Thursday, 6 June 2024

Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy

विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23 मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून average गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.


👉ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला PYQ analysis+ PYQ info तोंड पाठ जरी केली तरी पुरेस आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये आलेला जर्मन सिल्व्हर चा प्रश्न PYQ होता आणि त्यात 3-4 प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेले दिसतात.


👉गट ब मुख्य पेपर-2 आणि गट क मुख्य पेपर-2 मध्ये विचारलेल्या विज्ञानाच्या प्रश्नांचे Analysis ही नक्की करा.संयुक्त पूर्व 23 पेक्षा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी होती.या 2 पेपर मध्ये प्राणी वर्गिकरणावर 4-5 प्रश्न आलेले दिसतात.

✅जीवशास्त्र | Biology:


1.प्राण्याचे वर्गीकरण

2.वनस्पती वर्गीकरण

3. ग्रंथी संप्रेरके आणि विकरे

4. पोषण द्रव्ये

5. रोग लक्षणे आणि चिन्हे (यात जीवाणूजन्य, विषाणूजन्य,कवके,असंसर्ग जन्य यांचा अभ्यास)


✅रसायनशास्त्र | Chemistry 


1. अणू आणि त्याची रचना

2. आवर्तसारणी 

3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण

4. खनिजे आणि धातुके

5. किरणत्सारीता आणि आण्विक रसायनशास्त्र

6. कार्बनी संयुगे


✅भौतिशास्त्र | Physics 


1.प्रकाश

2.ध्वनी

3.विद्युत धारा

4.ऊर्जा,कार्य व शक्ती

5. गती आणि बल

6. प्रकाश,भिंग,आरसे

7.किरणोत्सारीता 


👉Science चे स्टेट बोर्ड मधील One liner Problems ही चांगले करा.त्यात जे फक्त फॉर्म्युला टाकून एक दोन स्टेप मध्ये सोडवायचे छोटे छोटे problems आहेत बऱ्याचदा तेच आलेले दिसतात.


👉विज्ञान विषय अभ्यासताना मुलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला तरच तो विषय समजून गुण येतात.या साठी अभ्यास करताना जी संकल्पना समजली नाही ती youtube वर search करून Video स्वरूपात बघितली तर चांगली लक्षात राहील (उदा.Cell structure).YT वर बऱ्याच channel वर वरील सर्व topics मोफत उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल.


🚨सर्वात महत्वाचे........❌

👉बरेच जण मला msg करतात की सर विज्ञानात गुण मिळत नाही,खूप टेन्शन आलंय.जेव्हा त्यांच्याशी बोलणं होत तेव्हा प्रत्यक्षात अस जाणवत की त्यांना मुळात गणितात 8-10 गुण असतात,Polity मध्ये 7-8 गुण असतात. लक्षात घ्या विज्ञान तुमची लीड किती असणारे? हे ठरवणार नाही. ते गणित बुध्दिमत्ता आणि polity ठरवणार आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये पूर्व गणित one liner होत.मुलांनी त्यात 18-19 गुण पण घेतले आहेत.

विज्ञानात कमी गुण मिळतात म्हणून आता त्यात PHD च करतो अस ही काही जन ठरवतात.परंतु तस करू नका.त्यात किती जरी अभ्यास केला तरी अमुक अमुक गुण मिळतीलच हे सांगता येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतः ला 2 प्रश्न विचारा.

1. मला गणित बुद्धिमातेत किमान 15 पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत ना? इतका आत्मविश्र्वास आलंय ना?

2. मला Polity मध्ये 12+ गुण मिळणार आहेत ना?


या 2 प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर पहिले 2 विषय focus करा. कारण ते predictable आहेत आणि input output ratio ही खूप high आहे.


👉विज्ञानाला घाबरायच काही कारण नाही...

Combine पूर्व 23 ला बरेच जण प्रश्न बघून घाबरून गेले.मुळात त्याच कारण हे आहे की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायची मानसिकता.वर सांगितल्या प्रमाणे कमीत कमी वेळात अभ्यास करून Avg गुण मिळवायचे ध्येय ठरवा.जास्त टेन्शन घेऊ नका.

बाकी गणित,polity,Geo,Eco,His आहेच score करायला.💯


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...