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचा तिरंगा प्रथम व्हाइसरॉय माऊंटबॅटनच्या हस्ते फडकविण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व इंग्रज सरकारचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन ठरले. माऊंटबॅटन जून, १९४८ पर्यंत स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते.




MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम




MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा
अभ्यासक्रम



पेपर- १ (गुण २०० - कालावधी २ तास)

1.राज्य ,राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्त्वपूर्ण चालू घडामोडी.

2.भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ

3.महाराष्ट्र , भारत आणि जगाचा भूगोल- भौतिक , सामाजिक आणि आर्थिक.

4.महाराष्ट्र व भारत - राज्यव्यवस्था आणि शासन- राज्यघटना , राजकीय व्यवस्था , पंचायती राज , शहरी प्रशासन , शासकीय  धोरणं ,  हक्कविषयक घडामोडी इत्यादी .

5.आर्थिक आणि सामाजिक विकास- शाश्वत विकास , गरिबी , समावेशन , लोकसंख्याविषयक मुद्दे , सामाजिक धोरणं इ.

6.पर्यावरणीय परिस्थिती ,जैव विविधता , हवामान बदल (सर्वसामान्य मुद्दे )

7. सामान्य विज्ञान


पेपर- 2 (गुण २०० - कालावधी २ तास)

▪️इंटरपर्सनल स्किल्स (कम्युनिकेशन स्किलसह)

▪️तर्कशुद्ध युक्तिवाद आणि मीमांसा/ पृथ:करण क्षमता (लॉजिकल रिझनिंग आणि अॅनालिटिकल अॅबिलिटी)

▪️निर्णय क्षमता व प्रश्नांची उकल ( डिसिजन मेकींग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग)

▪️सामान्य बुद्धिमापन क्षमता (जनरल मेंटल एबिलिटी)

▪️बेसिक न्यूमरसी , डेटा इंटरप्रिटेशन (चार्ट , ग्राफ , टेबल्स) (दहावीचा स्तर असेल)

▪️इंग्लिश व मराठी भाषा आकलन क्षमता - कॉम्प्रिहेन्शन स्किल (दहावीस्तर)



 राज्यसेवा पूर्व परीक्षा पुस्तके

▪️ इतिहास- डॉ अनिल कठारे
▪️समाजसुधारक- के सागर
▪️भूगोल- ए. बी. सवदी
▪️भारताची राज्यघटना आणि शासन- लक्ष्मीकांत
▪️पंचायतराज- के सागर
▪️भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे
▪️विज्ञान आणि तंत्रज्ञान- अनिल कोलते
▪️गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
▪️बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
▪️राज्यसेवा C-SAT गाईड- अरिहंत प्रकाशन
▪️चालू घडामोडी– लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, चाणक्य मंडल मासिक,

Question bank


1. पहिल्या पंचवार्षिक योजनेत ------ ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.

1. व्यापार

2. शेती

3. औद्योगिकरण

4. गुंतवणूक

🅾️उत्तर : शेती


2. धवलक्रांति ----- शी संबंधित आहे.

1. शेती व्यवसाय

2. मत्स्य व्यवसाय

3. दुग्ध व्यवसाय

4. कुकुटपालन व्यवसाय

🅾️उत्तर : दुग्ध व्यवसाय


3. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?

1. महाबळेश्वर

2. पंचगणी

3. लोणावळा

4. आंबोली

🅾️उत्तर : आंबोली


4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?

1. तहसीलदार

2. उपजिल्हाधिकारी

3. जिल्हाधिकारी

4. महसूल आयुक्त

🅾️उत्तर : महसूल आयुक्त


5. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?

1. पीटर सविड्लर

2. अलेक्झांडर ग्रीशुक

3. व्हॅसिली इव्हानचूक

4. विश्वनाथ आनंद

🅾️उत्तर : पीटर सविड्लर


6. मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?

1. सौदी अरेबिया

2. अफगाणिस्तान

3. लिबिया

4. इराक

🅾️उत्तर : लिबिया


7. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार ------ वर्गापर्यंतच्या मुलांना 'मोफत व सक्तीचे शिक्षण' देण्यात येणार आहे.

1. दहावी

2. आठवी

3. बारावी

4. स्नातकीय

🅾️उत्तर : दहावी


8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?

1. गगन नारंग

2. रामपाल

3. राजेंद्र सिंह

4. जहीरखान

🅾️उत्तर : जहीरखान


9. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

1. ब्रिटन

2. रशिया

3. भारत

4. दक्षिण आफ्रिका

🅾️उत्तर : ब्रिटन


10. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

1. हल्दिया

2. न्हावा-शेवा

3. कांडला

4. मार्मागोवा

🅾️उत्तर : न्हावा-शेवा


11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

1. जिनिव्हा

2. पॅरिस

3. न्यूयॉर्क

4. रोम

🅾️उत्तर : जिनिव्हा


12. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

1. महाड

2. औरंगाबाद

3. नाशिक

4. मुंबई

🅾️उत्तर : नाशिक


13. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

1. अडीच

2. तीन

3. साडे चार

4. साडे पाच

🅾️उत्तर : साडे पाच


14. ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

2. लोकहितवादी

3. महात्मा फुले

4. न्या. महादेव गोविंद रानडे

🅾️उत्तर : महात्मा फुले


15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

1. द्राक्ष

2. मका

3. उस

4. डिझेल

🅾️उत्तर : उस


16. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

1. नीळ

2. भात फक्त

3. गहू फक्त

4. भात व गहू

🅾️उत्तर : भात व गहू


17. 'श्रीपती शेषाद्री प्रकरण' ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

