Thursday, 2 May 2024

चालू घडामोडी :- 02 मे 2024

◆ दरवर्षी 2 मे रोजी जागतिक टूना दिवस जगभरात साजरा केला जातो.

◆ IQAir नुसार, काठमांडू हे जगातील सर्वात प्रदूषित शहर असल्याचे आढळून आले आहे.

◆ भारतीय नौदलाने ओडिशाच्या किनारपट्टीवर 'सुपरसोनिक मिसाइल-असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पेडो' (SMART) प्रणालीची यशस्वी चाचणी घेतली आहे.

◆ एअर मार्शल 'नागेश कपूर' यांनी ट्रेनिंग कमांडमध्ये एअर ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (AOC-in-C) म्हणून पदभार स्वीकारला आहे.

◆ ‘भारत’ संघाने आशियाई कॅरम चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ भारतीय edtech स्टार्टअप ‘Emeritus’ ने TIME च्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे.

◆ व्हाइस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी मौसमी चक्रवर्ती यांनी ऑल इंडिया रेडिओ न्यूजच्या महासंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

◆ एप्रिल महिन्यात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक मासिक GST कर संकलन झाले आहे.

◆ स्मार्ट हे क्षेपणास्त्र DRDO या संस्थेद्वारे विकसित करण्यात आले आहे.

◆ सध्या जागतिक जहाज बांधणी क्षेत्रात भारत 22व्या क्रमांकावर आहे.

◆ वयाच्या 60 व्या वर्षी मिस युनिव्हर्स आयर्स चा किताब जिंकणाऱ्या अलेजांड्रा रॉड्रिगज या अर्जेंटिना देशाच्या नागरिक आहेत.

◆ पुढील वर्षी होणाऱ्या कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचे यजमानपद भारत या देशाला मिळाले आहे.

◆ कुमार जागतिक बॅडमिंटन स्पर्धा 2025 भारतात गुवाहाटी येथे आयोजित करण्यात येणार आहे.

◆ इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (IREDA) या कंपनीला नवरत्न दर्जा देण्यात आला आहे.

◆ IERDA ही नवरत्न दर्जा प्राप्त करणारी भारतातील 18वी कंपनी ठरली आहे.

◆ IERDA या कंपनीला नवरत्न दर्जा मिळाला आहे. या कंपनीची स्थापना 1987 साली झाली आहे.

◆ उत्तर प्रदेश राज्यातील फुरसतगंज रेल्वे स्टेशन चे नाव बदलून तपेश्वर नाथ धाम करण्यात आले आहे.

◆ एअर ऑफिसर कमांडींग इन चीफ ट्रेनिंग कमांड या पदावर नागेश कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...