Wednesday, 27 March 2024

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती' सुरू केले.

◆ SEBI ने वैकल्पिक आधारावर T+0 सेटलमेंटची बीटा आवृत्ती मंजूर केली.(SEBI ची स्थापना 21 फेब्रुवारी 1992 रोजी वैधानिक संस्था म्हणून करण्यात आली.)

◆ काश्मीर खोऱ्यात, आशियातील सर्वात मोठे ट्युलिप गार्डन अधिकृतपणे लोकांसाठी खुले करण्यात आले.

◆ श्रीजा अकुलाने WTT फीडर स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले.

◆ मित्तलबेन पटेल यांनी लिहिलेल्या 'सरनामा वगर्ण मानवियो" या पुस्तकावर आधारित गुजराती चित्रपट "भारत म्हारो देश चे" ने गुजरात सरकारद्वारे आयोजित 'गुजरात राज्य पुरस्कार 2021 मध्ये 6 पुरस्कार जिंकले आहेत.

◆ मुंबई ने बिजिंग या शहराला मागे टाकून आशियातील सर्वाधिक अब्जाधिशांचे शहर बनले आहे.

◆ हुरून रिसर्च 2024 च्या ग्लोबल रिच लिस्ट नुसार जगातील अब्जाधिश शहराच्या यादीत मुंबई शहर तिसऱ्या स्थानावर पोहचले आहे.

◆ जगात सर्वाधिक अब्जाधीश च्या यादीत न्युयॉर्क हे शहर प्रथम क्रमांकावर आहे.

◆ जगात सर्वाधिक अब्जाधीश असलेल्या देशांच्या यादीत चीन हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारतीय वंशाचे डॉ. टी एन सुब्रमण्यम(गणित तज्ञ) यांचे निधन झाले. ते 'जनरल मोटर्स' वाहन कंपनीचे संस्थापक होते.

◆ महिला आशियाई क्रिकेट करंडक स्पर्धा 2024 या श्रीलंका देशात खेळवल्या जाणार आहेत.

◆ स्वामी स्मरणानंद यांचे निधन झाले. ते 2017 या वर्षी रामकृष्ण मिशन चे अध्यक्ष(16 वे) झाले होते.

◆ भारताचा आघाडीचा टेबल टेनिस पटू जी. साथीयान जागतिक क्रमवारीत 60व्या स्थानी पोहचला आहे.

◆ लोकसभा निवडणुक 2024 साठी केंद्रिय निवडणुक आयोगाने दिव्यांगासाठी 'सक्षम' हे ॲप लाँच केले आहे.

◆ जागतिक रंगभूमी दिवस दरवर्षी 27 मार्च रोजी साजरा करण्यात येतो.

◆ 27 मार्च या दिवशी 1961 पासून जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्यात येतो.[पहिला जागतिक रंगभूमी दिन 1962 मध्ये साजरा झाला]

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...