1. जगन्नाथ शंकर सेठ

2. बाळशास्त्री जांभेकर

3. भाऊ दाजी लाड

4. छत्रपती शाहू महाराज

🅾️उत्तर : बाळशास्त्री जांभेकर


18. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

1. अमेरिका आणि मेक्सिको

2. अमेरिका आणि कॅनडा

3. ब्राझिल आणि अर्जेटीना

4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🅾️उत्तर : अमेरिका आणि कॅनडा


19. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे

2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात

3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.

4. वरील कोणतीही नाही

🅾️उत्तर : वरील कोणतीही नाही


20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

1. 79

2. 59

3. 49

4. 39

🅾️उत्तर : 49


१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?

अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी

ब)  श्री. दिनशॉ वाच्छा

क) श्री. विल्यम वेडेरबर्न

ड) वरील सर्व.🅾️


२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?

अ) कांग्रेस सेवा दल 

ब)  युक्रांद🅾️

क) एन एस यू आय

ड) आय एन टी यू सी


३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?

अ) पक्षाध्यक्ष

ब) पक्ष उपाध्यक्ष 

क) कांग्रेस कार्यकारी समिती 🅾️

ड) यापैकी नाही


४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.

२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.

३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.


अ) फक्त १ व ३

ब) फक्त १ व २

क) फक्त २ व ३

ड) वरील सर्व 🅾️


५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 

१) विचारसरणीत  भिन्नता 

२) आंदोलन मार्गातील भिन्नता 

३) मागण्यात  भिन्नता 

४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 


अ) १, ३ व ४

ब) २, ३ व ४

क) १, २ व ३🅾️

ड) १, २ व ४



६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?

   

अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.

ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 

क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 

ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे🅾️


७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?


अ) सी. राजगोपालाचारी  

ब) आचार्य कृपलानी 

क) महात्मा गांधी 🅾️

ड) जयप्रकाश नारायण 


८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?

अ) मनरेगा

ब) किसान विकास पत्र

क) सुकन्या समृद्धी🅾️

ड) अन्न सुरक्षा


९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?

अ) ४४ 🅾️

ब) ४८ 

क) ५२

ड) ६१


१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?

अ) पी. चिदंबरम

ब) पी.व्ही. नरसिंहाराव

क) इंदिरा गांधी

ड) पृथ्वीराज चव्हाण 🅾️


समाजसुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या संस्था

📚 आर्य महिला समाज - 1882
       पंडिता रमाबाई

📚 सत्यशोधक समाज —1873
      महात्मा फुले

📚 सार्वजनिक समाज - 1872
      आनंदमोहन बोस

📚 नवविधान समाज —1880
      केशवचंद्र सेन

📚 भारत सेवक समाज-1905
      गोपाळ कृष्ण गोखले

📚 भारत कृषक समाज-1955
      पंजाबराव देशमुख

📚 ब्राह्मो समाज —1828
      राजाराम मोहन रॉय

📚आदी ब्राह्मो समाज — 1865
     देवेंद्रनाथ टागोर

📚 भारतीय ब्राह्मो समाज —1865    
      केशवचंद्र सेन

📚 तरुण ब्राह्मो समाज - 1923    
      वि. रा. शिंदे

📚 प्रार्थना समाज - 1867
      आत्माराम पांडुरंग तर्खडकर

📚 आर्य समाज —1875
       स्वामी दयानंद सरस्वती

📚 आर्य समाज शाखा कोल्हापूर-1918   
      शाहू महाराज

रघुनाथ धोंडो कर्वे

✅ रघुनाथ धोंडो कर्वे ✅

✅  (जानेवारी १४, इ.स. १८८२ - ऑक्टोबर १४, इ.स. १९५३)

✅ हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते.

✅ हे धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होत.

✅बालपण आणि तारुण्य ✅

र.धों. कर्वे यांचा जन्म मुरुड येथे झाला. पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूल मधे ते शिकले. इ.स. १८९९ साली त्यांनी दहावीची परीक्षा दिली.

 इ.स. १९०४ मधे ते फर्ग्युसन कॉलेजमधून बी. ए.झाले. आशा व पौर्णिमा नावाची साप्ताहिके इ.स. १९४०च्या सुमारास प्रसिद्ध होत असत, त्यांमध्ये ह.वि. देसाई या पत्रकाराने रघुनाथरावांच्या घेतलेल्या दोन मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत.. इ.स. १९१९ साली ते गणितातील पी.एच.डी. पदवी घेण्याकरिता ते पॅरिसला गेले, परंतु ती न मिळवता एका पदविकेवर समाधान मानून त्यांना परत यावे लागले. त्यामागील घडलेल्या घटना त्यांनी या मुलाखतींमध्ये नोंदविल्या आहेत.

