🔥 साधारण बहुमत:
- साधारण बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.
- वापर: सर्वसाधारण विधेयक, ठराव, नवीन राज्य निर्मिती, विधान परिषदांची निर्मिती, नागरिकत्व कायदे, इ. (कलम 2/3, कलम 368 वगळता).
🔥 प्रभावी बहुमत:
- प्रभावी बहुमत: सर्व सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.(vacancy deducted)
- वापर: अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची हटवणूक.
🔥 संपूर्ण बहुमत:
- संपूर्ण बहुमत: सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.
- वापर: महत्त्वपूर्ण ठराव पास करण्यासाठी आवश्यक.
🔥 विशेष बहुमत:
📌 विशेष बहुमत प्रकार 1:
- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3.
- वापर: सर्व भारतीय सेवा निर्मिती (कलम 312), राज्यसभेचा ठराव (कलम 249).
📌 विशेष बहुमत प्रकार 2:
- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाचा एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक.
- वापर: न्यायाधीशांची व CEC ची हटवणूक, दुरुस्ती (कलम 368(1)).
📌 विशेष बहुमत प्रकार 3:
- विशेष बहुमत: उपस्थित व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि सभागृहाच्या एकूण सदस्यांच्या 50% पेक्षा अधिक आणि साधारण बहुमताने निम्म्यापेक्षा जास्त राज्यांचे बहुमत.
- वापर: संविधानातील दुरुस्ती (कलम 368), 4था अनुसूची, 7वा अनुसूची, सर्वोच्च व उच्च न्यायालयांच्या शक्ती, राष्ट्रपती निवडणूक (कलम 54/55), केंद्र-राज्य संबंध, संसदेमध्ये राज्यांचे प्रतिनिधित्व.
🔥 राष्ट्रपती महाभियोग:
- महाभियोग: सर्व सदस्यांच्या 2/3.***
- वापर: राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठी आवश्यक.
No comments:
Post a Comment