०७ मे २०२४

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्मक पद्धतीने होणार की नाही, या बद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्मक पद्धतीने होणार की नाही, या बद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेरीस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ पासूनच लागू करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.माहिती अधिकारातून हा संभ्रम दूर झाला असून, विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता वर्णनात्मक पॅटर्नची तयारी सुरु करावी. एमपीएससीकडून परीक्षांचे निकाल लावण्यास दिरंगाई होत आहे. तसेच परीक्षांचे वेळापत्रक पाळले जात नाही.

त्यामुळे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा वर्णनात्मक (लेखी) पॅटर्न २०२५ लागू होण्याची शक्यता कमी आहे. हा पॅटर्न लागू करण्यासाठी वेळेची मर्यादा वाढवली जाऊ शकते. अशी चर्चा स्पर्धा परीक्षा क्षेत्रात रंगली आहे.

यामुळे राज्यसेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रामाचे वातावरण होते. त्यामुळे एका विद्यार्थ्यांने माहिती अधिकारातून ही माहिती एमपीएससीला विचारली होती. त्यावर एमपीएससीने ही माहिती दिली आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर झाला आहे.

औरंगाबाद खंडपीठामध्ये शपथपत्र...
खंडपीठात आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये सुद्धा वर्णनात्मक परीक्षा २०२५ पासून लागू करण्यासंबंधी बाब अधोरेखित केली आहे. आयोगाने दिलेल्या शपथपत्रामध्ये कायदा व सुव्यवस्था व विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारा वेळ ही बाब लक्षात घेऊनच निर्णय २०२५ पासून लागू करण्यासंबंधी आयोगाने निर्णय घेतला ही बाब नमूद केलेली आहे. २०२४ मध्ये होणारी राज्यसेवा परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा असणार आहे.

चालू घडामोडी :- 06 मे 2024

◆ फ्रान्स मध्ये पार पडलेल्या इंटरपोल परीषद(महासभा) ला भारतातर्फे प्रवीण सुद उपस्थित होते.

◆ बांगलादेशा मध्ये 03 ते 20 ऑक्टोंबर 2024 या कालावधी दरम्यान ICC महिला टी20 क्रिकेट वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहे.

◆ भारत आणि इंडोनेशिया देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीच्या 7व्या बैठकीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.

◆ 'ला लिगा फुटबॉल' स्पर्धेचे विजेतेपद 'रेयाल माद्रिद' संघाने पटकावले आहे.

◆ माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद मिळवणारी इगा स्विओटेक 'पोलंड' या देशाची टेनिस पटू आहे.

◆ वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्याधिकरण च्या अध्यक्षपदी संजय कुमार मिश्रा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पेंशन विभागाने सरकारी निवृत्त कर्मचाऱ्या साठी 'भविष्य' पोर्टल लाँच केले आहे.

◆ भारतीय हवाई दलाने C295 वाहतूक विमान फ्रान्स या देशाकडून खरेदी केले आहे.

◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 चे विजेतेपद जपान ने पटकावले आहे.

◆ AFC under 23 Asia cup पुरुष 2024 च्या अंतिम फेरीत जपानने उझबेकिस्तान चा पराभव केला आहे.

◆ AFC under 23 Asia Cup पुरुष 2024 चे आयोजन कतार येथे करण्यात आले होते.

◆ UNICEF ने करिना कपूर या भारतीय अभेनेत्रेची राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ उत्तराखंड टुरिझमने "नक्षत्र सभा" ही भारतातील पहिली  खगोल- पर्यटन मोहीम सुरू केली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...