Tuesday, 16 January 2024

चालू घडामोडी :- 16 जानेवारी 2024

◆ राज्य शासनाकडून सन 2023 चा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार नारायण जाधव यांना जाहीर.

◆ भारतीय नौदलाची चित्ता, गुलदार आणि कुंभीर, पोलनोकनी श्रेणीतील लैंडिंग जहाजांचा भाग, जवळजवळ चार दशकांच्या समर्पित सेवेनंतर बंद करण्यात आली.

◆ तैवानच्या नागरिकांनी विल्यम लाई यांना त्यांचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडले.

◆ हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी सुरु केलेल्या 'अपना विद्यालय'चे उद्दिष्ट सरकारी शाळा सुविधा वाढविण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय नेते आणि व्यावसायिक यांच्यात सहकार्य वाढवणे आहे.

◆ केरळच्या ऑपरेशन AMRITH चे उद्दिष्ट प्रतिजैविक प्रतिकाराचा सामना करणे आहे.

◆ AMRITH म्हणजे अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स इंटरव्हेंशन फॉर टोटल हेल्थ.

◆ केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी लाइफ सायन्सेस पार्क येथे ग्लोबल सायन्स फेस्टिव्हल केरळचे उद्घाटन केले.

◆ वाघांच्या मृत्यूत महाराष्ट्र(मृत-48) प्रथमस्थानी असून मध्य प्रदेश दुसऱ्या तर उत्तराखंड तिसऱ्या क्रमंकावर आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचा 2021 चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार हिराबाई कांबळे यांना जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र शासनाचा 2022 चा विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार अशोक पेठकर यांना जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र कृषी पणन महासंघाच्या वतीने मिलेट महोत्सव 2024 चे आयोजन पणजी येथे आयोजीत करण्यात आले आहे.

◆ लोकप्रिय उर्दू शायर मुनुव्वर राणा यांचे नुकतेच लखनऊ या ठिकाणीं निधन झाले आहे.

◆ ऑक्सफॅम या संस्थेने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार जगातील गरीबी संपण्यासाठी 229 वर्षाचा कलावधी लागणार आहे.

◆ "सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी" या भारतीय टेनिस जोडीने मलेशिया बॅडमिंटन सुपर 1000 स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे.

◆ 2024 ची स्विझरलँड मधील दोवोस येथे world economic foram आयोजित जागतिक अर्थिक परिषद 54व्या क्रमांकाची आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 15 जानेवारी 2024

◆ राजस्थानमधील बिकानेर या सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध जिल्ह्यात तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला.

◆ महाराष्ट्र शासनाने नुकतेच सांगली जिल्ह्यातील आटपाडी विभागात 'आटपाडी संवर्धन राखीव' नावाने नवीन संवर्धन अभयारण्य स्थापन केल्याची घोषणा केली आहे.

◆ भारतीय सैन्य 2024 हे तंत्रज्ञान अवशोषणाचे वर्ष म्हणून पाळणार आहे.

◆ भारतीय आणि जपानी तटरक्षक दलांनी चेन्नईच्या किनारपट्टीवर 'सहयोग केजिन' नावाचा यशस्वी संयुक्त सराव केला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत लाई चिंग ते विजयी झाले आहेत.

◆ तैवान देशातील राष्ट्र अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाने विजय मिळवला आहे.

◆ तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्षपदाच्या निवडणूकीत डेमॉक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्ष तिसऱ्यांदा विजयी झाला आहे.

◆ डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायक होत्या.

◆ हिंदुस्थान शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना भारत सरकारने 2022 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे यांच्या नावावर एकाच मंचावरून 11 संगितावरील पुस्तके प्रकाशीत करण्याचा जागतिक विक्रम आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांना 2002 वर्षी भारत सरकारचा पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना मध्यप्रदेश राज्य सरकारने कालिदास सन्मान पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना 2023 मध्ये "अटल संस्कृती पुरस्कार" प्रदान करण्यात आला होता.

◆ जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ 102व्या स्थानावर आहे.

◆ 2023 चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान सोहळा कोलकाता येथे पार पडला.

◆ राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी मॉरिशस देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना 2 तासाची रजा मंजूर केली आहे.

◆ ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका डॉ. प्रभा अत्रे यांचे निधन झाले. त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सरकारने पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले होते.

◆ 18 वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात अमळनेर येथे होणार आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील अमळनेर येथे 3 ते 4 फेब्रुवारी 2024 कालावधी दरम्यान विद्रोही साहित्य संमेलन आयोजित करण्यात येणार आहे.

◆ अमळनेर येथे होणाऱ्या 18 विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. वासुदेव मुलाटे यांची निवड झाली आहे.

◆ भारतीय सेना दिवस 15 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो.

◆ भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा 150 आंतरराष्ट्रिय टी 20 क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे.

◆ ऑलिंपिकवीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 15 जानेवारी हा जन्मदिन, दरवर्षी राज्य क्रीडा दिन म्हणून साजरा करणार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

चालू घडामोडी :- 13 जानेवारी 2024

◆ पुण्यातील हृदयरोगतज्ज्ञांसाठी जगातील पहिले 'डिजिटल थेरॅप्युटिक्स' सहभाग प्रमाणपत्राची सुरुवात केल्याची घोषणा झाली.

