१६ एप्रिल २०२४

मध्ययुगीन भारताचा इतिहास


✺ गुलाम वंशाची स्थापना कोणी केली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ कुतुबमिनारचा पाया कोणी घातला?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ अडीच दिवस लागलेली झोपडी कोणी बांधली?

► कुतुबुद्दीन ऐबक


✺ नालंदा विद्यापीठ कोणी नष्ट केले?

► बख्तियार खिलजी


✺ दिल्ली सल्तनतचा खरा संस्थापक कोण मानला जातो?

► इल्तुतमिश


✺ मोर सिंहासन कोणी बांधले?

► शहाजहान


✺ मयूर सिंहासन तयार करणाऱ्या कलाकाराचे नाव काय होते?

► बादलखान


✺ शाहजहानचे बालपणीचे नाव काय होते?

► खुर्रम


✺ शाहजहानच्या बेगमचे नाव काय होते?► मुमताज


✺ शाहजहानच्या आईचे नाव काय होते?

► ताज बीबी बिल्कीस माकानी


✺ मुमताज महल या नावाने प्रसिद्ध होण्यापूर्वी शाहजहानच्या बेगमला कोणत्या नावाने संबोधले जात होते?

► अर्जुमंदबानो


✺ जहांगीरचा धाकटा मुलगा शहरयार याचे लग्न कोणासोबत झाले होते?

► तिच्या पहिल्या पतीपासून नूरजहानला जन्मलेल्या मुलीपासून.


✺ शहाजहानने कोणाच्या मदतीने गादी मिळवली?

► असफ खान


✺ शहाजहानच्या काळात कोणते ठिकाण मुघलांच्या हातातून गेले?

► कंदहार


✺ शाहजहानने आग्रा येथून राजधानी कोठे हलवली?

► शाहजहानाबाद (जुनी दिल्ली)


✺ लाल किल्ला आणि किला-ए-मुबारक कोणी बांधले?

► शहाजहान


✺ शाहजहानने पत्नी मुमताज महलची कबर कुठे बांधली?

► आग्रा


✺ मुमताज महलची कबर कोणत्या नावाने ओळखली जाते?

► ताजमहाल


✺ ताजमहाल बांधण्यासाठी किती वेळ लागला?► 20 वर्षे


✺ ताजमहालचे बांधकाम कधी सुरू झाले?

► १६३२ मध्ये


✺ ताजमहालचे शिल्पकार कोण होते?

► उस्ताद ईशा खान आणि उस्ताद अहमद लाहौरी.


✺ ताजमहाल बांधण्यासाठी संगमरवरी कोठून आणले होते?

► मकराना (राजस्थान)


✺ आग्राची मोती मशीद कोणी बांधली?

► शहाजहान


✺ शहाजहानच्या काळात आलेल्या फ्रेंच माणसाचे नाव काय होते?

► फ्रान्सिस बर्नियर आणि टॅव्हर्नियर


✺ शहाजहानच्या दरबारात कोणते संस्कृत विद्वान उपस्थित होते?

► कबींद्र आचार्य सरस्वती आणि जगन्नाथ पंडित


✺ कवी जगन्नाथ पंडित यांनी कशाची रचना केली?

► रसगंगाधर आणि गंगालहरी


✺ उपनिषदांचे फारसीमध्ये भाषांतर कोणी केले?

► दारा शिकोह


✺ उपनिषदांचे पर्शियन भाषांतर कोणत्या नावाने केले गेले?

► सर-ए-अकबर!


✺ लोह आणि रक्ताचे धोरण कोणी पाळले?

► बलबन


✺ तुघलक वंशाचा संस्थापक कोण होता?

► घियासुद्दीन तुघलक

महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग

 🔻Q. महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?


1) न्या रंगनाथ मिश्रा.

2) न्या. H. L. दत्तू

3) न्या. अरविंद सावंत✅✅✅अचूक उत्तर

4) श्री. M. A. सयिद


----------------------------------------------------------


🔻स्पष्टीकरण :-


❤️ महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग :-


📌स्थापना :- 6 मार्च 2001

     ⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार


📌अध्यक्ष :- उच्च न्यायालयाचे माजी  न्यायाधीश


➡️पहिले अध्यक्ष :- न्या. अरविंद सावंत (2001- 02) 


➡️कार्यरत अध्यक्ष :- कमलकिशोर ताटेड (2022 पासून)


----------------------------------------------------------


❤️ राष्ट्रीय मानव अधिकार आयोग :-


📌 स्थापना  :- 12 ऑक्टोबर 1993

         ⭐️मानवी अधिकार संरक्षण अधिनियम, 1993 नुसार


📌अध्यक्ष :- सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश 


➡️पहिले अध्यक्ष :- न्या. रंगनाथ मिश्रा (1993 - 96) 


➡️कार्यरत अध्यक्ष :- न्या. अरुण कुमार मिश्रा (2021 पासून)


----------------------------------------------------------

📌📌

⚠️Note :- पश्चिम बंगाल राज्य मानवी हक्क आयोग स्थापन करणारे पहिले (1995) राज्य ठरले आहे.

