Saturday, 27 July 2024

महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल:

🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

bird sanctuaryआल्फ्रेड विणकर यांनी मांडलेल्या भूखंड वहनाच्या सिद्धांतानुसार उत्तरेला असणाऱ्या लाॅरेशिया व दक्षिणेला असणारा गोंडवाना या दोन भूमीच्या दरम्यान टेथिसा नावाचा समुद्र पसरलेला होता भूगर्भातील हालचाली उत्तरेकडील लाॅरेशिया व दक्षिणेकडील गोंडवाना या भूमि जवळ येऊ लागल्या व टेथिसा समुद्रांचा तळ घड्यांसारखा वर उचलला जाऊन यापासून हिमालय या घडीच्या पर्वतांची निर्मिती झाली. या हिमालयीन पर्वतावर होणाऱ्या भरपूर पर्जन्य वर्षावामुळे येथे अनेक नद्यांचे उगम झाले.

या हिमालयात उगम पावणार्‍या नद्यांनी खाली मैदानात येतांना आपल्यासोबत बराच गाळ वाहून आणला या गाळापासून भारतातील उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. या उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेपासून (यमुना नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या राजमहाल टेकड्या) भारतीय द्वीपकल्प पठारी प्रदेशाला सुरुवात होते. उत्तर भारतीय पठारी प्रदेश व दक्षिण भारतीय पठारी प्रदेश या दोन प्रादेशिक विभागाचा समावेश होतो. दक्षिण भारतीय पठारी प्रदेशातील एक पठार म्हणजे महाराष्ट्र पठार होय. या पठाराची भूमी ही प्राचीन गोंडवानाची भूमी आहे.

तसेच भारताच्या पाच प्राकृतिक विभागांपैकी पश्चिम किनारपट्टी चे प्रदेश व द्विकल्पीय पठारी प्रदेश या दोन प्राकृतिक विभागांचा समावेश हा महाराष्ट्रात होतो.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

🌹🌹महाराष्ट्र हा प्राकृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. पश्चिमेला असणारे कोकण किनारपट्टी, भारतातील सात पर्वत प्रणालीपैकी प्रमुख सह्याद्री पर्वत व सातपुडा पर्वत या दोन पर्वत प्रणाली व ज्वालामुखीपासून तयार झालेले महाराष्ट्र पठार अशी महाराष्ट्राची प्राकृतिक रचना आहे.

प्राकृतिक रचना अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण प्राकृतिक प्रभाव हा त्या भागावरील हवामानावर होतो.

महाराष्ट्रातील कोकण भागामध्ये सम हवामान आहे तर पूर्व पठारावर विषम हवामान आहे. हवामान व प्राकृतिक रचना या दोघांच्या प्रभावाने याच भागातील मृदा तयार होते. (जास्त पाऊस पडणाऱ्या भागात कमी सुपीक, तर कमी पाऊस पडणाऱ्या भागात अधिक सुपीक जमीन) ज्या भागात जसे हवामान व मृदा त्या पद्धतीची पिके तेथे घेतली जातात. कोकणात फळ व भात पिके तर  पठारावर कापूस

म्हणजेच एकूणच एखाद्या प्रदेशाची प्राकृतिक रचना ही त्या देशाची वा राज्याची विकासाची दिशा ठरवू शकते.

🌸🌸🌺🌺🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

1) प्रस्तरभंग (Geological Fault) :- भूगर्भातील अंतर्गत शक्ती जेव्हा कठिण खडकांनी बनविलेल्या भूपृष्ठावर आडव्या परंतु एकमेकांविरुद्ध किंवा क्षितिज समांतर दिशेने कार्य करत असेल तर भूपृष्ठावर ताण निर्माण होऊन भूपृष्ठाला घड्या न पडता तडे पडतात. त्यास प्रस्तरभंग असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

2) गट पर्वत ( Block Mountain) :- कठीण भूपृष्ठावर जर एकाच वेळी दुहेरी प्रस्तरभंग झाला असेल तर काहीवेळा प्रस्तरभंग बाहेरील भाग स्थिर राहतो व मधला भाग वर उचलला जातो, तर काही वेळा व दुहेरी प्रस्तरभंगाच्या मधला भाग स्थिर राहतो व दोन्ही बाजूंकडील भाग खाली खचतो तेव्हा मधला भाग उंच दिसतो. त्यास गट पर्वत अथवा ठोकळ्याचा पर्वत असे म्हणतात.

उदा:- महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत.

🍀🍀🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺

3) अवशिष्ट पर्वत :- भूपृष्ठावरील एखादा उंचवटा मृदू व कठीण खडकापासून तयार झालेला असेल, अशा उंचवट्यावर होणाऱ्या बाह्य घटकांच्या उत्खनन कार्यामुळे मृदू खडकांची झीज होते व कठीण खडक अस्तित्वात राहतात, ते सभोवतालच्या खडकांपेक्षा उंच दिसतात. त्याला अवशिष्ट पर्वत असे म्हणतात.

उदा :-सातपुडा पर्वत, विंध्य पर्वत, अरवली पर्वत.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀🌸🌸🍀🍀

4) घळई (V Shape Vally) :- नदी पर्वतीय प्रदेशातून वाहताना तीव्र उतारावरून वाहते. त्यावेळी तिचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे नदीचे  तळभागाचे म्हणजे अधोगामी क्षरण (शीर्ष क्षरण) हें काठांच्या क्षरणापेक्षा (पार्श्व क्षरण) जास्त असते. म्हणजेच तळ भागाची झीज जास्त होते व काठावरील बाजू तीव्र उताराची होते याला  घळई म्हणतात.

उदा:- प्रवरा नदीवर रंधा धबधब्याखाली घळई निर्माण झाली आहे.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...