◆ आकाश-एनजी' क्षेपणास्त्राची ओदिशात यशस्वी चाचणी करण्यात आली असून आकाश शस्त्र प्रणाली DRDO द्वारे स्वदेशी डिझाइन आणि विकसित केली गेली आहे.

◆ केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्रालयाकडून "भारतासाठी हरित संक्रमणाचे मार्ग " या संकल्पनेवर आधारित हवामान परिषद, 2024 आयोजीत करण्यात आली.

◆ ट्युनिशिया प्रजासत्ताक देशाने "नंदकिशोर कागलीवाल" यांची मानद वाणिज्य दुत म्हणून मुंबई येथे नियुक्ती केली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा या सागरी सेतू पुलाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ देशातील सर्वात मोठ्या शिवडी न्हावासेवा सागरी सेतू पूलाची लांबी 22 किलोमीटर आहे.

◆ टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 150 बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरलेला टीम साऊदी न्यूझीलंड  या देशाचा क्रिकेट खेळाडू आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

◆ ओडिशा येथील चांदीपूर किनाऱ्यावरून DRDO ने यशस्वी चाचणी घेतलेल्या आकाश एन जी क्षेपणास्त्राचा पल्ला 80 किलोमीटर आहे.

◆ CNN News 18 तर्फे उल्लेखनीय कामगिरीसाठी यंदाचा इंडीया ऑफ दि एअर पुरस्कार ISRO ला प्रदान करण्यात आला आहे.

◆ वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्दारे  तिसरी अंतरराष्ट्रीय साखर परिषद पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ पेंच व्याघ्र प्रकल्प हा भारतातील पहिला डार्क स्काय पार्क ठरला आहे.

◆ केंद्र सरकारने गार्भाशय व मुखाचा कर्करोगाचे प्रमाण कमी करण्यासाठी 9 ते 14 वर्षाच्या वयोगटातील मुलीसाठी HPV ही लसीकरण [वर्षात 8 कोटी] मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ गर्भाशय व मुखाचा कर्करोगाचे सर्वाधिक प्रमाण आढळणाऱ्या जगातील देशात भारत 5व्या क्रमांकावर आहे.

◆ जपान या देशाने H2A या रॉकेटचे प्रक्षेपण केले आहे.

◆ शेरिंग तोबगे यांची भूतान देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे.

◆ भारतात 1989 वर्षापासून दरवर्षी 11 ते 17 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह आयोजित करण्यात येतो.

◆ Microsoft हि कंपनी जगातील सर्वाधिक महागडी कंपनी ठरली आहे.

◆ टाईम मासिकाच्या 2023 च्या जगातील सर्वोत्कृष्ट कंपनीच्या यादित इन्फोसिस या कंपनीला स्थान मिळाले आहे.

◆ अलीप्त चळवळीची 2024 मध्ये 19वी शिखर परिषद युगांडा(यजमान पद) मध्ये आयोजित करण्यात आली आहे.

◆ इंडियाज अनडिक्लेअर्ड इमर्जन्सी या पुस्तकाचे लेखक अरविंद नरेन हे आहेत.

◆ भारताचा युवा नेमबाज अखिल शेरॉन ने 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात अशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 15 January - Current Affairs

🔖 प्रश्न - तैवान देशाच्या राष्ट्रअध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली?

ANS - लाई चिंग-ते यांची  

🔖 प्रश्न - कोणत्या राज्याच्या विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या संशोधकांनी कोरल सापाची नवीन प्रजाती शोधून काढली?

ANS - मिझोराम

🔖 प्रश्न - डॉ.प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?

ANS - संगीत क्षेत्राशी

🔖 प्रश्न - जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारत देशाचा संघ कितव्या स्थानावर आहे?

ANS - १०२ व्या स्थानावर

🔖 प्रश्न - २०२३ चा मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला?

ANS - विशाखा विश्वनाथ यांना - हा सोहळा कोलकाता येथे पार पडला.

🔖 प्रश्न - राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळासाठी कोणत्या देशाच्या सरकारने तेथील हिंदू धर्माच्या अधिकाऱ्यांना २ तासाची रजा मंजूर केली?

ANS - मॉरिशस

🔖 प्रश्न - १८ वे विद्रोही साहित्य संमेलन महाराष्ट्रात कोठे होणार?

ANS - अमळनेर येथे - डॉ. वासुदेव मुलाटे हे या संमेलनाच्या अध्यक्षपदी असतील.

🔖 प्रश्न - भारतीय सेना दिवस कधी साजरा करतात येतो?

ANS - १५ जानेवारी ला

🔖 प्रश्न - भारतीय क्रिकेपटू रोहित शर्मा हा किती आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट सामने खेळणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला?

ANS - १५० आंतरराष्ट्रिय टी २० क्रिकेट सामने

🔖 प्रश्न - संघ लोकसेवा आयोगाचे (UPSC) सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?

ANS - शीलवर्धन सिंग यांची

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...