चालू घडामोडी :- 15 एप्रिल 2024

◆ नवीन शिक्षण धोरणानुसार नव्या पद्धतीने शिक्षण देण्यासोबतच नवे नेतृत्व घडवण्यासाठी प्रेरणा उत्सवाची सुरुवात वडनगर गुजरात येथून करण्यात येणार आहे.

◆ भारतात तयार करण्यात आलेल्या इलेक्ट्रिक मोटारीची परदेशात निर्यात करणारी सिट्रोन ही पहिली बहुराष्ट्रीय कंपनी ठरली आहे.

◆ भारत आणि सिंगापूर या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात AI तंत्रज्ञानावर दोन दिवसीय परिषद आयोजित करण्यात येणार आहे.

◆ BARTI आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लंडन येथे शास्वत सर्वसमावेशक विकास आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या विषयावर अंतरराष्ट्रिय परिषदेचे अयोजन करण्यात आले.

◆ आतापर्यंत एकूण 31 मानवांनी पृथ्वीच्या वातावरणा बाहेर उड्डाण करून अंतराळात प्रवेश केला आहे.

◆ स्वदेशी बनावटीच्या मॅन पोर्टेबल अँटी टँक गायडेड मिसाईल प्रणालीची DRDO ने यशस्वी चाचणी घेतली आहे.

◆ जगातील जर्मनी देशाच्या प्राणी संग्राहलयात जगातील सर्वात वयस्कर गोरिला आहे.

◆ डस्टलिक 2024 युद्ध सराव भारत आणि उझबेकिस्तान या देशात सुरू झाला आहे.

◆ यावर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत Athletics मध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना जागतिक अथलेटीक्स महासंघातर्फे 50 हजार अमेरिकन डॉलर बक्षिसाची घोषणा करण्यात आली आहे.

◆ IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा SRH संघ पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहे.

◆ कॅनडाच्या गार्डनर फाऊंडेशनचा ग्लोबल हेल्थ मधील जॉन डक्स पुरस्कार 2024 डॉ. गगनदीप कांग मिळाला आहे.

◆ देशात आसाम राज्यात 14 ते 20 एप्रिल दरम्यान रोंगाली बिहू उत्सव साजरा करण्यात येतो.

◆ राष्ट्रीय न्यायिक अकादमी च्या प्रमुखपदी अनिरुद्ध बोस यांची निवड करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

IMPORTANT CURRENT #GK



🟣1. भारतातील पहिली पॉड टॅक्सी 🚕सेवा - उत्तर प्रदेश


🟣2. आंतरराष्ट्रीय मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क 🚚- जोगीघोपा (आसाम)


🟣3.🏥 मुलांसाठी 'डिजिटल हेल्थ कार्ड' - उत्तर प्रदेश


🟣4. 💧राज्य जल बजेट (वॉटर बजेट) स्वीकारत आहे - केरळ


🟣5. 🚇 भारतातील पहिला 'अंडरवॉटर रोड बोगदा - मुंबई'


🟣6.♻️ भारतातील पहिले 'ग्रीन एव्हिएशन इंधन उत्पादन - पानिपत (हरियाणा)'


🟣7. ☀️सौर उर्जेवर चालणारी पर्यटक बोट 'सूर्यांशू' - केरळ


🟣8. पर्यटनाला चालना देण्यासाठी 'मरीना' विकसित करणारे - कुंदापूर (कर्नाटक)


🟣9.📳भारतातील पहिले 'डिजिटल सायन्स पार्क' - केरळ


🟣10.📒 संविधान अंतर्गत भारतातील पहिला पूर्ण साक्षर जिल्हा - कोल्लम (केरळ)


🟣11. 📱भारतातील पहिला 'सेमी-कंडक्टर प्लांट' उघडला - ढोलेरा (गुजरात)


🟣12. ♿️ दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र विभाग स्थापन - महाराष्ट्र


🟣13. 🛫 विमानतळावरील भारतातील पहिले 'रीडिंग लाउंज' - लाल बहादूर शास्त्री (वाराणसी)


🟣14.⚡️ 2030 पर्यंत सरकारी विभागांमध्ये 100% इलेक्ट्रॉनिक वाहने - केरळ


🟣15. 📮भारतातील पहिले 3D-मुद्रित पोस्ट ऑफिस - बेंगळुरू


🟣16.🚇 अंडरवॉटर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी - कोलकाता


🟣17. अंधांच्या नावाने ओळखले जाणारे गाव - माना (उत्तराखंड)


🟣18. दृष्टीदोष नियंत्रण धोरणाची अंमलबजावणी करणारे राज्य - राजस्थान


🟣19. भारतातील पहिले 'हायब्रीड साउंडिंग रॉकेट लॉन्च साइट - पट्टीपुलम (तामिळनाडू)


🟣20. पहिले 'कार्बन न्यूट्रल व्हिलेज' विकसित - भिवंडी तालुका (महाराष्ट्र)


🟣21. भारतातील पहिले 'सौर ऊर्जा-चालित शहर'  - सांची (मध्य प्रदेश)

लक्षात ठेवा

🔸१) दुर्गाराम मंछाराम यांच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी १८४४ मध्ये 'मानवधर्म सभा' या सभेची स्थापना केली. कोठे ?

