Monday, 22 April 2024

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अंतरावर 16 सेमी इतक्या कमी लिंबो स्केटिंगमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे.

◆ केंटो मोमोटाने(जपान) वयाच्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमधून निवृत्तीची घोषणा केली.

◆ सुरिंदर एस जोधका, विकास कुमार यांची आदिसेशिया पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

◆ नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने नेव्हिगेशन प्रणालीचे मूल्यांकन करण्यासाठी "डॉपलर अतिशय उच्च-वारंवारता ओम्नी श्रेणी (DVOR) कॅलिब्रेशन फ्लाइट" चे उद्घाटन केले.

◆ जगभरात दरवर्षी 22 एप्रिल हा दिवस पृथ्वी दिवस किंवा 'जागतिक वसुंधरा दिन' म्हणून साजरा केला जातो.

◆ जागतिक वसुंधरा दिन 2024 ची थीम “प्लॅनेट विरुद्ध प्लास्टिक” ही आहे.

◆ बलराज पन्वर रोईंग या खेळात पॅरिस ऑलिंपिकची पात्रता मिळवणारा तो भारताचा पहिलाच खेळाडू ठरला आहे.

◆ चार दिवसांचा आठवडा करणारा सिंगापूर आशिया खंडातील पहिला देश.

◆ दिनेश कार्तिक हा आयपीएल मध्ये 250 सामने खेळणारा तिसरा क्रिकेट पटू ठरला आहे.

◆ प्लॅस्टिक मुळे होणाऱ्या प्रदूषणाला अटकाव करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी कॅनडा या देशाच्या ओटावा येथे 23 ते 29 एप्रिल दरम्यान विशेष परिषदेचे आयोजन केले आहे.

◆ Inteligens ब्युरो IB च्या विशेष निर्देशक पदी सपना तिवारी यांनी निवड झाली आहे.

◆ अंतरीक्ष विज्ञानाच्या योगदानाबद्दल पी. सुब्बाराव यांना आर्यभट्ट पुरस्कार देण्यात आला आहे.

◆ आर्टेमिस करारात सामील होणारा स्वीडन हा 38वा देश ठरला आहे.

◆ AI सक्षम लॉर्ज लँग्वेज मॉडेल Liama-3 हे Meta या कंपनीने लाँच केले आहे.

◆ मोहम्मद सालेम यांच्या छायाचित्राला वर्ड प्रेस ऑफ द इयर 2024 पुरस्कार मिळाला आहे.

◆ दीपिका सोरेंग हिला असुंता लाक्रा पुरस्कार मिळाला आहे. ती हॉकी खेळाशी संबंधित आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

MPSC समाजकल्याण अधिकारी गट अ व ब, इतर मागास बहुजन विभाग अधिकारी गट अ व ब परीक्षेची तयारी कशी कराल?



       MPSC सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातील सहायक आयुक्त समाजकल्याण व तत्सम गट- अ संवर्ग 41 पदे, समाजकल्याण अधिकारी गट-ब साठी 22 पदे, व गृहप्रमुख, गट ब या संवर्गातील 18 पदांसाठी भरती केली जात आहे. या पदांसाठी अनुक्रमे 5836, 35361 व 796 विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्याचप्रमाणे इतर मागास बहुजन कल्याण विभागातील सहायक संचालक / संशोधन अधिकारी / प्रकल्प अधिकारी, गट अ संवर्ग 26 पदे व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट-ब संवर्ग 31 पदे भरती होणार असून त्यासाठी अनुक्रमे 2864 व 11241 विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. या दोन्ही विभागातील परीक्षांसाठी चाळणी परीक्षा होणार असून त्यांचा नवीन अभ्यासक्रम आयोगाने घोषित केला आहे, त्यानुसार यामधील गट ब पदांसाठी चाळणी परीक्षा 19 मे 2024 रोजी होणार आहे.

       परीक्षेत 100 प्रश्न  200 गुण व मुलाखत 50 गुणांसाठी असणार आहे. परीक्षेसाठी 1 तास वेळ असून 60 मिनिटात 100 प्रश्न सोडविण्याचे आव्हान विद्यार्थ्यांसमोर आहे, कारण परीक्षेत चुकीच्या उत्तरासाठी 1/4 नकारात्मक गुण पद्धती लागू आहे.

       सध्या अंतिम निवडीसाठी विद्यार्थ्यांनी गुण लेखी परीक्षेत अधिक गुण संपादन करण्यावर भर देणे आवश्यक आहे.


