Thursday, 25 July 2024

सिंधू/हडप्पा संस्कृती



💁‍♂ महत्त्वाची स्थळे व नद्या 


⦿ हडप्पा ➾ रावी


⦿ मोहेंजोदाडो ➾ सिंधू


⦿ चन्हंदडो ➾ सिंधू


⦿ कोटदिजी ➾ सिंधू


⦿ कालीबंगन ➾ घग्गर


⦿ बनवाली ➾ घग्गर


⦿ रंगपुर ➾ मादर


⦿ रोपड ➾ सतलज


⦿ लोथल ➾ भोगवा


⦿ धोलावीरा ➾ रंगाई


⦿ राखीगढ ➾ चौटांग


⦿ आलमगीर ➾ हिंडन


(इंग्रजी: Harappan civilization) ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे. हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो. 


इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली. 


या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात. ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला सिंधू संस्कृती असेही म्हणतात.


 नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात. 

जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले.


 हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते.


 हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.


💠💠प्राचीन भारताचा इतिहास 💠💠

.
* सिंधू संस्कृती
०१. समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.

०२. सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.

०३. १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.

०४. नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

०५. १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.

०६. रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.

०७. प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.

०८. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.

०९. सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.

१०. सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.

११. भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.

१२. अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.

१३. सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.

१४. हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.

१५. सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.

१६. हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.

१७. राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.

१८. माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

🟢 सिंधु संस्कृतीचा शोध 🟢

◾️  सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी रेल्वे मार्ग टाकण्याचे काम चालू असतांना खोदकाम करतेवेळी तेथील लोकांना पुरातन विटा व चित्रलिपीत मुद्रा सापडल्या. 

◾️  सर जॉन मार्शल व राखलदास बॅनर्जी यांच्या गटाने सन 1922 ते 1930 पर्यंत या भागात उत्खनन कार्य करून एक महत्वपूर्ण आणि विकसित संस्कृती जगापुढे आणली तीच सिंधु संस्कृती होय. 

◾️  ही संस्कृती इसवी सन पूर्व 5000 या काळात अस्तित्वात असावी असे या उत्खननात मिळालेल्या पुराव्यावरून स्पष्ट होते. 

◾️ आज ही ठिकाणे पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर केलेल्या उत्खनामध्ये भारतातील आलमगीरपूर, कालीबंगन, सुरूकोटडा, धोलावीरा, रंगपूर, रुपड इत्यादी ठिकाणी या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहे. 

◾️ आज ही संस्कृती जगातील सर्वात प्राचीन नागर हडप्पा व मोहेंजदडो या नावानी प्रसिद्ध आहे. ही संस्कृती सिंधु आणि रावी नदीच्या परिसरात उदयास आली होती.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...