 याशिवाय अण्णांशी त्यांचे संबंध कसे राहिले, यावरही या मुलाखतींमध्ये प्रकाश टाकण्यात आला आहे. आणखी काही दुर्मिळ माहितीही तिथे निश्चितच मिळते.

इ.स. १९०६ साली रघुनाथराव मुंबईला ट्रेनिंग कॉलेजात शिक्षण घेण्याकरिता आले, तेव्हा तिथे त्यांना भेटलेले प्रो. नेल्सन फ्रेझर या गुरूंविषयी आणि फ्रेंच भाषा शिकायचे निश्चित झाले, तेव्हापासून दीर्घकालपर्यंत ज्यांच्या सानिध्याचा व साहाय्याचा लाभ रघुनाथरावांना मिळाला ते प्रो. पेल्तिए यांच्या संबंधातील त्यांनी जागवलेल्या आठवणी ‘एक विक्षिप्त इंग्रज- प्रो. नेल्सन पेल्तिए‘ या लेखात आहेत.

✅संततिनियमन: रघुनाथ धोंडो कर्वे ✅

संततिनियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख करून देता येईल असे आधुनिक संत म्हणजे रघुनाथ कर्वे. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन व लैंगिक शिक्षण यांविषयी र. धों. कर्वे यांनी केलेले लोकांचे मत-विचार प्रबोधन, प्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य फार मोलाचे आहे. ज्या काळात संततिनियमनाविषयी साधा उच्चारही करणे निषिद्ध मानले जायचे, त्या काळात रघुनाथरावांनी या विषयाचा प्रचार करून जनजागृती घडवून आणायचे ठरविले.

 वाचनाची अफाट गोडी आणि लहानपणापासून जडलेली अवांतर वाचनाची सवय यामुळे कर्वे यांनी अनेक शास्त्रीय पुस्तके वाचनालयांतून आणून वाचली.

स्त्री मुक्ती, स्त्री शिक्षण, स्त्री-पुरुष संबंध याबाबतही कर्व्यांचा दृष्टिकोन अतिशय पुरोगामी होता. वैद्यकीय नवविध संशोधनाने कमी होत चाललेले मृत्यूचे प्रमाण व अनिर्बंध वाढत चाललेली लोकसंख्यामुळे संततिनियमनाची गरज लक्षता घेऊन रघुनाथराव कर्वे यांनी इ.स. १९२१ साली इंग्रजीत एक पुस्तक प्रकाशित केले. ह्या विषयावर संशोधन करून आपल्या राहत्या घरीच संततिनियमनाची साधने बनवून देण्याचा आधुनिक उपक्रम त्यांनी सुरू केला. पत्नी मालतीलाही बरोबर घेऊन त्यांनी कुटुंबनियोजन केंद्र स्थापन केले.

नागरिकांना मार्गदर्शन केले. लैंगिक रोगांची लक्षणे, कारणे त्यावरील उपाय यांबाबत लोकांना माहिती दिली. त्यासाठी त्यांनी ‘वेश्याव्यवसाय’, `आधुनिक आहारशास्त्र' ही पुस्तके लिहिली.

स्वत:ला एकही मूल नसताना कर्वे यांनी शस्त्रक्रिया करून घेतली व त्यांच्या बायकोनेही त्याला थोर मनाने संमती दिली.

इ.स. १९२३ साली पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत त्यांनी ‘संततिनियमन’ ह्या विषयावर भाषण केले. कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र इ.स. १९२१ साली लंडनमधे सुरू केले,त्याच वर्षी ते भारतात सुरू झाले.


  •  स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी अगदी इसवी सनाच्या दुसऱ्या दशकात धरला होता. लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यासच घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता. पण संतती नियमनाची पुरेशी साधन/ शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत. त्यामुळे स्त्री-आरोग्यावर गंभीर परिणाम व्हायचे. कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची. खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची, अशा भीतीमुळे मानसिक विकृतीनिर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बऱ्याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला

सतीबंदी कायदा (1829)


🔷 सती पध्दत म्हणजे पती निधनानंतर पतीवरील निस्सीम प्रेमाचे द्योतक म्हणून त्याच्यां पत्नीने स्वत:ला जाळून घेणे किंवा चितेत उडी टाकणे.

🔷 ऋग्वेदात सती प्रथा प्रचलित नसल्याचे दिसते. महाकाव्याच्या काळात सती प्रथा होती, पण सक्ती नव्हती इसा या लढाऊ जमातीकडून भारतीयांनी सतीप्रथा स्वीकारली असावी असे मानले जाते.

🔷 नतर पुराण ग्रंथात सती प्रथेला महत्व प्राप्त झाले.

🔷 पती निधनानंतर पत्नीला अतिशय खडतर जीवन जगावे लागत असे. त्यामुळे सती जाणे पसंत केले जाई.

🔷 काही विधवेस कुलप्रतिष्ठेसाठी धर्मासाठी तिच्यावर दबाव आणून पतीच्या चितेवर जाळले जाई.

