१५ एप्रिल २०२४

महाराष्ट्रातील पंचायतराज


◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

  - स्थानिक स्वराज्य संस्था


◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

  -  2 ऑक्टोबर 1953


◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

  - 16 जानेवारी 1957


◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

  - वसंतराव नाईक समिती


◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

  - 27 जून 1960


◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

  - महसूल मंत्री


◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

  - 226


◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

  - जिल्हा परिषद


◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

   - 1  मे 1962


◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

  -  7 ते 17


◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

  - 5 वर्षे


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

  - पहिल्या सभेपासून


◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

  - विभागीय आयुक्त


◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - सरपंच


◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - दोन तृतीयांश (2/3)


◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - तीन चतुर्थांश (3/4)


◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - संबंधित विषय समिती सभापती


◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - विभागीय आयुक्त


◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

  -  ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

   - जिल्हा परिषदेचा


◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

  - ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  -  राज्यशासनाला


◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

   -  विस्तार अधिकारी


◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

  - ग्रामविकास खाते


  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

  - जिल्ह्याचे पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

  -  जिल्हाधिकारी


◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)


◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

  -  जिल्हा परिषद अध्यक्ष


◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

  -  वसंतराव नाईक

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)


प्रश्न.1) महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणच्या राजघराण्याच्या गंजिफा कलेसह लाकडी खेळण्यांना भारत सरकारकडून GI टॅग प्राप्त झाले आहे?

उत्तर - सावंतवाडी


प्रश्न.2) कोणता खेळाडू आयपीएल मध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार करणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे?

उत्तर - शुभमन गील


प्रश्न.3) भारतातील कोणत्या जैन अध्यात्मिक गुरू ना अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांच्या सुवर्ण सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?

उत्तर - लोकेश मुनी


प्रश्न.4) QS रँकिंग नुसार कोणते विद्यापीठ भारतातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ ठरले आहे?

उत्तर - JNU विद्यापीठ नवी दिल्ली


प्रश्न.5) इटलीत खुल्या स्किफ युरो चॅलेंज नौकायान स्पर्धेत मिश्र गटात मुंबई च्या आनंदी चंदावरकर हिने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर - कांस्य 


प्रश्न.6) लंडन येथील जागतिक पातळीवरील कॉमनवेल्थ युवा चॅम्पियन २०२४ साठी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - दारासिंग खुराणा


प्रश्न.7) जागतिक आरोग्य संघटनेच्या हिपॅटायटीस अहवाल २०२४ नुसार रुग्णाच्या बाबतीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे?

उत्तर - तिसऱ्या


प्रश्न.8) जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगात सर्वाधिक हिपॅटायटीस चे रुग्ण कोणत्या देशात आहेत?

उत्तर -  चीन


प्रश्न.9) पिटर हिग्ज यांचे निधन झाले. त्यांना कोणत्या साली नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?

उत्तर - 2013


प्रश्न.10) राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दीन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर -11 एप्रिल


प्रश्न.1) महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारांची संख्या कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर - पुणे 


प्रश्न.2) आयपीएल मध्ये दोन वेळा ५ विकेट घेणारा जसप्रीत बुमराह कितवा गोलंदाज ठरला आहे?

उत्तर - चौथा


प्रश्न.3) महिला हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - हरेंद्र सिंग


प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्ड च्या सदस्य पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - जगजित पवाडिया


प्रश्न.5) आशियाई विकास बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी भारताच्या GDP वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?

उत्तर - 7%


प्रश्न.6) हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स नुसार भारत देश कितव्या कितव्या स्थानावर आहे?

उत्तर - तीसऱ्या 


प्रश्न.7) हूरून युनिकॉर्न इंडेक्स २०२४ नुसार कोणता देश प्रथम स्थानावर आहे?

उत्तर - अमेरीका 


प्रश्न.8) मानवी अंतराळ उड्डाणासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा केला जातो ?

उत्तर - 12 एप्रिल


प्रश्न – अलीकडेच आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू कोण बनला आहे?

उत्तर - विराट कोहली


प्रश्न – गंगू रामसे यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते?

उत्तर - सिनेमॅटोग्राफर


प्रश्न – जर्दाळू ब्लॉसम फेस्टिव्हल 2024 नुकताच कुठे सुरू झाला?

उत्तर - लडाख


प्रश्न – नुकताच जर्मन लोकशाही पुरस्कार कोणाला मिळेल?

उत्तर - युलिया लानाया


प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच आपला रोजगार व्हिसा कार्यक्रम बदलला आहे?

उत्तर - न्यूझीलंड


प्रश्न – अलीकडेच F1 जपानी ग्रां प्री 2024 कोणी जिंकले आहे?

उत्तर - मॅक्स वर्स्टॅपेन


प्रश्न – भारतीय तटरक्षक दलाने अलीकडेच जलचर केंद्राचे उद्घाटन कोठे केले आहे?

