Thursday, 25 July 2024

ब्राम्हो समाज व त्याची स्थापना.


🅾️धार्मिक व सामाजिक सुधारणांच्या युगाला राजा राममोहन रॉय यांच्या कार्यापासूनच खर्‍या अर्थाने सुरवात झाली राजा राममोहन रॉय यांचा जन्म 22 मे 1772 रोजी राधानगर (बंगाल) येथे झाला.

 

🅾️विद्यार्थीदशेत असताना इंग्रजी संस्कृत, अरबी, आणि फार्सी, या भाषा चा त्यांनी सखोल अभ्यास केला. त्यांनी बंगालमध्ये इंग्रजी राजवट कशी स्थिर झाली हे प्रत्यक्ष पाहिले.

 

🅾️ब्रिटिशांचे अनेक गुण भारतीय विचारवंतांना अंतर्मुख करु लागले होते.

 आपल्या समाजातील रुढी, परंपरा व अंधश्रध्दा यामुळे भारतीय समाजाची अधोगती झाली आहे, याची जाणीव रॉय यांना होती.

 

🅾️त्यांनी काही काळ ईस्ट इंडिया कंपनीत नोकरीपण केली होती त्या काळात ख्रिश्चन मिशनर्‍यांचे कार्य त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. हिंदू धर्मातील एकेश्र्वरवाद, मुर्तिपूजा, आणि जातिभेद, समाजाच्या प्रगतीतील प्रमुख अडथळे आहेत. असे त्यांचे मत होते.

 

🅾️त्यामुळे भारतीय समाजाला जागृत करावयाचे असेल तर या अनिष्ट रुढी आणि परंपरांचा त्याग केला पाहिजे असा प्रसार रॉय यांनी सुरु होता. सतीची चाल बंद करण्याचा प्रयत्न रॉय यांनी केला.अर्थात हे काम सोपे नव्हते शतकानुशतकांचा धर्माचा पगडा समाजातील उच्चवर्णियांवर होता.

 स्वार्थी भटभिक्षुकांची समाजावर फार जबरदस्त पकड होती. पती निधनानंतर विधवा स्त्रीने स्वत:च्या मृत पतिसमवेत 

जाळून घेणे म्हणजे सती जाणे आणि हाच धर्म मानला जात होता.


🅾️ संवाद कौमुदी नावाच्या पाक्षिकातून त्यांनी सतीच्या अमानुष पध्दतीवर कडाडुन टिका केली. रॉयसारख्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे बेंटिंकने 1829 साली सतीबंदीचा कायदा केला सतीच्या रुढीप्रमाणे बालविवाह, कन्याविक्रय आणि बहुपत्नित्वाची पध्दती समाजासाठी लांच्छानास्पद असल्याचे मत रॉय यांनी मांडले होते.


🧩ब्राम्हो समाजाची स्थापना :


🅾️त्या सुमारास ख्रिस्ती मिशनर्‍यांनी हिंदू धर्मावर प्रखर हल्ले होते.हे हल्ले परतवून हिंदू धर्म व संस्कृती यांचे संरक्षण करण्यासाठी अस्तित्वात असलेल्या बुरसटलेल्या धर्मकल्पना हिंदूंनी फेकून दिल्या पाहिजेत असे रॉय यांना वाटत होते.

 

🅾️हिंदू धर्माची मूळ बैठक वेदांताच्या तत्वज्ञानावर आहे हे ओळखून रॉय यांनी वैदिक विचारसरणीचा पुरस्कार केला. वेदांत सूत्रावरील शांकर भाष्याचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.अनेक उपनिषदांचे बंगाली भाषेत त्यांनी रुपांतर केले.वेदांत सार नावाचा ग्रंथ लिहून वेदांचे तत्वज्ञान सोप्या भाषेत सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

 

🅾️केवळ ग्रंथ लिहून व वृत्तपेतातून लेखन करुन धार्मिक व सामाजिक सुधारणा होणार नाहीत याची त्यांना जाणीव होती.

 म्हणून त्यांनी 1828 मध्ये ब्राम्होसमाज स्थापन केला. तेव्हा ब्राम्हो समाजाला असंख्य अनुयायी मिळाले. या समाजाचा प्रसार बंगाल बाहेर इतर प्रांतातही झाला होता.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...