Tuesday, 10 December 2024

राज्यसेवा पूर्व झाली.. आता combine गट ब ची तयारी !!



दि. 5 जानेवारी 2024 ला आपण आतुरतेने वाट पाहणाऱ्या combine गट ब ची पूर्व परीक्षा होत आहे.. या निमित्ताने विद्यार्थी म्हणून आपली भूमिका कशा पद्धतीने असायला हवी ?


Combine 2024 च्या पूर्व परीक्षेचा अभ्यास करण्याऱ्या विद्यार्थ्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल.


१. Core फक्त गट ब पूर्व चा अभ्यास करणारे विद्यार्थी

२. राज्यसेवा व combine दोन्ही करणारे विद्यार्थी


१. पहिल्या गटातील विद्यार्थ्यांबाबतीत बोलायचं झालं तर हे विद्यार्थी तब्बल 3 महिने झाले, combine पूर्व चा अभ्यास करत आहेत. ( combine ची date जाहीर झाल्यापासून) त्यामुळे या विद्यार्थ्यांचा basic book reading, नोट्स

तयारी व PYQ विश्लेषण झाले असेल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे ज्यांनी हे टप्पे पूर्ण केले आहेत त्या विद्यार्थ्यांनी रोज किमान 1 पेपर वेळ लावून सोडवणे अत्यावश्यक आहे.

Combine गट ब पूर्व परीक्षा ही फक्त वेळेच्या व्यवस्थापनाची परीक्षा आहे, त्यामुळे जो त्या 1 तासात पेपर काळजीपूर्वक सोडवणार तोच यशस्वी होणार. त्यामुळे येत्या महिन्यात किमान 25 पेपर पूर्ण करण्याचे टार्गेट तुम्ही ठेवायला हवे. सरावासाठी मार्केट ला नामवंत clasees चे सराव पेपर उपलब्ध आहेत ते तुम्ही काळजीपूर्वक सोडवू शकता..


२. दुसऱ्या गटातील विद्यार्थ्यांनी आता त्यांचा combine mode चालू केला पाहिजे. राज्यसेवा पूर्व 2024 चा पेपर कसा गेला ? किती मार्क्स आले ? Cut off किती असेल ? या चर्चे पेक्षा तुम्ही combine च्या तयारी कडे आवर्जून लक्ष द्या.

आता तुम्ही ( राज्यसेवा ग्रुप ) combine साठी नवीन काय करणार ?

1. Csat ची खूप चांगली तयारी करा. गणिते 20 पैकी किमान 15 बरोबर आले तरच तुम्ही मुख्य साठी सहज पात्र व्हाल हे लक्षात घ्या.

2. चालू घडामोडी व्यवस्थित करा. राज्यसेवा पूर्व साठी तुम्ही एप्रिल- मे 24 पर्यंत चे current केला असेल , अशी अपेक्षा केली तरी तुम्ही नोव्हेंबर पर्यंत चे current affairs करणे आवश्यक आहेच. त्यामुळे daily current साठी वेळ राखून ठेवा. राज्यसेवा पूर्व परीक्षेत आलेल्या current च्या प्रश्नाचे विश्लेषण करता लक्षात येते की current वाचताना बारकावे पाहायला हवेच!!

3. महाराष्ट्र इतिहास व भूगोल आवर्जुन करा..

4. सराव प्रश्न सोडवा, PYQ विश्लेषण कराच..


आता राज्यसेवा पूर्व 2024  च्या अनुषंगाने थोडं combine च prediction पाहू..


१. राज्यशास्त्र :

- घटनेची कलमे खूप चांगली पाठ करा. आयोगाचा trend थेट कलमे विचारण्यावर दिसतोय.

- संविधानिक- वैधानिक संस्था नीट करा

- पंचायत राज बघून घ्या..


२. भूगोल :

-  24 च्या पूर्वचे विश्लेषण पाहता पुन्हा ध्यानात येईल की आयोग conceptual - factual खेळत आहे.  त्यामुळे concept सोबत fact माहिती असू द्या.

-( प्राकृतिक , राजकिय , नदीप्रणाली , खनिजे ,अभयारण्य , पर्यटन - तोंडपाठ असू द्या)

- लोकसंख्या data खूपच भारी करा. राज्यसेवेला तीन प्रश्न आलेत.

- भारत भूगोल पण करा..


३. इतिहास 

- base source + notes + 11 वी जुने पुस्तक+ समाजसुधारक  + PYQ = best combination

- कुदळे सरांना follow करत असाल तर उत्तमच!


४. विज्ञान -

- , Base source Basic concept  नीट करा. Numerical येऊ शकतात

- plant kingdom , animal kingdom  चांगलं करा

- बाकी जे विज्ञान येईल ते पेपर मध्येच takle करू.


५. अर्थशास्त्र 

- आयोग गेले 2-3 exam पासून अर्थशास्त्रास danger flag दाखवत आहे. Thinker , economist , ycmou बरेच source दिसत आहेत पण तुम्ही basic वर stick राहा. Base book खूप मस्त करा. झालेल्या पेपरचे इकॉनॉमिक्स चे प्रश्न खूप काळजीपूर्वक बघा. Conceptual प्रश्नाचा approach बघा.


६. चालू घडामोडी

- परिक्रमा/ इयर बुक नीटपणे वाचा. सगळं पुस्तकातच आहे, वाचायची गरज आहे.

- थीम predict करायला शिका, त्यावर focus करा.

( उदा. राज्यसेवा पूर्व मध्ये संसद , नारी शक्ती वंदन अधिनियम, स्वामिनाथन , aditya L1 , नर्गिस मोहम्मद हे मुद्दे prediction ला होते)


७. CSAT 

रोज 2 तास प्रॅक्टिस कराच.


विशेष टीप:

State board चे boxes नीट करा. कोकण रेल्वे , SAFAR इंडेक्स हे प्रश्न तिथूनच येत आहेत.



बाकी combine हा knowledge व time management चाच game आहे. त्यामुळे खूप चांगली practice करा. 70+ चं target ठेवा.. desk ला लिहून ठेवा.. एक महिना जोमाने अभ्यास करा.. यश तुमचंच आहे..


No comments:

Post a Comment

Latest post

Just for revision

GEM (Gender Empowerment Measure) सुरू - 1995 बंद - 2010 3 आयाम 1. राजकीय सहभाग 2. आर्थिक सहभाग + निर्णयप्रक्रिया  3. आर्थिक स्त्रोतांवरील मा...