*समाजकल्याण परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप*

       समाजकल्याण गट ब व इतर मागास बहुजन अधिकारी गट ब पदाचा अभ्यासक्रम समान असून त्यात पुढील घटक समाविष्ट आहेत, मागील प्रश्नपत्रिकांचा आढावा घेतला असता या घटकावर  किती प्रश्न असतील याचा अंदाज बांधता येतो. 

1.समाजकल्याण अध्ययन - 40 ते 45 प्रश्न

2.बुद्धिमापन प्रश्न - 10 ते 15 प्रश्न

3.चालू घडामोडी - 5 ते 10 प्रश्न

4.विज्ञान व अभियांत्रिकी - 10 ते 15 प्रश्न

5.कला शाखेतील घटक इतिहास, भूगोल व राज्यव्यवस्था - 10 ते 15 प्रश्न

6.वाणिज्य व अर्थव्यवस्था - 8 ते 10 प्रश्न

7. मराठी - 10 ते 15 प्रश्न

          विद्यार्थ्यांना आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न समजून घेण्यासाठी समाजकल्याण विभागाच्या गट अ व ब पदासाठी घेतलेल्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका अभ्यासणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे मागील परीक्षांमध्ये परीक्षेत विचारलेले समाजकल्याण अध्ययन घटकावरील व इतर घटकांचे प्रश्न अभ्यासल्यास विद्यार्थ्यांना आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार नेमका काय अभ्यास करायचा हे लक्षात येईल.


*MPSC समाजकल्याण संदर्भ पुस्तके*


*1.MPSC समाज कल्याण विभाग पूर्वीच्या 6 संस्करित प्रश्नपत्रिका व इतर परिक्षातील समाजकल्याण  विश्लेषणात्मक स्पष्टीकरणासह लेखक- डॉ. शशिकांत अन्नदाते* - या पुस्तकात mpsc परीक्षेच्या समाजकल्याण प्रश्नपत्रिका सखोल स्पष्टीकरणासह देण्यात आले असल्याने  अभ्यासाची रणनीती व अभ्यासक्रमातील कोणत्या घटकांवर भर द्यावा हे लक्षात येण्यासाठी पुस्तक अतिशय उपयुक्त ठरेल.


2.विज्ञान व अभियांत्रिकी घटक के सागर सुधारित 37 वी आवृत्ती


3.व्यावसायिक समाजकार्य- डॉ. प्राजक्ता टांकसाळे


4. समग्र समाजकल्याण अध्ययन -डॉ. प्राजक्ता टांकसाळे व प्रा. अनुराधा जोशी


5. बुद्धिमत्ता चाचणी - के सागर/सचिन ढवळे


6. स्मॉलेस्ट जनरल नॉलेज -  विनायक घायाळ (कला शाखा घटकासाठी)


7. वाणिज्य व अर्थव्यवस्था घटक - स्टेट बोर्ड 11 वी व 12 वी पाठ्यपुस्तक


8.चालू घडामोडी - परिक्रमा मासिक व कोणतेही इतर पुस्तक


9. मराठी - के सागर/ बाळासाहेब शिंदे


10. समाजकल्याण प्रशासन - डी आर सचदेव / नितीन कोतापल्ले


(कृपया सदर माहिती MPSC  समाजकल्याण व इतर मागास बहुजन कल्याण विभागाची परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शेअर करावी ही विनंती)

Prelims की Mains?


परीक्षेच्या तारखेच्या या अनिश्चिततेच्या काळात अनेक जण मला हा प्रश्न विचारत आहेत. मुळात हा प्रश्नच बदलून विचारायला हवा. 

Prelims किती वेळ आणि Mains किती वेळ? हा योग्य प्रश्न आहे. कसं, पाहूया.


अशा प्रश्नाचं कुठलंही एक असं उत्तर देता येत नाही. ते प्रत्येकाने आपापलं शोधायचं असतं. फक्त ते कसं शोधायचं याची दिशा तुम्हाला पुढे मिळेल.


दिवसातील किती वेळ Prelims आणि किती वेळ Mains, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला Prelims किती मार्काधिक्याने पास होण्याचा confidence आहे यावर अवलंबून आहे. मार्काधिक्य म्हणजे expected cutoff पेक्षा किती मार्क्स अधिक. Thumb rule असा आहे की पहिल्या key ने हे मार्काधिक्य 20 च्या घरात हवे, जेणेकरून दुसऱ्या key चे दडपण न घेता Mains चा अभ्यास जोरदार सुरू करता येईल. Prelims ला 'खजूर मे अटके' असे काठावरचे मार्क्स असतील तर दुसरी key येईपर्यंत पूर्ण ताकद लागत नाही आणि आपण Mains ची निम्मी लढाई तिथेच हरतो. त्यामुळे Prelims ला दमदार Lead घेणे महत्त्वाचे!


