Friday 14 June 2024

चालू घडामोडी :- 13 JUNE 2024

1) वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जाहीर केलेल्या 'ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स' मध्ये भारत 129 व्या स्थानावर पोहोचला आहे.

2) दरवर्षी 13 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय अल्विनिझम जागरूकता दिवस साजरा केला जातो.

3) कारगिल युद्धातील विजयाच्या 25 वर्षांच्या स्मरणार्थ भारतीय लष्कराने 'पॅन-इंडिया मोटरसायकल मोहीम' सुरू केली आहे.

4) भारत 2025 मध्ये पुरुषांच्या ज्युनियर हॉकी विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे.

5) ज्योती विज यांची फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) चे नवीन महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6) 'संग्राम सिंग' मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये सामील होणारा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

7) स्वित्झर्लंडमध्ये युक्रेन शांतता परिषद होणार आह

8) जगप्रसिद्ध सरोद वादक 'राजीव तारानाथ' यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

9) साखर उत्पादनात महाराष्ट्र प्रथम स्थानी असून, उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी आहे.

10) Globel Gender gap index 2024 यादीमध्ये भारत देश 129व्या स्थानावर आहे.

11) Globel Gender gap index 2024 मध्ये भरताची दोन स्थानानी खाली घसरण झाली आहे.

12) Globel Gender Gap index 2024 मध्ये आइसलँड हा देश प्रथम क्रमांकावर आहे.

13) Globel Gender Gap index 2024 मध्ये सर्वात शेवटी 146 व्या स्थानावर सुदान हा देश आहे.

14) Globel Gender Gap index 2024 अहवाल World Economic Forum या संस्थेने जाहीर केला आहे.

15)चंद्रबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेश राज्याच्या मुख्यमंत्री पदाची चौथ्यांदा शपथ घेतली आहे.

16) आंध्र प्रदेश राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी पवन कल्याण यांची निवड झाली आहे.

18) भारत आणि जपान देशात Jimex-24 या नौदल अभ्यासाचे आयोजन करण्यात आले आहे.

17) टी. के. चथूत्री यांचे निधन झाले. ते फुटबॉल या खेळाशी संबंधित होते.

19) जगप्रसिद्ध सरोद वादक पंडित राजीव तारानाथ यांना 2019 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

20) आंतरराष्ट्रीय सरोद वादक पंडित राजीव तारानाथ यांना 2000 साली केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

21) भारताचा किरकोळ महागाई दर मे महिन्यात 4.75 टक्क्यावर आला आहे.

22) आर्थिक वर्षे 2024 च्या शेवटच्या तिमाहीत देशाच्या कृषी आणि सलग्न क्षेत्राची वाढ 1.1 टक्के झाली आहे.

23) पेमा खांडू यांची अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी सलग तिस-यांदा निवड झाली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...