🔷 ती चितेंतून बाहेर येऊ नये म्हणून लोक बांबू घेऊन चितेभोवती उभे राहत तिच्या किंकाळया ऐकू येऊ नये म्हणून वाद्ये वाजविली जात असत.

🔷 ही प्रथा राजपुतांना बंगाल, विजयनगर भागात मोठया प्रमाणात होती.

🔷 काश्मीरचा राजा सिकंदर, मुघल सम्राट, अकबर, जहांगीर, दुसरा बाजीराव पेशवा, गोव्याचे पोर्तुगीज, श्रीरामपूरचे डॅनिश, चंद्रनगरचे फ्रेंच, चिन्सूरचे डच, यांनी आपल्या राज्यात सती प्रथेवर बंदी घातली होती, पण अपयश आले, इंग्रज राजवटीमध्ये र्लॉड कॉर्नवालिस, र्लॉडमिंटो, र्लॉड हेस्टिग्ज, व अ‍ॅमहर्स्ट यांनी प्रयत्न केले.

🔷 काही अटीवर सती पध्दतीला परवानगी देण्याची प्रथा र्लॉड वेलस्लीने सुरु केले.

🔷 सती कायद्यास सनातनी लोकांनी विरोध केला 1812 पासून राजा राममोहन रॉय यांनी प्रयत्न केल्याने र्लॉड बेटिंक यांनी 4 डिसेंबर 1829 रोजी सती बंदीचा कायदा मंजूर केला.

🔷 1830 मध्ये मुंबई, मद्रास प्रांताला लागू केला सती जाणेबाबत सक्ती करणे. सतीच्या वेळी हजर राहणे या गोष्टी गुन्हा ठरविण्यात आल्या

भारतात युरोपिअन वसाहतीची सुरुवात

 

  • वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजेच युरोपियनांच्या व्यापाराला झालेली सुरुवात म्हणावी लागेल. सर्वप्रथम व्यापाराच्यानिमित्ताने पोर्तृगीज आले.
  • त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ डच, इंग्रज, फ्रेच, इ. व्यापारी आले व ते हिंदुस्थानात व्यापार करु लागले.
  • या व्यापारातून त्यांच्यात सत्ता स्पर्धेला सुरुवात झाली. त्यातुनच इंग्रज फ्रेंच संघर्षातून कर्नाटकात तीन युध्दे लढली गेली.
  • त्यात अंतिम विजय इंग्रजांना मिळाला व ते सत्तास्पर्धेत यशस्वी झाले.
  • ब्रिटिशांच्या प्रशासकीय व्यवस्थेत आणि धोरणात विविध कायद्यांद्वारे बदल कसे होत गेले याचा उहापोह या प्रकरणात केला आहे.
  • प्लासीच्या युध्दाने इंग्रजांना साम्राज्य विस्ताराची गुरुकिल्ली मिळाली बक्सारच्या युध्दात विजय मिळाल्याने साम्राज्याविस्ताराचा खर्‍या अर्थाने पाया रोवला गेला.
  • र्लॉड वेलस्लीने तैनाजी फौजेला पध्दशीर स्वरूप दिल्यामुळे भारतीय राज्यकर्त्यामध्ये त्याविषयी जे आकर्षण निर्माण झाले त्यातुन अनेक राजे, महाराजे व नबाब यांनी या पध्दतीचा स्वीकार केला.

युरोपियनांचे भारतात आगमन :-

  • पूर्वी भारतातील माल इराणचे आखात कॉन्स्टॅटिनोपल इटली या खुष्कीच्या मार्गाने युरोपियन देशात पाठवला जात असे.
  • परंतु 1453 मध्ये तुर्कानी कॉन्स्टॅटिनोपल हे शहर जिंकुन घेतल्यामुळे युरोपियनांचा भारताशी चालणारा व्यापारच बंद झाला कारण तुर्कानी युरोपियन व्यापार्‍यांचा मार्गच अडवून धरला.
  • आता युरोपियनांपुृढे एकच मार्ग होता. तो म्हणजे भारताकडे जाणार्‍या समुद्रमार्गाचा शोध लावणे भारताशी सुरु असलेला व्यापार असा अचानक बंद पडल्यामुळे नेहमी लागणारा व भारतातून येणारा माल दुसर्‍या राष्ट्रांमध्ये मिळणे अशक्य होते.
  • या गरजेतूनच युरोपियन व्यापारी व राज्यकर्ते भारताचा शोध समुद्रमार्गे लागतो का याचा प्रयत्न करु लागले या गरजेतूनच स्पॅनिश राजा राणीच्या मदतीने कोलंबस या धाडसी खलाशाने अटलांटिक महासागर पार करुन भारताकडे जायार्‍या मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे तो 1492 मध्ये अमेरिकेला जाऊन पोहचला म्हणजे त्यास अमेरिका हा नवीन खंड सापडला.
  • वास्को-द-गामा हा पोर्तृगीज प्रवासी आफ़्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून 23 मे 1498 रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला.
  • या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनार्‍यावरील पहिले पाऊल होते.
  • 1615 मध्ये इंग्रज राजाचा प्रतिनिधी सर थॉमस रो याने जहांगीर बादशहाकडून प्रथमच व्यापारी सवलती मिळवल्या व त्यानंतर मच्छलीपट्टण, सुरत, मद्रास, कलकत्ता, मुंबई इ. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या वखारीउभारल्या नफा प्रचंड मिळत असल्यामुळे त्यांचा भारतातील व्यापार सारखा वाढत होता. काही मालाच्या बाबतीत या व्यापार्‍यांना 100 टक्के फायदा मिळत होता. पुढे 1717 साली विल्यम हॅमिल्टन नावाच्या एका इंग्रज डॉक्टरने मोगल बादशहा फारुक सियर याला एका भयंकर आजारापासून वाचवले या गोष्टीचा फायदा इंग्रज व्यापार्‍यांनी घेतला व बंगालमध्ये जकात मुक्त व्यापार करण्याचे आणि भारतात व्यापाराच्या निमित्ताने वखार स्थापन करण्याचे फर्मान मिळविले.
युरोपियन कंपन्यांची सत्तास्पर्धा :-

