Saturday, 27 July 2024

सम्राट अशोक


📌चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केल्यानंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधचा राजा झाला. 


➡️बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा अशोक इ.स.पू. २७३ मध्ये सत्तेवर आला. 


📌राजा होण्यापूर्वी त्याची नेमणूक तक्षशिला आणि उज्जयिनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. 


➡️तो राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड त्याने यशस्वीरीत्या मोडून काढले होते. 


📌मगधचे सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्याने कलिंगवर स्वारी केली. 


🗺कलिंग राज्याचा प्रदेश आजच्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर विजय मिळवला.


🗺वायव्येस अफगाणिस्तान आणि उत्तरेस नेपाळपासून दक्षिणेस कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे साम्राज्य पसरले होते.


✔️कलिंगचे युद्ध :- 


🔻कलिंगच्या युद्धातील रक्तपात पाहून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. 


🔻सत्य, अहिंसा, इतरांप्रति दया आणि क्षमावृत्ती हे गुण त्याच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. 


🔻त्याचा संदेश लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरविले. 


🔻हे लेख ब्राह्मी लिपीत आहेत. 


🔻या लेखांमध्ये त्याने स्वतःचा उल्लेख 'देवानं पियो पियदसी' (देवाचा प्रिय प्रियदर्शी) असा केलेला आहे. 


➡️राज्याभिषेक झाल्यानंतर आठ वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला आणि तेथील विनाश पाहून त्याचे हृदयपरिवर्तन झाले, याचा उल्लेख त्याच्या एका लेखात आहे.


➡️सम्राट अशोकाच्या दिल्ली-टोपडा येथील एका लेखात वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादींची शिकार करू नये, जंगलात वणवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते.

No comments:

Post a Comment