Saturday, 23 March 2024

चालू घडामोडी :- 22 मार्च 2024

◆ चांद्रयान- 3' मोहिमेसाठी अवकाश क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा 'एव्हिएशन वीक पुरस्कार' इस्रोला मिळाला आहे.

◆ महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर 2023 मध्ये समिती स्थापन केली होती.

◆ 18 मार्च ते 31 मार्च 2024 दरम्यान, पूर्व समुद्रकिनाऱ्यावर, अमेरिका आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय त्रि-सेवा मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण (HADR) युद्धसराव पार पडणार आहे.

◆ ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांनी भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियममध्ये भारताच्या पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स स्टेडियम अँड ॲक्वेदिक सेंटरचे अनावरण केले.

◆ झोमॅटोने 'शुद्ध शाकाहारी (प्योर व्हेज) डिलिव्हरी फ्लीट सुरु केला आहे. जो ग्रीन डिलिव्हरी बॉक्समध्ये 'शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट्‌समधून ऑर्डर घेईल.

◆ दक्षिण कोरियाकडून 'लोकशाहीसाठी AI जोखीम इशारा परिषदेचे आयोजन करण्यात आले.(दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष :- यून सुक योल)

◆ मिझोरामचे माजी मुख्य सचिव लालमलसावमा यांची लोकायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भरत नाट्यममधील योगदानाबद्दल डॉ. उमा रेळे यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ राजस्थानने धरणे, जलाशय आणि कालव्यांमधील पाण्याची पातळी आणि उपलब्धतेची वास्तविक- वेळ माहितीसाठी एक समर्पित पोर्टल सुरु केले आहे.

◆ UN अहवालानुसार "प्लॅनेट ऑन द ड्रिंक: 2014-2023 है रेकॉर्डवरील सर्वात उष्ण दशक ठरले.

◆ भारत निवडणूक आयोगाने भूषण गगराणी यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नवे आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ नयना जेम्सने तिसऱ्या इंडियन ओपन जंपमध्ये सुवर्णपदक जिंकले.(चंद्रशेखरन नायर स्टेडियमवर पहिली इंडियन ओपन जंप स्पर्धा झाली.)

◆ मुस्तफा सुलेमान यांची मायक्रोसॉफ्टचे नवे एआय प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.(AI लॅबचे सह-संस्थापक :- मुस्तफा सुलेमान)

◆ 2024 मध्ये पॅरिस याठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी 'शरथ कमल'(खेळ :- टेबल टेनिस) खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणार आहे.

◆ पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून 'मेरी कोम' यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रशियातील भारताचे राजदूत म्हणून विनय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ सौमेंदु बागची यांच्या इराण या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ चिली देशात भारताचे राजदूत म्हणून अभिलाषा जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ टी. आर्मस्ट्रांग चांगसन यांची क्युबा या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...