Sunday, 28 April 2024

चालू घडामोडी :- 28 एप्रिल 2024

◆ ‘जागतिक कार्यस्थळ सुरक्षा आणि आरोग्य दिन’ दरवर्षी 28 एप्रिल रोजी साजरा केला जातो.

◆ केंद्र सरकारने बांगलादेश, यूएई, भूतान, बहारीन, मॉरिशस आणि श्रीलंका येथे 99 हजार मेट्रिक टनांहून अधिक कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे.

◆ तिरंदाजी विश्वचषक 2024 मध्ये भारताच्या ज्योती सुरेखा वेनम, अदिती गोपीचंद स्वामी आणि प्रणित कौर यांनी महिलांच्या अंतिम फेरीत इटलीचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले आहे.

◆ केंब्रिज शिक्षक पुरस्कारासाठी केरळमधील 'जीना जस्टस' यांची निवड झाली आहे.

◆ भारताची पॅरा नेमबाज 'मोना अग्रवाल' हिने जागतिक नेमबाजी पॅरा स्पोर्ट्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

◆ श्रीलंकेच्या 'मट्टाला राजपक्षे आंतरराष्ट्रीय विमानतळा'च्या व्यवस्थापनाची जबाबदारी रशियन कंपनीसोबत संयुक्तपणे एका भारतीय कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.

◆ दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे जागतिक शैक्षणिक आणि प्रशिक्षण प्रदर्शन ‘गेटेक्स 2024’ आयोजित करण्यात आले आहे.

◆ वरिष्ठ IRS अधिकारी अनुराग चंद्रा यांची रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभागात उपसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पॉवरलिफ्टर 'गौरव शर्मा' याला अमेरिकन युनिव्हर्सिटी फॉर स्पोर्ट्स एक्सलन्सने मानद डॉक्टरेट दिली आहे.

◆ अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याची माचो स्पोर्ट्सने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ क्लेफिन टेक्नॉलॉजीज आणि जना बँकेने त्यांच्या Omnichannel Digital Banking Solution साठी IBSi डिजिटल बँकिंग पुरस्कार 2024 जिंकला आहे.

◆ TRAI ने ऑक्टोबर-डिसेंबर 2023 च्या तिमाहीसाठी "भारतीय दूरसंचार सेवा परफॉर्मन्स इंडिकेटर रिपोर्ट" जारी केला.

◆ अर्जुन बाबुताने ऑलिंपिक निवड चाचणी (OST) T1 मध्ये पुरुषांच्या 10M एअर रायफलमध्ये 254.0 गुणांसह विश्वविक्रम प्रस्थापित केला.[दिव्यांश सिंग पनवारचा विश्वविक्रम मागे टाकला]

◆ इंग्लंडमध्ये 2016 च्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पॉवरलिफ्टर गौरव शर्मा ने दोन सुवर्णपदके जिंकली होती.

◆ IAF ने राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे पहिला शोध समारंभ आयोजित केला आहे.

◆ नरसिंग यादवची WFI च्या सात सदस्यीय ऍथलीट्स पॅनेलच्या अध्यक्षपदी निवड झाली.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

साहित्य अकादमी पुरस्कार :- माहिती


◾️ साहित्य अकादमी ची स्थापना " 12 मार्च 1954 " रोजी झाली
◾️ मुख्यालय " नवी दिल्लीला " आहे
◾️ साहित्य अकादमी चे पहिले अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते
◾️ भारतातील 24 भाषांच्या साठी साहित्य अकादमी पुरस्कार दिला जातो
◾️ भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टातील एकूण 22 भाषा आणि इंग्रजी व राज्यस्थानी अशा दोन भाषा या सर्व मिळून एकूण 24 भाषांच्या साठी हा पुरस्कार दिला जातो

‼️ काही महत्वाच्या गोष्टी ‼️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️ मराठी साठी प्रथम साहित्य अकादमी पुरस्कार लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला
◾️2023 साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक हे आहेत
◾️ कृष्णात खोत यांच्या रिंगण या कादंबरीला मराठी भाषे करता साहित्य अकादमी पुरस्कार 2023 जाहीर झाला

‼️ रिंगाण - कृष्णात खोत यांच्याविषयी ‼️
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
◾️ मूळचे कोल्हापूर येथील कृष्णात खोत हे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील रहिवाशी आहेत'
त्यांच्या प्रकाशित कादंबऱ्या
🔥गावठाण’ (२००५),
🔥‘रौंदाळा’ (२००८),
🔥‘झड-झिंबड’ (२०१२),
🔥‘धूळमाती’ (२०१४),
🔥‘रिंगाण’ (२०१८
🔥'गरल्याविन भुई’ हे त्यांनी लिहिलेले ललित व्यक्तिचित्रण प्रकाशित झाले आहेत
◾️रिंगाण ही कादंबरी प्रकल्पासाठी घरादारावर पाणी सोडून उठवलेल्या माणसांची परवड हा ‘रिंगाण’ कादंबरीचा एक धागा आहे
◾️ पुरस्काराचे वितरण 12 मार्च 2024 ला होणार आहे
➖➖➖➖➖➖➖➖