Thursday, 2 May 2024

चालू घडामोडी :- 02 मे 2024

◆ दरवर्षी 2 मे रोजी जागतिक टूना दिवस जगभरात साजरा केला जातो.

◆ IQAir नुसार, काठमांडू हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे आढळून आले आहे.

◆ भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनारपट्टीवर 'सुपरसोनिक मिसाइल-असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो' (SMART) प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे.

◆ एअर मार्शल 'नागेश कपूर' यांनी ट्रेनिंग कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ ‘भारत’ संघाने आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ भारतीय edtech स्टार्टअप ‘Emeritus’ ने TIME च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

◆ व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी मौसमी चक्रवर्ती यांनी ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

◆ एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले आहे.

◆ स्मार्ट हे क्षेपणास्त्र DRDO या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे.

◆ सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत 22व्या क्रमांकावर आहे.

◆ वयाच्या 60 व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकणाऱ्या अलेजांड्रा रॉड्रिगज या अर्जेंटिना देशाच्या नागरिक आहेत.

◆ पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भारत या देशाला मिळाले आहे.

◆ कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे.

◆ इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे.

◆ IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे.

◆ IERDA या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. या कंपनीची स्थापना 1987 साली झाली आहे.

◆ उत्तर प्रदेश राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे.

◆ एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

बरेच दिवसापासून यावर प्रश्न आलेला नाही.... त्यामुळे प्रश्न अपेक्षित आहे. ...

Q. गरजणारे चाळीस .............हे वारे आहेत ?

1) ईशान्य - व्यापारी
2) आग्नेय - व्यापारी
3) नैऋत्य - प्रतिव्यापारी
4) वायव्य - प्रतिव्यापारी✅✅✅अचूक उत्तर

[Source :- राज्यसेवा मुख्य 2016]
------------------------------------------------------------

✔️ग्रहीय वारे  :-

😄पृथ्वी या ग्रहावर नियमितपणे वाहणाऱ्या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात.

🔵मुख्यतः तीन प्रकार पडतात

🚩व्यापारी
🚩प्रतिव्यापारी
🚩ध्रुवीय

✔️व्यापारी वारे :-

😄प्राचीन काळी या  वाऱ्यांचा उपयोग व्यापारी जहाजांना होत असल्यामुळे त्यांना व्यापारी वारे असे म्हणतात.

✔️प्रतिव्यापारी वारे :-

😄व्यापारी वार्‍यांच्या उलट दिशेने हे वारे वाहतात म्हणून यांना प्रतिव्यापारी असे म्हणतात.

📌📌
Note:- दक्षिण गोलार्ध वायव्य प्रतिव्यापारी वारे कमी अडथळा असल्यामुळे 40° ते 60° दक्षिण अ. वृ. दरम्यान अतिशय वेगाने वाहतात त्यामुळे त्यांना पुढील प्रमाणे नावे देण्यात आलेली आहेत.

📌 नाव                         📌अ. वृ. विस्तार
-----------------------------------------------------------

❤️गरजणारे चाळीस             40° दक्षिण अ. वृ.
[Roaring Forties]

❤️खवळलेले पन्नास/           
शूर पश्चिमी वारे                    50° दक्षिण अ. वृ.
[Furious Fifties/Brave
Wert Winds]

❤️किंचाळणारे साठ             60° दक्षिण अ. वृ.
[Screaming Sixties]

काही देश व त्या देशांना लागून असणारे भारतातील राज्य


1)पाकिस्तान ::
-  पंजाब,राजस्थान,गुजरात,जम्मू काश्मीर आणि लडाख

**ट्रिक :: पाकहून पराग जम्मूला लढत गेला.

••••••••••••••••••♪♪•••••••••••••••••••

2) अफगाणिस्तान  ::
   - लडाख
( सर्वात कमी भारतीय सीमा लागून असणारा देश (0.7%)

••••••••••••••••••••♪♪•••••••••••••••••••

3) म्यानमार ::
- अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर मिझोराम.

**ट्रिक :: म्यानमार मध्ये अरुण आणि मनी नागाला पाहून राम म्हणाले.

••••••••••••••••••♪♪•••••••••••••••••••••

4)चीन ::
- हिमाचल प्रदेश, लडाख,उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम.

ट्रिक :: चीनमध्ये हिमात लडत उत्तर म्हणून अरुणने सिक्का टाकला.

•••••••••••••••••••♪♪••••••••••••••••••••

5) नेपाळ  ::
  -  उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम.

**ट्रिक  :: उत्तराने युपी बिहारमध्ये बंगला बांधून सिक्के नेपाळला दिले.

•••••••••••••••••♪♪••••••••••••••••••••••

6) भूतान  ::
- आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम.

**ट्रिक  :: भूतान चा आसामी अरुण कडून बंगाल मधून सिक्के घेऊन गेला.

••••••••••••••••♪♪•••••••••••••••••••••••

7) बांगलादेश  ::
- आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम,
पश्चिम बंगाल.

** ट्रिक :: आत्रि मेघा व मिझो सह बंगल्यात राहतात.

** सर्वाधिक 27% भारतीय राज्य सीमा लागून असणारा देश..

••••••••••••••••♪♪••••••••••••••••••••••••