  • ब्रिटिश ईस्ट कंपनीतर्फे भारतात आलेल्या व्यापार्‍यांचा उद्देश व्यापार करणे आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवणे हा होता.
  • पण भारतातही होणार्‍या व्यापारात इंग्रजांना पोर्तृगीज, डच, फ्रेंच, अशा विविध युरोपियन व्यापार्‍यांशी स्पर्धा करावी लागली.
  • त्या वेळी भारतात कार्यरत असणार्‍या डच ईस्ट इडिया कंपनीकडून व फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीकडून जबरदस्त स्पर्धेला तोंड द्यावे लागल्यामुळे ब्रिटिश कंपनीच्या व्यापारावर व नफ्यावर मर्यादा आली.
  • त्याला पर्याय व सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारतीय व्यापार क्षेत्रातून या स्पर्धेत कंपन्यांना समाप्त करणे होय.
  • भारतात व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांनी व्यापाराबरोबर राज्यविस्ताराचे व धर्मप्रसाराचे धोरण स्वीकारले म्हणून त्यांच्या सत्तेचा विस्तार भारतात फारसा होऊ शकला नाही.
  • याच सुमारास युरोपात इंग्लडने हॉलंडचा पराभव केल्यामुळे भारतातील डच, व्यापारी निष्प्रभ झाले. प्लासीच्या युध्दांत इंग्रजांना विजय मिळाला.
  • सिराजउद्दिला याच्या जागी इंग्रजांच्या मदतीने मीर जाफर हा बंगालचा नबाब झाला.
  • दिवसेदिवस इंग्रजांचे वर्चस्व वाढत गेल्यामुळे तो भयभीत होऊ लागला होता, या वेळी बंगालमध्ये इंग्रजांप्रमाणेच डच लोकही व्यापार करीत होते.
  • इंग्रजांच्या वाढत्या प्रभावामुळे त्यांच्या व्यापाराला धक्का बसल्याने ते इंग्रजांचा द्वेष करीत होते. मीर जाफरने त्यांना इंग्रजांविरुध्द भकडावले.
  • त्याचा परिणाम असा झाली की इ.स. 1759 मध्ये डचांनी इंग्रजांमध्ये निकराचा संघर्ष होऊन त्यात इंग्लंडला विजय मिळाला.
  • डच व इंग्रज यांच्यात तह होऊन डचांनी इंग्रजांवर चढाई न करण्याचे सैन्य न पाठवण्याचे व वखारींची तटबंदी न करण्याची हमी दिली.
  • यांनतर बंगालमध्ये डचांनी पुन्हा डोके वर काढण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. इंग्रजांना आता भारतातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.

भारतातील इंग्रज -फ्रेंच संघर्ष :-

  • व्यापार करता-करता इंग्रज व फ्रेंच कंपन्या भारतीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत होत्या, या दोन्ही कंपन्यांचा मुख्य उद्देश व्यापारातून जास्तीत जास्त फायदा करुन घेणे हा होता.
  • भारतातील व्यापारातून आपल्याला जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी इंग्लंड व फ्रान्स यांच्यात जणू स्पर्धाच लागली होती. पण त्यातूनच त्यांच्यात भारतात सज्ञ्ल्त्;ाा मिळविण्यासाठी जो प्रयत्न करण्यात आला त्यातून त्यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
  • 17 व्या आणि 18 व्या शतकात इंग्लड व फ्रान्स परस्परांचे कट्टर शत्रू होते, त्यामुळें त्यांच्यात युध्द सुरु झाले की जगाच्या कोणत्याही भागात त्यांच्या कंपन्या एकत्र कार्यरत असल्या म्हणजे त्यांच्यातही युध्द सुरु असे.
  • ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दापासून भारतात इंग्रज फ्रेच संघर्ष सुरु झाला. फ्रेंचचे भारतातील मुख्य केंद्र पॉडेचरी असून मछलीपट्टम, कारिकल, माहेृ सुरत व चंद्रनगर ही उपकेंद्रे होती.
  • इंग्रजांनी आपले वर्चस्व मद्रास, मुंबई, व कलकत्ता या विभागावर आणि आजूबाजूच्या परिसरात प्रस्थापित केले होते.

