1) दरवर्षी 21 मे हा दिवस भारतात 'राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन' म्हणून साजरा केला जातो.
2) तैवानचे नेते 'लाय-चिंग-ते' देशाचे नवे राष्ट्रपती झाले आहेत.
3) दुबई येथे आर्टारा-24 ललित कला प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
4) इंग्लंडच्या एका परिषदेने 'मोहम्मद असदुइझमन' यांची ब्राइटनचे नवे महापौर म्हणून निवड केली आहे.
5) 'संजीव पुरी' भारतीय उद्योग महासंघाचे (CII) नवे अध्यक्ष बनले आहेत.
6) दीप्ती जीवनजीने जपानमधील कोबे येथे झालेल्या जागतिक पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये महिलांच्या 400 मीटर 120 स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले आहे.
7) नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' यांनी 18 महिन्यांत चौथ्यांदा विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.
8) इंग्लंडच्या फुटबॉल क्लब 'मॅचेस्टर सिटी'ने इंग्लिश प्रीमियर लीग (ईपीएल) 2024 चे विजेतेपद पटकावले आहे.
9) डीपीआयआयटीच्या नॅशनल सिमेंट आणि बिल्डिंग मटेरियल्स कौन्सिलमध्ये इन्क्युबेशन सेंटर' चे उद्घाटन करण्यात आले आहे.
10) भोपाळ येथील 55 वर्षीय ज्योती अत्रे ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी सर्वात वयोवृद्ध भारतीय महिला ठरली आहे.
11) 'प्रदीप नटराजन' यांची IDFC FIRST बँकेचे नवीन संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
12) नवी दिल्ली येथे भारतीय स्पर्धा आयोगाच्या (CCI) 15 व्या वार्षिक दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.
13) भारताच्या मिश्र रिले संघाने 4 बाय 400 मीटर मध्ये पहिल्या आशियाई रिले चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे.
14) भारताच्या दिप्ती जीवनजी हिने पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप मध्ये महिलांच्या 400 मीटर 120 शर्यतीत सुवर्ण पदक जिंकून अमेरिका देशाच्या ब्रियाना क्लार्क हिचा 55.12 सेकंद चा विश्वविक्रम मोडला आहे.
15 ) विश्व पॅरा अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 जपान या देशात सूरू आहे.
16) इराण देशाचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला असून ते पदावर असताना निधन झालेले इराण देशाचे दुसरे राष्ट्रपती आहेत.
17) जागतिक दूरसंचार मानकीकरन परीषद ऑक्टोंबर महिन्यात भारत या देशात होणार आहे.
18) नेपाळ देशाचे पंतप्रधान पुष्कमल दहल यांनी संसदेत 275 पैकी सदस्यांपैकी 157 विश्वास मते जिंकली आहेत.
19) जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात 76 टक्के काम पूर्ण झाले आहे.
20) जलशक्ति मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार हर घर जल योजनेचे देशात 8 राज्यामध्ये 100 टक्के काम पूर्ण झाले आहे. [महाराष्ट्र 85% काम पूर्ण]
21) टो लैम यांची व्हिएतनाम या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.