उत्तर - तामिळनाडू


प्रश्न – अलीकडे कोणत्या राज्यातील मिरज शहरात बनवलेल्या सतारला तानपुरा हा GI टॅग मिळाला आहे?

उत्तर - महाराष्ट्र


प्रश्न – नुकताच CRPF शौर्य दिवस कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – ९ एप्रिल


प्रश्न – IPEF द्वारे नुकतेच क्लीन एनर्जी इन्व्हेस्टर फोरम कोणत्या देशात आयोजित केले जाईल?

उत्तर - सिंगापूर


प्रश्न – नुकतेच कोणत्या शहरात राष्ट्रीय महिला हॉकी लीगचे उद्घाटन होणार आहे?

उत्तर - रांची


प्रश्न – वित्त आयोगाचे सदस्य म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर - मनोज पांडा


प्रश्न – भारताने अलीकडेच कोणत्या देशात सिटवे बंदरावर ऑपरेशनल नियंत्रण मिळवले आहे?

उत्तर - म्यानमार


प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडे रशियाकडून सर्वाधिक कच्चे तेल आयात केले आहे?

उत्तर - चीन


प्रश्न – अलीकडे कोणत्या देशाचे सैन्य माउंट एव्हरेस्टवरून कचरा गोळा करण्याची मोहीम सुरू करणार आहे?

उत्तर - नेपाळ


प्रश्न – ECI ने अलीकडे कोणते नवीन ॲप लाँच केले आहे?

उत्तर – सुविधा पोर्टल


प्रश्न – नुकताच मार्च 2024 चा ICC प्लेयर ऑफ द मंथ कोण बनला आहे?

उत्तर - माइया बाउचर आणि कामिंदू मदिन्स


प्रश्न – जागतिक होमिओपॅथी दिन नुकताच कधी साजरा करण्यात आला?

उत्तर - 10 एप्रिल


प्रश्न – अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने सुरक्षा आव्हानांचे मूल्यांकन केले आहे आणि दहशतवादावर विचारांची देवाणघेवाण केली आहे?

उत्तर - कझाकस्तान


प्रश्न – अलीकडेच त्याच्या नवीन लोगोचे अनावरण कोणी केले आहे?

उत्तर - CCL


प्रश्न – कोणत्या देशाने अलीकडेच WTO मध्ये तांदूळासाठी शांतता कलम लागू केले आहे?

उत्तर भारत


प्रश्न – अलीकडे हिपॅटायटीसच्या बाबतीत कोणता देश अव्वल आहे?

उत्तर - चीन


प्रश्न – नुकताच नवीन वर्ष उगादी सण कोठे साजरा करण्यात आला?

उत्तर - तेलंगणा आणि आंध्र प्रदेश


प्रश्न – अलीकडेच, कोणत्या मिशनसाठी इस्रो टीमला प्रतिष्ठित जॉन अल हा पुरस्कार देण्यात आला? जॅक स्विगर्ट जूनियरची पुरस्कारासाठी निवड झाली आहे?

उत्तर - चांद्रयान ३


प्रश्न – नुकताच आंतरराष्ट्रीय मानव अंतराळ उड्डाण दिन कधी साजरा करण्यात आला?

उत्तर - 12 एप्रिल


प्रश्न – नुकतीच आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डवर कोणाची निवड झाली आहे?

उत्तर - जगजित पावडिया


प्रश्न – अलीकडेच भारत आणि कोणत्या देशामध्ये संयुक्त लष्करी सराव डस्टलिक सुरू होणार आहे?

उत्तर - उझबेकिस्तान


प्रश्न – T20 क्रिकेटमध्ये 7000 किंवा त्याहून अधिक धावा करणारा आठवा भारतीय कोण आहे?

उत्तर - सूर्यकुमार यादव


प्रश्न – अलीकडेच नौदल प्रमुखांनी कोणत्या राज्याच्या कारवार नौदल तळावर नवीन सुविधांचे उद्घाटन केले आहे?

उत्तर - कर्नाटक


प्रश्न – भारतीय लष्कराने अलीकडेच रणगाडाविरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रांचा सराव कोठे केला आहे?

उत्तर - सिक्कीम


प्रश्न – नुकतेच स्वामी विवेकानंद U20 फुटबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोठे झाले?

उत्तर - छत्तीसगड


प्रश्न – नुकतीच आशिया कुस्ती स्पर्धा 2024 कोणत्या देशात आयोजित केली जात आहे?

उत्तर - किरगिझस्तान

सामान्य ज्ञान (GK) प्रश्नोत्तरे



(1) सौरऊर्जा ___ स्वरुपात असते.

1) प्रकाश प्रारणांच्या

*2) विद्युत चुंबकीय प्रारणांच्या ✅*

3) अल्फा प्रारणांच्या

4) गामा प्रारणांच्या 


----------------------------


(2) बटाट्यांना मोड येऊ नये म्हणून त्यावर _ प्रारणांचा मारा करतात.