पहिले कर्नाटक युध्द (1746-1748) :-

  • युरोपात ऑस्ट्रियाच्या वारसा युध्दाचा प्रारंभ झाल्यांवर त्याचाच झालेला विस्तार म्हणजे कर्नाटकाचे पाहिले युध्द होय.
  • आपल्या मूळ देशांच्या आदेशाविरुध्द भारतातील इंग्रज व फ्रेंचांनी 1746 मध्ये संघर्ष सुरु केला. बारनेटच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमाराने फ्रेंचांची काही जहाजे पकडली त्यामुळे पॉंडेचरीचा फ्रेंच गव्हर्नर डुप्ले याने मॉरिशसचा फ्रेंच गव्हर्नर ला बोर्डोकडे मदत मागितली.
  • डुप्लेच्या मदतीला 3000 सैन्यासह ला बोर्डो मद्रासजवळ असलेल्या कोरोमंडळ तटाकडे निघाला. मार्गात त्याने इंग्रजाच्या आरमाराचा पराभव केला.
  • फ्रेंचांनी जल व स्थल अश दोन ठिकाणी मद्रासला घेरले. या युध्दात मद्रासच्या इंग्रजांचा 21 सष्टेंबर 1746 रोजी पराभव कला फ्रेंचांनी मद्रास जिंकून घेतले.
  • या प्रसंगी जे इंग्रजयुध्दकैदी पकडण्यात आले त्यात रॉर्बट क्लाईव्हही होता.
  • मद्रासच्या इंग्रजांपासून खंडणी घ्यावी असे ला बोर्डेनिचे मत होते. पण डुप्लेला ते मान्य नव्हते.
  • शेवटी एका मोठया रकमेच्या मोबदल्यात ला बोडॅनि मद्रास पुन्हा जिंकून घेतले. पण पाँडेचरीपासून फक्त 18 मैल दक्षिणेला असलेला सेंट डेविडचा किल्ला त्यास जिंकता आला नाही.
  • अर्थात इंग्रजांनी पाॅंडेचरी जिंकून घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न असफल ठरला.
  • कर्नाटकच्या पहिल्या युध्दातील सेंट टोमेची लढाई महत्वाची समजली जाते. ही लढाई कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन याच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्य आणि फ्रेंच सैन्य यांच्यात झाली.
  • मद्रास फ्रेंचांनी घेतल्यापासून हा संघर्ष सुरु झाला आपल्या प्रदेशात दोन्ही परकिय कंपन्या लढत असलेल्या पाहून हा संघर्ष बंद करण्याची व प्रदेशांची शांतता भंग न करण्याची आज्ञा नवाबाने दिली.
  • त्यावर डुप्लेने आपले आश्र्वासन न पाळल्याने आपली मागणी पूर्ण करण्यासाठी नबाबने सैन्य पाठविले.
  • या तुकडीचे नेतृत्व कॅ पॅराडइज याच्याकडे होते. आणि महफूजखानच्या नेतृत्वाखालील 10,000 भारतीय सैनिकांना अडयार नदीजवळ सेंट टोमे येथे पराभूत केले.
  • या विजयामुळे असंघटिक व अप्रशिक्षित भारतीय सैन्याच्या तुलनेत प्रशिक्षित परकिय सैन्याचे श्रेष्ठत्व दिसून आले.
  • परंतु एक्स-ला शापेलच्या युरोपातील युध्द बंद होताच 1748 पहिल्या कर्नाटक युध्दाचीही समाप्ती झाली. मद्रास इंग्रजांना पुन्हा परत मिळाले.
  • या युध्दात फ्रेंचांचे श्रेष्ठत्व दिसून आले. डुप्लेची कूटनीती प्रदर्शित झाली. इंग्रजांना पॉंडेचरी जिंकून घेता आले नसले तरी त्यांना आरमाराचे महत्व लक्षात आले.

