१३ जून २०२४

काही महत्वाचे निर्देशांक व भारताचा क्रमांक


▪️ग्लोबल Gender Gap index 2024
• प्रथम देश - आइसलँड व  भारत - 129 वा क्रमांक

▪️"जागतिक सायबर क्राईम इंडेक्स" नुसार भारताचा क्रमांक 10 ,, स्थान प्रथम - रशिया

▪️"वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स-2024" मध्ये
• प्रथम - नॉर्वे,
• भारताचा क्रमांक - 159

▪️जागतीक FIFA क्रमवारी -
• प्रथम देश अर्जेटिना 
• भारत 99 वा.

▪️जागतिक आनंद निर्देशांक - फिनलंड
• भारत 126

▪️जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक
• प्रथम - डेन्मार्क
• भारत 40 वा

▪️जागतिक ऊर्जा प्रसारण निर्देशांक
• प्रथम देश- स्वीडन
• भारत 67 सावा

▪️जगातील पत्रकारिता स्वतंत्रता निर्देशांक-
• प्रथम - नॉर्वे
• भारत 161 वा

▪️वैश्विक लैंगिक अंतर निर्देशांक -
• प्रथम देश- आइसलँड
• भारत 127 वा

▪️जागतिक दहशदवाद निर्देशांक
• प्रथम देश - अफगाणिस्थान
• भारत 13 वा

▪️शाश्वत विकास अहवाल 2023
• प्रथम देश - फिनलॅंड
• भारत 112 वा

▪️ग्लोबल हंगर इंडेक्स 2023
• प्रथम देश- बेलारूस,
• भारत 111 वा

▪️निवडणूक लोकशाही निर्देशांक
• प्रथम देश -डेन्मार्क
• भारत 108 वा

▪️हेन्ली पासपोर्ट इंडेक्स 2023
• प्रथम देश जपान
• भारत 85 वा.

महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🔖 प्रश्न – आज भारत सरकारने नवीन लष्करप्रमुख पदी कोणाची निवड केली ?

उत्तर– उपेंद्र द्विवेदी - ३० वे लष्करप्रमुख

🔖 प्रश्न – नुकतीच भारतीय नौदलाची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली ?

उत्तर– अनामिका राजीव

🔖 प्रश्न – अलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएम आवास योजनेअंतर्गत किती कोटी नवीन घरांना मंजुरी दिली ?

उत्तर– ३ कोटी

🔖 प्रश्न – इस्राईल मध्ये युद्ध विरामासाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ठराव मंजूर करण्यात आला असुन यामध्ये १५ पैकी किती देशांनी पाठिंबा दिला ?

उत्तर– १४

🔖 प्रश्न – हेल्ब्रॉन नेकारकप 2024 एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले ?

उत्तर– भारतीय टेनिसपटू समिट नागपाल

🔖 प्रश्न – जैन आचार्य लोकेश मुनी यांनी कोणत्या देशात जागतिक शांतता केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली ?

उत्तर– अमेरिका

🔖 प्रश्न – १८ व्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वाधिक कोणत्या मतदारसंघात NOTA ला मतदान झाले ?

उत्तर– रायगड

🔖 प्रश्न – भारतीय नौदलासाठी मिसाईल व दारुगोळा ने सज्ज LSAM-१३ हे जहाज कोणत्या ठिकाणच्या सेकॉन इंजिनियर प्रॉजेक्ट pvt LTD ने तयार केले ?

उत्तर– विशाखापट्टणम

🔖 प्रश्न – FIH हॉकी मेन्स ज्युनिअर वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार ?

उत्तर– भारत

🔖 प्रश्न – नुकतीच जपान-भारत सागरी सराव (JIMEX)-24 ची 8 वी आवृत्ती कोठे आयोजित करण्यात आली ?

उत्तर– योकोसुका, जपान

🔖 प्रश्न – लेफ्टनंट जनरल वाकर-उझ-जमान यांची कोणत्या देशाच्या लष्करप्रमुख पदी निवड करण्यात आली ?

उत्तर– बांगलादेश

🔖 प्रश्न – महाराणा प्रताप टुरिस्ट सर्किट कोणत्या राज्यात विकसित करण्यात येणार ?

उत्तर– राजस्थान

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️ सिक्कीम चे नवे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमाग

◾️पक्ष : सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा
◾️शपथ : 10 जून 2024 ला
◾️सलग 2 वेळा ते सिक्कीम चे मुख्यमंत्री बनले
◾️सिक्कीम चे गव्हर्नर : लक्ष्मण प्रसाद आचार्य ◾️यांनी त्यांना शपथ दिली
सिक्कीम विधानसभा जागा : 32
◾️त्यापैकी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा 31 जिंकल्या

❇️ RBI ने पेमेंट फसवणुकीचे धोके कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी विविध पैलू तपासण्यासाठी समिती स्थापन केली
◾️नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे माजी MD आणि CEO श्री. AP होटा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
❇️ SEBI ला द एशियन बँकर तर्फे 'बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर' पुरस्काराने सन्मानित
◾️हाँगकाँग येथे आयोजित समारंभात सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी हा पुरस्कार स्वीकारला