1) अल्फा

2) बिटा

3) गॅमा ✅

4) क्ष-किरण 


----------------------------


(3) पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ......... इतकी असते.

1) M

*2) N ✅*

3) A

4) X

----------------------------

(4) जीवभूरसायन चक्रात कार्बन प्रमाण.........आहे.

*1) ०.०३% ✅*

2) ०.३%

3) ३%

4) ०.००३%


----------------------------

(5) खालीलपैकी कोणती वनस्पती टेरीडोफायटा या सवंहिनी वनस्पती वर्गात येत नाही.

1) फिलीसीनी

*2) मुसी ✅*

3) लायकोपोडियम

4) इक्विसेटीनि 


----------------------------


(6) मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण..........हे विकर त्याच्या जठरात नसते.

1) *सेल्युलेज ✅*

2) पेप्सीन

3) सेल्युलीन

4) सेल्युपेज 

----------------------------


(7) पाण्याची घनता ................ ला उच्चतम असते.

*1) ४℃ ✅*

2) २५℃

3) ०℃

4) ७३℃

----------------------------


*(8) आधुनिक जैवतंत्रज्ञान ............. पातळीवर कार्य करते.*

1) अवअणू

2) अणू

*3) रेणू ✅*

4) पदार्थ 

भारत : स्थान व विस्तार




◼️भारत अक्षवृत्तीयदृष्ट्या उत्तर गोलार्धात व रेखावृत्तीयदृष्ट्या पूर्व गोलार्धात आहे. 


◻️अक्षवृत्तीय स्थान : ८० ४' उत्तर ते ३७० ६' उत्तर अक्षवृत्त


◼️रेखावृत्तीय स्थान : ६८०७' पूर्व ते ९७० २५' पूर्व रेखावृत्त


◻️सर्वांत दक्षिणेकडील टोक : इंदिरा पॉईंट (६०४५' उत्तर अक्षवृत्त)


◼️पूर्व पश्चिम जास्तीत जास्त अंतर : २९३३ किमी 


◻️दक्षिण-उत्तर जास्तीत जास्त अंतर : ३२१४ किमी


◼️क्षेत्रफळ : ३२,८७, २६३ चौरस किमी (जगात सातवा क्रमांक)


◻️भूसीमा लांबी : १५२०० किमी.


◼️सागरी किनारा लांबी : ७,५१७ किमी


◻️सर्वांत उत्तरेकडील स्थान : दफ्तार (जम्मू आणि काश्मीर)


◼️सर्वांत दक्षिणेकडील स्थान : कन्याकुमारी/इंदिरा पॉईंट


◻️सर्वांत पूर्वेकडील स्थान : किबिथू (अरुणाचल प्रदेश)


◼️सर्वांत पश्चिमेकडील स्थान : घुअर मोटा (राजस्थान)


◻️सर्वांत उंच स्थान : के-२ (गॉडवीन ऑस्टिन) (८६११ मी) (काराकोरम रांग)


◼️सर्वांत खोल बिंदू : कुट्टानाद (-२.२ मी) (केरळ)


◻️सागरी सीमा : ६ देशांशी संलग्न


◼️भू सीमा : ७ देशांशी संलग्न


सर्व स्पर्धा परीक्षासाठी उपयुक्त


◾️भारतातील पहिले 100% साक्षर राज्य :- केरळ

◾️भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य :- सिक्कीम

◾️प्लॅस्टिक ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य :- त्रिपुरा

◾️जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य :- आंध्र प्रदेश

◾️मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य :- पश्चिम बंगाल

◾️लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य :- उत्तराखड

◾️देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य :- दिल्ली

◾️जानकी दूध बँक चालविणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य :- हिमाचल प्रदेश

◾️भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य :- दिल्ली

◾️भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य :- प. बंगाल

◾️मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य :- सिक्किम

◾️GST विधेयकास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य :- आसाम

◾️राज्य GST कायद्यास मान्यता देणारे भारतातील पहिले राज्य :- तेलंगणा

◾️'आरोग्य अदालत' सुरु करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

◾️भारतातील पहिले धुम्रपानमुक्त राज्य :- सिक्किम

◾️निकोटिनवर बंदी घालणारे भारतातील पहिले राज्य :- पंजाब

◾️सौर ऊर्जेवरील पहिली बोट (आदित्य) सुरू करणारे पहिले राज्य :- केरळ

◾️कृषी आधारित अर्थसंकल्प सादर करणारे पहिले राज्य :- कर्नाटक

◾️बालक जन्मतःच त्याची आधार नोंदणी करणारे पहिले राज्य :- हरियाणा

◾️पंचायत निवडणुकांत शैक्षणिक पात्रता बंधनकारक करणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य :- पंजाब

◾️सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य :- मध्य प्रदेश

◾️ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य :- दिल्ली

◾️ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य :- दिल्ली

◾️ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य :- आंध्र प्रदेश

◾️भारतातील पहिले ई-न्यायालय :- हैद्राबाद उच्च न्यायालय

◾️ऑनलाईन मतदान राबविणारे पहिले राज्य :- गुजरात

◾️जन-धन योजनेची 100% अंमलबजावणी करणारे पहिले राज्य :-मेघालय

◾️पदवीपर्यंत लैंगिक शिक्षण सक्तीचे करणारे पहिले राज्य :- तेलंगणा

◾️भारतातील पहिली फूड बैंक सुरू करणारे राज्य :- दिल्ली

◾️होमिओपॅथिक विद्यापीठ सुरू करणारे पहिले राज्य :- राजस्थान

◾️स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना 33% आरक्षण देणारे राज्य :- महाराष्ट्र

......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ...

