◆ करीना कपूरची UNICEF इंडियाच्या राष्ट्रीय राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ एअर मार्शल नागेश कपूर यांनी एअर फोर्स ट्रेनिंग कमांडचा पदभार स्वीकारला आहे.
◆ हार्वर्ड प्रोग्राम सुरू करणारे चंदीगड विद्यापीठ हे भारतातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.
◆ सुबोध कुमार (IAS) यांची आयुष मंत्रालयात संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ सानिया कद्रे यांची J&K साठी ग्रॅपलिंग कमिटीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ रोड नेटवर्कमध्ये(रस्ते आणि महामार्गाचे जाळे) प्रथम स्थानी अमेरिका हा देश आहे.
◆ रोड नेटवर्क अर्थात रस्ते आणि महामार्गाच्या जाळ्यामध्ये भारताने चीनला मागे टाकत जगात दुसरा क्रमांक पटकावला आहे.
◆ भारत देशाने स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान बनवले आहे.
◆ भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले मानव रहित बॉम्बर विमान 'फ्लाईंग वेज डिफेन्स अँड एरोस्पेस टेक्नॉलॉजी' या कंपनीने बनवले आहे.
◆ भारताने बनवलेल्या पहिल्या स्वदेशी बनावटीच्या मानव रहित बॉम्बर विमानाला FWD-200B असेही म्हंटले जाते.
◆ जगातील व भारतातील पहिली CNG बाईक बजाज या कंपनीने तयार केली आहे.
◆ ICC ने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारत देशाच्या क्रिकेट संघाने वनडे व टी-20 मध्ये अव्वल स्थान कायम राखले आहे.
◆ काँगो देशाने मंकी पॉक्स या विषाणू ला आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले आहे.
◆ जगातील सर्वाधिक उंच वेधशाळा जपान या देशात स्थापित करण्यात आली आहे.
◆ चीन ने आपल्या चांगई चांद्रयान मोहिमे सोबत पाकिस्तान या देशाचा आयक्यूब- क्यू उपग्रह प्रक्षेपित केला आहे.
◆ चीन पहिल्यांदा आपल्या चांद्रयान मोहिमेमध्ये पाकिस्तान या देशाच्या ऑर्बिटर चा समावेश केला आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━