Thursday, 4 April 2024

चालू घडामोडी :- 04 एप्रिल 2024

◆ दक्षिण कोरियाच्या वैज्ञानिकांनी कुत्रिम सूर्य बनवला असून त्याचे तापमान 10 कोटी अंश सेल्सिअस पर्यंत निर्माण करून नवा विक्रम केला आहे.

◆ 01 एप्रिल 2024 च्या नवीन आकडेवारीनुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती "बर्नार्ड अरनॉल्ट" आहेत.

◆ सर्वांत श्रीमंताच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी नवव्या स्थानी आहेत.

◆ भारतातील अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी पहिल्या स्थानावर आहेत.

◆ तिन्ही सेना दलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातील पहिला 'त्रिदल तळ' हा मुंबईत उभा राहणार आहे.

◆ आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीने (आयओसी)
आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेची (आयबीए) मान्यता काढून घेतली.

◆ संपूर्ण IPL मध्ये आत्तापर्यंत सर्वात वेगवान चेंडू फेकणारा गोलंदाज "शॉन टेट" आहे.

◆ IPL 2024 मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकणारा गोलंदाज "गेराल्ड कोएत्झी (मुंबई)" आहे.

◆ दोस्ती 16 संयुक्त सरावामध्ये "भारत, श्रीलंका आणि मालदीव" देशाचा समावेश आहे.

◆ दोस्ती 16 या संयुक्त सरावाचे आयोजन मालदीव या देशात करण्यात आले आहे.

◆ अंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन द्वारे थायलंड या देशात IWF वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ थायलंड मध्ये '31 मार्च ते 11 एप्रिल' कालावधीत IWF वर्ल्ड कप 2024 चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ थायलंड मध्ये आयोजित IWF वर्ल्ड कप 2024 मध्ये भारताच्या बिंदिया राणी देवी ने कास्य पदक जिंकले आहे.

◆ My CHGS हे ॲप " केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण" मंत्रालयाकडून लाँच करण्यात आले आहे.

◆ आंतरराष्ट्रिय खाण जागरूकता दिवस 4 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो.

Latest post

महत्वाचे इतिहास प्रश्न

१. इबादत खाना का बांधण्यात आला?  अ. धर्मांवर चर्चा करणे ब. राज्याच्या चर्चेसाठी C. लोकांशी संवाद साधण्यासाठी D. यापैकी काहीही नाही  उत्तर: अ...