१० एप्रिल २०२४

आधी सुरू केलेल्या महत्त्वाच्या योजना


✔️स्टार्स योजना  - 28 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना -  7 मार्च 2019

✔️प्रधानमंत्री जन आरोग्य योजना - 23 सप्टेंबर 2018

✔️अमृत योजना  - 2015

✔️प्रधानमंत्री उज्वला योजना -  1 मे 2016

✔️सौभाग्य योजना -  25 सप्टेंबर 2017

✔️प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना - 15 फेब्रुवारी 2019

✔️राष्ट्रीय पोषण अभियान -  8 मार्च 2019

✔️वन धन योजना - 14 एप्रिल 2018

✔️उजाला योजना -  जानेवारी 2015

✔️प्रधानमंत्री जनधन योजना -  28 ऑगस्ट 2014

✔️राष्ट्रीय वयोश्री योजना - 1 एप्रिल 2017

✔️संपदा योजना - 26 एप्रिल 2017

✔️प्रधानमंत्री वय वंदना योजना - 21 जुलै 2017

✔️संकल्प योजना -  2017

✔️स्पार्क योजना - 25 सप्टेंबर 2018

✔️मानधन योजना -  12 सप्टेंबर 2019

✔️सुमन सुरक्षित मातृत्व योजना - 10 ऑक्टोंबर 2019

✔️पी एम किसान सन्माननिधी -  24 फेब्रुवारी 2019

✔️अटल आहार योजना - 28 फेब्रुवारी 2019


🔸अल्पसंख्याकांसाठी योजना - 

✔️शादी शगुन पोर्टल

✔️नई रोशनी योजना

✔️उस्ताद योजना


अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान


सुरुवात :-

राज्यात अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियानाची (अमृत) अंमलबजावणी सन 2015-16 पासून करण्यात आहे.



उद्देश :-


शहरांतील पाणी पुरवठा व मलनिःसारणाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे.


प्रत्येक कुटुंबास खात्रीशीर पाणीपुरवठयासाठी नळ जोडणी आणि सांडपाणी व्यवस्था यांचो सुनिश्चिती करणे हे अभियानाचे एक उद्दिष्ट आहे.


या अभियाना अंतर्गत राज्यातील 44 शहरे समाविष्ट असून त्यात नागरी भागातील 76 टक्के जनतेचा समावेश आहे.


अमृत 2.0 अभियान 2021-22 ते 2025 - 26 या कालावधीमध्ये राज्यातील सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये राबविण्यात येणार आहे.


अमृत 2.0 अभियानाची प्रमुख उद्दिष्टे :-


सर्व शहरातील घरांना नळजोडणी देऊन पाणी पुरवठ्याच्या बाबतीत 100 टक्के स्वयंपूर्ण करणे, जलस्रोत: पुनरुज्जीवन व शहरातील मोकळ्या जागेमध्ये उद्याने व हरितक्षेत्र विकसित करणे

44 अमृत शहरांमध्ये 100 टक्के मल प्रक्रिया व मलनि:स्सारण जोडणी देणे.

देश पिवळ्या क्रांतीच्या दिशेने

🇮🇳 भारतात पिवळ्या क्रांतीची पायाभरणी 1986 मध्ये झाली होती. 

👤 सॅम पित्रोदा पिवळ्या क्रांतीचे प्रणेते होते. 

🌼 तेलबियांची फुले प्रामुख्याने पिवळी असल्यामुळे याला पिवळी क्रांती म्हटले गेले.


🌏🌾 कृषी क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांती 👇

◾️हरित क्रांती – अन्नधान्य उत्पादनात वाढ

◾️धवल क्रांती – दुधाच्या उत्पादनात वाढ

◾️श्वेताक्रांती – रेशीम उत्पादनात वाढ

◾️नीलक्रांती – मत्स्यत्पादनात वाढ

◾️पिवळी क्रांती – तेलबिया उत्पादनात वाढ

◾️लाल क्रांती – मेंढी-शेळी उत्पादनात वाढ

◾️तपकिरी क्रांती – कोकोचे उत्पादन वाढवणे

◾️गोलक्रांती – आलू उत्पादनात वाढ

◾️सुवर्ण क्रांती – मधाचे उत्पादन

◾️रजत धागा क्रांती – अंडे उत्पादन

◾️गुलाबी क्रांती – कांदा उत्पादन

पोलीस भरती टेस्ट सिरीज

1] शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) 369
2) 547
3) 639 ✅
4) 912

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?
1) सोडियम क्लोरेट ✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3] जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर
1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
1) तीन ✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?
1)  अ 
2) ब ✅
3) ड
4) ई

6] खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?
1)  सायकल 
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅

7] 2352 डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?
1)  23.52                                       
2) 235.2
3) 230.52
4) 2.352 ✅

8] त्वरण म्हणजे ---------------- मधील बदलाचा दर होय .
1) वेग ✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन 

