◆ रॉकफेलर फाउंडेशनचे अध्यक्ष आणि माजी यूएस एड प्रमुख डॉ. राजीव शाह यांचा फेडरल रिझर्व्ह बँक ऑफ न्यूयॉर्कच्या संचालक मंडळात समावेश करण्यात आला.
◆ पी. संतोष यांची ‘नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी’ (NARCL) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ 'प्रोफेसर एड्रियन मायकल क्रूझ' यांना त्यांच्या अंतराळ सेवेतील योगदानाबद्दल 'ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
◆ Adidas कंपनी कर्नाटक राज्यात आपले 'ग्लोबल कॉम्पिटन्स सेंटर' (GCC) स्थापन करणार आहे.
◆ पश्चिम बंगाल राज्य सरकारने ‘पोइला बैशाख’ हा राज्य दिन म्हणून घोषित केला आहे.
◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री श्री अमित शहा यांनी ‘तुर डाळ खरेदी पोर्टल’ सुरू केले आहे.
◆ गोवा राज्यात 10व्या शतकातील कन्नड आणि संस्कृत भाषेत लिहिलेला 'कदंब शिलालेख' सापडला आहे.
◆ वरिष्ठ IAS अधिकारी 'श्री विकास शील' यांनी 'Asia Development Bank' (ADB) चे कार्यकारी संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.
◆ भारताचा महान फलंदाज 'विराट कोहली' याला 'प्युबर्टी ॲथलीट ऑफ द इयर 2023' साठी नामांकन मिळाले आहे.
◆ वरिष्ठ IFS अधिकारी 'इंद्रमणी पांडे' यांनी BIMSTEC चे महासचिव म्हणून पदभार स्वीकारला आहे.
◆ ‘नॅशनल इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंड लिमिटेड’ (NIIFL) द्वारे ‘संजीव अग्रवाल’ यांची नवीन सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ ‘शशी सिंग’ यांची ऑल इंडिया रबर इंडस्ट्री असोसिएशन (AIRIA) चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━