Friday, 15 March 2024

तुम्हाला हे पाठ आहेत ना - काही महत्वाची कलमे



1. घटना कलम क्रमांक 14

कायद्यापुढे समानता


2. घटना कलम क्रमांक 15

भेदभाव नसावा


3. घटना कलम क्रमांक 16

समान संधी


4. घटना कलम क्रमांक 17

अस्पृश्यता निर्मूलन


5. घटना कलम क्रमांक 18

पदव्यांची समाप्ती


6. घटना कलम क्रमांक 19 ते 22

मूलभूत हक्क


7. घटना कलम क्रमांक 21 अ

प्राथमिक शिक्षण


8. घटना कलम क्रमांक 24

बागकामगार निर्मूलन


9. घटना कलम क्रमांक 25

धर्म स्वातंत्र्याचा अधिकार


10. घटना कलम क्रमांक 26

धार्मिक संस्था स्थापन करणे व चालवणे


11. घटना कलम क्रमांक 28

धार्मिक शिक्षण देण्यावर बंधी


12. घटना कलम क्रमांक 29

स्वतःभाषा व लिपी, संस्कृती जतन करणे


13. घटना कलम क्रमांक 30

अल्पसंख्यांक समाजाला शिक्षण संस्था स्थापन करण्याचा अधिकार


14. घटना कलम क्रमांक 40

ग्राम पंचायतीची स्थापना


15. घटना कलम क्रमांक 44

समान नागरिक कायदा


16. घटना कलम क्रमांक 45

6 ते 14 वयोगटातील मुळा मुलींना मोफत व सक्तीचे शिक्षण


17. घटना कलम क्रमांक 46

शैक्षणिक सवलत


18. घटना कलम क्रमांक 352

राष्ट्रीय आणीबाणी


19. घटना कलम क्रमांक 356

राज्य आणीबाणी


20. घटना कलम क्रमांक 360

आर्थिक आणीबाणी


21. घटना कलम क्रमांक 368

घटना दुरूस्ती


22. घटना कलम क्रमांक 280

वित्त आयोग


23. घटना कलम क्रमांक 79

भारतीय संसद


24. घटना कलम क्रमांक 80

राज्यसभा


25. घटना कलम क्रमांक 81

लोकसभा


26. घटना कलम क्रमांक 110

धनविधेयक


27. घटना कलम क्रमांक 315

लोकसेवा आयोग


28. घटना कलम क्रमांक 324

निर्वाचन आयोग


29. घटना कलम क्रमांक 124

सर्वोच्च न्यायालय


30. घटना कलम क्रमांक 214

उच्च न्यायालय


विधानसभा



विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:


घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत


विधानसभेची रचना :

170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.


राखीव जागा :

घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.


निवडणूक : 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.


उमेदवारांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.


गणसंख्या : 1/10

अधिवेशन : 

दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


सभापतीचे कार्य आणि अधिकार :

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.

2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.

3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.

4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.


जनरल माहिती :

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.

2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.

3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.

4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.

6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.

7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.

8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:



लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.


सभासदांची संख्या :

घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.


मतदारसंघ निर्धारण आयोग :

या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.


उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


निवडणूक पद्धत :

लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.


लोकसभेचा कार्यकाल :

पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.


सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.


बैठक किंवा अधिवेशन :

घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


गणसंख्या :

कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.


पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)


लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.


कार्य :

1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.

2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.

3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.

4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.

5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.

6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.

7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.

8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.

इ.स. 1883 :- इल्बर्ट बिल


🖍 ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात युरोपीय व्यक्तींकरीता ब्रिटिश फौजदारी कायदा तर भारतीय लोकांसाठी मोगलकालीन फौजदारी कायदा लागू करण्यात येत असे. 


🖍 1857 च्या उठावानंतर मात्र परीस्थिती बदलली व इंग्रज लोकांप्रमाणे भारतीय लोकंही ब्रिटिश  

राजसत्तेचे प्रजानन बनल्याने सर्वांनाच ब्रिटिश फौजदारी कायदा लागू करण्यात आला. परंतु युरोपीयनांविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार मात्र भारतीय न्यायाधीशांना दिल्या 

गेला नाही. 


🖍 1873 च्या क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना  

युरोपियनांविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले.  

हा अधिकार उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना होता. परंतु जिल्हा स्तरावर मात्र फक्त युरोपीयन 

न्यायाधीशांनाच होता. 


🖍 करिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सुधारणा करण्याचे काम 1882 मध्ये रिपन सरकारने हाती घेतले त्यावेळी सनदी सिव्हील सर्व्हिसमध्ये असलेले बिहारीलाल गुप्ता यांनी न्यायदान पध्दतीतील हे दोष रिपनच्या नजरेस आणून दिले. 


🖍 परेसिडेंन्सी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांना युरोपीयन गुन्हेगांरांविरुध्द खटले चालविण्याचा असलेला अधिकार जिल्ह्याच्या ठिकाणी बदली होताच उच्च पदी नेमणूक होऊनही त्यांनी तो गमावला होता. 


🖍 यावेळी रिपन यांनी भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांनाही युरोपीय न्यायाधीशांप्रमाणे युरोपीय गुन्हेगारांविरुध्द खटले चालविण्याचा अधिकार दिला जावा अशी शिफारस केली. 


🖍 सदरील प्रस्तावावर इंडिया कौन्सिल मध्येही चर्चा झाली. परंतु इंडिया कौन्सिलचा विधीतज्ज्ञ सर हेन्री मेन हा त्यावेळी पॅरीसला होता. त्याच्याकडे विचारणा केली असता रिपनने योजलेली सुधारणा ही युरोपीय तसेच अँग्लो इंडियन गटाला बोचक ठरण्याचा संभव असल्याने प्रथम या गटांशी विचार विमर्श कारावा अशी सूचना त्याने केली. 

  परंतु त्याचे हे पत्र चुकून भारतमंत्र्यांच्या खिशात राहून गेल्याने रिपन पर्यंत ते पोहोचलेच नाही व यामुळे आपण योजलेल्या सुधारणेला इंडीया कौन्सिल व भारतातील ब्रिटिश अधिकारी वर्ग यांच्याकडून विरोध होणार नाही असे रिपनला वाटल्याने त्याने त्या दिशेने पाऊल उचलले.


🖍 तयाच्या मार्गदर्शनाखालील सी.पी. इलबर्ट या कार्यकारी मंडळाच्या विधीसदस्याने तद्संबंधी विधेयक तयार करुन 2 फेब्रुवारी 1883 रोजी विधीमंडळापुढे मान्यतेकरीता ठेवले. 


🖍 यान्वये उच्च न्यायालयाकडे अपील करण्याचा आरोपीचा हक्क कायम ठेवून भारतीय जिल्हा 

न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना युरोपीय आरोपीविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार देण्याची तरतूद त्या विधेयकात केली होती. 


🖍 परंतु विधेयक सादर होताच विधीमंडळातून ब्रिटिश सदस्यांनी याबद्दलची तीव्र नापसंती व्यक्त केली व लगेचच भारतातील युरोपीय व अँग्लो इंडियन समाज हा रिपन विरुध्द भडकला. 


