२९ मार्च २०२४

लक्षात ठेवा!

✅ भाषिक तत्त्वावर स्थापन झालेले भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश (1953)

✅ भारतातील पहिले 100% साक्षर राज्य : केरळ

✅ भारतातील पहिले सेंद्रिय राज्य व पहिले निर्मल राज्य : सिक्कीम

✅ प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटणारे पहिले राज्य : त्रिपुरा

✅ जन-सुरक्षा कायदा करणारे पहिले राज्य : आंध्र प्रदेश 

✅ सैगिंगविरोधी कायदा करणारे पहिले राज्य : तामिळनाडू

✅ मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे पहिले राज्य : पश्चिम बंगाल

✅ लोकायुक्त संमत करणारे पहिले राज्य : उत्तराखंड

✅ देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य : दिल्ली

✅ केरोसीन थेट लाभ हस्तांतरण (DBT) राबविणारे पहिले राज्य : झारखंड

✅ मानवी दूध बँक (जीवनधारा) चालविणारे पहिले राज्य : राजस्थान (जयपूर), 26 मार्च 2014

✅ भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य : हिमाचल प्रदेश

✅ भारतातील पहिले बाल न्यायालय सुरू करणारे राज्य (कें.प्र.) : दिल्ली

✅ भारतातील पहिले महिला न्यायालय सुरू करणारे राज्य : प. बंगाल (मालदा, 2013)

✅ मिनरल वॉटर बाटल्यांवर बंदी घालणारे पहिले राज्य : सिक्किम

✅ मृदा स्वास्थ्य कार्ड सुरू करणारे पहिले राज्य : पंजाब

✅ सेवा हमी कायदा (RTS) संमत करणारे पहिले राज्य : मध्य प्रदेश (18 ऑगस्ट 2020); दुसरे : बिहार

✅ सेवा हमी कायद्यातील 369 सेवांची ऑनलाईन हमी देणारे पहिले राज्य : महाराष्ट्र

✅ ई-रेशनकार्ड वितरित करणारे पहिले राज्य (कें.प्र.) : दिल्ली

✅ ई-रिक्षा सुरू करणारे पहिले राज्य : दिल्ली

✅ ई-कॅबिनेटचा वापर करणारे भारतातील पहिले राज्य : आंध्र प्रदेश

मुलभुत कर्तव्य (Fundamental Duties)


◼️मुलभूत कर्तव्य मूळ घटनेत नव्हती तर स्वर्णसिंह समितीच्या (1976 च्या) शिफारशीनुसार : 42 वी घ.दु. 1976 ला घटनेत नवीन भाग 4A समाविष्ठ केला त्यात कलम 51A समाविष्ठ करून त्यात मूलभूत कर्तव्ये देण्यात आली. त्यात 10 मूलभूत कर्तव्य समाविष्ठ करण्यात आली.

◻️स्वर्णसिंह समितीने सांगितलेले कोणत्या शिफारशी घटनेत घेण्यात आल्या नाहीत 👇

    🔻कर देणे  

    🔻कर्तव्य पालन न केल्यास दंड

◼️मूलभूत कर्तव्यांचा अमल : 3 जानेवारी 1977

◻️मूलभूत कर्तव्य कोणत्या देशाकडून घेतली : रशिया.

◼️86 वी घ.दु. 2002 ला 11वे/K मूलभूत कर्तव्य घटनेत समाविष्ठ करण्यात आले.

◻️कोणकोणत्या देशात मूलभूत कर्तव्य आहेत जपान, व्हिएतनाम, नेदरलँड, रशिया, भारत.

◼️मूलभूत कर्तव्य नसणारे देश: अमेरिका, कॅनडा, फ्रान्स, जर्मना, आस्ट्रेलिया

◻️मूलभूत कर्तव्ये- न्यायप्रविष्ठ नाहीत हे केवळ भारतीय नागरिकानाच लागु आहेत.

