Sunday, 14 January 2024

चालू घडामोडी :- 14 जानेवारी 2024

◆ कवयित्री विशाखा विश्वनाथ यांना "स्वतःला स्वतः विरुद्ध उभं करताना" या कवितासंग्रहास साहित्य अकादमीचा 'युवा' साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[विशाखा विश्वनाथ यांचा हा पहिलाच कवितासंग्रह आहे.]

◆ साहित्य अकादमीच्या वर्ष 2023 च्या युवा साहित्य पुरस्कारासाठी 20 प्रादेशिक भाषांमधील साहित्य कलाकृतींची निवड करण्यात आली होती.

◆ 'युवा' साहित्य अकादमी पुरस्कारांचे स्वरूप मानचिन्ह आणि 50 हजार रुपये रोख असे आहे.

◆ मराठी भाषेतील निवड साहित्य मंडळामध्ये ख्यातनाम साहित्यिक डॉ. अक्षयकुमार काळे, बाबा भांड आणि प्रा. डॉ. विलास पाटील यांचा समावेश होता.

◆ 13 जानेवारी रोजी ‘लोहरी’ हा सण साजरा करण्यात आला.

◆ मॉरिशस सरकारने राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेनिमित्त हिंदू धर्माच्या अनुयायांना दोन तासांची विशेष सुट्टी देण्याची घोषणा केली आहे.

◆ विल्यम लाई हे तैवानचे नवे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

◆ ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी युक्रेनला अडीच अब्ज पौंडांची लष्करी मदत देण्याची घोषणा केली आहे.

◆ मुंबईत ‘जयपूर समिट 2024’चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ दिवंगत उत्तरकाशी गिर्यारोहक सविता कंसवाल यांना मरणोत्तर तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ नवी दिल्लीत ‘नमो-नव-मतदार नोंदणी पोर्टल’ सुरू करण्यात आले आहे.

◆ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी ‘मलकानगिरी’ येथील नवीन विमानतळाचे उद्घाटन केले.

◆ रिअर अ‍ॅडमिरल उपल कुंडू हे दक्षिणी नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ बनले आहेत.

◆ दीपा भंडारे साखर उद्योगातील सर्वोत्कृष्ट पर्यावरण अधिकारी पुरस्कार जिंकणारी पहिली महिला ठरली आहे.

◆ रिंदम सांगवानने आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तुल प्रकारात कांस्यपदक जिंकले.

◆ CREA अहवालानुसार, मेघालयातील 'बर्निहाट' हे 2023 मध्ये भारतातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...