Friday, 3 May 2024

चालू घडामोडी :- 03 मे 2024

◆ ‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन’ दरवर्षी 03 मे रोजी साजरा केला जातो.

◆ 2024 मध्ये भारत प्रतिष्ठित '46 व्या अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक' आयोजित करेल.

◆ ‘वैशाली रमेश बाबू’ यांना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने ‘ग्रँडमास्टर’ या पदवीने सन्मानित केले आहे.

◆ न्यूझीलंडमध्ये 11 वी भारत-न्यूझीलंड संयुक्त व्यापार समिती (JTC) बैठक पार पडली.

◆ 'हितेश कुमार सेठिया' यांची तीन वर्षांसाठी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ EZTax ने भारतातील पहिले AI-सक्षम IT फाइलिंग मोबाइल ॲप लाँच केले आहे.

◆ वरिष्ठ IRS अधिकारी 'प्रतिमा सिंग' यांची 'डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री ॲण्ड इंटर्नल ट्रेड' (DPIIT) च्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अलीगढ मुस्लिम विद्यापीठाचे प्रा. मोहम्मद रिहान यांनी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थेचे (NISE) महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ युक्रेन या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगातील पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रवक्ता सादर केली आहे.

◆ युक्रेन ने सादर केलेल्या जगातील पहिल्या AI प्रवक्ताचे नाव "व्हिक्टोरिया शी" हे आहे.

◆ जपान देशातील कंपन्यांनी जगातील पहिले हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस तयार केले आहे.

◆ जपान देशातील कंपन्यांनी तयार केलेल्या जगातील पहिल्या हाय स्पीड 6G वायरलेस डिवाइस चा वेग 100GB पर सेकंद आहे.

◆ UPI सरखी प्रणाली विकसित करण्यासाठी NPCI ने नामिबिया या देशाच्या बँकेसोबात करार केला आहे.

◆ भारताचा बुद्धीबळ पटू डी. गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत 6व्या स्थानावर पोहचला आहे.

◆ नॉर्वे देशाचा खेळाडू मॅग्नस कार्लसन जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

◆ टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये IISC बेंगलोर 32व्या स्थानावर आहे.

◆ टाईम हायर एज्युकेशन द्वारा जारी करण्यात आलेल्या एशिया युनिव्हर्सिटी रँक 2024 मध्ये चीन देशाची tasinghua युनिव्हर्सिटी प्रथम क्रमांकावर आहे.

◆ आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ महासंघाने द्वारे ग्रँडमास्टर किताब ने सन्मानित करण्यात आलेली वैशाली रमेश बाबू ही तिसरी भारतीय महिला खेळाडू आहे.

◆ व्हिटली गोल्ड पुरस्कार हा पर्यावरण संबंधी पुरस्कार ब्रिटन(UK) या देशाकडून देण्यात येतो.

◆ भारताच्या लोकसभा निवडणुकीत शोम्पेन जमातीच्या लोकांनी पहिल्यांदा मतदान केले. ते ग्रेट निकोबार बेट या भगात राहतात.

◆ 46वी अंटार्क्टिका करार सल्लागार बैठक भारतात 20 ते 30 मे 2024 या कालावधीत कोची येथे आयोजित करण्यात येणार आहे.

◆ आलोक शुक्ला यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 प्राप्त झाला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...