🖍 28 फेब्रुवारी 1883 रोजी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये त्यांनी मोठी सभा घेतली व इलबर्ट 

बिलाविरुध्द आंदोलन सुरु करण्याकरीता अँग्लो इंडियन ॲण्ड युरोपीयन डिफेन्स असोसिएशन या  

नावाची संघटना देखील स्थापन करण्यात आली. तसेच युरोपीय महिलांचीही एक समिती तयार  

करण्यात आली. 


🖍 सटेटस्मन या केवळ एका इंग्रजी वृत्तपत्राचा अपवाद वगळता इंग्रजी वृत्तपत्रेप्रामुख्याने सुशिक्षित  

भारतीयांविरुध्द विषारी प्रचार करु लागली. 


🖍 इग्रजी वृत्तपत्रांव्दार युरोपीय व अँग्लो इंडियन गटांनी रिपनवर कठोर शब्दात टिकेचे प्रहार तर केलेच, परंतु कलकत्त्याच्या भर रस्त्यावर त्याच्याशी उद्दामपणे वागून त्याची उघडपणे अप्रतिष्ठा करण्याइतपत त्यांची मजल गेली होती. 


🖍 आता पार्लमेंटच्या बऱ्याच सदस्यांनी रिपनच्या विरोधकांचा पक्ष उचलून धरल्याने रिपनला उघडपणे पाठिंबा देणे हे ग्लॅडस्टनला शक्य झाले नाही. 


🖍 बऱ्याच विचाराअंती रिपनने त्यात फेरफार करुन नव्याने ते विधेयक विधीमंडळापुढे ठेवले व 25 जानेवारी 1884 रोजी ते पारीत झाले. 


🖍 यान्वये भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना युरोपीय आरोपीविरुध्द फौजदारी खटला चालविण्याचा अधिकार दिला गेला असला, तरी देखील सदरील खटला ज्युरी समाेर चालवावा व ज्युरींपैकी निम्मे सदस्य तरी युरोपीय असावेत अशी मागणी करण्याचा अधिकार हा युरोपीयनांना देण्यात आला. 


🖍 अखेर इलबर्ट बिल पास झाले, तरीही वर्णभेदावर आधारीत पक्षपात नाहीसा करणे व युरोपीय न्यायाधीशांच्या बरोबरींने भारतीय न्यायाधीशांना खटले चालविण्याचा अधिकार देणे हे या बिलामागील मुख्य उद्दिष्ट मात्र अत्यंत काैतुकास्पद व हिम्मतीने प्रयत्न करुन सुध्दा लॉर्ड रिपन यास साध्य करीता आले नाही.

विधेयक बद्दल थोडक्यात माहिती


{A} साधारण विधेयक -
       - खाजगी सदस्य किंवा मंत्री दोन्ही पण मांडू शकता.
      -  लोकसभा किंवा राज्यसभा
      -  पारित होण्याची पद्धत - साधे बहुमत
     - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी नाही
     - संयुक्त बैठक आहे

{B}  धनविधेय
   - फक्त मंत्री मांडू शकतात
    - फक्त लोकसभेमध्ये
    - साधे बहुमत
    - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते
   - संयुक्त बैठक नाही

{C}  वित्तीय विधेयक -
   - फक्त मंत्री मांडू शकतात
   - फक्त लोकसभेमध्ये
   - साधे बहुमत
-  मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागते   -  संयुक्त बैठक आहे

{D} वित्तीय विधेयक 2

     - खाजगी सदस्य किंवा मंत्री मांडू शकतात
    - लोकसभा किंवा राज्यसभा
    - साधे बहुमत
    - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत नाही
    -  संयुक्त बैठक आहे

{E}.  घटनादुरुस्ती विधेयक
    - खाजगी सदस्य किंवा मंत्री
    - लोकसभा किंवा राज्यसभा
    - विशेष बहुमत IMP
    - मांडताना राष्ट्रपतींची परवानगी लागत           नाही.
   24 घटना दुरुस्ती 1971 नुसार परवानगी देणे बंधनकारक.
   -  संयुक्त बैठक नाही

तैनाती फौज पद्धत (Subsidiary Force)



०१. तैनाती फौजेची सुरूवात प्रथम फ्रेंचांनी केली. १७४८ मध्ये डूप्ले व चंदासाहेब यांच्यात करार होऊन फ्रेंचांनी आपली फौज नबाबाच्या मदतीसाठी ठेवली. त्याबद्दल नबाबने डूप्लेला पॉंडिचेरीजवळचा मुलूख तोडून दिला. यातच पुढे इंग्रजांनी सुरू केलेल्या तैनाती फौजेचा उगम आहे. अशाच तऱ्हेचा करार १७६० मध्ये इंग्रजांनी मीर कासीमशीही केला होता.


१८ व्या शतकाच्या अखेरच्या काळात शांततामय वातावरण निर्माण झाले तर इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीनंतर तयार झालेले अतिरिक्त उत्पादन भारताच्या बाजारात खपवता येईल असा ब्रिटीश व्यापाऱ्यांचा कयास होता. यासाठी कंपनीने तीन मार्ग अवलंबिले. थेट युद्ध पुकारणे व पूर्वी अंकित केलेल्या प्रदेशावरील आपली पकड मजबूत करणे. यासोबतच तैनाती फौज पद्धत त्यापैकी एक होती.


०२. वॉरन हेस्टिंग्जने थोड्या फार प्रमाणात तैनाती फौजेची योजना अंमलात आणली होती. पण वेलस्लीने भारतात खऱ्या अर्थाने तैनाती फौजेचा प्रसार केला आणि एतद्देशीय संस्थानिकांना ब्रिटिश अंमलाखाली आणले व भारताचे ब्रिटिश साम्राज्यात रूपांतर केले.


०३. वेलस्लीने प्रथम निजामाकडची फ्रेंच फौज काढून टाकण्यास सांगून त्या जागी इंग्रज फौज ठेवून तैनाती फौजेच्या योजनेला मूर्त स्वरूप दिले. पुढे त्याने या योजनेची सक्ती केली व जे एतद्देशीय संस्थानिक फौज ठेवून घेणार नाहीत, अशांबरोबर काहीतरी निमित्त काढून युद्धे केली.


०४. आल्फ्रेड लायलने भारतीय युद्धात कंपनीच्या भाग घेण्याबाबत चार अवस्था सांगितल्या आहेत.


* आपल्या भारतीय मित्रांना युद्धात मदत करण्यासाठी कंपनी आपली फौज किरायाने पाठवत असे. ह्याअंतर्गत १७६८ मध्ये निजामाशी तह झाला होता.