❇️ संयुक्त राष्ट्र ने इजराईल देशाला काळ्या यादीत ( back list ) केलं आहे
◾️इजराईल आणि गाझा युद्धामुळे खूप लहान मुलांचा मृत्यु झाला आणि मानवाधिकारांचे उल्लंघन झाले
◾️त्यामुळं Black List केलं आहे
◾️Black list असलेले काही देश
⭐️हमास ,ISIS, अल कायदा या संघटना
⭐️इराक , म्यानमार , येमन, सोमालिया ,रशिया हे देश

❇️ पूजा तोमर UFC (Ultimate Fighting Championship) मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय ठरली
◾️तिने महिलांच्या स्ट्रॉवेट विभागात ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा पराभव केला.
◾️ त्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या बुढाना गावातील आहेत
◾️त्यांचं टोपण नाव The Cyclone

◾️NITI - National Institution for Transforming India
⭐️1 जानेवारी 2025 ला स्थापना
⭐️नीती आयोग अध्यक्ष : पंतप्रधान
⭐️नीती आयोग उपाध्यक्ष : श्री सुमन बेरी
⭐️नीती आयोग CEO : श्री BVR सुब्रह्मण्यम

❇️ नुकतेच झालेले काही मुख्यमंत्री लक्षात ठेवा
◾️मोहन चरण माझी : ओडीसा मुख्यमंत्री
◾️लालदुहोमा : मिझोराम मुख्यमंत्री
◾️भजनलाल शर्मा : राजयस्थान मुख्यमंत्री
◾️मध्यप्रदेश मुख्यमंत्री : मोहन यादव
◾️तेलंगणा मुख्यमंत्री : रेवंत रेड्डी

❇️ 2025 चा पुरुष ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे
◾️ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने तशी घोषणा केली आहे
◾️अध्यक्ष : तैयब इकराम
◾️डिसेंबर 2025 ला स्पर्धा होतील
◾️2013 , 2016 ,2021 ला याचे आयोजन भारतात झाले होते

❇️ संत कवी थिरुमंगाई अलवार यांची  मूर्ती ब्रिटन मधून परत आणली जाणार आहे
◾️प्राचीन धातूची मूर्ती ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अश्मोलियन म्युझियममध्ये आहे
◾️ही 500 वर्षे जुनी मूर्ती आहे
◾️ह्याची उंची 60 cm आहे
◾️1967 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ मध्ये ही ठेवण्यात आली

❇️ ग्लोबल Gender Gap index 2024 मध्ये भारताचा 129 वा क्रमांक आहे
◾️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ( WEF) ने प्रकाशित केला
◾️146 देशांचा अहवाल प्रसिद्ध
◾️पहिल्या 3 क्रमांकावर
1)आइसलँड
2) फिनलँड
3)नॉर्वे
◾️शेवटचा देश सुदान आहे ( 146 क्रमांक)

❇️ भारताचे नवीन आर्मी प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे बनले आहे
◾️30 व्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख असतील
◾️हे सध्या लष्कर उपप्रमुख आहेत
◾️लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून ला पदभार स्वीकारतील
◾️15 डिसेंबर 1984 ला भारतीय सेनेमध्ये सामील झाले होते

❇️ भारतीय आर्मी
◾️स्थापना : 26 जानेवारी 1950
◾️मुख्यालय : दिल्ली
◾️सेना दिवस : 15 जानेवारी ला

🔖 याच्या Notes काढून ठेवा : VVIMP
◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु
◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल चौहान
◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत)
◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत)
◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी
◾️नौदल उपप्रमुख : कृष्ण स्वामीनाथन 
◾️हवाईदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी
◾️वायुदल उपप्रमुख : अमरप्रीत सिंग
◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल
◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव
◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद
◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया
◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका
◾️RAW प्रमुख : रवी सिंह
◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते
◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन

-------------------------------------------

महत्त्वाच्या आयोगांची माहिती :-

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,

📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,

🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324
- स्थापना: 26 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

💰 CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.

⚖️ Lokpal (लोकपाल)

- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013
- स्थापना: 2019
- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.

⚖️ Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980
- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल

👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: 1993
- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.

👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.

🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003
- स्थापना: 1964
- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.

👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1985
- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1991
- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978
- स्थापना: 1966
- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773

- 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल
- 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना
- 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधित
- 🟢 कोर्ट ऑफ डायरेक्टर्सला अहवाल देण्याची जबाबदारी

---

⭕️ पिट्स इंडिया अ‍ॅक्ट 1784

- 🟢 बोर्ड ऑफ डायरेक्टर्स (BOD) आणि कोर्ट ऑफ डायरेक्टर्स (COD)
- 🟢 दुहेरी सरकार

---

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1813

- 🟢 व्यापार मक्तेदारी रद्द
- 🟢 ख्रिस्ती धर्मप्रसारकांना भारतात येण्याची परवानगी
- 🟢 पाश्चिमात्य शिक्षणाची सुरुवात

---

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1833

- 🟢 भारताचे गव्हर्नर-जनरल (लॉर्ड विल्यम बेंटिक)

---

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1853

- 🟢 विधायी आणि कार्यकारी कार्यांचे विभाजन
- 🟢 खुल्या स्पर्धेतून निवड
- 🟢 भारतीय विधीमंडळात स्थानिक प्रतिनिधित्व

---

⭕️भारत सरकार 1858

- 🟢 गव्हर्नर-जनरल ते व्हाइसरॉय
- 🟢 कंपनीचे शासन समाप्त
- 🟢 नवीन कार्यालय - भारतासाठी राज्य सचिव
- 🟢 15 सदस्यांची भारताची परिषद

---

⭕️ भारतीय परिषद अ‍ॅक्ट 1861

1. 🟢 व्हाइसरॉयने काही भारतीयांना अशासकीय सदस्य म्हणून नामांकित करणे (राजा ऑफ बनारस, महाराजा ऑफ पटियाला, आणि सर दिनकर राव)
2. 🟢 बॉम्बे आणि मद्रासला विधायी अधिकार देऊन विकेंद्रीकरणाची प्रक्रिया सुरू केली
3. 🟢 बंगाल, उत्तर-पश्चिम प्रांत आणि पंजाबसाठी नवीन विधीमंडळाची स्थापना
4. 🟢 विधानसभेत व्यवसायाची अधिक सोयीची व्यवस्था करण्यासाठी व्हाइसरॉयला नियम आणि आदेश जारी करण्याचा अधिकार दिला ('पोर्टफोलिओ' प्रणाली)
5. 🟢 व्हाइसरॉयला अध्यादेश जारी करण्याचा अधिकार दिला (सहा महिने)

---

⭕️ भारतीय परिषद अ‍ॅक्ट 1892

- 🟢 आकार वाढवला पण अधिकृत बहुसंख्य ठेवली
- 🟢 बजेटवर चर्चा आणि प्रश्न विचारण्याची परवानगी
- 🟢 (मर्यादित आणि अप्रत्यक्ष निवडणुकीची तरतूद)

---

⭕️ भारतीय परिषद अ‍ॅक्ट 1909 (मॉर्ले-मिंटो सुधारणा)

- 🟢 विधीमंडळाच्या आकारात वाढ (16 ते 60)
- 🟢 केंद्रीय विधीमंडळात अधिकृत बहुसंख्य, प्रांतीय विधीमंडळात अशासकीय बहुसंख्य
- 🟢 पुरवणी प्रश्न विचारण्याची आणि बजेटवर प्रस्ताव सादर करण्याची परवानगी
- 🟢 कार्यकारी परिषदेत भारतीयांची नियुक्ती (सत्येंद्र प्रसाद सिन्हा - कायदा सदस्य)
- 🟢 मुस्लिमांसाठी सांप्रदायिक प्रतिनिधित्व
- 🟢 प्रेसिडेंसी कॉर्पोरेशन, चेंबर्स ऑफ कॉमर्स, विद्यापीठे आणि जमीनदारांचे प्रतिनिधित्व

---

⭕️ भारत सरकार अ‍ॅक्ट 1919 (मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा)

- 🟢 केंद्र आणि प्रांतीय विषयांचा वेगळा समावेश
- 🟢 प्रांतात द्वैध शासन प्रणालीचा प्रारंभ
- 🟢 विधीमंडळात द्विसदनीयता आणि थेट निवडणुका
- 🟢 व्हाइसरॉयच्या कार्यकारी मंडळातील 6 सदस्य भारतीय
- 🟢 सिख, भारतीय ख्रिश्चन, अँग्लो-इंडियन आणि युरोपियनचे प्रतिनिधित्व
- 🟢 भारतासाठी उच्चायुक्ताच्या नवीन कार्यालयाची स्थापना
- 🟢 सार्वजनिक सेवा आयोगाची स्थापना
- 🟢 प्रांतीय बजेट्सना केंद्र बजेट्सपासून विभक्त करणे
- 🟢 सांविधिक आयोगाची नियुक्ती

---

⭕️ भारत सरकार अ‍ॅक्ट 1935

- 🟢 संपूर्ण भारतीय महासंघ
- 🟢 तीन यादी - केंद्रीय यादी, प्रांतीय यादी, समवर्ती यादी
- 🟢 प्रांतात द्वैध शासन समाप्त आणि केंद्रात प्रारंभ
- 🟢 प्रांतात द्विसदनीयता
- 🟢 दबलेली वर्ग, महिला आणि श्रमिकांसाठी सांप्रदायिक प्रतिनिधित्व
- 🟢 भारतीय परिषदेचे उच्चाटन
- 🟢 रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया
- 🟢 केंद्रीय, प्रांतीय आणि संयुक्त सार्वजनिक सेवा आयोग
- 🟢 फेडरल कोर्ट

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...