Saturday, 14 December 2024

राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाबद्दल या गोष्टी लक्षात ठेवा यावर प्रश्न असतोच


◾️पाहिले अधिवेशन - 1885 - मुंबई (व्योमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते (पाहिले ख्रिश्चन अध्यक्ष)

◾️ पहिले अधिवेशन मुंबईत गोपाळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले

◾️ पहिल्या अधिवेशनात एकूण 72 प्रतिनिधी होते

◾️पहिल्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते

◾️ राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ऑलन ह्युम,  हेन्री कॉटन , विल्यम वेडर बर्न हे इंग्रज अधिकारी उपस्थित होते

◾️दुसरे अधिवेशन - 1886 - कोलकाता दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते

◾️सी शंकरन नायर - हे  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष 1897 (13 वे ) - अमरावती

◾️1924 (40 वे) - महात्मा गांधी (बेळगाव) - महात्मा गांधी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले( आणि हे एकमेव अधिवेशन आहे अध्यक्ष म्हणून)

◾️1896 कलकत्ता अधिवेशन - रहिमतुल्ला एम. सयानी (राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' पहिल्यांदा गायले गेले)

◾️1911कलकत्ता अधिवेशन - बिशन नारायण धर अध्यक्ष ('जन गण मन' पहिल्यांदा गायले)

◾️1917 कलकत्ता अधिवेशन ॲनी बेझंट - पहिल्या महिला अध्यक्ष (भारतीय नाही)

◾️1925 कानपूर अधिवेशन - सरोजिनी नायडू - पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष

◾️1929 लाहोर अधिवेशन - अध्यक्ष जवाहरलाल नेहरू' पूर्ण स्वराज' ठराव

◾️1936 : फैजपूर अधिवेशन - जवाहरलाल नेहरू अध्यक्ष - पहिले ग्रामीण अधिवेशन अधिवेशन

◾️ 1907 सुरत अधिवेशनात जहाल गट आणि मवाळ गट अशी फूट पडली

◾️1916 : लखनऊ अधिवेशनात जहाल गट आणि मवाळगट पुन्हा एकत्र आले

◾️ घ.दा बिर्ला आणि वालचंद हिराचंद हे राष्ट्रीय महासभेत सामील झाले नाहीत परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक मदत केली

◾️ काँग्रेसचे 4 थे अधिवेशन अलाहाबाद - अध्यक्ष जॉर्ज युल या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले होते

◾️1946 : मेरठ अधिवेशन - आचार्य कृपलानी - स्वातंत्र्यापूर्वीचे शेवटचे अधिवेशन

◾️1948 : जयपूर अधिवेशन - पट्टाभी सीतारामय्या अध्यक्ष - स्वातंत्र्यानंतरचे पहिले अधिवेशन

◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सरचिटणीस - एओ ह्यूम

◾️INC च्या पहिल्या अधिवेशनावेळी लॉर्ड डफरिन हे व्हाइसरॉय होते

◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष - बद्रुद्दीन तैयबजी (1887 चेन्नई 3रे)

◾️1889 च्या अधिवेशनात ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य चार्ल्स ब्रेड लॉ उपस्थित राहिले

◾️ राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे ऐवजी मुंबईत भरवले कारण पुण्यात कॉलरा ची साथ आली होती

◾️पाहिले परकीय अध्यक्ष - जॉर्ज यूल (3रे) - 1888 - अलाहाबाद 


👉 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना वेळ 72 प्रतिनिधी पैकी मुंबई प्रांताचे  प्रतिनिधी (यावर प्रश्न येतो)

◾️दादाभाई नौरोजी

◾️के टी तेलंग

◾️फिरोजशहा मेहता

◾️कृष्णाजी नूलकर

◾️दिनशा वाँच्छा

◾️नारायण गणेश चंदावरकर

◾️शिवराम हरी साठे

◾️रहिमतुल्ला सयानी

◾️वामन शिवराम आपटे

◾️सीताराम चिपळूणकर

◾️रामकृष्ण गोपाल भांडारकर

◾️रामचंद्र मोरेश्वर साने

◾️गोपाळ गणेश आगरकर

◾️गंगाराम मस्के

◾️बेहराम मलबारी

◾️न्या. महादेव गोविंद रानडे

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...