* आपल्या मित्रांच्या मदतीने कंपनी स्वतःच युद्धात भाग घेऊ लागली


* कंपनीची मित्रराज्ये कंपनीला सैनिकाऐवजी पैसा पुरवू लागली. ज्याच्या आधारावर कंपनीने इंग्रज अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सानिक भरती करून त्यांना प्रशिक्षण देऊन शस्त्रसज्ज करण्यास प्रारंभ केला. पुढे गरजेनुसार हेच प्रशिक्षित सैन्य मित्रराज्यांना देऊन त्याऐवजी कंपनी पैसा घेऊ लागली. उदा. १७९८ चा हैद्राबाद तह


* शेवटच्या अवस्थेत कंपनीने मित्रराज्यांच्या संरक्षणाची जबाबदारी पत्करून त्याकरिता तैनाती फौज त्या राज्यात ठेवणे सुरु केले. त्याऐवजी कंपनी पैसे न घेता त्या राज्यातून काही प्रदेश घेऊ लागली. १८०० मध्ये निजामाशी झालेला तह.


०५. सर्वप्रथम प्रयोग १७६५ मध्ये अवधसोबत केला. यावेळी राजधानी लखनौत इंग्रज रेसिडेंट ठेवण्याचे अवधने मान्य केले. १७८७ मध्ये कंपनीने कर्नाटक नवाबाला विनंती केली कि त्याने इंग्रजान्शिवाय दुसऱ्या युरोपियन शक्तीशी संबंध ठेऊ नये.


०६. १७९८ मध्ये सर जॉन शोअरने अवधच्या नवाबाशी तह करताना अशी अट घातली कि नवाबाने इंग्रजांव्यतिरिक्त इतर युरोपियनांना सेवेत घेऊ नये व कोणताही संबंध ठेऊ नये.


०७. पैशाऐवजी प्रदेशाची मागणी करणे हा एक नैसर्गिक टप्पा होता. भारतीय राज्ये धन कबुल करीत असत पण त्यांची फेड न झाल्याने रक्कम वाढत जाई. म्हणून कंपनीने तैनाती फौजेचा खर्च म्हणून प्रदेशाची मागणी सुरु केली. ह्या प्रदेशावर कंपनीची सार्वभौम सत्ता प्रस्थापित होत असे.


०८. ब्रिटिशांनी आपल्या सहा बटालियन हैदराबादेत ठेऊन फ्रेंचांना हाकलून दिले. या फौजेचा खर्च म्हणून ब्रिटिशांनी २ लाख ४१ हजार ७१० पौंड निजामकडून वसूल केले. फौजेचा वाढता खर्च झेपेनासा झाल्याने निजामाने आपल्या संस्थानचा काही भाग ब्रिटीशांच्या हवाली केला.

घटनेतील मूलभूत कर्तव्य


1.      घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  


2.      ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 


3.      भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 


4.      देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 


5.      धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 


6.      आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 


7.      वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 


8.      विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 


9.      सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 


10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 


11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.

महत्वपूर्ण युद्ध


✳️हाईडेस्पीज का युद्ध (Battle of the Hydaspes)

🔻समय : 326 ई.पू.

🔻किसके बीच – सिकंदर और पंजाब के राजा पोरस के बीच हुआ, जिसमे सिकंदर की विजय हुई।


✳️कलिंग की लड़ाई (Kalinga War)

🔻समय : 261 ई.पू.

🔻किसके बीच – सम्राट अशोक ने कलिंग पर आक्रमण किया। युद्ध के रक्तपात को देखकर उसने युद्ध न करने की कसम खाई।


✳️सिंध की लड़ाई 

🔻समय : 712 ई.

🔻किसके बीच – मोहम्मद कासिम ने अरबों की सत्ता स्थापित की।


✳️तराईन का प्रथम युद्ध (Battles of Tarain) 

🔻समय : 1191 ई.

🔻किसके बीच – मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच हुआ, जिसमे चौहान की विजय हुई।


✳️तराईन का द्वितीय युद्ध (2nd Battles of Tarain)

🔻समय : 1192 ई.

🔻किसके बीच – मोहम्मद गौरी और पृथ्वी राज चौहान के बीच हुआ, जिसमे मोहम्मद गौरी की विजय हुई।


✳️चदावर का युद्ध (Battle of Chandawar)

🔻समय : 1194 ई.

🔻किसके बीच – इसमें मुहम्मद गौरी ने कन्नौज के राजा जयचंद को हराया।


✳️पानीपत का प्रथम युद्ध (First Battle of Panipat)

🔻समय : 1526 ई.

🔻किसके बीच – मुग़ल शासक बाबर और इब्राहीम लोधी के बीच।


✳️खानवा का युद्ध (Battle of Khanwa)

🔻समय : 1527 ई.

🔻किसके बीच – बाबर ने राणा सांगा को पराजित किया।


✳️घाघरा का युद्ध (Battle of Ghagra)

🔻समय : 1529 ई.

🔻किसके बीच – बाबर ने महमूद लोदी के नेतृत्व में अफगानों को हराया।


✳️चौसा का युद्ध (Battle of Chausal) 

🔻समय : 1539 ई.

🔻किसके बीच – शेरशाह सूरी ने हुमायु को हराया


✳️कन्नौज/बिलग्राम का युद्ध (Battle of Kanauj or Billgram) 

🔻समय : 1540 ई.

🔻किसके बीच – एकबार फिर से शेरशाह सूरी ने हुमायूँ को हराया व भारत छोड़ने पर मजबूर किया।


✳️पानीपत का द्वितीय युद्ध (Second Battle of Panipat) 

🔻समय : 1556 ई.

🔻किसके बीच – अकबर और हेमू के बीच।


✳️तालीकोटा का युद्ध (Battle of Tallikota) 

🔻समय : 1565 ई.

🔻किसके बीच – इस युद्ध से विजयनगर साम्राज्य का अंत हो गय।


✳️हल्दीघाटी का युद्ध (Battle of Haldighati) 

🔻समय : 1576 ई.

🔻किसके बीच – अकबर और राणा प्रताप के बीच, इसमें राणा प्रताप की हार हुई।


✳️पलासी का युद्ध (Battle of Plassey) 

🔻समय : 1757 ई.

🔻किसके बीच – अंग्रेजो और सिराजुद्दौला के बीच, जिसमे अंग्रेजो की विजय हुई और भारत में अंग्रेजी शासन की नीव पड़ी।


✳️वांडीवाश का युद्ध (Battle of Wandiwash) 

🔻समय : 1760 ई.

🔻किसके बीच – अंग्रेजो और फ्रांसीसियो के बीच, जिसमे फ्रांसीसियो की हार हुई।


✳️पानीपत का तृतीय युद्ध (Third Battle of Panipat) 

🔻समय : 1761 ई.

🔻किसके बीच – अहमदशाह अब्दाली और मराठो के बीच, जिसमे फ्रांसीसियों की हार हुई।


✳️बक्सर का युद्ध (Battle of Buxar)

🔻समय : 1764 ई.

🔻किसके बीच – अंग्रेजो और शुजाउद्दौला, मीर कासिम एवं शाह आलम द्वितीय की संयुक्त सेना के बीच, जिसमे अंग्रेजो की विजय हुई।


✳️परथम आंग्ल मैसूर युद्ध 

🔻समय : 1767-69 ई.

🔻समाप्त - मद्रास की संधि 

🔻किसके बीच – हैदर अली और अंग्रेजो के बीच, जिसमे अंग्रेजो की हार हुई।


✳️दवितीय आंग्ल मैसूर युद्ध 

🔻समय : 1780-84 ई.