9] होकायंत्रात -------------चुंबक वापरतात.
1)  निकेल 
2) रबर
3) रबर
4) सूची✅

10] हॅड्रोजन आणि ----------- या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?
1)  ऑक्सीजन ✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

पंचायत राज ग्रामप्रशासन


निवडणूक खर्च मर्यादा 


पंचायत समिती सदस्य 

जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समित्या 


💬 71 ते 75 निवडणूक विभाग 

     असलेला जिल्हा 

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


जिल्हा परिषद सदस्य


💬 71 ते 75 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 4,00,000


💬 61 ते 70 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,50,000


💬 50 ते 60 निवडणूक विभाग

➖ खर्च मर्यादा - 3,00,000


▪️गावात दिवाबत्तीची सोय करणे ही जबाबदारी ग्रामपंचायतची असते 


▪️अशोक मेहता समितीने पंचायत समिती या घटकास गौण स्थान दिले आहे. 


▪️महाराष्ट्रात संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार अभियान 2000 मध्ये सुरू झाली. 


▪️निर्मल ग्राम पुरस्कार केंद्र शासनाकडून दिला जातो. 


▪️110 वी घटनादुरुस्ती विधेयक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण आहे.


▪️भारतात सर्वाधिक कटक मंडळे मध्यप्रदेश राज्यात आहेत. 

16 वा केंद्रीय वित्त आयोग


🕒कालावधी - 2026 ते 2031


✅अध्यक्ष :-  श्री. अरविंद पनगारिया  

✅सचिव :- रित्विक रंजन पांडेय 


💌4 सदस्य 


✅1. (निरंजन राजाध्यक्ष )  मनोज पांडा

✅2. अजय नारायण झा

✅3. एनी जॉर्ज

✅4. सौम्य क्रांती घोष



केंद्राने 16 व्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून मनोज पांडा यांची नियुक्ती केली


🔸मनोज पांडा, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथचे माजी संचालक, 16 व्या वित्त आयोगावर नियुक्त.


🔹पांडा यांनी निरंजन राजाध्यक्ष यांची जागा घेतली, ज्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि धोरण विश्लेषणात कौशल्य आणले.


🔸CESS हैदराबाद आणि IGIDR मुंबई येथील पार्श्वभूमीसह, पांडाच्या समावेशाचा उद्देश आयोगाच्या आर्थिक मूल्यमापनांना समृद्ध करणे आहे.


🔹16 व्या एफसीचे अध्यक्ष: डॉ. अरविंद पनागरिया


आजच्या दिवशी पोस्ट थोडी बरी नाही ठरणार पण तरीही लिहीत आहे...

MPSC vs विद्यार्थी




मागच्या वर्षी जानेवारी (२०२३) मध्ये फॉर्म्स भरून झाले,

३० एप्रिल २०२३ ला पूर्व परीक्षा पार पडली...




ऑक्टोबर २०२३ च्या जवळपास पूर्व चा निकाल लागला,

१७ डिसेंबर २०२३ ला मुख्य परीक्षा पार पडली,

मार्च २०२४मध्ये अंतिम उत्तर पत्रिका आली,




आता २०२४ चा एप्रिल आला , काही दिवसात ३० एप्रिल २०२४ उजाडेल म्हणजे पूर्व परीक्षा देऊनच १ वर्ष पूर्ण होणार,




मग पुन्हा टॅक्स असिस्टंट आणि क्लर्क साठी स्कील टेस्ट बाकी आहेत,

४-५ महिने किमान त्याच्यात जातीलच,

तिथून पुढे कधी नियुक्त्या कधी निकाल अन कधी काय....




काही सुधारणा व्हाव्यात असं कोणालाच वाटत नाही का ??




२ वर्ष जर एक परीक्षेत जात आहे ,

तर मग आयुष्याचा किती भाग एकूण परीक्षांमध्ये जात असेल ??? (जर आयुष्य ६० वर्ष पकडल तरी आयुष्याचा किमान १०% भाग तयारी मध्ये जात आहे पदवी घेतल्या नंतर, २२-२३ वर्ष आधीच गेले आहेत मग आपला एकूण ३५-४०% भाग वाया जात नाहीये का ?)




माननीय आयोगाने थोडी गती वाढवावी असं त्यांनाही वाटल पाहिजे...

कारण या काळात आर्थिक , मानसिक , शारीरिक सर्वच नुकसान विद्यार्थ्यांचं होत राहतं,

मग कितीक जण तर परीक्षांचा निकाल पाहायला पण जशे फॉर्म भरताना होते तसे राहत नाहीत...




तसाही आपल्या देशात सामान्यांचा विचार करणारे आता जन्माला येत नाहीयेत,

पण एक विचार काहीही बदल घडवू शकतो...




एका परीक्षेला १ वर्षाच्या आत मार्गी लावलेलं खूप बरं राहील...(हे पण कमी नाहीये)




बँकिंग च्या परीक्षांचे निकाल ३ महिन्यात जिकडे तिकडे होतात,




आता २१००० पोरं निकालाच्या प्रतिक्षेत आहे (क्लर्क),

७००० जण क्लर्क होतील,

बाकीचे १४००० जण पुन्हा पुढच्या २ वर्ष बरबादी कडे वाटचाल करतील...




