१८ एप्रिल २०२४

जागतिक वारसा दिन : 18 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 18 एप्रिल हा आंतरराष्ट्रीय स्मारके आणि स्थळांचा दिवस (International Day For Mounments And Sites) म्हणून साजरा केला जातो. याला ''जागतिक वारसा दिवस'' म्हणूनही ओळखले जाते.

◆ 2024 ची थीम :-'विविधता शोधा आणि अनुभवा.' (''Discover and Experience Diversity.'')

◆ 2023 ची थीम :- 'वारसा बदल' ("Heritage Changes")

➢ उद्देश :- मानवी वारसा जतन करणे आणि संबंधित संस्थांच्या सर्व प्रयत्नांना मान्यता देणे.

➢ या दिनाचा इतिहास :-

युनेस्कोने 1982 मध्ये झालेल्या सभेत 18 एप्रिल हा जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव आयसीओएसओएसने (ICOMOS) दिला होता. त्यामुळे युनेस्कोने 18 एप्रिल हा दिन जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा करण्यास 1983 मध्ये सहमती दर्शवली होती. त्यामुळे 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा स्थळ दिन म्हणून साजरा केल्या जातो.

➢ युनेस्को जागतिक वारसा स्थळे 2024 :-

सध्या जगभरात एकूण 1199 जागतिक वारसा स्थळे असून, त्यापैकी 933 सांस्कृतिक स्थळे, 227 नैसर्गिक स्थळे आणि 39 मिश्र स्थळे आहेत. आणि 56 वारसा स्थळांचा धोक्याच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.

➢ युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा प्राप्त सर्वाधिक स्थळे 2024 :-

• इटली - 59
• चीन - 57
• जर्मनी व फ्रान्स - प्रत्येकी - 52
• स्पेन - 50
• भारत - 42

➢ भारतातील जागतिक वारसा स्थळे 2024 :-

जागतिक वारसा स्थळांच्या संख्येमध्ये भारत जगात सहाव्या स्थानी असून, भारतात सध्या 42 जागतिक वारसा स्थळे आहेत. यापैकी 34 सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक स्थळे, तर 1 संमिश्र स्थळ आहे.

➢ महाराष्ट्रतील जागतिक वारसा स्थळे 2024 :-

➢ भारतातील सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे महाराष्ट्रमध्ये असून यात,

(1) अजिंठा लेणी - (छत्रपती संभाजीनगर)
(2) वेरूळ लेणी - (छत्रपती संभाजीनगर)
(3) घारापुरी लेणी किंवा एलिफंटा लेणी - (मुंबई)
(4) छत्रपती शिवाजी टर्मिनस (पूर्वीचे व्हिक्टोरिया टर्मिनस) - (मुंबई)
(5) पश्चिम घाट (कासचे पठार) - (सातारा)
(6) व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको एन्सेम्बल्स - (मुंबई)

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

18 एप्रिल 2024 चालू घडामोडी


प्रश्न – WEF च्या 2024 च्या वर्गात अलीकडेच कोणाला यंग ग्लोबल लीडर म्हणून नाव देण्यात आले?
उत्तर - अद्वैत नायर

प्रश्न – जागतिक आवाज दिवस नुकताच कधी साजरा करण्यात आला?
उत्तर – १६ एप्रिल

प्रश्न – अलीकडेच कोणत्या देशाच्या दीपेंद्र सिंगने एका षटकात 6 षटकार मारण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर - नेपाळ

प्रश्न – अलीकडे कोणत्या संघाने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे?
उत्तर - सनरायझर्स हैदराबाद

प्रश्न – स्पेस इंडियाने अलीकडेच ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - संजना संघी

प्रश्न – चेन्नई व्हेल विद्यापीठात नुकतीच मानद डॉक्टरेट पदवी कोणाला प्रदान करण्यात आली?
उत्तर - रामचरण

प्रश्न – केंद्र सरकारच्या ग्रीन क्रेडिट योजनेच्या अंमलबजावणीत अलीकडे कोण आघाडीवर आहे?
उत्तर - मध्य प्रदेश

प्रश्न – नुकतीच IMD चे MD म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - क्रिस्टालिना जॉर्जिएवा
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

....𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....