 ◾️"चंद्रयान प्रकल्प 4 "- ISRO प्रमुख एस सोमनाथ यांनी खुलासा केला आहे 2040 पर्यत ISRO चंद्रावर अंतराळवीर उतरवणार आहे


पृथ्वीच्या कक्षेबाहेर इस्रोच्या पाच मोहीम👇👇

1] 'चांद्रयान-1' :- 22 ऑक्टोबर 2008

2] 'मंगळयान' :- 05 नोव्हेंबर 2013

3] 'चांद्रयान-2' :- 22 जुलै 2019

4] 'चांद्रयान-3' :- 14 जुलै 2023

5] 'आदित्य एल-1' :- 02 सप्टेंबर 2023


◾️फ्रेंच ऑटोमेकर Citroën ही भारतात उत्पादित इलेक्ट्रिक वाहने (EVs) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात करणारी पहिली बहुराष्ट्रीय कार उत्पादक बनली आहे.

⭐️Citroën ही इंडोनेशिया ला 500 EV गाड्या देणार आहे


◾️जागतिक होमिओपॅथी दिवस 10 एप्रिल, 2024


◾️Tata Advanced Systems Ltd (TASL ) ने सॅटेलॉजिकच्या सहकार्याने, भारताचा खाजगी क्षेत्रातील निर्मित सब-मीटर रिझोल्यूशन पृथ्वी निरीक्षण उपग्रह, TSAT-1A चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे

⭐️7 एप्रिल रोजी इलॉन मस्कच्या स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेटवर केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा येथून TSAT-1A चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले


◾️QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रैंकिंग 2024

⭐️ IIT बॉम्बे अभियांत्रिकीमध्ये जागतिक स्तरावर 45 व्या क्रमांकावर आहे


◾️सुश्री जगजीत पावडिया यांची न्यूयॉर्क येथे झालेल्या निवडणुकीत 2025-2030 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ नियंत्रण मंडळावर निवड झाली आहे


◾️आशियाई विकास बँकेने FY25 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज पूर्वीच्या 6.7% वरून 7% पर्यंत वाढवला आहे.

⭐️FY26 साठी, ने ते 7.2% वर्तवला आहे


◾️आशियाई विकास बँक /Asian Development Bank 


⭐️मुख्यालयः मांडलुयोंग, फिलीपिन्स

⭐️स्थापनाः 19 डिसेंबर 1966

⭐️अध्यक्षः मासात्सुगु असाकावा


◾️15 वा वित्त आयोग या

⭐️अध्यक्ष - NK सिंग आहेत

⭐️स्थपणा - नोव्हेंबर 2017 


◾️16 व्या वित्त आयोग

⭐️अध्यक्ष - अरविंद पंगरियार

⭐️स्थपणा - 31 डिसेंबर 2023


◾️दरवर्षी 9 एप्रिल रोजी

 CRPF दिवस

 साजरा केला जातो


◾️झिम्बाब्वे देशाने स्वतःचा नवीन चलन ZiG (जीग ) लॉन्च केली


◾️शक्ती महोत्सव 

⭐️संगीत अकादमी शक्ती महोत्सवाचे आयोजन करनार आहे 9 ते 17 एप्रिल दरम्यात 

⭐️हयात संगीत आणि नृत्य होईल

⭐️याचे आयोजन देशातील 7 शक्तीपीठांच्या मध्ये होणार आहे


◾️देशातील 7 शक्तिपीठे मध्ये शक्ती महोत्सवाचे आयोजन  

⭐️गुवाहाटी चे कामाख्या मंदिर (आसम) 

⭐️कोल्हापुर चे महालक्ष्मी मंदिर (महाराष्ट्र) 

⭐️कांगड़ा चे ज्वालामुखी मंदिर (हिमाचल प्रदेश)

⭐️उदयपुर चे त्रिपुरी सुंदरी मंदिर (त्रिपुरा) 

⭐️बनासकंठा चे अंबाजी मंदिर (गुजरात) 

⭐️देवघर चे जय दुर्गा शक्ती पीठ (झारखंड)

⭐️उज्जैन चे  हरसिद्धि मंदिर (मध्य प्रदेश)