दुसरे कर्नाटक युध्द (1748-1754) :-

  • कर्नाटकच्या पहिल्या युध्दामुळे डुप्लेची राजकीय महत्वाकांक्षा अधिक वाढली.
  • भारतीय राजांमध्ये सुरु असलेल्या संघर्षात भाग घेउन फ्रेंचांचा राजकीय प्रभाव वाढविण्याचा त्याने निणर्य घेतला.
  • या स्थितीचे वर्णन करताना मॅलेसन म्हणतो, महत्वाकंाक्षा जागृत होऊ लागल्या, परस्पर द्वेष वाढू लागले. युरोपियनांना शांततेशी काहीच देणे घेणे नव्हते कारण आकांक्षा पूर्तीसाठी संधी दार ठोठावत होती.
  • ही संधी हैद्राबाद व कर्नाटकच्या निर्वादास्पद वारसांमूळे प्राप्त झाली.
  • हैद्राबादचा निजाम उल मुल्क आसफजाह याचा मे 1748 मध्ये मृत्यू झाला त्यांच्यानंतर त्याचा मुलगा नासिरजंग हैद्राबादच्या गादीवर बसला. परंतु त्याला निजाम उल मुल्काचा नातू मुझॅफ्फरजंगने आव्हान दिले.
  • याच वेळी कर्नाटकचा नबाब अन्वरुद्दीन आणि त्याचा मेहुण चंदासाहेब यांच्यात संघर्ष निर्माण झाला.
  • या संघर्षपूर्ण राजकीय स्थितीचा लाभ घेत मुझफ्फरजंगने दक्षिणेचा सुभेदार आणि चंदासाहेंबास कर्नाटकचा सुभेदार बनविण्यासाठी त्यांना समर्थन देण्याचे डुप्लेंने ठरवले स्वाभाविकच इंग्रजांनी त्यांचे प्रतिस्पर्धी अनुक्रमे नासिरजंग व अन्वरुद्दीन यांचा पक्ष उचलून धरला.
  • एकुण डुप्लेला खूप यश मिळाले. मुझफ्फरजंग चंदासाहेब व फ्रेंच सैन्याचे ऑगस्ट 1949 मध्ये अंबूर येथे अन्वरुद्दीनचा पराभव करुन त्यास ठार मारले. तसेच डिसेंबर 1750 मध्ये झालेलया एका संघर्षात नासिरजंगसुध्दा मारला गेला. मुझफ्फरजंग दक्षिणेचा सुभेदार बनला व आपल्या समर्थकांना त्याने फार मोठी बक्षिसे दिली.
  • कृष्णा नदीच्या दक्षिणेकडील मोगल प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून डुप्लेंची नियुक्ती करण्यात आली.  
  • चंदासाहेब कर्नाटकचा नबाब बनला. 1751 डुप्ले या वेळी आपल्या यशाच्या व राजकीय शक्तीच्या शिखरावर होता.
  • परंतु लवकरच फ्रेंचांसमोर नविन आव्हान उभे राहिले, अन्वरूद्दीनचा मुलगा मुहम्मद अलीने त्रिचनापल्लीला आश्रय घेतला होता.
  • त्यामुळे चंदासाहेब व फ्रेंच सैन्याने त्रिचनापल्लीच्या किल्ल्यास वेढा घातला त्याला शह देण्यासाठी इंग्रजांचा प्रतिनिधी रॉर्बट क्लाईव्ह याने फक्त 210 सैनिकांसह कर्नाटकची राजधानी असलेले अकराट जिंकून घेतले.
  • राजधानी अकराट जिंकून घेण्यासाठी चंदासाहेबाने 4000 सैनिक पाठविले, परतु क्लाईव्हने अकराटचे योग्य पध्दतीने संरक्षण केले. त्यामुळे फ्रेंचांना अकराट जिंकता आले नाही. हा फ्रेंचांच्या प्रतिष्ठेला जोरदार धक्का बसला.
  • जून 1752 मध्ये त्रिचनापल्लीला वेढा घातलेल्या फ्रेंच इंग्रजांसमोर शरणागती पत्करली. याच सुमारास चंदासाहेब तंजावरच्या राजाकडून मारला गेला. त्रिपनापल्लीला झालेल्या फ्रेंचांच्या पराभवामुळे डुप्लेचे महत्व कमी झाले.
  • 1754 मध्ये गॉडेव्हयूला डुूप्लेंचा उत्तराधिकारी नियुक्त करून भारतातील फ्रेंच प्रदेशाचा गव्हर्नर म्हणून नेमणूक करण्यात आली फ्रेंचांनी इंग्रजांशी पाँडेचरीचा तह करुन हे युध्द समाप्त केले.
  • जमिनीवर लढल्या गेलेल्या युध्दांत इंग्रजांचे वर्चस्व राहिले. इंग्रजांनी मुहम्मदअली यास कर्नाटकाच्या नबाब पदी बसवले असे असले तरी हैद्राबाद राज्यात अजूनही फ्रेंचंाची परिस्थिती चांगली होती.
  • मुझफ्फरजंग एका लहानशा संघर्षात मारला गेल्यावर हैद्राबादच्या गादीवर बसलेल्या सलाबतजंगाकडून फ्रेंचांनी बराच प्रदेश जहागीरी म्हणून पदरात पाडून घेतला.
  • 30 लक्ष रु वार्षिक उत्पन्नाचा भू भाग फ्रेंच कंपनीला देण्यात आला. थोडक्यात दुसर्‍या कर्नाटक फ्रेंचांची पिछेहाट झाली तर इंग्रजांची परिस्थिती अधिक दृढ झाली.

   तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763) :-

  • 1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.
  • फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.
  • त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.
  • काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.
  • कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.
  • दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.
  • खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.
  • युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.
  • कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले. 1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला. या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