मग याच्यात त्या भोळ्या विद्यार्थ्यांचा दोष आहे की दुसऱ्या कोणाचा ???







१४० कोटी जनता आहे त्यात जर ८३% तरुण जनता बेरोजगार असेल,

तर भारत चीन ला कधीही मागे टाकू शकत नाही ( स्वप्नात पण नाही),

सर्व दोष जनतेचा नसतो , काही दोष सिस्टीम मध्ये असतो... आणि तो बऱ्याच काळानंतर कळतो,




तरुण पिढ्या आयुष्याचा मौल्यवान काळ वाया घालवत आहे, कारण नोकऱ्याच नाही,




आमच्याकडे डॉक्टर , इंजिनियर पासून पी एच डी पर्यंत सध्या सगळेच बेरोजगार आहेत...

यामध्ये दोष त्या सर्व जनतेचा आहे का ?

चालू घडामोडी :- 09 एप्रिल 2024

◆ इंटिग्रेटेड मॅट्रेस उत्पादक स्लीपफ्रेश मॅट्रेसने बॉलीवूड सुपरस्टार विद्या बालनची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ मुंबई इंडियन्स T20 मध्ये सर्वाधिक विजय मिळविणारा पहिला संघ ठरला.

◆ अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाऊंडेशन आणि यूएस डिपार्टमेंट ऑफ एनर्जी यांच्या मदतीने जगातील सर्वात मोठा कॅमेरा तयार करण्यात आला आहे.

◆ ATP मास्टर्स स्पर्धेच्या मुख्यमधील पहिल्या फेरीत विजय मिळवणारा "सुमित नागल" हा भारताचा पहिला टेनिसपटू ठरला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Female Award इंग्लंडची फलंदाज "माइया बौचियर" यांना मिळाला आहे.

◆ मार्च महिन्याचा ICC player of month Male Award श्रीलंकेच्या "कामिंदू मेंडिसने" यांना मिळाला आहे.

◆ The idea of democracy हे पुस्तक "सॅम पित्रोदा" यांनी लिहिले आहे.

◆ कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅलेंज स्पर्धेत महिला गटात विजेतेपद मिळवणारी अनुपमा उपाध्यय भारत या देशाची खेळाडू आहे.

◆ श्रीनिवास पालिया यांची "विप्रो" उद्योग समूहाच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ पीटर पेलेग्रिनी यांची "स्लोवाकिया" या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे.

◆ भारतीय निवडणूक आयोगाने स्वतंत्र, निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक होण्यासाठी "सुविधा" पोर्टल सूरू केले आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये भारत 51व्या क्रमांकावर आहे.

◆ इकॉनोमिक इंटेलिजेंस युनिट ने प्रसिद्ध केलेल्या 2024 साठी व्यवसाय पर्यावरण क्रमवारी मध्ये सिंगापूर हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ Economic business ranking 2024 "Economics inteligens unit" कडून प्रसिध्द करण्यात आली आहे.

◆ UNO द्वारे जैव विविधता संमेलनाच्या सचिवालयाच्या कार्यकारी सचिवपदी एस्ट्रीड शोमेकर यांची निवड करण्यात आली आहे.

ऑपरेशन 'नन्हे फरिश्ते' अंतर्गत 1064 जणांची सुटका.

मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयातून 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत एप्रिल 2023 ते मार्च 2024 या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्‍थानके, फलाटावरील 1064 मुलांची सुटका करण्‍यात आली आहे.

RPF च्या इतर उल्लेखनीय ऑपरेशन्स👇👇
1] मेरी सहेली पथके :- रेल्वेतील महिला प्रवाशांना, विशेषतः एकट्या प्रवास करणाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशाने मेरी सहेली पथके तैनात करण्यात आली आहेत.

2] ऑपरेशन मातृशक्ती :- ऑपरेशन मातृशक्ती अंतर्गत, महिला आरपीएफ जवानांनी कर्तव्याच्या पलीकडे जाऊन ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रसूती झालेल्या गर्भवती महिलांना मदत केली.

3] मिशन जीवन रक्षा :- मिशन जीवन रक्षा अंतर्गत, आरपीएफ जवानांनी रेल्वेचा अपघात किंवा रेल्वे-खाली आत्महत्त्या करण्यापासून अनेक जणांचे प्राण वाचवले.

4] ऑपरेशन महिला सुरक्षा :- महिला आणि मुलींना मानवी तस्करी करणाऱ्या सिंडिकेटच्या जाळ्यात अडकण्यापासून 150 जणांना रेल्वे संरक्षण दलाने (RPF) ऑपरेशन महिला सुरक्षा अंतर्गत वाचवले होते.

5] ‘मेरी सहेली' नावाचा कार्यक्रमही रेल्वेकडून राबविण्यात येत आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...