Thursday, 25 July 2024

चित्तरंजन दास

जन्म :- ५ नोव्हेंबर १८७०.


मृत्यू :- जून १९२५.


🎤 भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रगण्य बंगाली नेते, प्रसिद्ध कायदे पंडित व प्रभावी वक्ते. देशबंधू या उपाधीनेच ते ओळखले जातात.


🏬 चित्तरंजनाचे शिक्षण कलकत्त्यात झाले. बी. ए. झाल्यावर १८९० मध्ये ते आय्. सी. एस्. परीक्षेकरिता इंग्लंडला गेले. इंग्लंडमध्ये त्यांनी दादाभाई नवरोजी यांच्या निवडणूक प्रचारसभांतून भाषणे दिली


📝 शेली, ब्राउनिंग, कीट्स, बंकिमचंद्र, गिरिशचंद्र घोष, टागोर हे त्यांचे आवडते लेखक. त्यांच्यापासून स्फूर्ती घेऊन बंगाली साहित्यात त्यांनी मोलाची भर घातली. त्यांनी कलकत्त्यास वकिलीस प्रारंभ केला; पण सुरुवातीस फारसा जम बसेना. म्हणून ते ग्रामीण भागात वकिली करू लागले.


📜 चित्तरंजन यांनी या काळात मालंच (१८९५) हा पहिला भावगीतांचा संग्रह प्रसिद्ध केला. यात देशबंधूंचे सारे तत्त्वज्ञान सामावले आहे.


🏛 बंगाल फाळणीविरुद्ध झालेल्या चळवळीत बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांच्या बरोबरीने त्यांनी काम केले. १९१७ मध्ये ते प्रांतिक परिषदेचे अध्यक्षही झाले. तेव्हापासून अखिल भारतीय राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले. 


♟ १९१८ मध्ये त्यांनी माँटेग्यू–चेम्सफर्ड सुधारणांना विरोध केला. कलकत्ता येथील १९२० च्या काँग्रेस अधिवेशनात त्यांनी गांधीच्या असहकार चळवळीला प्रथम विरोध केला; पण पुढे नागपूर काँग्रेसमध्ये ते पूर्णतः गांधीवादी झाले. एवढेच नव्हे, तर त्यांनी आपली वकिली सोडली व पुढे आपली राहती वास्तू आणि इतर मालमत्ताही काँग्रेसला व पर्यायाने देशास समर्पण केली. 


🎯 त्यांची अहमदाबाद (१९२१) व नंतर गया (१९२२) येथील काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली


🏤 १९२४–२५ या साली ते कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर होते. त्या वेळी सुभाषचंद्र बोस त्यांचे साहाय्यक होते


🔮 सूतकताईचा प्रसार केला आणि परदेशी मालावर बहिष्कार टाकला. ते म्हणत, ‘माझी देशभक्ती म्हणजे देवभक्ती; माझे राजकारण म्हणजे धर्म’.


💐 अखेरच्या दिवसांत कामाच्या ताणाने त्यांची प्रकृती अधिक क्षीण झाली. दार्जिलिंग येथे ते विश्रांतीस गेले आणि तेथेच ह्रदयविकाराच्या झटक्याने मरण पावले.


🏩  त्यांच्या स्मरणार्थ चित्तरंजन हे शहर वसविण्यात आले, तसेच त्यांच्या राहत्या घरात (भोवनीपूर बंगल्यांत) चित्तरंजन सेवासदन नावाचे रुग्णालय स्थापण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...