◾️30 मार्च ला राजयस्थान स्थपणेला 75 वर्षे पूर्ण

⭐️1949 मध्ये स्थापना


◾️हुरुन ग्लोबल यूनिकॉर्न इंडेक्स 2024 रिपोर्ट

⭐️यूनिकॉर्न स्टार्टअप मध्ये भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो 

🔥अमेरीका - पहिला ( 703 स्टार्टअप )

🔥चीन - दुसरा ( 340 स्टार्टअप )

🔥भारत - तिसरा ( 67 स्टार्टअप )

यात 68 होते Byjus कमी झालं एक - बायजूस जगात सर्वात जास्त वैल्यू डिस्ट्रॉयर स्टार्टप बनले


भारतातील सर्वोत्तम मूल्यवान युनिकॉर्न

⭐️स्वीगी  - 8 Billion $

⭐️ड्रीम 11 - 8 Billion $

⭐️रेझर पे - 7.5 Billion $


🔥स्विगी आणि ड्रीम11 जगात 83 वा क्रमांक आहे 

🔥रेझर पे चा जगात 93 वा क्रमांक आहे


◾️ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत 1064 जणांची सुटका.

⭐️ऑपरेशन नन्हे फरिश्ते' रेल्वे कडून राबवले जाते

⭐️ऑपरेशन नान्हे फरिश्तेचा उद्देश विविध कारणांमुळे हरवलेल्या किंवा त्यांच्या कुटुंबापासून विभक्त झालेल्या मुलांना पुन्हा जोडणे हा आहे.


◾️आइसलँडने नवीन पंतप्रधान म्हणून बजार्नी बेनेडिक्ट्सन निवड

⭐️कॅटरिन जेकोब्सडोटीर यांच्या जागी त्यांची निवड
⭐️जानेवारी ते नोव्हेंबर 2017 या 10 महिन्यासाठी सरकारमध्ये पंतप्रधान होते.
⭐️बेनेडिक्ट्सन यांनी जेकोब्सडोटीरच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणूनही काम केले आहे

◾️आइसलँड देशाबद्दल माहिती
⭐️उत्तर अटलांटिक महासागरात स्थित बेट देश 
⭐️उत्तर अमेरिका आणि युरोपमधील  भौगोलिक सीमेवर असलेला देश
⭐️राजधानी, रेकजाविक (“बे ऑफ स्मोक्स”),
⭐️लोकसंख्या: 317,000
⭐️क्षेत्रः 39,769 चौरस मैल (103,001 चौरस किलोमीटर)

◾️वरिष्ठ आयपीएस अधिकारी अनुराग कुमार यांची सीबीआयच्या सहसंचालकपदी नियुक्ती

⭐️2004 च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवा (IPS) अधिकारी आहेत
⭐️सध्या पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो (BPR&D) मध्ये कार्यरत आहेत.
⭐️आसाम-मेघालय केडरचे अधिकारी आहेत
⭐️CBI स्थापना: 1 एप्रिल 1963
⭐️CBI मुख्यालय: नवी दिल्ली.
➡️CBI चे सध्याचे संचालक प्रवीण सूद आहेत

◾️US-INDIA टॅक्स फोरमच्या अध्यक्षपदी तरुण बजाज यांची नियुक्ती
⭐️यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक अँड पार्टनरशिप फोरम (USISPF) ने त्यांची नेमणूक केली
⭐️ते माजी महसूल सचिव आणि माजी आर्थिक व्यवहार सचिव आहेत
⭐️बजाज हे 1988 च्या बॅचचे हरियाणा कॅडरचे आयएएस अधिकारी

◾️Tax Forum म्हणजे
⭐️Tax forum म्हणजे दोन्ही देशतील व्यवहारादरम्यान Tax धोरणे ठरवणे
⭐️टॅक्स फोरम 25 फेब्रुवारी 2020 रोजी अधिकृतपणे सुरू
⭐️US-INDIA टॅक्स फोरममध्ये सुमारे 350 सदस्य कंपन्या आहेत

◾️ T20 मध्ये 500 षटकार मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय बनला आहे
⭐️वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान, टी-20 क्रिकेटमध्ये 500 षटकार मारण्याचा टप्पा गाठला. 
⭐️T20 क्रिकेट सामन्यात 500 किंवा त्याहून अधिक षटकार मारणारे फलंदाज
🏏1056 - ख्रिस गेल
🏏860 - किरॉन पोलार्ड
🏏678 - आंद्रे रसेल
🏏548 - कॉलिन मुनरो
🏏500* - रोहित शर्मा

◾️नायजेरिया मेनिंजायटीसवर (मेंदुज्वर) लस आणणारा पहिला देश बनला आहे
⭐️लाशीचे नाव : Men5CV/MenFive
⭐️नायजेरिया हा आफ्रिकेतील 26 देशांपैकी एक आहे ज्यात मेंदुज्वराचे प्रमाण जास्त आह.



