Saturday, 18 May 2024

सुनील छेत्री तडकाफडकी निवृत्त


➡️सोशल मीडियावर घोषणा : ६ जूनला कुवेतविरुद्ध खेळणार अखेरचा सामना


🔖छेत्रीचा जलवा  :-


💡२००७, २००९ आणि २०१२ मध्ये नेहरू चषक विजेत्या भारतीय संघात सुनील छेत्रीचे मोलाचे योगदान.


💡 दक्षिण आशियाई महासंघ (सॅफ) अजिंक्यपद स्पर्धेत भारताला २०११, २०१५ आणि २०२१ मध्ये जेतेपद मिळवून देण्यात सुनील छेत्रीची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.


💡२००८ साली सुनील छेत्रीच्या जोरावर भारताने एएफसी चॅलेंज चषक पटकावला. यामुळे २७ वर्षात पहिल्यांदाच भारताला २०११ साली एएफसी आशियाई चषक स्पर्धेत खेळता आले.


💡२००२ मध्ये मोहन बागान संघातून क्लब फुटबॉलमध्ये पदार्पण केलेल्या छेत्रीने अमेरिकेत २०१० मध्ये मेजर लीग फुटबॉल स्पर्धेत टीम कन्सास सिटी विझाडर्सकडून छाप पाडली.


💡सात वेळा एआयएफएफचा सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या छेत्रीने इस्ट बंगाल, डेम्पो या संघांसह आयएसएलमध्ये मुंबई सिटी एफसी आणि बंगळुरू एफसीकडून चमकदार खेळ केला.


💡छेत्रीने बंगळुरू एफसी संघाकडून खेळताना आय-लीग, आयएसएल आणि सुपर चषक स्पर्धेत जेतेपद पटकावले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...