🔻समाप्त - मंगलोर की संधि 

🔻किसके बीच – हैदर अली और अंग्रेजो के बीच, जो अनिर्णित छूटा।


✳️ ततीय आंग्ल मैसूर युद्ध 

🔻समय : 1790-92 ई.

🔻समाप्त - श्रीरंगपट्टनम की संधि 

🔻किसके बीच – टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच लड़ाई संधि के द्वारा समाप्त हुई।


✳️चतुर्थ आंग्ल मैसूर युद्ध 

🔻समय : 1797-99 ई.

🔻किसके बीच – टीपू सुल्तान और अंग्रेजो के बीच, टीपू की हार हुई और मैसूर शक्ति का पतन हुआ।


✳️चिलियान वाला युद्ध 

🔻समय : 1849 ई.

🔻किसके बीच – ईस्ट इंडिया कंपनी और सिखों के बीच हुआ था जिसमे सिखों की हार हुई।


✳️भारत चीन सीमा युद्ध 

🔻समय : 1962 ई.

🔻किसके बीच – चीनी सेना द्वारा भारत के सीमा क्षेत्रो पर आक्रमण। कुछ दिन तक युद्ध होने के बाद एकपक्षीय युद्ध विराम की घोषणा। भारत को अपनी सीमा के कुछ हिस्सों को छोड़ना पड़ा।


✳️भारत पाक युद्ध (Indo-Pakistani War) 

🔻समय : 1965 ई.

🔻किसके बीच – भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। भारत पाकिस्तान के बीच शिमला समझौता हुआ।


✳️भारत पाक युद्ध (Indo-Pakistani War) 

🔻समय : 1971 ई.

🔻किसके बीच – भारत और पाकिस्तान के बीच युद्ध जिसमे पाकिस्तान की हार हुई। फलस्वरूप बांग्लादेश एक स्वतन्त्र देश बना।


✳️कारगिल युद्ध (Kargil War)

🔻समय : 1999 ई.

🔻किसके बीच – जम्मू एवं कश्मीर के द्रास और कारगिल क्षेत्रो में पाकिस्तानी घुसपैठियों के बीच।

1857 चा उठाव आणि त्यावरील मते



♦️ शिपायांचे बंड:-  सर जॉन, सिले सर जॉन लॉरेन्स ,सर सय्यद अहमदखान  किशोरचंद्र मित्रा .


♦️ राष्ट्रीय उठाव : अशोक मेहता .


♦️ पर्णत : बंड अथवा पूर्णतः स्वातंत्र्ययुद्धही नव्हते - गो . स . सरदेसाई व  प्रा . ना . के . बेहेरे 


♦️ सस्थानिक व जमीनदारांचा गेलेले हक्क परत मिळविण्याचा अखेरचा प्रयत्न :- थॉम्सन व गॅरेट.


♦️ उत्तरेकडील जनतेचा उठाव :-  डॉ . ईश्वरीप्रसाद.


♦️अशत : जनतेचा उठाव : व्हिन्सेट स्मिथ.


♦️ एक राष्ट्रीय उत्थान : के . एम . पणिक्कर.


♦️खरिश्चनांविरुद्ध हिंदूंचे धर्मयुद्ध : डॉ . एस . एन . सेन .


♦️योग्य नेतृत्व व सूत्रबद्धतेचा उठाव : मौलाना आझाद. 


♦️ बरखास्त संस्थानिकांचा गुप्तकट : मॅलेसन.


♦️ ससंस्कृतपणा विरुद्ध रानटीपणा :-   टी.आर. होल्म्स .


♦️काळे विरुद्ध गोरे - जे.जी. मिडले.

वाचा :- बौद्ध परिषदा



🎯पहिली बौद्ध परिषद

👁‍🗨काळ:-483 इ स पू

👁‍🗨अद्यक्ष:-महाकश्यप

👁‍🗨ठिकाण:-राजगृह

👉राजा:-अजातशत्रू



🎯दसरी बौद्ध परिषद

🔘काळ:-387 इ स पू

🔘अद्यक्ष:-महास्तवीर रेवत

🔘ठिकाण:-वैशाली

👉राजा:-कालाशोक



🎯तिसरी बौद्ध परिषद

👁‍🗨काळ:-243 इ स पू

👁‍🗨अद्यक्ष:-मोगलीपुत्र तिस्स

👁‍🗨ठिकाण:-पाटलीपुत्र

👉राजा:-अशोक



🎯चौथी बौद्ध परिषद

🔘काळ:-पहिले शतक

🔘अद्यक्ष:-वसुमित्र

🔘ठिकाण:-कुंडलवण

👉राजा :-कनिष्क

महाराष्ट्रातील खनिजे / खनिज संपत्ती :-


१) भंडारा. :- मँगनीज, लोहखनिज, क्रोमाईट


२)नागपूर. :- मँगनीज, लोहखनिज, चुनखडी, डोलोमाईट, जांभा, संगमरवर, टंगस्टन, अभ्रक, दगडी कोळसा 


३)चंद्रपूर.  :-  लोहखनिज, चुनखडी, ग्रॅनाईट, डोलोमाईट 


४)गडचिरोली :- लोहखनिज, चुनखडी, ग्रॅनाईट, डोलोमाईट, तांबे,अभ्रक


५)कोल्हापूर. :- बॉक्साईट, जांभा


६)सिंधुदूर्ग :- मँगनीज, लोहखनिज, क्रोमाईट, चुनखडी, डोलोमाईट, सिलीकामय वाळू, ग्रॅनाईट


७)रत्नागिरी :- बॉक्साईट, क्रोमाईट, डोलोमाईट, चुनखडी, सिलीकामय वाळू, ग्रॅनाईट


८)यवतमाळ :- चुनखडक, दगडी कोळसा 

ठाणे व रायगड :- बॉक्साइड, मीठ, खनिजतेल


९)बॉम्बे  :- खनिज तेल


एक गंमतीशीर Trick एका वाक्यात महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्याची नावे लक्षात ठेवण्यासाठी.

अग कमला उठ पाय धु , रस ,भजे ,चहा बनव.


अ:- अकोला, अमरावती,औरंगाबाद,अहमदनगर

ग:-गङचिरोलि, गोंदिया

क:- कोल्हापूर

म:- मुंबई

ला:- लातूर

उ:- उस्मानाबाद

ठ:- ठाणे

पा:- पालघर, पुणे, परभणी

य:- यवतमाळ

धु :- धुळे

र:- रायगड, रत्नागिरी

स:- सांगलि, सातारा, सोलापूर, सिंधुदूर्ग

भ:- भंङारा 

जे:- जळगाव, जालना

च:- चंद्रपूर

हा:- हिंगोली

ब:- बिड, बुलढाणा

न:- नांदेड, नागपूर, नाशिक,नंदुरबाद

व:- वर्धा, वाशिम

महाराष्ट्र जिल्हावार-पर्वत, डोंगर, टेकड्या, डोंगररांगा



💢 जिल्हा ➡️➡️ पर्वत डोंगर टेकड्या डोंगररांगा 💢


🎇मबई मुंबई उपनगर - ⛰⛰पाली, अंटोप हिल, शिवडी,खंबाला, मलबार हिल.


