Sunday, 14 April 2024

चालू घडामोडी :- 14 एप्रिल 2024

◆ उद्योगपती आणि पायलट गोपी थोताकुरा हे पहिले भारतीय अवकाश पर्यटक ठरणार आहेत.

◆ विंग कमांडर राकेश शर्मा हे 1984 साली अवकाशात जाणारे पहिले भारतीय होते.

◆ उपाध्यक्ष जगदीप धनखर यांनी प्रा. रमण मित्तल आणि डॉ. सीमा सिंग यांच्या ‘द लॉ अँड स्पिरिच्युॲलिटी: रिकनेक्टिंग द बॉण्ड’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे.

◆ 2024 मध्ये जालियावाला बाग हत्याकांडाला 105 वर्षे पूर्ण होत आहेत.

◆ अदानी ग्रीन एनर्जी गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात जगातील सर्वात मोठे अक्षय ऊर्जा पार्क तयार करणार आहे.

◆ जगजीत पावडिया यांची आंतरराष्ट्रीय नार्कोटिक्स कंट्रोल बोर्डाच्या तिसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निवड झाली आहे.

◆ न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांची राष्ट्रीय न्यायिक अकादमीचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ मध्य प्रदेशातील पारंपारिक गोंड पेंटिंगला जीआय टॅग दर्जा मिळाला आहे.

◆ ‘सच्चिदानंद मोहंती’ यांची विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ कन्नड भाषेतील प्रसिद्ध लेखिका ममता जी.  सागर यांना जागतिक साहित्य संस्थेने (WOW) ‘आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार’ प्रदान केला आहे.

◆ हैदराबादची मूळ भारतीय-अमेरिकन अभिनेत्री अवंतिका वंदनापू हिला हार्वर्ड विद्यापीठाने “दक्षिण आशियाई पर्सन ऑफ द इयर” पुरस्कार आणि पदवीने सन्मानित केले आहे.

◆ राष्ट्रपती ज्युलियस माडा बायो(सिएरा लिओन) यांनी झोम्बी ड्रग संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली.

◆ डॉ. गगनदीप कांग यांना प्रतिष्ठित जॉन डर्क्स ग्लोबल हेल्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.[कॅनडाचे गार्डनर फाउंडेशन हा पुरस्कार प्रदान करते.]

◆ सर्वाधिक मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा पुणे(8382) आहे.

◆ सर्वात कमी मतदान केंद्र असणारे मतदारसंघ/ जिल्हा सिंधुदुर्ग(918) आहे.

◆ जगातील सर्वाधिक 407 मीटर लांबीचा SkyWalk प्रकल्प अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा येथे तयार होत आहे.

◆ T20 क्रिकेट मध्ये 500 सिक्स मारणारा रोहित शर्मा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

RPF चे उल्लेखनीय ऑपरेशन्स

1] ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' :-  मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्‍थानके, फलाटावरील 1064 मुलांची सुटका करण्‍यात आली आहे.

2] मेरी सहेली पथके :- रेल्वेतील महिला प्रवाशांना, विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने मेरी सहेली पथके तैनात करण्यात आली आहेत.

3] ऑपरेशन मातृशक्ती :- ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत, महिला आरपीएफ जवानांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना मदत केली.

4] मिशन जीवन रक्षा :- मिशन जीवन रक्षा अंतर्गत, आरपीएफ जवानांनी रेल्वेचा अपघात किंवा रेल्वे-खाली आत्महत्त्या करण्यापासून अनेक जणांचे प्राण वाचवले.

5] ऑपरेशन महिला सुरक्षा :- महिला आणि मुलींना मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या जाळ्यात अडकण्यापासून 150 जणांना रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत वाचवले होते.

Note :- ‘मेरी सहेली' नावाचा कार्यक्रमही रेल्वेकडून राबविण्यात येत आहे.

पंचतीर्थ

पंचतीर्थ (Panchteerth)

- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील पाच महत्त्वाच्या स्थळांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देणारा हा उपक्रम.
- 2014 - 2015 मध्ये घोषित केलेल्या स्वदेश दर्शन योजनेंतर्गत 15 सर्किट घोषित करण्यात आली आहेत, त्यातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सर्किट अंतर्गत या पाच स्थळांचा विकास करण्यात येत आहे.

1⃣ जन्मभूमी

- महू (मध्य प्रदेश) येथे 14 एप्रिल 1891 रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.
- 2019 मध्ये महू रेल्वे स्थानकाचे नाव बदलून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे स्थानक असा केले.

2⃣ दीक्षाभूमी

- नागपूर (महाराष्ट्र) येथे बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
- 2014 मध्ये या ठिकाणाला अ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात आला.

3⃣ शिक्षण भूमी

- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी लंडन येथे असताना 10, किंग हेन्री मार्ग येथे राहिले होते.
- महाराष्ट्र सरकारने ही जागा खरेदी केली आणि 14 नोव्हेंबर 2015 रोजी नरेंद्र मोदींच्या हस्ते या स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.

4⃣ महापरिनिर्वाण भूमी

- दिल्लीत 26, अलीपूर रोड याठिकाणी बाबासाहेबांचे निवासस्थान होतो. येथेच त्यांचे निधन झाले.
- या घराचे राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करण्याचा निर्णय 2 डिसेंबर 2003 रोजी झाला.
- स्मारकाचे 21 मार्च 2016 रोजी भूमीपूजन तर 13 एप्रिल 2018 रोजी मोदींच्या हस्ते स्मारकाचे उद्घाटन झाले.

5⃣ चैत्यभूमी

- दादर, मुंबई (महाराष्ट्र) येथे बाबासाहेबांची समाधी आहे.
- येथे (इंदू मिल) भव्य स्मारक नियोजित आहे, त्याचे 2015 मध्ये भूमीपूजन झाले आहे.

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...