Prelims पास होण्याच्या आत्मविश्वासाच्या पातळीनुसार चर्चेच्या सोयीसाठी खालीलप्रमाणे 3 गट करू.


1. पहिला गट : पहिल्यांदा Prelims देणारे, आधी दिलेली मात्र Cutoff पासून खूप दूर राहिलेले, एकंदरीत Prelims ची भीती वाटणारे.

या गटाने Mains चा विचार न करता, पूर्णपणे Prelims वरती लक्ष केंद्रित करावे. कच्चे दुवे ओळखून त्यावर विशेष मेहनत घ्यावी. शेवटच्या आठवड्यात उजळणी साठी short notes आधीच बनवून ठेवाव्यात, या नोट्स निदान 5 वेळा वाचून होतील याची काळजी घ्यावी. Prelims PYQ साठी निदान 2 तास रोज द्यावेत. आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका नियमितपणे सोडवून त्याचे विश्लेषण करावे. हमखास मार्क्स घेण्याच्या कोणत्या विषयात कमी पडतो आहोत याचे Micro-analysis करावे. GS पक्के मात्र CSAT मध्ये विकेट जाणाऱ्यांनी निदान 4 तास CSAT च्या सरावासाठी द्यावेत. हे 4 तास आपापल्या तयारीनुसार कमी-जास्त करावेत. 


2. दुसरा गट : याआधी दिलेल्या Prelims मध्ये Cutoff च्या आसपास (±5 range मध्ये) तरंगणारे. 

या गटाने Prelims आणि Mains च्या syllabus मध्ये common असणारे घटक (Core Polity, समाजसुधारक, महाराष्ट्र भूगोल, Core Economy, etc) ओळखून त्यांची Mains च्या दृष्टीने तयारी (Mains PYQ, पाठांतर, नोट्स) पक्की करावी. असे करताना Prelims चा यावेळचा score Cutoff +20 न्यायचा आहे याचा विसर पडू देऊ नये. Prelims PYQ, CSAT यांचा नियमित सराव करण्याला इतर पर्याय नाही.


3. तिसरा गट : Prelims नेहमी दहा गडी राखून पास होणारे, core content वर झोपेतून उठवले तरी जबरदस्त command असणारे Mains चे महारथी. Hamstring injury असूनही 201 runs चोपणाऱ्या ग्लेन मॅक्सवेल सारखे! 

या गटाने सकाळच्या सत्रात मराठी-इंग्लिश व्याकरण वगैरे Mains चे topics करायला हरकत नाही. आत्ताच व्याकरणाच्या प्रत्येकी 15 पानांच्या नोट्स बनवून ठेवल्या तर Prelims ते Mains दरम्यान त्यांची पारायणे करता येतील. त्याच बरोबर कायद्यासारखे कमी मेहनतीत हमखास भरघोस मार्क्स मिळवून देणाऱ्या Topics चे handy material आत्ताच बनवून ठेवले तर पुढे नक्की फायदा होईल. 

"कायदे पढोगे तो फायदे में रहोगे!" 

पुन्हा तेच, GS ला Cutoff +20 आणि CSAT ला हलक्यात घ्यायचे नाही. कारण ग्लेन मॅक्सवेल पण स्वस्तात out होऊ शकतो!


सगळं पुराण सांगून झाल्यावर पुन्हा तेच, यातील आपल्याला काय लागू होते ते आपले डोळे उघडे ठेवूनच शोधायचे आणि अंगिकारायचे. 

ऐकावे जनाचे करावे मनाचे!

