Wednesday, 8 May 2024

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो.

◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

◆ ‘बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन’ (BRO) ने 7 मे 2024 रोजी आपला 65 वा स्थापना दिवस साजरा केला.

◆ भारत आणि भूतान यांच्यातील 5वी संयुक्त सीमाशुल्क गट (JGC) बैठक लेह, लडाख येथे आयोजित करण्यात आली आहे.

◆ कमांडंट कॉन्क्लेव्हच्या सहाव्या आवृत्तीचे पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.

◆ भावी मेहता यांनी ‘द बुक ब्यूटीफुल’ साठी 9वा ऑक्सफर्ड बुकस्टोअर बुक कव्हर अवॉर्ड्स 2024 जिंकला आहे.

◆ IIT मद्रास-समर्थित स्टार्टअप ‘माइंडग्रूव्ह टेक्नॉलॉजीज’ ने पहिली स्वदेशी डिझाइन केलेली मायक्रोकंट्रोलर चिप लाँच केली आहे.

◆ ‘राकेश सिंग’ यांची पेटीएम मनीच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ व्लादिमीर पुतिन यांच्या शपथ विधीला भारताचे राजदूत "विनय कुमार" हे उपस्थित होते.

◆ 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा कझाकिस्तान या देशामध्ये पार पडली आहे.

◆ कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने 7 सुवर्णपदके जिंकले आहेत.

◆ महाराष्ट्र राज्याच्या "सृष्टी साठे" हिने आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत 63 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे.

◆ काझाकिस्तान येथे झालेल्या 22 वर्षांखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकून 43 पदके जिंकली आहेत.

◆ भारत आणि घाना देशाची संयुक्त व्यापार समितीची बैठक अक्रा (घाना) येथे पार पडली आहे.

◆ 26 व्या युके आशिया फिल्म फेस्टिवल मध्ये "शबाना आझमी" या भारतीय व्यक्तीला फ्रीडम ऑफ सिटी ऑफ लंडन अवॉर्ड ने सन्मानित करण्यात येणार आहे.

◆ 26 व्या युके आशिया फिल्म फेस्टिवल चे आयोजन लंडन येथे करण्यात आले आहे.

◆ गुरुग्राम प्रशासनाने युजवेंद्र चहल या भारतीय क्रिकेट खेळाडुची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केली आहे.

◆ हेन्री ड्युनंट यांच्या सन्मानार्थ 8 मे हा दिवस विश्व रेडक्रॉस दिन म्हणून साजरा केला जातो.

◆ अमेरीका देशात COVID-19 रोगाचा FLIRT नावाचा नविन व्हेरियंट आढळून आला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...