खाडी नदी जिल्हा

 खाडी      नदी       जिल्हा 

━━━━━━━━━━━━━━━━━━━

▪️दातीवार ➖ तानसा वैतरणा =पालघर

▪️वसई ➖ उल्हास =पालघर

▪️ठाणे ➖ उल्हास=ठाणे


▪️मनोरी ➖ दहिसर=मुंबई

▪️मालाड / मोर्वे ➖ अशिवरा=मुंबई उपनगर

▪️माहीम ➖ मिठी=मुंबई उपनगर


▪️पनवेल ➖ पाताळगंगा=रायगड

▪️धरमतर ➖अंबा=रायगड

▪️राजपुरी ➖ काळ =रायगड


▪️बाणकोट ➖ सावित्री =रायगड/रत्नागिरी

▪️केळशी ➖ भरजा=रत्नागिरी

▪️दाभोळ ➖ विशिस्टी=रत्नागिरी


▪️जयगड ➖ शास्त्री=रत्नागिरी

▪️भाट्ये ➖काजळी =रत्नागिरी

▪️पूर्णगड ➖ मुचकुंदी= रत्नागिरी


▪️जैतापूर ➖ काजवी =रत्नागिरी

▪️विजयदुर्ग ➖ शुक=रत्नागिरी/सिंधुदुर्ग

▪️देवगड ➖ देवगड=सिंधुदुर्ग


▪️आचरा ➖ आचरा=सिंधुदूर्ग 

▪️कालावली ➖गड =सिंधुदुर्ग

▪️कर्ली ➖ कर्ली=सिंधुदुर्ग

जाणून घ्या बाबासाहेबांविषयीच्या दहा विशेष गोष्टी


#History 


१. प्रज्ञावंत बाबासाहेबांनी संपादित केलेल्या पदव्या : 


डॉ. आंबेडकरांनी तब्बल ३२ पदव्या संपादित केल्या होत्या. यामध्ये बीए, एमए, पीएचडी (अर्थशास्त्र), एमएससी (Provincial Decentralization of Imperial Finance in British India), बॅरिस्टर इन लॉ, डीएससी (The Problem of the Rupee – Its origin and its solution), एलएलडी (HIS achievements, Leadership and authoring the constitution of India), डी.लिट. या काही महत्वाच्या पदव्या आहेत.


२. आंबेडकरांनी लिहिलेले महत्वाचे ग्रंथ : 


Caste in Hindu (1916), The problem of Rupee (1923), Annhilation of Caste (1935), Federation Versus Freedom (1939), Ranade, Gandhi and Ginnah (1943), Communal Deadlock and a Way to solve it (1945), What congress and Gandhi have done to the untouchables? (1945), Pakistan or Partition of India (1945), State and Minorities (1947), Maharashtra as a Linguistic state (1948), The untouchable (1948), Who were shudra (1945), Buddha and his Dhammas (1957).


३. डॉ. आंबेडकरांनी सुरु केलेली वर्तमानपत्रे : 


मूकनायक (१९२०), बहिष्कृत भारत (१९२७), समता (१९२८), जनता (१९३०), प्रबुद्ध भारत (१९५६, जनताचे नामांतर).



४. महत्वाचे सत्याग्रह / आंदोलने : 


महाडचे चवदार तळे सत्याग्रह, (२० मार्च १९२७), मनुस्मृती दहन (२५ डिसेंबर १९२७), शेतकऱ्यांची चळवळ (१९२८), पर्वती देवालय प्रवेश (१९२९), काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह (१९३१), पुणे करार (१९३२), येवला परिषद (१९३५), बौद्ध धर्मात प्रवेश (१४ ऑक्टोबर १९५६), बावीस प्रतिज्ञा.


५. बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या महत्वपूर्ण संस्था/संघटना :


बहिष्कृत हितकारिणी सभा (१९२४), समता सैनिक दल (१९२७), स्वतंत्र मजूर पक्ष (१९३६), शेड्युल कास्ट फेडरेशन (१९४२), पिपल्स एज्युकेशन सोसायटी (१९४५), भारतीय बौद्ध महासभा (१९५५).



६. बाबासाहेब आंबेडकरांच्या गाजलेल्या घोषणा : 


‘मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो, ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही’.

‘जे आपला इतिहास विसरतात ते कधीही इतिहास घडवू शकत नाहीत’

‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’

‘स्वातंत्र, समता, बंधुता शिकवणाराच धर्म मला प्रिय वाटतो’

‘जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असायला हवे’


७. बाबासाहेबांना मिळालेले पुरस्कार / सन्मान : 


१९५५ मधील काठमांडू येथील जागतिक बौद्ध परिषदेत ‘बोधीसत्व’ ही उपाधी प्रदान, १९९० मध्ये ‘भारतरत्न’ हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देण्यात आला.


८. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू :


चित्रकार : बी. आर. मडिलगेकर यांच्याकडून त्यांनी चित्रकलेचे प्रशिक्षण घेतले होते. बाबासाहेबांना व्हायोलिन वाजवण्याचीही आवड होती.

