१) हडप्पा :- रावी नदीच्या डाव्या किनाऱ्यावर पाकिस्तानातील पूर्व पंजाबमधील मॉण्टगोमरी जिल्ह्य़ात आहे. याचा शोध १९२१ मध्ये दयाराम साहनी यांनी लावला. येथे धान्याचे कोठार सापडले आहे. तसेच दफनभूमी, दगडाची मानवी नृत्य करणारी मानवी मूर्ती सापडली आहे. येथे मानवी सांगाडे सापडले आहेत.
२) मोहोंजोदरो :- याचा अर्थ ‘मृताची टेकडी’ असा होतो. याचा शोध १९२२ मध्ये आर. डी. बॅनर्जी यांनी लावला. हे ठिकाण सिंधू नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतात हे सर्वात मोठे नगर असावे. शहराचा आकार आयताकृती होता. कांस्य समिश्राचे नर्तिकेची मूर्ती येथे सापडलेली आहे. दाढी असलेली दगडी मूर्ती देखील सापडली आहे. भांडय़ात कपडय़ाचा तुकडा सापडलेला आहे. भांडय़ाच्या तुकडय़ावर जहाजाचे चित्र आढळून आले आहे.
३) चन्होदारो :- ( chanhudaro) :- पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सिंध नदीवर वसलेले होते. याचा शोध एम. जी. मुजुमदार यांनी लावला. हडप्पा संस्कृतीतील एकमेव ठिकाण जेथे Citadel ( किल्ला ) आढळलेला आहे. येथे बांधकामाचे दगड मोठय़ा प्रमाणात आढळले आहेत. हे मनी तयार करण्याचे प्रसिद्ध ठिकाण असावे.
४) कालिबंगन ( kalibangan) :- राजस्थानातील घग्गर नदीवर वसलेले ठिकाण. याचा शोध ए. घोष यांनी लावला. कालिबंगन म्हणजे काळ्या बांगडय़ा येथे उंटाचे हाड सापडले आहे. येथे पूर्व हडप्पा व परिपक्व हडप्पा अशा दोन्ही अवस्था आढळून आल्या आहेत.
५) लोथल :- गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्य़ातील भोगावा नदीतीरावरील वसलेले ठिकाण. याचा शोध एस. आर. राव यांनी लावला. हडप्पा संस्कृतीतील महत्त्वाचे बंदर होय. येथे कृत्रिम जहाज बोट सापडली आहे. येथील मुद्रांवर जहाजाची चित्रे आहेत.
६) बनवाली :- याचा शोध आर. एस. बिस्त यांनी लावला. हरियाणातील हिस्सार जिल्ह्य़ातील हे ठिकाण. येथे यव ( बार्ली) हे धान्य सापडलेले आहे.
७) धोलवीरा :- गुजरातमधील हे ठिकाण. याचा शोध डॉ. जे. पी. जोशी व आर. एस. बिस्त यांनी लावला.
८) राखीगड :- घग्गर नदीवरील हरियाणातील हे शहर धोलवीरापेक्षाही मोठे होते.
९) रोपार :- पंजाबमधील सतलज नदीवरील ठिकाण. याचा शोध यज्ञदत्त शर्मा यांनी लावला.मृतांसोबत कुत्रा पुरल्याचे अवशेष येथे सापडलेले आहेत.
१०) सुरकोटाडा :- गुजरातमधील कच्छ जिल्ह्य़ातील हे ठिकाण. याचा शोध जगपती जोशी यांनी लावला.
११) कोटदिजी :-पाकिस्तानातील सिंध प्रांतातील सिंधू नदीवरील हे ठिकाण. येथे परिपक्व हडप्पा संस्कृती असावी. येथे चाकावरील मृद भांडी व तीही रंगवलेली आढळून आलेली आहे.
१२) सुतकागेंडोर :-पाकिस्तानातील बलुचिस्तानातील ठिकाण. याचा शोध औरेल स्टेईन याने लावला.
No comments:
Post a Comment