🎇 रायगड - ⛰⛰रत्नागिरी,सिंधुदुर्ग,सह्यण्द्री,


🎇 धळे - ⛰⛰धानोरा, व गाळण्याचे डोंगर.


🎇नाशिक - ⛰⛰सह्यान्द्री, गाळणा, साल्हेर, मुल्हेर,वणी,चांदवड,सातमाळा,


🎇 पणे -⛰⛰ सह्यान्द्री,हरिश्चंद्र,शिंगी,तसुबाई,पुरंदर,ताम्हिनी,अंबाला,


🎇 सांगली -⛰⛰ आष्टा,होणाई,शुकाचार्य,कामलभैरव, बेलगबाद, आडवा,मुचींडी,दंडोबा.


🎇 सोलापूर -⛰⛰ महादेव,बालाघाट, शुकाचार्य,


🎇 जालना - ⛰⛰अजिंठ्याची रांग,जाबुवंत,


🎇 हिंगोली - ⛰⛰अजिंठ्याची रांग, हिंगोलीचे पठार.


🎇 लातूर - ⛰⛰बालाघाटचे डोंगर,


🎇 बीड -  ⛰⛰बालाघाटचे डोंगर


🎇 अकोला - ⛰⛰गाविलगड,अजिंठाचे


🎇 अमरावती -⛰⛰ सातपुडा, गाविलगडच्या रांगा,पोहऱ्याचे व चिरोडीचे डोंगर.


🎇 वर्धा - ⛰⛰रावनदेव, गरमासुर, मालेगाव, नांदगाव, ब्राह्मणगाव टेकड्या.


🎇 भडारा - ⛰⛰अबागडचे डोंगर, गायखुरी व भिमसेन टेकड्या,


🎇 चद्रपूर -⛰⛰ परजागड व चांदूरगडचे, चिमूर व मुल टेकड्या.


🎇 ठाणे -  ⛰⛰सह्यान्द्री


🎇 जळगाव -⛰⛰ सातपुडा, सातमाळा, अजिंठा, शिरसोली, हस्तीचे डोंगर.


🎇 नदुरबार -⛰⛰ सातपुडा व तोरणमाळचे डोंगर.


🎇 अहमदनगर -⛰⛰ सह्यान्द्री,कळसुबाई,अदुला,बाळेश्वर,हरिश्चंद्र डोंगर,


🎇 सातारा -⛰⛰ सह्यान्द्री,परळी,बनमौली,महादेव, यावतेश्वेर, मेंढोशी, आगाशिव, औध,


🎇 कोल्हापूर - ⛰⛰सह्यान्द्री, पन्हाळा, उत्त्तर व दक्षिण, दुधगंगा, चिकोडी रांग.


🎇 औरंगाबाद - ⛰⛰अजिंठा, सातमाळा, सुरपलायान,


🎇 परभणी - ⛰⛰उत्तरेस अजिंठ्याचे डोंगर, दक्षिणेस बालाघाट रांग.


🎇 नांदेड - ⛰⛰सातमाळा, निर्मल,मुदखेड,बलाघाटचे डोंगर,


🎇 उस्मानाबद -⛰⛰ बालाघाट, तुळजापूर, व नळदुर्ग डोंगर


🎇 यवतमाळ - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर व पुसदच्या टेकड्या.


🎇 बलढाणा - ⛰⛰अजिंठ्यचे डोंगर.


🎇वाशीम - ⛰⛰अजिंठ्याचे डोंगर


🎇 नागपूर - ⛰⛰सतपुड्याचे डोंगर, गरमसूर,महादागड, पिल्कापर टेकड्या,


🎇 गोदिया -⛰⛰ नवेगाव, प्रतापगड, चिंचगड, व दरकेसाचे डोंगर.


🎇 गडचिरोली -⛰⛰ चरोळी,टिपागड,सिर्कोडा,सुरजागड,भामरागड,चिकियाला डोंगर.

महाराष्ट्र- जिल्हे व त्यांची प्रसिद्धि.

*१)मुंबई*--------भारताचे प्रवेशद्वार,

            भारताचे प्रथम क्रमांकाचे 

           औद्योगिक शहर,भारताची,

           राजधानी


*२)रत्नागिरी*---देशभक्त व

                समाजसेवकांचा जिल्हा


*३)सोलापूर*----ज्वारीचे कोठार,

                सोलापुरी चादरी


*४)कोल्हापुर*--कुस्तीगिरांचा जिल्हा

                गुळाचा जिल्हा


*५)रायगड*-----तांदळाचे कोठार व 

               डोंगरी किल्ले असलेला 

              जिल्हा


*६)सातारा*----कुंतल देश व शुरांचा 

               जिल्हा


*७)बिड*------जुन्या मराठी कविंचा 

              जिल्हा,मिठगरांचा जिल्हा,

              देवळादेवळा जिल्हा, ऊस

              कामगारांचा जिल्हा


*८)परभणी*---ज्वारीचे कोठार


*९)उस्मानाबाद*--श्री.भवानी मातेचा 

                    जिल्हा


*१०)औरंगाबाद*--वेरुळ-अजिंठा 

                   लेण्यांचा जिल्हा,

                  मराठवाडयाची 

                  राजधानी


*११)नांदेड*--संस्कृत कवींचा जिल्हा


*१२)अमरावती*--देवी रुख्मिणी व 

                   दमयंतीचा जिल्हा


*१३)बुलढाणा*--महाराष्ट्राची 

                 कापसाची बाजारपेठ


*१४)नागपुर*----संत्र्यांचा जिल्हा


*१५)भंडारा*-----तलावांचा जिल्हा


*१६)गडचिरोली*--जंगलांचा जिल्हा


*१७)चंद्रपुर*----गौंड राजांचा जिल्हा


*१८)धुळे*----सोलर सिटीचा जिल्हा

                     

*१९)नंदुरबार*-आदिवासी बहुल

                                   जिल्हा


*२०)यवतमाळ*-पांढरे सोने-

                     कापसाचा जिल्हा

                    

*२१)जळगाव*--कापसाचे शेत,

                      केळीच्या बागा,

                       अजिंठा लेण्यांचे

                      प्रवेशद्वार


*२२)अहमदनगर*-साखर कारखाने

                   असलेला जिल्हा


*२३)नाशिक*---मुंबईची परसबाग, 

                   द्राक्षांचा जिल्हा,मुंबईचा

                   गवळीवाडा

२४) सांगली - हळदीचा जिल्हा ,

                    कलावंतांचा जिल्हा 

आचार्य विनोबा भावे



जन्म - 11 सप्टेंबर 1895 गगोदा (रायगड).
मृत्यू - 11 नोव्हेंबर 1982.

🔰 आचार्य विनोबा भावे हे म. गांधीचे मानसपूत्र होते.
🔰 भावे यांचे विनायक नरहर भावे, हे मूळ नाव.