फ्रेंचांच्या भारतीय राजकारणातून झालेला अस्त :-

  • इ.स. 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांती यशस्वी होऊन तेथे लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली होती.
  • पुढे याच राज्यक्रांतीतून नेपोलियन बोनापेटचा उदय झाला. त्याने आपल्या कारकिर्दीतचत सर्व युरोपला सळो कि पळो करून सोडले होते.
  • इ.स. 1798 मध्ये नेपोलियनने इजिप्तवर स्वारी करुन तो देश जिंकलीा तेथून भारतात येऊन इंग्रजांना हाकलून लावण्याचा त्याचा बेत होता.
  • इ.स. 1798 मध्येच र्लॉड वेलस्ली याने भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून सत्ता आपल्या ताब्यात घेतली होती. युरोपात इंग्रज व फ्रेंच यांच्यातील संघर्षाची त्यास कल्पना होती.
  • भारतात ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यास वेलस्ली जेवढा उत्सूक होता तेवढाच तो नाममात्र शिल्लक राहिलेल्या फ्रेंच सत्तेच्या खाणाखुणा संपुष्टात आणण्यास उतावीळ झाला होता.
  • टिपू सुलतान दौलतराव श्ंिादे व हैद्राबादचा निजाम यांनी कवायती सैन्य ,तोफा, बंदुका व दारुगोळयाची सुसज्ज केल्या होत्या फ्रान्समध्ये नेपोलियनचा उदय झाल्यामूळे आता फ्रेंचांना भारतातून हुसकावून लावून नेपोलियनच्या आफि्रका व आशियातील वाढत्या आक्रमणास पायबंद घालणे हा उद्देश र्लॉड वेलस्लीने जाहीर केला.
  • निजामाकडे चौदा हजार व शिंद्याकडे चाळीस हजार फ्रेंच सेना असल्याचा प्रचार करुन त्याने तिचे पारिपत्य करण्यासाठी संचालकांकडून संमती मिळविली.
  • टिपू सुलतान फ्रेंचांच्या नादी लागला म्हणून त्याने चौथ्या इंग्रज म्हैसूर युध्दात त्याचा अंत केला.
  • र्लॉड वेलस्लीने लासवाडी आणि असराईच्या युध्दात दौलतराव शिंद्यांचाही पराभव केला.
  • एवढयावर संतोष न मानता वेलस्लीने फ्रेंचांच्या बंदोवस्तासाठी भारताबाहेरही अनेक कारवाया केल्या जॉन माल्कमला त्याने इ.स. 1803 मध्ये तेहरान येथे पाठविले.
  • डच लोक फ्रेंचांचे मित्र असल्यामूळे वेलस्लीने त्यांचा जावा व इतर बेटे जिंकून घेण्याचा आणि मॅारिशसवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला इजिप्तमध्ये याच वेळी त्याने सेनापती बेर्यडला एक फौज देऊन पाठविले परंतु वेलस्लीचे हे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले.
  • वेलस्लीने केलेल्या या उठाठेवींचा एक फायदा झाला तो म्हणजे फ्रेंचांचा पार निकाल लागला आणि भारतीय राजकारणातून त्यांचे पूर्णपणे उच्चाटन झाले.

इग्रज - फ्रेंच संघर्ष : फ्रेंच पराभूत

🔺 सन १६५० साली स्पेनने पोर्तुगालचा पराभव केल्याने हिंदुस्तानातील पोर्तुगीज व्यापाराला मोठा धक्का पोहोचला. याच सुमाराला युरोपात इंग्लंडने हॉलंडचा पराभव केल्याने हिंदुस्तानातील डच व्यापारी निष्प्रभ झाले. १६५४ साली आता हिंदुस्तानातील फ्रेंच हेच प्रभावी विरोध करणारे प्रतिस्पर्धी होते.


🔹* मद्रास किनाऱ्यावर पाँडेचेरी येथे फ्रेंच व्यापारी सत्तेचे प्रमुख ठिकाण होते. या ठिकाणी १७४२ साली हिंदुस्तानातील फ्रेंच हेच सत्तेचा गवर्नर म्ह्नणून डूप्ले या हुशार मुत्सद्याची नेमणूक केली. अशाच प्रकारचे पहिले इंग्रज फ्रेंच युद्ध मद्रास किनाऱ्यावर सन १७४६ - ४८ या काळात खेळले गेले. फ्रेंचांनी इंग्रजांचे मद्रास जिंकून घेऊन त्याच्यावर सरशी केली.


🔸* मोगलांचा दक्षिणेचा कर्तबगार सुभेदार निजाम उल्मुक याने बादशाहचे नाममात्र वर्चस्व स्वीकारून दक्षिणेत आपल्या हैदराबादेच्या राज्याची स्थापना केली होती. सन १७४८ साली निजाम मृत्यू पावला आणि मग त्याच्या गादीवर बसण्यासाठी त्याच्या वारसदाराकडे झगडा सुरु झाला. फ्रेंचांनी या दोन्ही राज्यांच्या हस्तक्षेप करून अवघ्या दोन वर्षाच्या आत कर्नाटकाच्या नावाबीवर व हैद्राबादच्या राज्यावर आपले स्थापन केले. १७४९ - ५० अशाप्रकारे दक्षिणेत डूप्ले व बुसी या दोन फ्रेंच अधिकाऱ्यांनी हिंदी राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले.


🔹* हैद्राबादच्या निजामाच्या दरबारात निर्माण झालेली फ्रेंचाचे वर्चस्व पूर्णपणे नष्ट झाले. व निजाम इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आला. पुढे १७६३ साली परिसचा तह झाला. त्या अन्वये इंग्रजांनी फ्रेंचांनी पोंडेचेरी वगैरे ठाणी परत केली. पण येथून फ्रेंच सत्ता हिंदुस्तानात वाढू शकली नाही

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...