- सुरत


🔹२) दादोबा पांडुरंग यांनी मुंबई येथे 'परमहंस सभे'ची स्थापना केली .... 

- ३१ जुलै, १८४९


🔸३) हिंदुधर्मातील स्त्रियांची दुःस्थिती व विशेषतः विधवा स्त्रियांची दयनीय स्थिती यांवर प्रकाश टाकणारी 'यमुना पर्यटन' ही कादंबरी लिहिली .... 

- बाबा पद्मनजी


🔹४) सन १८६७ मध्ये मुंबई येथे 'प्रार्थना समाजा'ची स्थापना करण्यात आली. या समाजाच्या स्थापनेचे श्रेय विशेषत्वाने देण्यात येते .... यांना.

- आत्माराम पांडुरंग


🔸५) .... रोजी मुंबईतील कोळीवाडा (मांडवी) येथील समारंभात जोतीराव फुले यांना 'महात्मा' ही पदवी दिली गेली.

- ११ मे, १८८८



🔸१) इ. स. १८४८ मध्ये आपल्या स्वतःच्या घरात मुलींची मुंबईतील पहिली शाळा स्थापन केली ....

- नाना शंकरशेठ


🔹२) मुंबई व पुणे दरम्यान रेल्वे सेवा सुरू व्हावी यासाठी जमशेदजी जिजीभाय यांच्याबरोबरच .... यांनीही विशेष प्रयत्न केले होते.

- नाना शंकरशेठ


🔸३) एरवी इंग्रजी राजवटीचे समर्थन करणाऱ्या .... यांनीच वेळप्रसंगी “दिवाळखोर सरदारांचा धूर्त कारभारी जसा संसार पाहतो तसे इंग्रज सरकार या देशाचा कारभार पाहत आहे." अशा शब्दांत ब्रिटिश शासनावर टीका केली. 

- लोकहितवादी


🔹४) अहमदनगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून काम करीत असताना .... यांनी १८५७ चे भिल्लांचे बंड मोडून काढले.

- दादोबा पांडुरंग


🔸५) स्वधर्मात राहून इतर धर्मातील चांगल्या धर्मतत्त्वांचा स्वीकार करावयाचा व स्वधर्मात सुयोग्य दिशेने परिवर्तन घडवून आणावयाचे, असे मानणारा सुधारकांचा एक वर्ग देशात एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर कार्यरत होता. अशा प्रकारच्या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून आपणास ..... यांनी स्थापन केलेल्या 'मानव धर्मसभा' व 'परमहंस सभा' यांचा उल्लेख करावा लागेल.

- दादोबा पांडुरंग


🔸१) पृथ्वीवरील दोन स्थानांमधील रेखावृत्तीय अंशात्मक अंतरास .... मिनिटांनी गुणले असता त्या दोन ठिकाणातील स्थानिक वेळेतील फरक समजू शकतो. 

- चार


🔹२) विषुववृत्ताच्या उत्तरेस व दक्षिणेस २३°३०' अक्षवृत्ता पर्यंतच्या प्रदेशात सूर्यकिरण लंबरूप पडतात. त्यामुळे त्या भागात तापमान जास्त असते. या पट्ट्यास काय म्हणतात? 

- उष्ण पट्टा


🔸३) पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने सूर्याभोवती फिरत असल्याने तिचे सूर्यापासूनचे अंतर सारखे नसते. जेव्हा पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते तेव्हा त्या स्थितीस .... म्हणून ओळखले जाते.

- उपसूर्य स्थिती


🔹४) चमकणाऱ्या विजेमुळे हवेतील काही ऑक्सिजनचे .... वायूत रूपांतर होते..

- ओझोन


🔸५)आपल्या आकाशगंगेचा व्यास किमान .... लाख प्रकाशवर्षे असावा. 

- एक

🔸१) २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी संपातस्थिती निर्माण होते. म्हणून या दोन दिवसांना ..... असे म्हणतात.
- संपातदिन

🔹२) ज्या वेळी पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या स्थितीस .... असे म्हणतात.
- अयनस्थिती

🔸३) २१ मार्च या संपातदिनाला उत्तर गोलार्धात ..... म्हणून ओळखले जाते.
- वसंत संपात 

🔹४) २३ सप्टेंबर या संपातदिनाला उत्तर गोलार्धात .... म्हणून ओळखले जाते. 
- शरद संपात

🔸५) पृथ्वीला सूर्याभोवती एक अंश फिरण्यास किती वेळ लागतो ?
- चार मिनिटे

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...