Thursday, 16 May 2024

चालू घडामोडी :- 16 मे 2024


◆ ‘इंटरनॅशनल डे ऑफ लाइट’ (आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस 2024) दरवर्षी 16 मे रोजी UNESCO द्वारे साजरा केला जातो.

◆ ऑलिम्पिक चॅम्पियन 'नीरज चोप्रा'ने भालाफेक स्पर्धेत 'फेडरेशन कप 2024' मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ अमेरिकन अभिनेत्री मेरील स्ट्रीप हिला 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात गेस्ट ऑफ ऑनर 'पाम डी'ओर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ भारत-झिम्बाब्वे संयुक्त व्यापार समितीचे तिसरे अधिवेशन नवी दिल्लीत संपन्न झाले.

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर चीनमध्ये दाखल झाले आहेत.

◆ ‘नागरिकत्व सुधारणा कायदा’ (CAA) अंतर्गत प्रथमच 14 जणांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले आहे.

◆ माजी सैनिक कल्याण विभागाने दार्जिलिंगमधील बांगडुबी येथे ‘समधान अभियान’ आयोजित केले आहे.

◆ भारतीय टेबल टेनिस स्टार खेळाडू मनिका बत्रा जागतिक महिला एकेरी क्रमवारीत टॉप-25 मध्ये प्रवेश करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे.

◆ प्रसिद्ध भारतीय अभिनेत्री शबाना आझमी यांना चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल लंडनच्या फ्रीडम ऑफ द सिटी या पदवीने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ सिक्कीममध्ये दरवर्षी 16 मे रोजी ‘राज्य दिवस’ साजरा केला जातो.

◆ प्रख्यात लेखक रस्किन बाँड यांना साहित्य अकादमी फेलोशिपने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ अमेरीका देशाची अंतराळ संस्था फ्लेक्सिबल लेव्हिटेशन ऑन अ ट्रॅक (FLOT) प्रकल्प राबवित आहे.

◆ टेबल टेनिसच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत टॉप 25 मध्ये प्रवेश करणारी मनिका बत्रा ही पहिली भारतीय महिला टेबल टेनिसपटू ठरली आहे.

◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro कॅनडा या देशाच्या रहिवाशी होत्या.

◆ नोबेल पारितोषिक विजेत्या लेखिका Alice Munro यांचे निधन झाले. त्यांना 2013 या वर्षी साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

◆ लॉरेंस वोंग यांनी सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.

◆ व्ही. प्रभाकरन यांनी स्थापन केलेली लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षाची बंदी घातली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...