कारण एकाला लागू झाले ते दुसऱ्याला लागू होईलच असे नाही. एकाला जे आज लागू झाले ते त्याला उद्या लागू होईलच असे नाही. एका विषयाला जे लागू झाले ते दुसऱ्या विषयाला लागू होईलच असे नाही. त्यामुळे क्षणोक्षणी सतर्क राहणे आणि मार्गक्रमण करणे गरजेचे. नेहमी स्वतःला Reinvent करत राहणे ही या प्रक्रियेची गरज आहे. लक्षात ठेवा, वर चर्चा केलेल्या कोणत्याही गटात तुम्ही असला तरी Prelims च्या दुसऱ्या दिवशी Mains चा अभ्यास जोमाने सुरू करायचा असेल तर Prelims मध्ये दमदार Lead घेणं क्रमप्राप्त आहे. त्या दृष्टीने पुढील वाटचालीचे नियोजन आणि त्यानुसार अंमलबजावणी करा. 20 ओव्हर्स मध्ये 288 runs चा पाठलाग करायचा असेल तर पहिल्या ओव्हरपासूनच फटकेबाजी करावी लागते, म्हणजे शेवटी RRR (Required Run Rate) हाताबाहेर जात नाही. 


खूप खूप शुभेच्छा. 💐

SR/ASO/PSI/STI यापैकी एकापेक्षा अधिक पदावरती निवड झाल्यानंतर कोणते पद निवडावे

 🚨 SR/ASO/PSI/STI यापैकी एकापेक्षा अधिक पदावरती निवड झाल्यानंतर कोणते पद निवडावे याबाबत खूप जणांचे मेसेज व कॉल येत आहे त्याबाबत काही अनुभव कथन येथे करतो.


1.SR (दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क): या पदाबाबत अधिक सांगायची आवश्यकता नाहीये.


2. PSI : 

१००% पोलीस प्रशासनाची आवड आहे यात अजिबात Confusion नाही अशा मुलांनी PSI घ्यायला पाहिजे. 

    थोडी जरी चलबिचलपणा असेल तर दुसरा पद निवडायला काही हरकत नाही.


3. ASO (मंत्रालय)

मुलांनी : पद घ्यायला हवं त्यासाठी


 सकारात्मक बाबी

 १. प्रमोशन खूप लवकर होतील २.चांगला जनसंपर्क वाढेल ३.आपल्या जर ओळखी चांगल्या झाल्या तर मंत्री कार्यालयामध्ये सुद्धा काम करता येईल. ४. तिथे राहून सुद्धा पहिली दोन वर्ष अभ्यास करता येतात (स्व अनुभव) ५. मुंबई राहायला खूप वाईट आहे असा निगेटिव्ह विचार अजिबात करू नका दोन ते तीन महिन्यानंतर मुंबईचं वातावरण आपल्याला एकदम चांगलं वाटायला लागेल.


मुलींसाठी : १. मुलींसाठी सुद्धा खूप चांगली पोस्ट आहे कारण मी प्रत्येक विभागामध्ये जास्त काम व कमी कामाची डेक्स असतात. २. एकाच ठिकाणी ऑफिस असल्यामुळे कुटुंबाकडे सुद्धा व्यवस्थित वेळ देता येईल.  


( पण काही जणांचा असं मत असू शकेल की मला फक्त शासकीय नोकरी हवी व त्यासोबत मी पूर्णवेळ फॅमिलीच द्यायची असेल तर ASO नका घेऊ)


4. STI

अभ्यास करायला खूप वेळ मिळतो म्हणून मुलं STI पद घेतात पण इतर पदावर सुद्धा पहिली एक-दोन वर्ष अभ्यास करायला मिळतात त्यामुळे अभ्यास या एकाच गोष्टीमुळे STI पद घेऊ नका.


सकारात्मक : 

अभ्यासाला वेळ मिळतो.

काम कमी आहे.

गावाकडे  जिल्ह्याच्या ठिकाणी पोस्टिंग होऊ शकते.


नकारात्मक : 

प्रमोशन ला उशीर आहे.

संपूर्ण कार्यकाळ एक सारख्याच पदावरती काम करावा लागेल.


(काही जणांचे गावाकडे खूप चांगली शेती असते व त्याकडे पाहण्यासाठी घरी माणसे कमी असतात त्या मुलांनी किंवा आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी गावाकडे कोणी नाहीये अशा मुलांनी व मला शांतपणे दहा ते पाच शासकीय काम करायचा आहे व त्यानंतर माझा व इतर लोकांचा काहीही संपर्क नसावा व कामाचे जास्त तणाव येऊ नये यासाठी हे पद उत्तम आहे.)


🔻❗️वरील मते ही माझी वैयक्तिक व अधिकारी मित्रांच्या सल्ल्यानुसार एकत्र करून तुम्हाला दिलेली आहेत यापेक्षा काही मत वेगळं असू शकतं पण तुम्हाला निर्णय घेण्यासाठी एक प्रांजळ मत देण्याचा प्रयत्न केला आहे.