संस्थात्मक योगदान :

📌 1921 - वर्ध्याजवळ पवणारा येथे आश्रमाची स्थापना.
संम्ययोगी समाज निर्मितीचा श्रीगणेश केला.
📌 18 एप्रिल 1951- भूदान चळवळ, आंध्रप्रदेशातील पोचमपल्ली येथून सुरवात.
📌 कांचनमुक्ती प्रयोगात पैशाला कमी व श्रमला जास्त महत्व.

आचार्य यांचे लेखन :

📌 1923-महाराष्ट्र धर्म मासिक.
📌 गीताई - भागवतगीतेचे समश्लोकी भाषांतर.
📌 मधुकर(निबंधसंग्रह)
📌 गीता प्रवचने.
📌 'स्वराज्य शस्त्र' हा ग्रंथ.
📌 विचर पोथी.
📌 जीवनसृष्टी.
📌 अभंगव्रते.
📌 गीताई शब्दार्थ कोश.
📌 गीताई - धुले येथील तुरुंगात सांगितली व सोने गुरुजींनी लिहून घेतली.

वैशिष्टे :

🎇 वयक्तिक सत्याग्रहासाठी पहिले सत्याग्रही म्हणून निवड.
🎇 गीता, इसपनीती या पुस्तकाचा प्रभाव.
🎇 चबल खोर्‍यातील दरोडेखोरांचे हृदयपरिवर्तन.
🎇 मगरौठ - उत्तरप्रदेश येथे 'सब भूमी गोपाल की' हा नारा दिला.
🎇 'जय जगत' घोषणा

भारतीय संविधान - महत्वपुर्ण प्रश्नोत्तरी


१) महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हीं कितव्या क्रमांकाची आहे?

अ ) पंधराव्या                                     

ब) सोळाव्या 

क) सतराव्या                                      

ड) चौदाव्या ✔️


२) महाराष्ट्रचे मुखमंत्री म्हणून श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कितव्या क्रमांकाचे मुखमंत्री आहेत?

अ ) पंचाविसाव्या                                 

ब) सत्ताविसाव्या 

क) एकोणतिसाव्या  ✔️                             

 ड) तिसाव्या  


३) खालीलपैकी कोणती  संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. 

I). निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण

II). संचलन आणि नियंत्रण

III). निवडणुकांचे आयोजन

IV.) मतदारसंघ आखणे

 

अ ) I आणि II                                             

ब) I,II,व III ✔️

क) I,III  व IV                                               

ड) I,II,III व IV


४). सध्याचे  महाराष्ट्र राज्याचे नवीन निवडणूक आयुक्त कोण आहेत.? 

अ ) श्री. यू. पी. एस. मदान ✔️                     

ब) श्री.जगेश्वर सहारिया

क) श्री. नन्दलाल                           

क) श्रीमती नीला सत्यनारायण


५). प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या कलमांतर्गत केली गेली? 

अ)७३ व ७४   ✔️                                         

ब) ७४ व ७५

क) ७७ व ७८                                            

ड)७९ व ८०


६). महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

अ ) २४ एप्रिल १९९५                          

 ब). २८ एप्रिल ,१९९५

क) ३० एप्रिल .१९९०                         

 ड) २६ एप्रिल, १९९४ ✔️


७). संविधानातील भाग -९ मधील अनुच्छेद २४३ ट (२४३ K) नुसार  कोणत्या निवडणूक घेण्याचा अधिकारी 

  निवडूक आयोगाला आहे. 

I. ग्रामपंचायत

II. जिल्हापरिषद 

III. महानगरपालिका 

IV. पंचायत समिती 


अ ) I आणि II                                             

ब) I,II,व II

क) I,II  व IV ✔️                                           

ड) I,II,III व IV


८). संविधानातील भाग -९ मधील अनुच्छेदअनुच्छेद २४३ यक (२४३ ZA) नुसार कोणत्या निवडणूक घेण्याचा अधिकारी निवडूक आयोगाला आहे.

I. नगरपरिषद 

II. जिल्हापरिषद 

III. ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था

IV. नगरपंचायत 


अ ) I आणि II                                             

ब) I,II,व II

क) I,II  व IV  ✔️                                           

ड) I,II,III व IV


९). श्री. यू. पी. एस. मदान यांनी दिनांक ०५ सप्टेबर २०१९ रोजी पदभार स्वीकारला असून ते महाराष्ट्राचे कितवे राज्य निवडणूक आयुक्त आहेत.?

अ ) सहावे ✔️                                              

ब)सातवे

क) नववे                                                    

ड) चौथे 


१०.) खालीलपैकी कोणती  संविधानिक जबाबदारी भारतीय  निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे. 

I. राजकीय पक्षांना मान्यता देणे निवडणूक चिन्हे ठरवणे

II. उमेदवारपत्रिका तपासणे

III निवडणुका पार पाडणे

IV उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा ताळमेळ लावणे


अ ) I आणि II                                            

ब) I,II,व II

क) I,II  व IV                                              

ड) I,II,III व IV ✔️

७४ वी घटना दुरुस्ती ( १९९२-९३ ) :

 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरवात ब्रिटिश कालखंडामध्ये झाली. ( १६८७ ) नागरी स्थानिक संस्थांना पंचायतराज संस्थेप्रमाणेच घटनात्मक दर्जा देण्यात यावा हि मागणी समोर आली. या दृष्टीकोनातून सर्वप्रथम १९८९ ला राजीव गांधी यांनी नगरपालिका संबंधी ६५ वे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले होते.  परंतु त्यांना अपयश आले. त्यानंतर व्ही. पी. सिंग व चनशेखर यांनी प्रयत्न केले. परंतु अपयश आले. १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना नागरी स्थानिक संस्थाना घटनात्मक दर्जा देण्यासाठी त्यांनी १९९२ ला ७४ वे घटनादुरुस्ती विध्येयक तयार केले.


– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.


– २३ डिसेंबर १९९२ ला या विधयेकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध


– २० एप्रिल १९९३ रोजी ७४ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ३१ मे १९९४ पर्यंत ह्या शिफारशी सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक करण्यात आले.


– राज्य घटनेच्या कलम २४३ ( P ) ते २४३ ( ZG ) मध्ये तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्य घटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले. व त्या मध्ये एकूण १८ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.


 ७४ व्या घटनादुरुस्तीची वैशिष्ट्ये / परिणाम / भूमिका :


१) नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम ( P ते ZG )


२) राज्यघटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले ( एकूण १८ विषयांचा समावेश आहे. )


३) महत्वाच्या व्याख्या कलम २४३ ( P )


४) नगरपालिका स्थापन करणे कलम २४३ ( Q )


     अ ) नगर पंचायत  ( Nagar Panchyat )


      ब ) नगर परिषद   ( Municipal Corporation )


      क ) महानगरपालिका ( Municipal Corporation )


५) नगरपालिकांची रचना कलम २४३ ( R )


६) वॉर्ड समित्या स्थापन करणे कलम २४३ ( S )


७) राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( T )


      अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा


       ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा


       क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) याना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.