◾️2024 विस्डेन क्रिकेटर्स ऑफ द इयर रिपोर्ट प्रकाशित

◾️रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक आघाडीचे क्रिकेटपटू
⭐️पुरुष : पॅट कमिन्स (Australia)
⭐️महिला  : नॅट सायव्हर-ब्रंट  ( England)
⭐️ T20 Cricketer of the year 2024:- हैली मैथयुस (WI)
⭐️ Test cricketer of the year 22024: टैविस हेड (Australia)

◾️विस्डेन हे एक वर्षाला प्रकाशित होणारे मॅगझीन आहे
याला "क्रिकेट चे बायबल" असे पण म्हणले जाते

◾️जागतिक हिमोफिलिया दिवस 2024
⭐️हिमोफिलिया हा एक अनुवांशिक रक्तस्त्राव विकार आहे ज्यामध्ये रक्त योग्यरित्या गुठळ्या होत नाही, ज्यामुळे रक्तस्त्राव लवकर थांबत नाही
⭐️2024 थीम : Equitable access for all: recognizing all bleeding disorders"

◾️प्रसिद्ध कर्नाटक संगीतकार केजी जयन (89) यांचे त्रिपुनिथुरा येथे निधन झाले.
⭐️2019 मध्ये, पद्मश्री, देशातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.

◾️इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या वर्षाच्या अखेरीस सूर्याचा अभ्यास करण्यासाठी प्रोबा-3 लाँच करणार
⭐️प्रक्षेपण सप्टेंबरसाठी लक्ष्य केले गेले आहे
⭐️ इस्रोच्या PSLV-XL रॉकेटचा वापर करून श्रीहरिकोटा येथून नेले जाईल

◾️शेख अहमद अब्दुल्ला यांची कुवेतचे नवे पंतप्रधान म्हणून नियुक्ती
⭐️यापूर्वी त्यांनी अर्थ, आरोग्य, तेल आणि माहिती यासारख्या महत्त्वाच्या मंत्रिपदांवर काम केले आहे.
⭐️माजी पंतप्रधान शेख मोहम्मद यांच्या राजीनाम्यानंतर यांची नियुक्ती

◾️भारताने एक स्वदेशी बुलेट ट्रेन विकसित करण्यास सुरुवात केली आहे जी 250 किलोमीटर प्रति तास (किमी) वेग ओलांडेल,
⭐️भारताने मुंबई-अहमदाबाद मार्गावर तैनात करण्याची योजना आखली आहे, ती 320 किमी प्रतितास वेगाने पोहोचू शकते.

◾️Operation True Promise
⭐️ऑपरेशन चे नाव
⭐️इराणने ऑपरेशन अंतर्गत इस्रायलवर शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रे सोडली

चालू घडामोडी :- 17 एप्रिल 2024

◆ सर्वात बिझी टॉप-10 विमानतळामध्ये पहिल्या स्थानी ॲटलांटा हर्ट्सफिल्ड जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळ(अमेरिका) आहे.

◆ दरवर्षी 17 एप्रिल रोजी जगभरात जागतिक हिमोफिलिया दिन साजरा केला जातो.

◆ एअरपोर्ट्स कौन्सिल इंटरनॅशनल (ACI) वर्ल्ड, 'इंदिरा गांधी इंटरनॅशनल (IGI) एअरपोर्ट' ने जारी केलेल्या यादीनुसार, दिल्ली हे जगातील दहावे सर्वात व्यस्त विमानतळ बनले आहे.

◆ 'संजना संघी' ची स्पेस इंडियाने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ इस्रायली गणितज्ञ आणि संगणक शास्त्रज्ञ अवि विग्डरसन यांना 2023 च्या असोसिएशन फॉर कॉम्प्युटिंग मशिनरी (ACM) एएम ट्युरिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ पलक गुलियाने ISSF अंतिम ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आहे.

◆ इंग्लंडचा महान फिरकी गोलंदाज आणि ICC हॉल ऑफ फेम इंडस्ट्री डेरेक अंडरवुड यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.

◆ केंद्र सरकारच्या ‘ग्रीन क्रेडिट प्रोग्राम’च्या अंमलबजावणीत मध्य प्रदेश राज्य अव्वल स्थानावर आहे.

◆ BharatPe ने 'नलिन नेगी' यांची नवीन CEO म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ जागतिक केळी दिवस[17 एप्रिल 2024] दरवर्षी एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी साजरा करण्यात येतो.

◆ क्रिकेटपटू जोस बटलर हा आयपीएल मध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दुसऱ्या तर विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे.

◆ IPL मध्ये एका सामन्यात शतक, विकेट आणि झेल घेणारा पहिला क्रिकेट पटू सुनिल नरेन ठरला आहे.

◆ जस्ट अ मर्सिनरी?: नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक RBI च्या डी. सुब्बाराव या माजी गव्हर्नर ने लिहिले आहे.

◆ Wisden क्रिकेटर ऑफ दी इयर 2024 साठी leading क्रिकेटर ऑफ दी इयर मेन "पॅट कमिन्स" ठरला आहे.

◆ Wisden क्रिकेटर ऑफ दी इयर 2024 मध्ये ॲशली गार्डनर या महिला क्रिकेट पटुचा समावेश झाला आहे.

◆ टी 20 क्रिकेट मध्ये 6 चेंडूवर 6 सिक्स मारणारा दीपेंद्र सिंह ऐरी हा जगतील तिसरा फलंदाज ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...