स्पर्धा परीक्षा किंवा अनेक नौकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घड्याळावर अनेकदा प्रश्न विचारतात त्या साठी काही सुञ आज आपण पाहू या.

🔰घटक  - घड्याळ :- 👇

स्पर्धा परीक्षा किंवा अनेक नौकरी साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत घड्याळावर अनेकदा प्रश्न विचारतात त्या साठी काही सुञ आज आपण पाहू या.

☘सुञ :-

1) वेळ दिली असता कोन काढणे.
      11
= --------- × M    -  30 × H
       2

M  - मिनीट
H  - दिलेल्या वेळेत एकूण किती तास आहेत.


2 )  समजा 7 ते 8 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा एकमेकावर येतात.....

सुञ...
       60 
=   -----------  ×  7 × 5
        55


3)  दिवसात किती वेळा तास व मिनीट काटा 90° चा कोन करतात  ??

उत्तर  -  12 तासात  -  22 वेळा.
            24 तासात  - 44 वेळा.


4) दिवसात किती वेळा तास काटा व मिनीट काटा परस्परांशी विरूद्ध असतात /येतात  ?

उत्तर  - 
     12 तासात    -  11 वेळा
     24 तासात    -  22 वेळा.


5 ) एक मिनीट म्हणजे   6° होय.
एक तास म्हणजे  90° होय.


6 ) प्रत्येक तासाला तितकेच ठोके पडत असतील तर दिवसात एकूण ठोके किती पडतात ?
      12  × 13 
=  ----------------   = 78.....12 तासात.
            2  

24 तासात एकूण ठोल   - 156


7 )  4 ते 5 च्या दरम्यान किती वाजता तास व मिनीट काटा विरुद्ध दिशेला असतील ?

स्पष्टीकरण  -
या वेळी मिनीट काटा 10 ते 11 च्या दरम्यान असेल म्हणून ...
M = 10 घ्यावे .

      60
=  --------- ×  5 × M
       55

       60  
=  -----------  × 5 × 10  
       55
      600               6
= -----------   = 54 ------
       11                11

                                  6
म्हणजे च  4 वाजून 54 ----- मिनीट.
                                  11                     

8)  5 ते 6 च्या दरम्यान किती वाजता 90 ° चा कोन होईल ?
स्पष्टीकरण  -

90 ° चा कोन होण्यासाठी मिनीट काटा 8 च्या पुढे असाला पाहीजे.
म्हणून  M = 8 घ्यावे .
       60 
  =  ------- × 5 × 8
        55

        480                7
=  -------------  = 43 ------
         11                 11

म्हणून ...                         7
90° चा कोन 5 वाजून 43 ----- मिनीट.
                                     11

=========================

काही धातू आणि त्यांची धातूके

1) मॅग्नेशिअम  ::
- मॅग्नेसाइट (MgCO3)
- डोलोमाइट (MgCo3. CaCo3)
- कार्नेलाईट

2) अल्युमिनिअम  ::
  - बॉकसाइट ( Al2O3. H2O + SiO2   
                      + Fe2O3 )
  - क्रायोलाइट  ( AIF3.3NaF )
  - फेल्डस्पार   ( KAISi3O8 )
  - कॅलोनाइट   ( AI2 (OH4) SiO5 )

3) सोडिअम  ::
- रॉकसॉल्ट ( Nacl )
- क्रायोलाइट ( Na3. AIF6)

4) पोटॅशिअम  ::
- सॉल्टपिटर ( KNO3)

5) लोह  ::
- हेमेटाईट ( Fe2O3 )
- मॅग्नेटाइट ( Fe3O4 )
- लिमोनाइट ( FeO( OH )
- सिडेराइट  ( FeCO3 )
- पायराइट  ( FeS2 )
- क्रोमाइट  ( FeO. CrO3 )

6) तांबे  ::
- मॅलाकाइट ( CuCO3. Cu(OH)2)
- कॉपर पायराइट ( CuFeS2 )
- कॉपर ग्लॉन्स ( Cu2S )
- क्युप्राइट ( Cu2O )

7) शिसे :: (Lead)
- गॅलीना
- लिथार्ज
- सेरूसाइट

8) जस्त  ::
-  झिंकाइट  ( ZnO )
-  स्फलेराइट ( ZnS )
-  कालामाइन ( ZnCO3 )

9) पारा  ::
  -  सिन्नाबार ( Hgs )

10) चांदी  ::
  -  अर्गेन्टाइट

######🌿🌿🌿🌿🌿###

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...