८) नगरपालिकांचा पालिकांचा कालावधी निश्चित कलम २४३ ( U )


९) सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( V )


१०) नगरपालींकाचे अधिकार, जबाबदारी कलम २४३ ( W )


११) नगरपालिकांना कर व निधी लादण्याचा अधिकार कलम २४३ ( X )


१२) राज्य वीत्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( Y )


१३) नगरपालिकांचे लेखांकन, लेखापरीक्षण कलम २४३ ( Z )


१४) नगरपालिकांच्या निवडणुका घेणे कलम २४३ ( ZA )


१५) केंद्रशासित व अपवाद असणाऱ्या प्रदेशासाठी तरतूद कलम २४३ ( ZB )


१६) काही प्रदेशांना ७४ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( ZC )


१७) जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा कलम २४३ ( ZD )


१८) महानगर नियोजन समितीची स्थापना कलम २४३ ( ZE )


१९) नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका बाबीमध्ये न्यायिक हस्तक्षेप नाही कलम २४३ ( ZG )



राज्यघटनेतील अकरावी अनुसूचित मधील विषय :

१) कृषी विस्तारासह शेती

२) भू – विकास जमीन सुधारणांची अंमलबजावणी, जमिनीचे एकत्रीकरण मृदसंधारण

३) पाण्याचे व्यवस्थापन, लघु पाटबंधारे आणि पाणलोट विकास

४) पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि कुकूटपालन

५) मासेमारी

६) सामाजिक वनीकरण व शेती वनीकरण

७) किरकोळ वन उत्पन्न

८) अन्नप्रक्रिया व लघु उद्योग

९) ग्रामोद्योग, कुटिरोद्योग व खादी उद्योग

१०) ग्रामीण गृह निर्माण

११) पिण्याचे पाणी

१२) इंधन व चारा

१३) रस्ते, नाली, पूल, नदी, जलमार्ग व दळणवळण अन्य साधने

१४) ग्रामीण विद्युतीकरण, विजेचे वाटप

१५) अपारंपरिक ऊर्जा साधने

१६) दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम

१७) प्राथमिक व माध्यमिक शाळांसह शिक्षण

१८) तांत्रिक व व्यावसायिक शाळांसह शिक्षण

१९) प्रौढ व अनोपचारिक शिक्षण

२०) ग्रंथालय

२१) सांस्कृतिक कार्यक्रम

२२) बाजार व यात्रा

२३) रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व दवाखाने यासह आरोग्य व स्वच्छता

२४) कुटुंब कल्याण

२५) स्त्रिया व बालविकास

२६) अपंग व मतिमंद यांच्या कल्याणासह समाजकल्याण

२७) दुर्बल घटकांचे कल्याण व अनुसूचित जाती ( SC ) व अनुसूचित जमाती ( ST ) कल्याण

२८) सार्वजनिक वितरण व्यवस्था

२९) समाजाच्या मौल्यवान ठेव्यांच्या सांभाळ करणे.

– २३ एप्रिल १९९४ पासून महाराष्ट्रात ७३ व्या घटना दुरुस्तूची अंबलबजावणी.

– १९६६ मध्य महाराष्ट्र शासनाने आपल्या १२३ योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्या आहेत.

– अरुणाचल प्रदेशात अनुसूचित जाती ( एस. सी ) साठी याना राखीव जागांची तरतूद नाही.

– ७३ व्या घटनादुरुस्तीची अमबलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य मध्यप्रदेश होय.

पंचायत राज



महानगरपालिकांच्या संख्येनुसार राज्यांचा क्रम खालीलप्रमाणे


१.  महाराष्ट्र              27

२.  उत्तरप्रदेश           16

३.  आंध्रप्रदेश           14

४.  मध्यप्रदेश            14

५.  बिहार                 13

६.  छत्तीसगड           13

७.  तमिळनाडू           13

८.  कर्नाटक              11

९.  गुजरात                08

१०.हिमाचलप्रदेश       02


महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या संख्येनुसार जिल्ह्यांचा क्रम खालीलप्रमाणे-


(१) ठाणे ०६

(२) पुणे ०२

(३) नाशिक ०२

- पनवेल-रायगड ही शेवटची महानगरपालिका आहे.


भारतील महानगरपालिका आकारमानानुसार उतरता क्रम-


(१) मुंबई 

(२) दिल्ली 

(३) कलकत्ता

(४) बंगलोर 

(५) चेन्नई

(६) हैदराबाद 

(७) अहमदाबाद 

(८) सुरत 

(९) पुणे

जनरल नॉलेज

 ♻️♻️ महाराष्ट्रातील जनरल नॉलेज ♻️

👇👇👇👇👇👇👇


महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?

👉 १ मे १९६०


महाराष्ट्राची राजधानी कोणती?

👉 मबई 


महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?

👉 नागपूर 


महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?

👉 ६


महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?

👉 ५


महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?

👉 ३६


महाराष्ट्रातील महानगरपालिका?

👉 २६


महाराष्ट्रातील नगरपालिका?

👉 २२२


महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?

👉 ७


महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?

👉 ३४


महाराष्ट्रातील एकुण तालुके?

👉 ३५८


महाराष्ट्रातील पंचायत समित्या?

👉 ३५५


महाराष्ट्राची लोकसंख्या किती?

👉 ११,२३,७४,३३३


स्त्री : पुरुष प्रमाण किती?

👉 ९२९ : १०००


महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?

👉 ८२.९१%


महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?

👉 सिंधुदुर्ग


सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?

👉 मबई उपनगर (८९.९१% )


सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?

👉 नदुरबार (६४.४% )


सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?

👉 रत्नागिरी


सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?

👉 मबई शहर


क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?

👉 अहमदनगर 


क्षेत्रफळाने लहान जिल्हा?

👉 मबई शहर 


जास्त लोकसंख्येचा जिल्हा?

👉 ठाणे 


कमी लोकसंख्येचा जिल्हा?

👉 सिंधुदुर्ग 


भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?

👉 ९३%


महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?

👉 आबा


महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?

👉 मोठा बोंडारा


महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?

👉 हारावत 


महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

👉 शकरु


महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?

👉 मराठी


महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?

👉 कळसुबाई (१६४६ मी.)


महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?

👉 गोदावरी


🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

भारतातील जनरल नॉलेज 

👇👇👇👇👇👇👇


सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?

👉 गगानगर ( राजस्थान )


सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?

👉 उत्तरप्रदेश


सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?

👉 मबई (१,८४,१४,२८८ )


सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?

👉 करळ


सर्वांत मोठा धबधबा कोणता?

👉 गिरसप्पा धबधबा 


सर्वांत मोठी मशीद कोणती?

👉 जामा मशीद 


सर्वांत लांब नदी कोणती?

👉 बरह्यमपुत्रा


सर्वांत मोठी घुमट कोणती?

👉 गोल घुमट 


सर्वांत मोठे वाळवंट कोणते?

👉 थरचे वाळवंट 


सर्वांत उंच पुतळा कोणता?

👉 गोमटेश्वर ( बाहुबली )


सर्वांत मोठे धरण कोणते?

👉 भाक्रा नांगल


सर्वांत उंच धरण कोणते?

👉 टिहरी


सर्वांत लांब धरण कोणते?

