Wednesday, 15 May 2024

चालू घडामोडी :- 15 मे 2024

◆ भारतात सध्या 4 कोटी घरे ब्रॉडबँड ने जोडलेली असून देशात सर्वाधिक 97 टक्के घरात ब्रॉडबँड आहे.

◆ अर्जेंटिना देशाने त्यांच्या चलनातील अतापर्यंतची सर्वाधिक 10 हजार पेसोची नोट चलनात आणली आहे.

◆ जगातील सर्वाधिक वजनदार रॉकेट स्टारशिप चे चौथ्यांदा उड्डाण कऱण्यात येत असून हे रॉकेट SPACE X या कंपनीने बनवले आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी क्रमवारी 2024 मध्ये देशातील एकूण 55 उच्च शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पहिल्या 200 मध्ये भारतातील 14 उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशनच्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था 162व्या स्थानी आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये सिंगापूर या देशाच्या नानयांग टेक्नॉलॉजीकल विद्यापीठाने प्रथम स्थान मिळवले आहे.

◆ टाईम्स हायर एज्युकेशन च्या युवा युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये केरळ राज्यातील महात्मा गांधी विद्यालय यांनी 81वे स्थान पटकावले आहे.

◆ अमेरिकन कॉलेज ऑफ इंडोक्रिनोलॉजीचा मास्टरशिप सन्मान मिळवणारे "डॉ. शशांक जोशी" हे अमेरिकेबाहेरील पहिले डॉक्टर ठरले आहेत.

◆ वकील हे ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत येत नाहीत असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदवले आहे.

◆ पुण्यातील उद्योजक रवी पंडित यांनी फोबर्सच्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत स्थान मिळवले आहे.

◆ 13 ते 15 मे दरम्यान नेदरलँड या देशात विश्व हायड्रोजन शिखर संमेलन 2024 चे आयोजन केले जात आहे.

◆ इंडोनेशिया या देशातील माऊंट इब्रू ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे.

◆ भारतीय नौकायन संघटनेने सीनियर नॅशनल नौकानयान स्पर्धा 2024 आयोजन मुंबई येथे केले आहे.

◆ भारताचा 85 वा बुद्धीबळ ग्रँडमास्टर ठरलेला पी. श्याम निखिल हा तामिळनाडू राज्याचा खेळाडू आहे.

◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस 15 मे रोजी साजरा करण्यात येतो.

◆ आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन 2024 ची थीम "family and climate change" ही आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...