Saturday, 6 April 2024

चालू घडामोडी :- 06 एप्रिल 2024

◆ आयपीएल 2024 मध्ये पहीले शतक झळकावणारा फलंदाज विराट कोहली ठरला आहे.

◆आयपीएल 2024 मध्ये दुसरे शतक झळकावणारा फलंदाज "जोस बटलर" ठरला आहे.

◆ RBI ने जाहीर केलेल्या द्विमासिक पतधोरण समितीच्या बैठकीत सातव्यांदा रेपो दर 6.5 टक्के कायम ठेवला आहे.

◆ हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

◆ यावर्षीची कॅन्डीडेट्स बुद्धिबळ स्पर्धा टोरांटो ,कॅनडा येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक 2024 साठी "आयुष्यमान खुराणा" ची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे.

◆ जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनल मध्ये राकेश मोहन या भारतीयाचा समावेश झाला आहे.

◆ 15 वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार 2024 SJVN Ltd. उद्योग समूहाला देण्यात आला आहे.

◆ FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार "अर्जुन एरिगैसी" हा भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पटू ठरला आहे.

◆ भारताचा बुद्धिबळ पटू अर्जून एरिगैसी जागतिक बुद्धिबळ रँकिंग मध्ये 9व्या क्रमांकावर आहे.

◆ FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार "मॅग्नसन कार्लसन" हा बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे.

◆ चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या रूद्र पांडे याने सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ जागतिक उत्तेजक विरोधी संघटना (WADA) च्या वार्षिक अहवालानुसार उत्तेजन चाचणीमध्ये सर्वाधिक दोषी असलेल्या खेळाडूच्या यादीत भारत या देशाचा प्रथम क्रमांक आहे.

◆ स्मार्ट AI रिसोर्स असिस्टंट फॉर हेल्थ (SARAH) हे WHO या संस्थेकडून लाँच करण्यात आले आहे.

◆ आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्य पदी "शायनी विल्सन" यांची निवड करण्यात आली आहे.

◆ आंतरराष्ट्रिय क्रिडा दिवस 6 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

◆ कर्नाटकच्या बंगळूरमधील 'म्हैसूर पेंट्स आणि व्हार्निश लि.' ही कंपनी देशभर चालणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी शाईच्या कुप्या पुरविण्याचे काम करते.

◆ कर्नाटक सरकार हे 1962 पासून देशभरातील निवडणुकीसाठी लागणाऱ्या शाईची निर्मिती करते.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

नवीन GI टॅग मार्च 2024

• मार्च 2024 मध्ये, भारताच्या भौगोलिक संकेत (GI) नोंदणीचा विस्तार आसाम, उत्तर प्रदेश, त्रिपुरा आणि मेघालयमधील 22 नवीन उत्पादनांसह झाला.

🏷️ आसाम - १२ उत्पादने:
1. आशरीकांडी टेराकोटा शिल्प
2. पाणी मेटेका क्राफ्ट
3. सार्थेबारी धातूचे शिल्प
4. जापी (बांबूची टोपी)
5. हातमाग उत्पादने मिसळणे
6. बिहू ढोल
7. बोडो डोखोना (बोडो महिलांचा पारंपारिक पोशाख)
8. बोडो गाम्सा (बोडो पुरुषांचा पारंपारिक पोशाख)
9. बोडो एरी रेशीम
10. बोडो ज्वमग्रा (पारंपारिक स्कार्फ)
11. बोडो थोरखा (एक वाद्य)
12. बोडो सिफुंग (एक लांब बासरी)

🏷️ उत्तर प्रदेश - 5 उत्पादने:
1. बनारस थंडाई, दूध आधारित पेय
2. बनारस तबला
3. बनारस शहनाई
4. बनारस लाल भरवामिरच
5. बनारस लाल पेडा

🏷️ त्रिपुरा - 2 उत्पादने:
1. पाचरा-रिग्नाई (पारंपारिक पोशाख)
2. माताबरी पेडा (गोड तयार करणे)

🏷️ मेघालय - 3 उत्पादने:
1. मेघालय गारो कापड विणकाम
2. मेघालय लिरनाई पॉटरी
3. मेघालय चुबिची (अल्कोहोलिक पेय)

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...