👉 हिराकुड


सर्वांत लांब बोगदा कोणता?

👉 जवाहर बोगदा 


सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?

👉 यवा भारती


सर्वांत उंच मनोरा कोणता?

👉 दरदर्शन मनोरा 


सर्वांत उंच झाड कोणते?

👉 दवदार


क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?

👉 कच्छ 


लोकसंख्येने मोठा जिल्हा?

👉 ठाणे 


सर्वाधिक पावसाचे ठिकाण?

👉 मावसनिराम


🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

जगाचे जनरल नॉलेज 

👇👇👇👇👇👇


सर्वांत मोठे वाळवंट कोणते?

👉 सहारा ( आफ्रिका )


सर्वांत मोठे बेट कोणते?

👉 गरीनॅलंड


सर्वाधिक लोकसंख्येचा देश?

👉 चीन


क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?

👉 रशिया


सर्वांत मोठा खंड कोणता?

👉 आशिया


सर्वांत मोठी गर्ता कोणती?

👉 मरियना


सर्वांत मोठा पक्षी कोणता?

👉 शहाम्रुग


सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?

👉 सदरबन


सर्वांत मोठा पुतळा कोणता?

👉 सटॅचु ऑफ लिबर्टी


सर्वांत मोठी नदी कोणती?

👉 अमेझॉन


सर्वांत मोठे बंदर कोणते?

👉 सिडनी


सर्वांत मोठा महासागर कोणता?

👉 पसिफिक महासागर 


सर्वांत मोठी मशीद कोणती?

👉 जामा मशीद ( दिल्ली )


सर्वांत मोठा धबधबा कोणता?

👉 वहेनेझुएला


सर्वांत लहान खंड कोणता?

👉 ऑस्ट्रेलिया 


सर्वांत लहान महासागर कोणता?

👉 आर्क्टिक महासागर 


सर्वांत लहान पक्षी कोणता?

👉 हमिंग बर्ड


सर्वांत लहान दिवस कोणता?

👉 २२ डिसेंबर

सर्वांत लांब नदी कोणती?

👉 नाईल


सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?

👉 मावसनिराम ( मेघालय )


सर्वांत जलद उडणारा पक्षी?

👉 हमिंग बर्ड 


सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?

👉 मलाक्काची सामुद्रधुनी 

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती :

पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.


उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.


उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.


विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.


अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.


रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.


स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

वारणा नदी



सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.

ती  कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.

काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो.

सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागाव जवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.

सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.

वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे.

वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.

यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

नोबेल पुरस्कार 2023 विजेते SHORTCUT

🔶वैद्यकशास्त्र(MEDICAL) :-

💉Shortcut :- D-M-k

☑️K:- कॅटालिन कॅरिको

☑️D- ड्र्यू वेडसमन ई. ब्रुस .

☑️M:- MEDICAL

⛳️कशासाठी दिला? :- m-rna लशीच्या विकास करणे सक्षम करणाऱ्या nucleoside base सुधारणा बाबत.

🔷रसायनशास्त्र(CHEMISTRY) :- 

🧪SHORTCUT :- chemistry ची LAB.

L:- लुईस ई‌ ब्रुस .

A:- अॅलेक्सी आय. एकिम .

B:- माँगी जी.बॉएंडी

⛳️कशासाठी दिला? :- discovery and synthesis of quantum dots.

🛠भौतिक(PHYSICS) :- 

❇️SHORTCUT :- PHYSICS वाला A-P-K

A :- ॲनी एल

P:- पिएरे  अगॉस्टिनी.

K :-  फेंटेक क्राउस्झ

⛳️कशासाठी दिला? :- attosecond pulse निर्माण करणाऱ्या प्रायोगिक पद्धतींच्या discovery साठी

📕साहित्य (literature):-

🔖Shortcut :- जॉन चे साहित्य.

जॉन फॉसे.

🧘‍♂️शांतता (PEACE):- 

🕊Shortcut :- M-N-P

P :- peace (शांतता)

M -N :- नर्गिस मोहम्मदी.

⛳️कशासाठी दिला? :- इराण मधील महिलांच्या अत्याचाराविरोधात कामासाठी.

📊अर्थशास्त्र( ECO):-

🎯Shortcut :- ECONOMY चा E-C-G.

E :- ECO

C-G:- क्लॉडिया गोल्डीन.

⛳️कशासाठी दिला? :- महिलांच्या श्रम बाजाराच्या परिणामाबद्दल समज वाढविल्याबद्दल

चालू घडामोडी :- 15 मार्च 2024

◆ ‘जागतिक ग्राहक हक्क दिन’ दरवर्षी 15 मार्च रोजी साजरा केला जातो.

◆ हैदराबादमध्ये ‘वर्ल्ड स्पिरिच्युअल फेस्टिव्हल’चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ रांची येथे भारतातील 5 व्या आणि पूर्व भारतातील पहिल्या 'अत्याधुनिक हनी टेस्टिंग लॅब'ची पायाभरणी करण्यात आली आहे.

◆ 'राजकुमार विश्वकर्मा' यांची उत्तर प्रदेशच्या मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखालील समितीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना एक देश एक निवडणुक बाबत अहवाल सादर केला आहे.

◆ भारतीय राज्यघटनेच्या 324 कलमांतर्गत सुखवीर सिंग संधू आणि ज्ञानेश्वर कुमार यांची केंद्रीय निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.

◆ रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 चे विजेतेपद मुंबई ने जिंकले आहे.

◆ मुंबई संघाने 42व्यांदा रणजी चसक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ मुंबई संघाने अजिंक्य रहाणे च्या नेतृत्वाखाली 42 व्यांदा रणजी चषक क्रिकेट स्पर्धेचे विजतेपद पटकावले.

◆ रणजी चषक क्रिकेट स्पर्धा 2023-24 मध्ये तनुष कोटियन ला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे.

◆ केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिध्द केलेल्या निवडणुक रोख्यांच्या यादीनुसार भाजपा या राजकीय पक्षाला सर्वाधिक देणगी मिळाली आहे.

◆ जगातील सर्वात ताकदवान यान स्टारशिप ची यशस्वी चाचणी SPACE X या खाजगी अवकाश कंपनीने घेतली आहे.

◆ अमेरिकेच्या धर्तिवर भारत आणि ब्राझील या देशात टू प्लस टू चर्चेचे आयोजन करण्यात आले.

◆ भारत आणि ब्राझील यांच्यात 'नवी दिल्ली' या ठिकाणी टू प्लस टू चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 193 देशांच्या यादीत भारत देश 134व्या क्रमांकावर आहे.

◆ मानव विकास निर्देशांक UNDP ही संस्था जाहीर करते.

◆ लैंगिक असमानता निर्देशांक 2022 मध्ये भारताचा 193 देशांच्या यादीत 108वा क्रमांक आहे.

◆ मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये 193 देशांच्या यादीत स्विझरलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

◆ CBSC बोर्डाच्या अध्यक्ष पदी 'राहुल सिंह' यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना 'मॉरीशस युनिव्हर्सिटी' विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ ही मानद पदवी दिली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━