पत्रकार : ‘ज्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो त्यासाठी वर्तमानपत्र त्यांचा आवाज होऊ शकते असे सांगणाऱ्या’ बाबासाहेबांचे नाव तत्कालीन ब्राह्मणेतर पत्रकारितेत अग्रस्थानी घेतले जाते.

राजकारणी : बाबासाहेब भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्रीही होते.

अर्थतज्ज्ञ : ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या त्यांच्या ग्रंथातून प्रेरणा घेऊन १९३५ साली भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली.

तत्वज्ञ : स्वातंत्र, समता आणि बंधुता या तत्वांवर विश्वास ठाम विश्वास असणाऱ्या बाबासाहेबांनी हीच तत्वे राज्यघटनेत समाविष्ट केली.


९. बाबासाहेबांच्या कार्याबद्दल फारशा चर्चिल्या न गेलेल्या गोष्टी : 


दुसऱ्या महायुद्धानंतर भारताची आर्थिक घडी बसवण्यात बाबासाहेबांचे मोठे योगदान होते. त्यासाठी नेमलेल्या रिकन्स्ट्रक्शन कमिटी ऑफ काऊन्सिलचे (आरसीसी) सदस्य होते. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांनी त्यांच्यावर सिंचन आणि विजेच्या प्रश्नांबाबत जबाबदारी सोपवली होती., ‘दामोदर नदी खोरे’ आणि ‘सोने नदी खोरे’ प्रकल्प तसेच देशातील सर्वात मोठ्या ‘हिराकुड धरण’ प्रकल्पाचे काम बाबासाहेबांच्या अखत्यारित झाले. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत आणि लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)च्या स्थापनेत बाबासाहेबांचा मोठा वाटा होता. ‘जय भीम’ या घोषणेनंतर देशात ‘जय हिंद’ ही घोषणा सुरु झाली.


१०. बाबासाहेबांचे लेखन : 


भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे प्रचंड लेखन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ ग्रंथ आणि पुस्तिका, १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० शोधनिबंध, लेख आणि परीक्षणं इतके प्रचंड लिखाण डॉ. आंबेडकरांनी केले आहे. विशेष म्हणेज त्यांनी हे सर्व लिखाण इंग्रजीतून केलेले आहे.

महात्मा गांधी


- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948 

- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे) 

- 9 जानेवारी 1915 वयाच्या 45 व्या वर्षी गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात (बाॅम्बे) आगमन. याचवर्षी अहमदाबाद येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना 

- गांधी युग 1917 ते 1947 

- 9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस 

- 2 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन 

 

● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917 

- बिहारमधील निळ उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी 

 - टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. 

- पहिला सविनय कायदेभंग  

- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल 

 

● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918 

 

- पहिले उपोषण / भूक हरताळ 

- कापड गिरणी मालकांविरोधात 

 

● खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918 

 

- पहिले असहकार आंदोलन 

- सरकारविरोधी  

 

● रौलट सत्याग्रह 1919 

 

- नागरी स्वातंत्र्यावर गदा आणत असलेल्या रौलट कायद्याविरोधात 

- पहिले जन आंदोलन (Mass Strike) 

 

- जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (13 एप्रिल 1919) निषेध म्हणून गांधींनी कैसर - ए- हिंद ही पदवी परत केली.  

- 1919 मध्ये दिल्लीत ऑल इंडिया खिलाफत समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड  

 

● असहकार चळवळ  

 

- जून 1920 अलाहाबादमध्ये खिलाफत समितीत हा ठराव पास झाला 

- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर 

- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता  

- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित  

 

- 1924 बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींकडे (पहिले आणि एकमेव) 

- 1930 तत्कालीन व्हाईसराॅय लाॅर्ड इर्विनकडे गांधीजींनी 11 मुद्द्यांची मागणी केली.  

 

 

● दांडी यात्रा 

 

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी 

- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश  

- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल 

- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला 

 

● गांधी इर्विन करार 1931 

- दुसर्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित राहणार 

- संविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली 

- काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या कराराला समर्थन मिळाले. 

- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. 

- 1931 संविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू ही चळवळ पुन्हा 1934 मध्ये मागे घेण्यात आली. 

 

● पुणे करार 1931 

- रॅम्से मॅकडाॅनल्डच्या जातीय निवड्याला विरोध म्हणून पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधींचे आमरण उपोषण 

- यावरूनच गांधी आणि आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला 

- दलितांची स्वतंत्र मतदार संघाची तरतूद रद्द केली.  

 

● वैयक्तिक सत्याग्रह 

 

- 1933 मध्ये सुरूवात 

- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत घोषणा 

- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. 

- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही  

- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही 

 

● चले जाव 

 

- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर 

- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त 

- सी. राजगोपालचारी सूत्र (CR Formula): गांधी आणि जिनांची मिटिंग

चालू घडामोडी :- 14 एप्रिल 2024

◆ उद्योगपती आणि पायलट गोपी थोताकुरा हे पहिले भारतीय अवकाश पर्यटक ठरणार आहेत.

◆ विंग कमांडर राकेश शर्मा हे 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय होते.

◆ उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी प्रा. रमण मित्तल आणि डॉ. सीमा सिंग यांच्या ‘द लॉ अँड स्पिरिच्युॲलिटी: रिकनेक्टिंग द बॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.

◆ 2024 मध्ये जालियावाला बाग हत्याकांडाला 105 वर्षे पूर्ण होत आहेत.

◆ अदानी ग्रीन एनर्जी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क तयार करणार आहे.

◆ जगजीत पावडिया यांची आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड झाली आहे.

◆ न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ मध्य प्रदेशातील पारंपारिक गोंड पेंटिंगला जीआय टॅग दर्जा मिळाला आहे.

◆ ‘सच्चिदानंद मोहंती’ यांची विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ कन्नड भाषेतील प्रसिद्ध लेखिका ममता जी.  सागर यांना जागतिक साहित्य संस्थेने (WOW) ‘आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ प्रदान केला आहे.

◆ हैदराबादची मूळ भारतीय-अमेरिकन अभिनेत्री अवंतिका वंदनापू हिला हार्वर्ड विद्यापीठाने “दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर” पुरस्कार आणि पदवीने सन्मानित केले आहे.

◆ राष्ट्रपती ज्युलियस माडा बायो(सिएरा लिओन) यांनी झोम्बी ड्रग संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.

◆ डॉ. गगनदीप कांग यांना प्रतिष्ठित जॉन डर्क्स ग्लोबल हेल्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[कॅनडाचे गार्डनर फाउंडेशन हा पुरस्कार प्रदान करते.]

◆ सर्वाधिक मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा पुणे(8382) आहे.

◆ सर्वात कमी मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा सिंधुदुर्ग(918) आहे.

◆ जगातील सर्वाधिक 407 मीटर लांबीचा SkyWalk प्रकल्प अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा येथे तयार होत आहे.

◆ T20 क्रिकेट मध्ये 500 सिक्स मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

RPF चे उल्लेखनीय ऑपरेशन्स

1] ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' :-  मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्‍थानके, फलाटावरील 1064 मुलांची सुटका करण्‍यात आली आहे.

2] मेरी सहेली पथके :- रेल्वेतील महिला प्रवाशांना, विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने मेरी सहेली पथके तैनात करण्यात आली आहेत.

3] ऑपरेशन मातृशक्ती :- ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत, महिला आरपीएफ जवानांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना मदत केली.

4] मिशन जीवन रक्षा :- मिशन जीवन रक्षा अंतर्गत, आरपीएफ जवानांनी रेल्वेचा अपघात किंवा रेल्वे-खाली आत्महत्त्या करण्यापासून अनेक जणांचे प्राण वाचवले.

5] ऑपरेशन महिला सुरक्षा :- महिला आणि मुलींना मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या जाळ्यात अडकण्यापासून 150 जणांना रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत वाचवले होते.

Note :- ‘मेरी सहेली' नावाचा कार्यक्रमही रेल्वेकडून राबविण्यात येत आहे.

पंचतीर्थ

पंचतीर्थ (Panchteerth)

- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पाच महत्त्वाच्या स्थळांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देणारा हा उपक्रम.
- 2014 - 2015 मध्ये घोषित केलेल्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत 15 सर्किट घोषित करण्यात आली आहेत, त्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सर्किट अंतर्गत या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे.

1⃣ जन्मभूमी

- महू (मध्य प्रदेश) येथे 14 एप्रिल 1891 रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.
- 2019 मध्ये महू रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असा केले.

2⃣ दीक्षाभूमी

- नागपूर (महाराष्ट्र) येथे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
- 2014 मध्ये या ठिकाणाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला.

3⃣ शिक्षण भूमी

- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी लंडन येथे असताना 10, किंग हेन्री मार्ग येथे राहिले होते.
- महाराष्ट्र सरकारने ही जागा खरेदी केली आणि 14 नोव्हेंबर 2015 रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

4⃣ महापरिनिर्वाण भूमी

- दिल्लीत 26, अलीपूर रोड याठिकाणी बाबासाहेबांचे निवासस्थान होतो. येथेच त्यांचे निधन झाले.
- या घराचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय 2 डिसेंबर 2003 रोजी झाला.
- स्मारकाचे 21 मार्च 2016 रोजी भूमीपूजन तर 13 एप्रिल 2018 रोजी मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले.

5⃣ चैत्यभूमी

- दादर, मुंबई (महाराष्ट्र) येथे बाबासाहेबांची समाधी आहे.
- येथे (इंदू मिल) भव्य स्मारक नियोजित आहे, त्याचे 2015 मध्ये भूमीपूजन झाले आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...