Thursday, 26 December 2024
इतिहास प्रश्नमंजुषा
०१. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?
A. लतिका घोष ✔
B. सरोजिनी नायडू
C. कृष्णाबाई राव
D. उर्मिला देवी
०२. पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?
A. अक्स-ला-चॅपेलचा तह ✔
B. पॉंडेचेरीचा तह
C. मँगलोरचा तह
D. पॅरिसचा तह
०३. १८५७च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?
A. खान बहादूर खान
B. कुंवरसिंग ✔
C. मौलवी अहमदुल्ला
D. रावसाहेब
०४. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केल े?
A. १८४९
B. १८५१
C. १८५३ ✔
D. १८५४
०५. १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केल े?
A. फ्री इंडिया
B. नया भारत
C. फ्री प्रेस जर्नल
D. लीडर ✔
०६. १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.
अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.
ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.
A. फक्त अ
B. फक्त ब
C. वरील दोन्ही ✔
D. वरीलपैकी एकही नाही
०७. खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.
अ] लॉर्ड कर्झन
ब] लॉर्ड चेम्सफर्ड
क] लॉर्ड हार्डिंग्स II
ड] लॉर्ड आयर्विन
पर्याय
A. अ-ब-क-ड ✔
B. अ-क-ब-ड
C. क-अ-ब-ड
D. अ-ड-क-ब
०८. विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.
स्पष्टीकरण:- ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.
पर्याय
A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ✔
B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.
C. अ बरोबर आणि ब चूक
D. अ चूक आणि ब बरोबर
०९. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?
A. भारत सरकारचा कायदा १९३५
B. भारत सरकारचा कायदा १९१९
C. भारत कौन्सिल कायदा १९०९ ✔
D. भारत कौन्सिल कायदा १८९२
१०. मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ?
A. सहदरण आय्यपन
B. नारायण गुरु ✔
C. हृदयनाथ कुंजरू
D. टी.एम. नायर
१२. बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?
A. कथा
B. कादंबरी
C. काव्य
D. नाटक ✔
१३. श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?
A. त्यांनी प्रथम मजूर संघटना 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' स्थापन केली
B. त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला.
C. त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा पुरस्कार देण्यात आला.
D. वरील एकही नाही ✔
१४. क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता ?
A. भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे.
B. श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे.
C. रेल्वे लाईन व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटीश साम्राज्य अडचणीत येईल.
D. वरील सर्वाचा त्यात समावेश होता ✔
१५. बापुजी आणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले ?
A. त्यांनी मीठ तयार केले व संविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला.
B. त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या.
C. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. ✔
D. त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली.
१६. भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मान्यता दिली ?
A. भातातीय राष्ट्रीय ट्रेड युनियन कॉंग्रेस ✔
B. अखिल भातारीय लाल ट्रेड युनियन कॉंग्रेस
C. अखिल भातारीय ट्रेड युनियन कॉंग्रेस
D. अखिल भारतीय किसान सभा
१७. सशस्त्र क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्य जोड्या लावा.
अ) श्रीधर परांजपे १. हैद्राबाद
ब) डॉ. सिद्धनाथ काणे २. अमरावती
क) दादासाहेब खापर्डे ३. यवतमाळ
ड) नार्हरीपंत घारपुरे ४. वर्धा,नागपूर
अ) ब) क) ड)
A. ४ ३ १ २
B. ४ ३ २ १ ✔
C. १ २ ३ ४
D. २ १ ४ ३
१८. शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ?
A. जी.बी.वालंगकर
B. ज्योतिबा फुले
C. वरील दोघांचाही ✔
D. वरील कोणाचाही नाही
१९. खालीलपैकी कोणती वाक्ये चुकीचे आहेत ?
A. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार-समांतर सरकार सुरु केले.
B. याश्वाणराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला.
C. प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.
D) वरीलपैकी एकही नाही ✔
२०. जहाल काळात केसरी व मराठा जनजागृतीच्या कामात आघाडीवर होते. टिळक व आगरकर त्यांच्याशी कसे संबंधित होते ?
A. त्यांनी केसरी मराठीत व मराठा इंग्रजीत १८८१ मध्ये सुरु केले.
B. आगरकरांनी मराठाचे तर टिळकांनी केसरीचे संपादन केले.
C. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत.
D. वरील एकही विधान बरोबर नाही. ✔
२१. कोळींच्या संदर्भात कोणते विधान अयोग्य ठरेल ?
A. कोळींनी तीन टप्यांत उठाव केला १८२४, १८३९ व सुमारे १८४५ मध्ये.
B. कोळी साधे, कोळी व डोंगरी कोळी तसेच सोन कोळी व महादेव कोळी इत्यादींमध्ये विभागलेले होते.
C. इंग्रज कोलींचे उठाव आटोक्यात आणू शकले नाहीत.
D. वरील एकही नाही. ✔
२२. वासुदेव बळवंत फडकेंबद्दल काय खरे नाही ?
A. त्यांनी स्वताची ओळख लपवण्यासाठी दाढी राखली होती व साधूंच्या वेशात लोकांत जनजागृती केली होती.
B. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे ते इंग्रजी शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत व प्रथमतः त्यांनी लष्करात नोकरी केली व तद्नंतर रेल्वेत. ✔
C. सुरवातीस रामोशांची त्यांना मदत होती पण नंतर रामोशांनी त्यांची साथ सोडली.
D. वरीलपैकी एकही नाही
२३) उमाजी नाईकांना अटक करण्याचे इंग्रजाचे प्रयत्न का फासले ?
A. उमजींना शासनाच्या सर्व हालचालींची माहिती मिळत होती.
B. शेतकरी व गावकरी त्यांना उद्युक्त व मदत करत होते.
C. वरील दोन्ही विधाने बरोबर आहेत. ✔
D. वरील एकही विधान बरोबर नाही.
२४. गावाचा विकास कसा साधावा हे समजून सांगण्यासाठी 'ग्रामगीता' हा ग्रंथ कोणी लिहिला ?
A. संत तुकाराम
B. संत एकनाथ
C. राष्ट्र संत तुकडोजी महाराज ✔
D. संत नामदेव
२५. संथाळांचा राग शांत करण्यासाठी ब्रिटीश सरकारने कोणता स्वतंत्र जिल्हा निर्माण केला ?
A. संथाळ प्रदेश
B. संथाळ इलाखा
C. संथाळ प्रांत
D. संथाळ परगणा ✔
Subscribe to:
Post Comments (Atom)
Latest post
Just for revision
GEM (Gender Empowerment Measure) सुरू - 1995 बंद - 2010 3 आयाम 1. राजकीय सहभाग 2. आर्थिक सहभाग + निर्णयप्रक्रिया 3. आर्थिक स्त्रोतांवरील मा...
-
विद्या प्रबोधिनी कोल्हापूर : CLICK HERE राष्ट्रनिर्माण प्रबोधनी : CLICK HERE स्पर्धाशाही acadeny : CLICK HERE रयत प्रबोधनी : CLICK HERE सारथ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...
-
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा? उत्तर- सोलापूर 2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? उत्तर...
No comments:
Post a Comment