Thursday, 25 July 2024

सिंधु नदीच्या खोर्‍यातील संस्कृती :

सिंधु संस्कृतीचा शोध –


सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या.
सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय.
ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते.
आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे.
आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


सिंधु संस्कृतीचे वैशिष्टे

जगातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती आहे.
रस्ते, घरे, सांडपाण्याची व्यवस्था याची सुनियोजित रचना.
पुरापसून संरक्षण करण्याकरिता उंच जोत्यावर घरे बांधण्यात आली होती.
आरोग्य व स्वच्छता यांच्या दृष्टीने बंद गटारे निर्माण करण्यात आली होती.
मोहेंजदडो येथे 12 मीटर लांब, 7 मीटर रुंद आणि 2.5 मीटर उंचीचे स्नानगृह मिळाले आहे.
मोहेंजदडो हे शहर नदीच्या पुरामुळे सात वेळा नष्ट होवून पुन्हा वसविल्या गेल्याचे येथील पुराव्यावरून सिद्ध होते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


स्थानिक प्रसाशन –

मोहेंजदडो येथे करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून येथील लोक आरोग्य आणि स्वच्छता विषयक सोईच्या बाबतीत जागरूक असल्याचे दिसून येते.
नगररचना योजनाबद्ध होती.
यावरून या ठिकाणी आजच्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात असाव्यात आणि त्यांच्याकडे ही जबाबदारी सोपीवण्यात आल्याचे दिसून येते.
हडप्पाकालीन लोकजीवन –

सिंधु आणि रावी नद्यांच्या परीसरात करण्यात आलेल्या उत्खननात मिळालेल्या पुराव्याच्या आधारे येथील लोकजीवनाबाबत खालील माहिती मिळते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣


दैनंदिन जीवनप्रणाली –

अन्न : येथील लोक आपल्या आहारामध्ये तांदूळ, गहू, सातू, खजूर, मांस, मासे भाज्या व फळे यांचा वापर करीत असल्याचे दिसून येते.
वस्त्र व प्रावरणे : येथील उत्खनात मिळालेल्या पुराव्यावरून या लोकांना कापड विणण्याची कला अवगत असल्याचे दिसून येते. स्त्री-पुरुषांच्या पोशाखात कंबरेपर्यंतचे वस्त्र व उपरण्याचा वापर करीत असे.
अलंकार : हे लोक सोने, चांदी, तांबे, रत्ने, शिंपले कवडया, बिया इत्यादींचा वापर दागिने तयार करण्याकरिता करीत असे. यामध्ये बाजूबंद, अंगठ्या, दंडापर्यंत बांगड्या कमरपट्टा इत्यादी अंलकाराचा समावेश होता.
करमणुकीची साधने : हे लोक करमणुकीकरिता, नृत्य, संगीत व सोंगट्या व फासे यांचा खेळ खेळत.


❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

धार्मिक संकल्पना –

पुजा अर्चना : हडप्पाकालीन उत्खननात मिळालेल्या मातृदेवतेची मूर्ति आणि अग्नीचे अवशेष यावरून लोक निसर्गपूजक व मातृपूजक होते स्पष्ट होते.
अंत्यविधी : हडप्पा कालीनलोक मृतदेहांना जाळित असे किंवा शवपेटीत घालून पुरले जात आसवेत असे या स्पष्ट होते. त्याचबरोबर मृतदेह पुरतांना सोबत अन्न, अंलकार व आयुधे सुद्धा पुरवण्यात येत असे.
उद्योग व व्यवसाय : हडप्पाकालीन लोकांचा शेती आणि व्यापार हे प्रमुख व्यवसाय होते.
शेती : शेती हा येथील लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. ते शेतीमध्ये गहू, तांदूळ, कापूस, सातू, कडधान्ये इत्यादी पिकांचे उत्पादन घेत असे.
भांडी : भांडी तयार करणे आणि त्यावरच चित्रकला काढणे हा येथील लोकांचा दूसरा व्यवसाय असल्याचे दिसून येते.
कापड : कापूस व लोकरीपासून धागा तयार करणे आणि कापड तयार करणे हा येथील लोकांचा एक व्यवसाय होता.


व्यापर : हडप्पा येथे तयार होणार्‍या मालाचे अवशेष सुमेरियन संस्कृतीमध्ये मिळाल्यामुळे आणि गुजरात मधील लोथल येथे मिळालेल्या बंदरच्या अवशेषावरून हे लोक व्यापारामध्ये प्रविण असल्याचे दिसून येते.हडप्पा येथील लोकांचा व्यापार जलमार्गाने इतर देशांशी चालत असल्याचे स्पष्ट होते.



❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

No comments:

Post a Comment