१. काशी – हे पुरातन महाजनपद आहे. याचे बौद्ध जातक कथांमध्ये वर्णन आहे. सध्याच्या वाराणसी या शहाराजवळ हे राज्य होते. काशीच्या शेजारी कोशलचे राज्य होते.
२. कोशल- सध्याच्या उत्तर प्रदेशातील अवध परिसरात हे महाजनपद होते. काशी शाक्य जमातीचा पराभव या राज्याने केला होता. याचा विस्तार करण्यामध्ये प्रसेनजीत राजाचा मोठा वाटा होता.
३. अंग – सध्याच्या बिहार राज्यातील भागलपूर व मोंगीर जिह्य़ात हे महाजनपद होते. चंपा हे राजधानीचे ठिकाण होते. व्यापारउदिमासाठी प्रसिद्ध होते. बिंबिसाराने अंग हे राज्य मगध साम्राज्यात जिंकून विलीन केले.
४. वज्जी किंवा वृज्जी – सध्याच्या उत्तर बिहारमध्ये आठ जमातींचे हे एक गणतंत्र होते. वैशाली ही या गणतंत्राची राजधानी होती. वज्जीची राजधानी मिथिला होती. वैशाली ही लिच्छिवीची राजधानी होती. वर्धमान महावीराची आई लिच्छिवी वंशातली होती. वैशाली येथे दुसरी बौद्ध परिषद पार पडली होती.
५. मल्ल – प्रजातंत्रीय राज्य म्हणून प्रसिद्ध. या राज्याच्या कुशीनगर आणि पावा या दोन राजधान्या होत्या. कुशीनगर येथे गौतम बुद्धाचे महापरिनिर्वाण झाले.
६. चेदी – सध्याच्या बुंदेल खंड भागात हे राज्य होते.
७. वत्स – सध्याच्या अलाहाबादजवळ होते. याची कौशम्बी ही राजधानी होती. उदयन हा पराक्रमी राजा या राज्यात होऊन गेला.
८. कुरू – सध्याच्या दिल्ली मेरठ परिसरातील ठिकाण. येथे कुरू जमातीचे राज्य होते. वैदिक काळातच याला महत्त्व आले होते.
९. पांचाल- दिल्लीच्या उत्तरेस व पूर्वेस हिमालयाच्या पायथ्यापासून चंबळपर्यंत पांचालांचे राज्य पसरले होते.
१०. मत्स्य – आधुनिक राजस्थानातील जयपूर, भरतपूर, अल्वा येथे हे राज्य होते.
११. शूरसेन – मथुरा याची राजधानी होती.
१२. अस्मक किंवा अश्मक – अवंत राज्याच्या शेजारीचे राज्य व गोदावरी नदीच्या तटापर्यंत पसरलेले होते. हे राज्य अवंती राज्यात विलीन झाले.
१३. गांधार – सध्याच्या पेशावर व रावळिपडी या ठिकाणी हे राज्य होते. तक्षशिला याची राजधानी होती.
१४. कंबोज – आधुनिक पाकिस्तान व गुजरातमधील भूप्रदेश मिळून हे राज्य होते.
१५. अवंती – उज्जन ही याची राजधानी होती.
१६. मगध – हे बिहार राज्यातील पाटणा आणि गया या जिल्ह्य़ात होते. मगधाचा उदय सर्वात शक्तिशाली साम्राज्य म्हणून झाला.
No comments:
Post a Comment