Thursday, 26 September 2024

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)



🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे.

🔻स्थापनाः 1964 - संथानम समितीच्या शिफारशींनुसार.

🔻2003 मध्ये वैधानिक दर्जा 

🔻रचनाः राष्ट्रपतींद्वारे नियुक्त एक केंद्रीय दक्षता आयुक्त (अध्यक्ष) आणि कमाल दोन दक्षता आयुक्त (सदस्य) +2

🔻CVC कोणत्याही मंत्रालय/विभागाद्वारे नियंत्रित नाही. 

CVC एक स्वतंत्र संस्था आहे जी केवळ संसदेला जबाबदार आहे..

🔻लाचलुचपत प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत काही विशिष्ट श्रेणीतील लोकसेवकांनी केलेल्या गुन्ह्यांची  'चौकशी करण्याचा अधिकार आहे.

🔻CVC ला भ्रष्टाचार किंवा पदाच्या गैरवापराच्या तक्रारी प्राप्त होतात आणि तिच्यातर्फे योग्य कारवाईची शिफारस केली जाते.

🔻CVC ही तपास यंत्रणा नाही. सीव्हीसी एकतर सीबीआय किंवा सरकारी कार्यालयातील मुख्य दक्षता अधिकाऱ्यांमार्फत (सीव्हीओ) तपास करते.

🔻पहिले CVC: एन. एस. राव)

🔴सध्याचे CVC: पी. के. श्रीवास्तव

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...