Thursday, 26 September 2024

पूर्व परीक्षेच्या गुणांचे गणित


📌 मागील पूर्व परीक्षांचा cut- off पाहिल्यास आपल्याला हे लक्षात येईल की पूर्व परीक्षेत 125+ मार्क्स आल्यास second key आली तरी आपण पूर्व परीक्षा नक्की पास होऊ हा विश्वास राहतो. त्यामुळे  कोणत्याही  शंकेविना  मुख्य परीक्षेकडे मोर्चा वळवता येतो. 

 

📌 त्यासाठी पूर्व परीक्षेत 125+ गुण मिळतील हा उद्देश ठेवून अभ्यास त्या दृष्टीने करावा . 125 गुण मिळविण्यासाठी तुम्ही पूर्ण प्रश्न  सोडवत आहात असे गृहीत धरल्यास तुमचे 70 प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे.


📌  या प्रमाणे विषयाच्या काठिण्य पातळी नुसार प्रत्येक विषयात किती किती गुण मिळणे अपेक्षित आहे ते आपण पाहू

    

विषय.          एकूण प्रश्न.      पैकी ✅ अपेक्षित


राज्यशास्त्र             15.                   13

 

भूगोल.                 15.                    12


अर्थशास्त्र.             15.                    12


पर्यावरण.              5.                      3


विज्ञान.                 20.                    12


चालू घडामोडी.       15.                    9


इतिहास                15.                     9.   

          

             एकूण.    100.                   70

               

📌 प्रत्येक विषयाला किमान वरीलप्रमाणे प्रश्न बरोबर येणे अपेक्षित आहे. तुमच्या विषयावरील प्रभुत्वानुसार हे प्रमाण तुम्ही बदलू शकता.  जसे तुम्हाला विज्ञान जर कठीण जात असेल तर ती कसर चालू घडामोडी मध्ये भरून काढू शकता.


📌 सुरवातीच्या तीन विषयात ( राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, भूगोल) सर्वांना गुण मिळविणे तुलनेने सोपे असते. तर या विषयाचा व्यवस्थित अभ्यास करणे अपेक्षित आहे.


📌 चालू घडामोडींचा अभ्यास दररोज केल्यास शेवटी त्याचा load येत नाही. Analytical विषय जसे की विज्ञान, अर्थशास्त्र, पर्यावरण , भौतिक भूगोल यांचा अभ्यास सुरवातीच्या टप्प्यात करावा. व ज्या विषयात  फॅक्ट्स जास्त आहेत (राज्यशास्त्र, अर्थशास्त्रातील आकडेवारी,इतिहास) ते विषय परीक्षा जवळ आली की हाताळावे म्हणजे short term memory मध्ये फॅक्टस लक्षात राहतात.

 

📌 अशाप्रकारे स्वतःला आधी analize करून अभ्यासाचे नियोजन केल्यास कमी श्रमात परिणामकारक अभ्यास करता येऊ शकतो.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...