◼️हेतू : घटनाबाह्य व विध्वंसक कृत्याना नियंत्रणात ठेवणे.

◻️भारतीय घटनेचा सर्वात महत्त्वाचा भाग असून सर्वात दुर्लक्षित भाग आहे.

◼️मूलभूत हक्कांना पूरक आहेत.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

NATO चर्चेत आहे त्याबद्दल जाणून घेवू

➢स्वीडन अधिकृतपणे NATO चा 32 वा सदस्य बनला आहे.

➢ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ने अलीकडेच युरोपमधील आपला सर्वात मोठा लष्करी सराव स्टेडफास्ट डिफेंडर 2024 सुरू केला.

➢ नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) ने अलीकडेच शीतयुद्ध काळातील सुरक्षा कराराचे औपचारिक निलंबन जाहीर केले आहे.

➢ फिनलंड नाटोचा 31 वा सदस्य बनला.

✔️उत्तर अटलांटिक करार संघटना (NATO).
➢ निर्मिती : ४ एप्रिल १९४९.
➢ मुख्यालय : ब्रसेल्स, बेल्जियम
➢ सरचिटणीस : जेन्स स्टोल्टनबर्ग (नॉर्वे).
➢ एकूण सदस्य : 32 (स्वीडन).
➢ वॉशिंग्टन कराराद्वारे स्थापित.

➢ सध्या नाटोचे 32 सदस्य आहेत.
➢ 1949 मध्ये, युतीचे 12 संस्थापक सदस्य होते: बेल्जियम, कॅनडा, डेन्मार्क, फ्रान्स, आइसलँड, इटली, लक्झेंबर्ग, नेदरलँड्स, नॉर्वे, पोर्तुगाल, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स.
➢ इतर सदस्य देश आहेत: ग्रीस आणि तुर्किये (1952), जर्मनी (1955), स्पेन (1982), झेक प्रजासत्ताक, हंगेरी आणि पोलंड (1999), बल्गेरिया, एस्टोनिया, लाटविया, लिथुआनिया, रोमानिया, स्लोव्हाकिया आणि स्लोव्हेनिया (2004). ), अल्बानिया आणि क्रोएशिया (2009), मॉन्टेनेग्रो (2017) आणि उत्तर मॅसेडोनिया (2020), फिनलंड (2023) आणि स्वीडन (2024).

भारत स्वातंत्र्याचा कायदा, 1947

◻️5 जूलै 1947 रोजी ब्रिटीश संसदेत मांडला.

◼️18 जूलै 1947 रोजी राजाची मान्यता.

◻️3 जून 1947 रोजी माऊंट बॅटन योजना जाहीर (फाळणीची योजना) ही योजना मुस्लीम लीग व काँग्रेसने मान्य केली. भारत स्वातंत्र्याचा कायदा-1947 संमत करून योजना लगेचच अंमलात आली.

🟠 कायद्यातील तरतुदी

🔻ब्रिटीश राजवट संपुष्टात 15 ऑगस्ट 1947 पासून स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र - भारत, पाकिस्तान निर्माण झाले.

🔻व्हाईसरॉय पद रद्द- त्याजागी- प्रत्येक देशाच्या मंत्रीमंडळाच्या सल्ल्यानुसार ब्रिटीश सम्म्राट 'गर्व्हनर जनरल' नियुक्त करेल.

🔻कोणताही कायदा रद्द करण्याचा अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभांना देण्यात आला.

🔻भारतमंत्री पद रद्द- त्याजागी 'राज्यसचिव'.

🔻संस्थानांचा अधिकार- भारतात/पाकिस्तानात/स्वतंत्र राहण्याची मुभा.

🔻नविन राज्यघटना तयार होईपर्यंत- 1935 च्या कायद्यानुसार राज्यव्यवस्था पाहिली जाईल.

🔻इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून 'भारताचा सम्राट' हे शब्द काढण्यात आले.

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️