Friday, 10 May 2024

चालू घडामोडी :- 10 मे 2024

◆ भारताचा क्रिकेट संघाचा खेळाडू विराट कोहली हा टी-20 क्रिकेट मध्ये 400 हून अधिक षटकार ठोकणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.

◆ भारताने वस्तूंच्या जागतिक निर्यात दारांमध्ये 19 व्या स्थानावरून 17व्या स्थानावर झेप घेतली आहे.

◆ संयुक्त राष्ट्रांने 25 मे हा दिवस जागतिक फुटबॉल दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली आहे.

◆ वर्गीस कोशी यांचे नुकतेच निधन झाले ते बुद्धिबळ या खेळाशी संबंधित होते.

◆ जगात सर्वात श्रीमंत शहरांची यादीत मुंबई 24व्या क्रमांकावर आहे.

◆ जगातील सर्वात श्रीमंत शहरांच्या यादीत न्यूयॉर्क शहर प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारत या देशाने जपान देशाला मागे टाकून जगातील तिसरा सर्वाधिक सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे.

◆ 2023 मध्ये चीन या देशाने सौर ऊर्जा पासून सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे.

◆ स्कॉटलंड या देशाचे प्रथम मंत्री म्हणून जॉन स्विनी यांची निवड झाली आहे.

◆ भारत बायोटेक कंपनी द्वारे क्षयरोग या आजारावरील MTBVAC ही लस विकसित करण्यात येत आहे.

◆ भारताच्या तेजस्वीन शंकरने टक्सन, ऍरिझोना, यूएसए येथे झालेल्या USATF फेस्टिव्हलमध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत विजय मिळवला.

◆ श्री पवन सिंधी यांना त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ आयआरडीएआयने केकी मिस्त्री यांच्या एचडीएफसी लाइफच्या अध्यक्षपदी नियुक्तीला अधिकृत मान्यता दिली आहे.

◆ समाजावर सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी केलेल्या असाधारण प्रयत्नांची दखल घेत पवन सिंधी यांना ग्लोबल प्राइड ऑफ सिंधी पुरस्कार 2024 हा सन्मान देण्यात आला आहे.

◆ दरवर्षी 10 मे रोजी जगभरात लोक जागतिक ल्युपस दिवस साजरा करतात.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...